Google Pixel 3a आणि Pixel 3a XL फ्लिपकार्ट वर झाले लिस्ट, 8 मे ला भारतात होतील लॉन्च

गूगलने घोषणा केली आहे कि कंपनी आपल्या पिक्सल सीरीज मध्ये मोठे बदल करणार आहे. अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या कि गूगल आता हाईएंड फ्लॅगशिप सेग्मेंट पासून दूर जात पिक्सल डिवाईस लॉन्च करेल. कंपनी येत्या 7 मे ला आपला स्वस्त पिक्सल फोन लॉन्च करेल ज्यात Pixel 3a आणि Pixel 3a XL यांचा समावेश असेल. तर आज इंडियन स्मार्टफोन यूजर्सना खुशखबर देत गूगलच्या स्वस्त पिक्सल फोनची इंडिया लॉन्च डेट पण समोर आली आहे. अंर्तराष्ट्रीय लॉन्च सोबत 8 मे ला Google चे नवीन पिक्सल फोन इंडियन बाजारात येतील. शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण गूगल ईवेंट बद्दल प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे.

लॉन्च डिटेल
Google ने कही दिवसांपूर्वी टीजर रिलीज करून सांगितले होते कि 7 मे ला कंपनी ‘पिक्सल यूनिवर्स मध्ये मोठा बदल करणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी अमेरिकेतील सॅनफ्रांसिस्को मध्ये Google I/O ची सुरवात केली जात आहे, ज्यात गूगल कडून सॉफ्टवेयर, अॅप्स व एंडरॉयडच्या क्षेत्रात नवीन घोषणा केल्या जातील. याच ईवेंटच्या मंचावरून कंपनी ने स्वस्त पिक्सल फोन पण बाजारात येतील.

तसेच भारतात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट ने गूगल साठी प्रोडक्ट पेज बनवून या नवीन पिक्सल डिवाईसेजच्या इंडिया लॉन्चची स्थिती पण स्पष्ट केली आहे. फ्लिपकार्ट वर 8 मे च्या तारखे सोबत ‘सोबत रहा’ लिहिण्यात आले आहे. गूगलच्या स्वस्त पिक्सल फोन बद्दल बोलले जात आहे की यात Pixel 3a आणि Pixel 3a XL यांचा समावेश असेल. 8 मे ला भारतात हे दोन्ही स्मार्टफोन लॉन्च होण्याची पूर्णपणे शक्यता आहे. तर फोन सेलची माहिती लॉन्च नंतर मिळेल.

हे देखील वाचा: Vivo Y95 आणि Y91 च्या किंमतीत झाली मोठी कपात, बघा नवीन किंमत

स्पेसिफिकेशन्स
आता पर्यंत आलेल्या लीक्स नुसार गूगल Pixel 3a मध्ये 5.6-इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकते तसेच Pixel 3a XL मध्ये 6-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. हे दोन्ही फोन क्लियरली वाइट, जस्ट ब्लॅक आणि बियॉन्ड ब्लॅक एंड वाइट मध्ये लॉन्च केले जाऊ शकतात. पिक्सल 3ए मध्ये एक्टिव एज, टाइटन एम सिक्यॉरिटी चिप आणि ई-सिम सारखे फीचर्स असतील. लीक नुसार पिक्सल 3 च्या लाइट वर्जन गूगल द्वारा 4जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 32जीबी व 64जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.

रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की या स्मार्टफोन्सची कॅमेरा परफॉर्मेंस Pixel 3a आणि Pixel 3a XL सारखी असेल. म्हणजे कंपनी लाइट वर्जन मध्ये पण कॅमेरा क्वॉलिटीशी तडजोड करणार नाही. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाल्यास लीक नुसार Pixel 3a च्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाईल तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 2,915एमएएच ची बॅटरी असल्याची बातमी या लीक मध्ये सांगण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Samsung Galaxy S10 5G model मध्ये लागली ​आग, यूजरचे झाले मोठे नुकसान

किंमत
विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात इंटरनेट वर Pixel 3a आणि Pixel 3a XL च्या प्राइज संबंधित लीक पण समोर आला होता. या लीक मध्ये सांगण्यात आले होते कि पिक्सल 3ए 490 यूएस डॉलर पर्यंतच्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो या किंमतीचा फोन 64जीबी स्टोरेज वेरिएंट सह येईल. तसेच पिक्सल 3ए एक्सएल च्या 64जीबी वेरिएंटची किंमत या लीक मध्ये 600 यूएस डॉलर सांगण्यात आली होती. या किंमती भारतीय करंसी नुसार क्रमश: 34,000 रुपये तसेच 41,000 रुपयांच्या आसपास असतिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here