Google Pixel 4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 16 Oct 2019 12:32:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Google Pixel 4 आणि Pixel 4XL झाले लॉन्च, शानदार कॅमेरा आणि प्रोसेसरच्या जीवावर करेल का मार्केटवर राज्य https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-and-pixel-4xl-launch-with-dual-rear-camera-know-price-and-specification/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-and-pixel-4xl-launch-with-dual-rear-camera-know-price-and-specification/#respond Wed, 16 Oct 2019 12:30:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5534 सर्वात महत्वाची बातमी अशी कि पिक्सल 4 सीरीज भारतात लॉन्च केली जाणार नाही.

The post Google Pixel 4 आणि Pixel 4XL झाले लॉन्च, शानदार कॅमेरा आणि प्रोसेसरच्या जीवावर करेल का मार्केटवर राज्य first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google ने अखेरीस आपली Pixel 4 सीरीज अधिकृतपणे लॉन्च केली आहे. गूगल पिक्सल 4 सीरीज काल न्यूयॉर्क मध्ये आयोजित Made by Google इवेंट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने गूगल पिक्सल 4 आणि गूगल पिक्सल 4 एक्सएल अनेक शानदार फीचर्स आणि दमदार कॅमेऱ्यासह सादर केले आहेत. फोन्स मध्ये यावेळी मागे चौकोनी आकाराचा डुअल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे.

किंमत आणि उपलब्धता

Google Pixel 4 ची बेस किंमत $799 (जवळपास 57,100 रुपये) आहे आणि गूगल पिक्सल 4 एक्सएल 899 डॉलर (जवळपास 64,000 रुपये) मध्ये विकला जाईल. तसेच डिवाइस कालच प्री-ऑर्डर साठी आले आहेत आणि 24 ऑक्टोबरपासून हे शिप केले जातील.

भारतात होणार नाहीत लॉन्च

सर्वात महत्वाची बातमी अशी कि पिक्सल 4 सीरीज भारतात लॉन्च केली जाणार नाही. याची माहिती स्वतः कंपनीने दिली आहे. गूगलने आपल्या विधानात अधिकृतपणे सांगितले आहे कि Pixel 4 भारतात येणार नाही. याचे कारण फोनच्या फ्रंटला असेलेली Soli Radar Chip आहे. जिच्या मदतीने मोशन सेंस (motion sense) आणि फेस अनलॉक (face unlock) फीचर चालतात.

दोन्ही फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच दोन्ही फोन्स 6जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज व 6जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज मॉडल मध्ये सादर केले गेले आहेत. पण स्टोरेज वाढवण्याचा पर्याय फोन मध्ये नाही. फोन्स मध्ये गूगल क्लाउड स्टोरेज मिळेल.

मोशन सेंस

कंपनीने पिक्सल 4 सीरीज मध्ये मोशन सेंस फीचर दिला आहे जो सर्वात आधी सोनी एरिक्सन फोन्स मध्ये दिसला होता. गूगलच्या नव्या टेक्नॉलजीच्या मदतीने यूजर्स आपला फोन स्पर्श न करता वापरू शकतील. या फीचरच्या मदतीने यूजर्स गाणी बदलणे, अलार्म बंद करणे आणि फोन कॉल साइलेंट करणे अशी कामे फक्त हातच्या इशाऱ्याने करू शकतील.

Pixel 4XL आणि Pixel 4 चे स्पेसिफिकेशन्स

पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्सएल चे स्पेसिफिकेशन पाहता दोन्ही हँडसेट मध्ये इंप्रूव्ड गूगल असिस्टेंट, गूगल कॅमेरा 7.1 ऍप, क्विक जेस्चर आणि मोशन सेंस सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच Pixel 4 मध्ये 5.7 इंचाचा फुल-एचडी+ ओलेड स्मूथ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच पिक्सल 4 एक्सएल मध्ये 6.3 इंचाचा क्वाड एचडी+ ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

तसेच फोन्स नवीन एंडरॉयड 10 वर आधारित आहेत. हा पहिला फोन नाही जो एंडरॉयड 10 सह लॉन्च झाला आहे. दोन्ही फोन मध्ये नॅनो सिम स्लॉट आहे. डुअल सिम कनेक्टिविटी साठी ई-सिम सपोर्ट आहे.

