Govt Schemes - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 12 May 2023 12:24:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स सारखे महत्वाचे ठेवा फोनमध्ये; काही स्टेप्समध्ये सुरु करा डिजीलॉकर https://www.91mobiles.com/marathi/how-to-start-digilocker/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-start-digilocker/#respond Sun, 14 May 2023 03:59:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17200 How To Start DigiLocker: डिजीलॉकर (DigiLocker) भारत सरकारचं क्लाउड डॉक्यूमेंट स्टोरेज वॉलेट आहे. हा प्लॅटफॉर्म इलेक्ट्रॉनिक आणि इनफॉर्मेंशन टेक्नॉलॉजी मंत्रालय (MeitY) नं डिजिटल इंडिया अंतगर्त तयार केला आहे. याच्या मदतीनं भारतीय नागरिक आपले डॉक्यूमेंट डिजीटल स्वरूपात व्हेरिफाय करण्यासह स्टोर देखील करू शकतात. उदा जर तुम्हाला बँकमधील अकाऊंटसाठी KYC करायची असेल तर तुम्ही डिडीलॉकरद्वारे ऑनलाइन करू […]

The post पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स सारखे महत्वाचे ठेवा फोनमध्ये; काही स्टेप्समध्ये सुरु करा डिजीलॉकर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • डिजीलॉकर (DigiLocker) भारत सरकारचं क्लाउड डॉक्यूमेंट स्टोरेज वॉलेट आहे.
  • डिजीलॉकरमध्ये भारतीय नागरिक आपले सर्व डॉक्युमेंट डिजिटली सुरक्षित ठेऊ शकतात.
  • अनेक प्लॅटफॉर्म्सवर डिजीटली ऑथेंटिकेशन देखील करता येतं.

How To Start DigiLocker: डिजीलॉकर (DigiLocker) भारत सरकारचं क्लाउड डॉक्यूमेंट स्टोरेज वॉलेट आहे. हा प्लॅटफॉर्म इलेक्ट्रॉनिक आणि इनफॉर्मेंशन टेक्नॉलॉजी मंत्रालय (MeitY) नं डिजिटल इंडिया अंतगर्त तयार केला आहे. याच्या मदतीनं भारतीय नागरिक आपले डॉक्यूमेंट डिजीटल स्वरूपात व्हेरिफाय करण्यासह स्टोर देखील करू शकतात. उदा जर तुम्हाला बँकमधील अकाऊंटसाठी KYC करायची असेल तर तुम्ही डिडीलॉकरद्वारे ऑनलाइन करू शकता. DigiLocker मध्ये युजर्स आपले महत्वाचे डॉक्यूमेंट जसे की पॅन कार्ड, ड्राईव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, शाळातील मार्कशीट, इंश्योरेंस पेपर, आयुषमान कार्ड स्टोर इत्यादी स्टोर करून ठेऊ शकतात.

डिजीलॉकरमध्ये भारतीय नागरिक आपले सर्व डॉक्युमेंट डिजिटली सुरक्षित ठेऊ शकतात. तसेच अनेक प्लॅटफॉर्म्सवर डिजीटली ऑथेंटिकेशन देखील करू शकतात. याच्या मदतीनं नागरिक सरकारी सेवा, रोजगार, शिक्षा, आरोग्याच्या सुविधांचा सहज लाभ घेऊ शकतात. इथे आम्ही तुम्हाला डिजीलॉकरवर अकाऊंट क्रिएट करण्याची माहिती देणार आहोत. हे देखील वाचा: ठरलं तर! Vivo Y56 आणि Vivo Y100 करणार भारतात एंट्री; कंपनी करत आहे मोठी तयारी

DigiLocker अकाऊंट कसं बनवायचं? | How To Start DigiLocker?

स्टेप 1: गुगल प्ले स्टोर (Google Play Store) वरून सर्वप्रथम तुमच्या फोनवर DigiLocker अ‍ॅप डाउनलोड करा.

how to start digilocker

स्टेप 2: अ‍ॅप ओपन करा आणि तुमच्या भाषेची निवड करा.

how to start digilocker

स्टेप 3: स्क्रोल डाउन करा आणि ‘गेट स्टार्ट’ बटनवर टॅप करा.