पावर बॅकअप साठी पिक्सल 4 मध्ये बॅटरी 2,800 एमएएच ची आहे आणि पिक्सल 4 एक्सएल मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18 वॉट फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. यावेळी फोन्सची खासियत अशी कि यात डुअल रियर कॅमेरा आहे. पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्सएल मध्ये दोन रियर कॅमेरा आहेत. पिक्सल 4 सीरीज मध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर (एफ/ 2.4 अपर्चर) आणि 12.2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा (एफ/ 1.7 अपर्चर, 77 डिग्री फील्ड ऑफ व्यू) आहे.

The post Google Pixel 4 आणि Pixel 4XL झाले लॉन्च, शानदार कॅमेरा आणि प्रोसेसरच्या जीवावर करेल का मार्केटवर राज्य first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-and-pixel-4xl-launch-with-dual-rear-camera-know-price-and-specification/feed/ 0
Google Pixel 4 XL चा खरा फोटो आला समोर, 15 ऑक्टोबरला लॉन्च होईल हा प्रीमियम डिवाईस https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-xl-real-hands-on-images-leaked-look-design-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-xl-real-hands-on-images-leaked-look-design-revealed/#respond Wed, 25 Sep 2019 10:56:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5412 डिजाईन सोबत असे पण समजले आहे कि Google Pixel 4 XL स्मार्टफोन 90हर्ट्ज डिस्प्ले रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

The post Google Pixel 4 XL चा खरा फोटो आला समोर, 15 ऑक्टोबरला लॉन्च होईल हा प्रीमियम डिवाईस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 15 ऑक्टोबरला न्यूयॉर्क सिटी मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून पिक्सल सीरीजचा नवीन फोन Pixel 4 आणि Pixel 4 XL लॉन्च केला जाईल . कंपनीने या ईवेंटला Google Event 2019 चे नाव दिले आहे आणि यादिवशी कंपनी पिक्सल स्मार्टफोन्स सोबत Pixelbook 2 आणि Google Home सारखे इतर प्रोडक्ट्स पण लॉन्च करू शकते. हा ईवेंट Made by Google या नावाने प्रमोट केला जात आहे. 15 ऑक्टोबरला लॉन्च होणाऱ्या प्रोडक्ट्स मध्ये ज्याची सर्वात जास्त चर्चा आहे तो आहे Pixel फोन. Pixel 4 आणि Pixel 4 XL बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत आणि आता लॉन्चच्या आधीच Pixel 4 सीरीज स्मार्टफोनचे खरे फोटोज पण इंटरनेट वर वायरल झाले आहेत.

Google Pixel 4 XL चे फोटोज नेक्स्टरिफ्ट द्वारा शेयर केले गेले आहेत. हे हॅंडसॉन फोटोज आहेत ज्यात Pixel 4 XL हातात घेऊन प्रत्येक अँगलने दाखवण्यात आला आहे. लीक झालेल्या फोटोज मध्ये Pixel 4 XL च्या फ्रंट आणि बॅक पॅनल सोबतच साईड पॅनलचे फोटो दाखवण्यात आले आहेत ज्यावरून फोनच्या लुक आणि डिजाईन सोबत अनेक महत्वाच्या फीचर्सची माहितीचा खुलासा झाला आहे. डिजाईन सोबत असे पण समजले आहे कि Google Pixel 4 XL स्मार्टफोन 90हर्ट्ज डिस्प्ले रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

अशी असेल डिजाईन

Google Pixel 4 XL च्या डिजाईनची सुरवात फोनच्या फ्रंट पॅनल पासून करूया, हा फोन नॉच-लेस डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच नाही. Pixel 4 XL दोन्ही बाजू पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खाली आणि वर बारीक बॉडी पार्ट आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला असलेल्या बॉडी पार्ट वर स्पीकर देण्यात आला आहे तर बाजूला एक सेल्फी कॅमेरा सेंसर आणि एक फेस रेक्ग्नेशन सेंसर आहे. समोर आलेल्या फोटो मध्ये डिस्प्ले राउंड कॉर्नर सह दाखवण्यात आला आहे.

Pixel 4 XL च्या बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर इतर कोणताही सेंसर नाही तसेच खालच्या बाजूला Google चा लोगो आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे ज्याच्या खाली सिम स्लॉट स्थित आहे. तसेच वॉल्यूम रॉकर फोनच्या डाव्या पॅनल वर देण्यात आला आहे. Google Pixel 4 XL यूएसबी टाईपी सी पोर्टला सपोर्ट करेल.

स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 4 XL च्या फोटोज वरून समजले आहे कि यात ‘Smooth Display’ मोड दिला जाईल ज्यामुळे फोनचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 60हर्ट्ज वरून 90हर्ट्ज पर्यंत होईल. लीक्स नुसार हा स्मार्टफोन 6.23 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करेल. तसेच Pixel 4 मध्ये 5.7 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. बोलले जात आहे कि दोन्ही ही मॉडेल्स मध्ये 3040 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असेलला डिस्प्ले दिला जाईल.

Pixel 4 XL मध्ये 12 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस या फोन मध्ये मिळू शकते. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. पावर बॅकअप साठी Pixel 4 मध्ये 2800एमएएच आणि Pixel 4 XL मध्ये 3700एमएएच ची मोठी बॅटरी मिळू शकते.

The post Google Pixel 4 XL चा खरा फोटो आला समोर, 15 ऑक्टोबरला लॉन्च होईल हा प्रीमियम डिवाईस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-xl-real-hands-on-images-leaked-look-design-revealed/feed/ 0
Google Pixel 4 आणि Pixel 4 XL येतील 15 ऑक्टोबरला समोर, कंपनीने शेयर केले इनवाइट https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-pixel-4-xl-launching-on-15-october-confirmed-by-company/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-pixel-4-xl-launching-on-15-october-confirmed-by-company/#respond Tue, 17 Sep 2019 12:24:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5333 या फीचर्सच्या मदतीने यूजर्स गाणी बदलणे, अलार्म बंद करणे आणि फोन कॉल साइलेंट करणे अशी कामे फक्त आपल्या हातच्या इशाऱ्याने करू शकतील.

The post Google Pixel 4 आणि Pixel 4 XL येतील 15 ऑक्टोबरला समोर, कंपनीने शेयर केले इनवाइट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि Google आपल्या फोनची नवीन सीरीज Pixel 4 आणि Pixel 4 XL वर काम करत आहे, जे कंपनी यावर्षी अक्टूबर पर्यंत लॉन्च करू शकते. आता कंपनीने ऑफिशियली माहिती दिली आहे कि 15 ऑक्टोबरला न्यूयॉर्क मध्ये Google Event 2019 चे आयोजन केले जाईल. या इवेंट मध्ये पुढील Pixel सीरीज लॉन्च केली जाऊ शकते.

Google ने यासाठी मीडिया इंवाइट पाठवायला सुरवात केली आहे. हा इवेंट पुढल्या महिन्यात 15 ऑक्टोबरला आयोजित केला जाईल. या इवेंट मध्ये Pixel 4, Pixel 4 XL व्यतिरिक्त Google चे इतर प्रोडक्ट्स पण लॉन्च केले जाऊ शकतात.

पिक्सल 4 सीरीजच्या स्मार्टफोन्स सोबत या इवेंट मध्ये कंपनी Pixelbook 2, Google Home speakers चे पुढील जेनरेशन लॉन्च करू शकते. 15 ऑक्टोबरला होणारा इवेंट Made by Google नावाने प्रमोट केला जात आहे.