how to start digilocker

स्टेप 4: तिथे ‘क्रिएट अ‍ॅन अकाऊंट’ वर क्लिक करा. हे देखील वाचा: GPay, Paytm आणि PhonePe वर अशी करा बिलाची समसमान वाटणी; कॅल्क्युलेटरचीही गरज नाही

how to start digilocker

स्टेप 5: इथे तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर, इमेल आयडी आणि आधार कार्ड नंबर संबंधित माहिती जोडा. त्यानंतर 6 डिजिट सिक्योरिटी पिन सेट करा. त्यानंतर सब्मिट बटनवर क्लिक करा.

how to start digilocker

स्टेप 6: तुमच्या तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ईमेल वर OTP पाठवला जाईल. तुम्हाला OTP सबमिट करावा लागेल, ज्या द्वारे आधारची डिटेल फेच केली जाईल. हे देखील वाचा: How To Download Youtube Shorts : पाहा युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करण्याच्या सर्वात सोप्या ट्रिक्स

अशाप्रकारे तुमचं डिजीलॉकर (DigiLocker) अकाऊंट सेटअप होईल.

The post पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स सारखे महत्वाचे ठेवा फोनमध्ये; काही स्टेप्समध्ये सुरु करा डिजीलॉकर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-start-digilocker/feed/ 0
PM Kisan Scheme: लवकरच येतोय 13 वा हप्ता; ऑनलाइन पूर्ण करा KYC, पाहा लाभार्थ्यांची यादी https://www.91mobiles.com/marathi/pm-kisan-13th-installment-date-ekyc-details-and-beneficiary-list/ https://www.91mobiles.com/marathi/pm-kisan-13th-installment-date-ekyc-details-and-beneficiary-list/#respond Wed, 07 Dec 2022 10:47:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15753 PM Kisan 13th Instalments Date 2022: सरकारनं काही दिवसांपूर्वी पीएम किसान निधी योजनेचा (PM KISAN Scheme) 12वा हप्ता जारी केला आहे. आता शेतकऱ्यांना या योजनेच्या 13व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. PM-KISAN योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे 2000 रुपयांच्या तीन सामान हप्त्यांमध्ये दर चौथ्या महिन्यात मिळतात. या योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी गरीब शेतकऱ्यांना […]

The post PM Kisan Scheme: लवकरच येतोय 13 वा हप्ता; ऑनलाइन पूर्ण करा KYC, पाहा लाभार्थ्यांची यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
PM Kisan 13th Instalments Date 2022: सरकारनं काही दिवसांपूर्वी पीएम किसान निधी योजनेचा (PM KISAN Scheme) 12वा हप्ता जारी केला आहे. आता शेतकऱ्यांना या योजनेच्या 13व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. PM-KISAN योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे 2000 रुपयांच्या तीन सामान हप्त्यांमध्ये दर चौथ्या महिन्यात मिळतात. या योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.

PM Kisan 13th Installment Date

पीएम किसान सम्मान निधीचा 13व्या हप्त्याच्या लाभार्थ्यांची यादी 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान रिलीज केली जाईल. ही लिस्ट ऑफिशियल वेबसाइट pmkisan.gov.in वर चेक करता येईल. त्यानंतर ही पीएम किसान निधीची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. परंतु पीएम किसान निधीच्या पुढील हप्त्याबाबत सरकारनं कोणतीही अधिकृत घोषणा केली आहे. हे देखील वाचा: Bank of Maharashtra Recruitment: 45 वर्षांपर्यंतच्या वयोमर्यादेसह सरकारी बँकेत नोकरी; पगार 1 लाखांपेक्षा जास्त

PM Kisan Samman Nidhi – ऑनलाइन रजिस्ट्रेशन

स्टेप 1: ऑफिशियल वेबसाइट pmkisan.gov.in वर लॉगइन करा.

स्टेप 2: होम वेबसाइटवर ‘फार्मर कॉर्नर’ मध्ये ‘बेनिफिशयरी स्टेटस’ वर क्लिक करा.

स्टेप 3: आता तुम्हाला तुमचा रजिस्टर आधार नंबर किंवा बँक अकाऊंट नंबर टाका.

स्टेप 4: त्यानंतर ‘गेट डेटा’ वर क्लिक करा.

स्टेप 5: आता तुम्हाला इंस्टॉलमेंट स्टेटस दिसेल.

ज्या शेतकऱ्यांनी आपली eKYC पूर्ण केली नाही, त्यांना योजनेचा 13वा हप्ता मिळणार नाही.

PM Kisan योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटनुसार, “पीएम किसान योजनेत रजिस्टर केल्या शेतकऱ्यांना eKYC करणे आवश्यक आहे. ई-केवायसी पीएमकिसान पोर्टलवर OTP च्या माध्यमातून करता येते.