हे देखील वाचा: OnePlus 7T आणि OnePlus TV होतील 26 सप्टेंबरला लॉन्च, 7T Pro पण होऊ शकतो सादर

काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि Pixel 4 सीरीजच्या फोन्स मध्ये एक नवीन फीचर येईल जो पहिल्यांदाच पिक्सल डिवाइस दिसेल. या फीचर्स बद्दल गूगल म्हणते कि कंपनी अनेक दिवसांपासून यांच्यावर काम करत आहे, जो आता पर्यंत ‘Soli’ प्रॉजेक्ट नावाने ओळखला जात आहे.

मोशन सेंसर संबंधित फीचर आधी सोनी एरिक्सन फोन्स मध्ये पण आला आहे. गूगलच्या नवीन टेक्नॉलजीच्या मदतीने यूजर्स आपला फोनला स्पर्श न करता वापरू शकतील. कंपनीने ब्लॉग पोस्ट मध्ये लिहिले आहे कि Pixel 4 सोली सह येणारा पहिला डिवाइस आहे, जो नवीन मोशन सेंसर फीचर सह येईल. या फीचर्सच्या मदतीने यूजर्स गाणी बदलणे, अलार्म बंद करणे आणि फोन कॉल साइलेंट करणे अशी कामे फक्त आपल्या हातच्या इशाऱ्याने करू शकतील.

स्पेसिफिकेशन्स

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार Google Pixel 4 मध्ये 1,080 x 2,280 पिक्सल रिजोल्यूशन वाला डिस्प्ले असेल. Pixel 4 XL मध्ये 1,440 x 3,040 पिक्सल असलेला डिस्प्ले असेल. अपकमिंग गूगल फ्लॅगशिप फोन मध्ये5जी असेल. असे बोलले जात आहे कि पिक्सल डिवाइस मध्ये 128जीबी स्टोरेज दिली जाईल. दुसऱ्या स्टोरेज वेरिएंटची माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधीच समोर आली डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा असेलेल्या Vivo V17 Pro ची किंमत, 20 सप्टेंबरला आहे भारतातील लॉन्च

Google Pixel 4 आणि Pixel 4 XL बद्दल बोलले जात आहे कि फोन मध्ये क्वाॉलकॉमचा फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगॉन 855 Plus चिपसेट असेल. फोन एंडरॉयड 10 वर चालेले.

The post Google Pixel 4 आणि Pixel 4 XL येतील 15 ऑक्टोबरला समोर, कंपनीने शेयर केले इनवाइट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-pixel-4-xl-launching-on-15-october-confirmed-by-company/feed/ 0
डुअल कॅमेरा आणि या वेगळ्या डिजाइन सह येईल Google Pixel 4, कंपनीने केले कंफर्म https://www.91mobiles.com/marathi/google-revealed-the-pixel-4-on-twitter/ https://www.91mobiles.com/marathi/google-revealed-the-pixel-4-on-twitter/#respond Thu, 13 Jun 2019 12:41:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4567 गूगलच्या ऑफिशियल अकाउंट @madebygoogle वरून एक ट्विट करण्यात आले आहे

The post डुअल कॅमेरा आणि या वेगळ्या डिजाइन सह येईल Google Pixel 4, कंपनीने केले कंफर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सर्च इंजन दिग्गज गूगलच्या Pixel सीरीजच्या नेक्स्ट जेनरेशन स्मार्टफोन Pixel 4 बद्दल पण खूप दिवसांपासून लीक्स समोर येत होते. अनेक मीडिया रिपोर्ट्स मध्ये Pixel 4 चा लुक, डिजाइन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स संबंधित बरीच माहिती समोर आली आहे. आता स्वतः गूगल ने पिक्सल 4 चे फोटो शेअर करून सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

विशेष म्हणजे गूगलच्या ऑफिशियल अकाउंट @madebygoogle वरून एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विट मध्ये कंपनीने Pixel 4 चे फोटो शेयर केले आहेत, ज्यात फोनचा बॅक पॅनल दिसत आहे. यावरून असे स्पष्ट झाले आहे कि पिक्सल 4 डिवाइस मध्ये मागील बाजूस एका चौकोनी कॅमेरा मॉड्यूल सह येईल, ज्यात डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. आतापर्यंत अशाप्रकारचा सेटअप असलेला इतर कुठलाही पिक्सल स्मार्टफोन बाजारात उपलब्ध नाही. सध्या बाजारात उपलब्ध सर्व पिक्सल मॉडल्स मध्ये सिंगल कॅमेरा सेंसर आहे.

तसेच फोनच्या खालच्या बाजूला गूगलची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. जरी फोनचा मागील पॅनल या ट्विट मध्ये नीट दाखवला नसला तरी रियर पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट स्कॅनर दिसत नाही. त्यामुळे अंदाज लावला जात आहे आहे कि कंपनी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देईल किंवा 3डी फेस अनलॉक मॉड्युल असेल किंवा दोन्ही असतील.

तसेच आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार फोनच्या काहलच्या बाजूला दोन एक्सटर्नल स्पीकर्स असतील ज्याच्या मध्ये यूएसबी-सी पोर्ट असेल. Google ने टेक बाजारात एंडरॉयडची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम Android Q सादर केली आहे. गूगल आपला Pixel डिवाईसे लेटेस्ट एंडरॉयड ओएस सह बाजारात आणते. त्यामुळे कंपनी द्वारा लॉन्च होणाऱ्या आगामी स्मार्टफोन Pixel 4 मध्ये पण एंडरॉयडच्या सर्वात नवीन ऑपरेटिंग सिस्टम मिळेल.

The post डुअल कॅमेरा आणि या वेगळ्या डिजाइन सह येईल Google Pixel 4, कंपनीने केले कंफर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-revealed-the-pixel-4-on-twitter/feed/ 0
डुअल पंच-होल सेल्फी कॅमेऱ्यासह लीक झाला Google Pixel 4, फोन असेल Samsung Galaxy S10+ पेक्षा पण जास्त ताकदवान https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-screen-protector-dual-punch-hole-selfie-camera-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-screen-protector-dual-punch-hole-selfie-camera-leaked/#respond Fri, 31 May 2019 11:07:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4474 Pixel 4 च्या बेस मॉडल मध्ये सिंगल पंच-होल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

The post डुअल पंच-होल सेल्फी कॅमेऱ्यासह लीक झाला Google Pixel 4, फोन असेल Samsung Galaxy S10+ पेक्षा पण जास्त ताकदवान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज Google ने अलीकडेच आपल्या Pixel डिवाईसचे स्वस्त वर्जन Pixel 3a आणि Pixel 3a XL लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन Pixel 3 आणि Pixel 3 XL चे डाउनग्रेडिड वर्जन आहे जे मीड बजेट मध्ये उतरवण्यात आले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन व्यतिरिक्त Google च्या Pixel सीरीजच्या नेक्स्ट जेनरेशन स्मार्टफोन Pixel 4 बद्दल पण अनेक दिवसांपासून लीक्स समोर येत आहेत. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्स मध्ये Pixel 4 च्या लुक, डिजाईन, फीचर्स व स्पेसिफिकेशन्स संबंधित बरीच माहिती समोर आली आहे. आता Pixel 4 चा स्क्रीन प्रोटेक्टर इंटरनेट वर लीक झाला आहे. हा स्क्रीन प्रोटेक्टर समोर आल्याने पुन्हा एकदा Pixel 4 च्या डिजाईनचा खुलासा झाला आहे.

Google Pixel 4 चा हा स्क्रीन प्रोटेक्टर बनवणाऱ्या कंपनी skinomi ने आपल्या वेबसाइट वर हा लिस्ट केला आहे. स्क्रीन प्रोटेक्टर वेबसाइट वर उपलब्ध करण्यासोबतच या कंपनीने याच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बद्दल पण सांगितले आहे. या स्क्रीन प्रोटेक्टर मध्ये Pixel 4 च्या स्पीकर आणि कॅमेरा सेंसर साठी वेगळे होल बनवण्यात आले आहेत, ज्यामुळे फोनच्या फ्रंट पॅनल आणि याच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे.

Pixel 4 च्या या स्क्रीन प्रोटेक्टर मध्ये वर उजवीकडे कर्व्ड ऐज वाला आयताकार आहे. हा आयताकार होल फोनच्या फ्रंट पॅनल वरील कॅमेरा सेंसर साठी बनवण्यात आला आहे ज्याने स्पष्ट झाले आहे कि Google Pixel 4 च्या फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या वर कॅमेरा सेंसर दिले जातील. तसेच होलच्या डिजाईन मुळे हे पण स्पष्ट झाले कि Pixel 4 एक नाही तर सोन सेल्फी कॅमेरा सेंसर्स सह येईल. हे दोन्ही ही कॅमेरा सेंसर फोन बॉडी वर नव्हे तर डिस्प्लेच्या वर असतील.

तुमच्या लक्षात असेलच कि अशीच फ्रंट कॅमेरा डिजाईन Samsung च्या Galaxy S10 Plus मध्ये पण होती. सॅमसंगने या कॅमेरा डिजाईनला इनफिनिटी ओ डिस्प्लेचे नाव दिले होते. तर इतर टेक कंपन्या डिस्प्ले वरील सेल्फी कॅमेऱ्याला पंच-होल डिस्प्ले पण म्हणतात. दोन सेल्फी कॅमेरा सेंसर्स बघून म्हणता येईल कि हा स्क्रीन प्रोटेक्टर Google Pixel 4 च्या हाईयर मॉडेलचा असू शकतो. तर Pixel 4 च्या बेस मॉडल मध्ये सिंगल पंच-होल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

एंडरॉयड क्यू
Google ने टेक बाजारात एंडरॉयडची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम Android Q सादर केली आहे. गूगल आपले Pixel डिवाईसेज लेटेस्ट एंडरॉयड ओएस सह बाजारात आणते. त्यामुळे कंपनी द्वारा लॉन्च केले जाणाऱ्या आगामी स्मार्टफोन Pixel 4 मध्ये पण एंडरॉयडची हि नवीन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम असेल.

स्पेसिफिकेशन्स
Google Pixel 4 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आता पर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल. Pixel 4 चे वेगवेगळे मॉडेल वेगवेगळ्या रॅम सह येतील. तसेच प्रोसेसिंग साठी गूगल आपला नवीन फोन क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 सह बाजारात आणेल. Google Pixel 4 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट पण मिळू शकतो. बेंचमार्किंग स्कोर बद्दल बोलायचे तर गीकबेंचने या फोनला सिंगल-कोर टेस्ट मध्ये 744 आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 3201 स्कोर दिला आहे.

The post डुअल पंच-होल सेल्फी कॅमेऱ्यासह लीक झाला Google Pixel 4, फोन असेल Samsung Galaxy S10+ पेक्षा पण जास्त ताकदवान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-screen-protector-dual-punch-hole-selfie-camera-leaked/feed/ 0
गूगल करणार आहे मोठा धमाका, ऑलस्क्रीन फोनची करत आहे तयारी नवीन पेटेंट वरून मिळाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-patent-files-full-display-phone-slider-panel-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-patent-files-full-display-phone-slider-panel-in-marathi/#respond Wed, 16 Jan 2019 13:07:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3391 फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन किंवा नॉच नाही

The post गूगल करणार आहे मोठा धमाका, ऑलस्क्रीन फोनची करत आहे तयारी नवीन पेटेंट वरून मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एखाद्या स्मार्टफोन फॅनला विचारले की सर्वात बेस्ट कॅमेरा फोन कोणता तर नक्कीच अनेकजण उत्तर ‘गूगल पिक्सल’ असेल. फक्त यूजर नव्हे तर टेक विश्वाने पण गूगल पिक्सलला बेस्ट कॅमेरा फोन म्हणून मान्यता दिली आहे. दमदार स्पेसिफिकेशन्स आणि शानदार लुक व फीचर्स असलेले पिक्सल फोन आणणारी गूगल आता पुन्हा एकदा हवा करणार आहे. गूगल ने नवीन पिक्सल फोन साठी पेटेंट फाईल केले आहे. या पेटेंट मध्ये नवीन पिक्सलची डिजाईन पण समोर आली आहे जी आत्तापर्यंत लॉन्च झालेल्या पिक्सल स्मार्टफोन्स पेक्षा जास्त वेगळी आणि चांगली आहे.

गूगल पिक्सल सीरीजच्या या नवीन फोनला पिक्सल 4 नाव देण्यात आले आहे. गूगल ने नवीन पिक्सल डब्ल्यूआईपीओ (वर्ल्ड इंटलेक्चुअल प्रोपर्टी आर्गनाइजेशन) वर सब्मिट केला आहे. वेबसाइट वर नवीन गूगल पिक्सल चे स्केच फोटो पण दाखवण्यात आले आहेत ज्यात फोनच्या फ्रंट व बॅक पॅनल सोबत सर्व साईड पॅनल तसेच टॉप व बॉटम पॅनल पण दाखविण्यात आले आहेत. सर्वात आधी फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर हा बघून म्हणू शकतो की गूगल कंपनी पिक्सल 3 मध्ये नॉच दिल्या नंतर आता डिस्प्ले अजून एडवांस करणार आहे.

पिक्सल फोनच्या फ्रंट पॅनल फुल डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन किंवा नॉच नाही. फ्रंट पॅनल वर कोणतेही एज नाही. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला नॉच किंवा कोणताही सेंसर दिसत नाही. नॉच नसल्यामुळे पिक्सल फोन मध्ये सेल्फी कॅमेरा पण फ्रंट पॅनल वर दिला जाणार नाही. हा डिस्प्ले पाहता बोलले जात आहे कि कदाचित गूगल आपला आगामी पिक्सल फोन स्लाईडर पॅनल सह लॉन्च करू शकते.

गूगलच्या नवीन पिक्सलचा बॅक पॅनल वर कंपनीच्या आधीच्या स्मार्टफोन्स प्रमाणे देण्यात आला आहे. बॅक पॅनल वर वरच्या बाजूला सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा सेंसरच्या उजव्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. पिक्सल च्या बॅक पॅनल वरच मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. नवीन पिक्सलची साईड एज वाली आहे. फोनकच्या उजव्या पॅनल वर पावर बटन आणि वाल्यूम रॉकर आहे. तसेच फोनच्या डावीकडे पॅनल वर सिम ट्रे दिसत आहे.

नवीन पिक्सल मध्ये खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. या फोन मध्ये 3.5एमएम जॅक असेल कि नाही हे समोर आलेल्या फोटो वरून समजलेले नाही. विशेष म्हणजे समोर आलेल्या फोटो मध्ये फोनची साईज मोठी दाखवण्यात आली आहे. आशा केली जाऊ शकते कि गूगलचा हा फोन 6 इंचाच्या स्क्रीन सह लॉन्च होईल. फोन मध्ये स्लाईडर पॅनल दिदिला जाईल कि नाही आणि फोनचा सेल्फी कुठे असेल हे आता सांगता येत नाही.

गूगल कधी आपला हा नवीन पेटेंट कधी सार्वजनिक करेल आणि हा नवीन पिक्सल फोन कोणत्या नावाने टेक मंचावर येईल. या माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत घोषणा व विश्वसनीय सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीची वाट बघितली जात आहे.

The post गूगल करणार आहे मोठा धमाका, ऑलस्क्रीन फोनची करत आहे तयारी नवीन पेटेंट वरून मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-patent-files-full-display-phone-slider-panel-in-marathi/feed/ 0