PM Kisan e-KYC ऑनलाइन कशी करायची?

  • PM Kisan योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटवर लॉगइन करा आणि eKYC ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला Aadhaar Card नंबर, कॅप्चा कोड आणि आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबर टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला एक OTP मिळेल, तो एंटर करा. अशाप्रकारे तुमची eKYC प्रोसेस पूर्ण होईल.

हे देखील वाचा: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! तुमची ट्रेन कुठे आहे हे पाहा मोबाइलवर, जाणून घ्या सोपी पद्धत

रेशन कार्डची प्रत असणं आवश्यक

पीएम किसान निधीच्या 13 व्या हप्त्यासाठी रेशन कार्ड खूप आवश्यक आहे. शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशनसाठी शेतकऱ्यांना रेशन कार्ड द्यावं लागेल. शेतकऱ्यांना रेशन कार्डची हार्ड कॉपी नव्हे तर पीडीएफ कॉपी अपलोड करावी लागेल. त्यासाठी आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जावं लागेल. तसेच तुम्हाला रेशन कार्डची पीडीएफ फाईल बनवावी लागेल आणि तिथे तुमच्या रेशन कार्डची सॉफ्ट कॉपी जमा करावी लागेल. रेशन कार्डची फाईल अपलोड न केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

The post PM Kisan Scheme: लवकरच येतोय 13 वा हप्ता; ऑनलाइन पूर्ण करा KYC, पाहा लाभार्थ्यांची यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pm-kisan-13th-installment-date-ekyc-details-and-beneficiary-list/feed/ 0
Ayushman Bharat Card Download: आयुष्मान भारत कार्ड घर बसल्या करा डाउनलोड, 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत https://www.91mobiles.com/marathi/ayushman-bharat-card-download/ https://www.91mobiles.com/marathi/ayushman-bharat-card-download/#respond Wed, 09 Nov 2022 12:46:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14779 Ayushman Bharat Card Download: केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाची योजना आयुष्मान भारतच्या माध्यमातून देशातील नागरिकांना आरोग्य सेवा मोफत दिल्या जातात. या योजनाच्या माध्यमातून नागरिक सरकारी आणि प्रायव्हेट इस्पितळांमध्ये आपला उपचार मोफत करू शकतात. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साल 2018 मध्ये लाँच केली होती. या योजनेअंतगर्त देशातील कोट्यवधी लोकांना मोफत उपचार मिळत आहे. आयुष्मान कार्ड धारकांना […]

The post Ayushman Bharat Card Download: आयुष्मान भारत कार्ड घर बसल्या करा डाउनलोड, 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Ayushman Bharat Card Download: केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाची योजना आयुष्मान भारतच्या माध्यमातून देशातील नागरिकांना आरोग्य सेवा मोफत दिल्या जातात. या योजनाच्या माध्यमातून नागरिक सरकारी आणि प्रायव्हेट इस्पितळांमध्ये आपला उपचार मोफत करू शकतात. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साल 2018 मध्ये लाँच केली होती. या योजनेअंतगर्त देशातील कोट्यवधी लोकांना मोफत उपचार मिळत आहे. आयुष्मान कार्ड धारकांना सरकारी आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत मिळतात.

या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड बाबत माहिती देणार आहोत. जर तुम्ही आयुष्मान भारत योजनेस पात्र असाल तर कशाप्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, याची माहिती पुढे देण्यात आली आहे. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला आयुष्मान भारत कार्डची पात्रता चेक करण्याची आणि हे कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत सांगितली आहे.

आयुष्मान भारत कार्डची पात्रता कशी चेक करायची

आयुष्मान भारत कार्डची पात्रता चेक करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटवर जावं लागेल. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे की कशाप्रकारे तुम्ही आयुष्मान भारत कार्डची पात्रात चेक करू शकता.

स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला mera.pmjay.gov.in वेबसाइटवर जावं लागेल. इथे तुम्हाला तुमचा फोन नंबर, कॅप्चा कोड टाकून लॉगइन करावं लागेल. लॉगइन केल्यावर तुम्हाला योजनेच्या पात्रातेची माहिती मिळेल.

स्टेप 2: त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचं राज्य टाकून विचारलेली सर्व माहिती भरून तुमची पात्रता जाणून घेता येईल.

नोट: पंतप्रधान जन आरोग्य योजना केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना काही राज्यांत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वप्रथम ही योजना तुमच्या राज्यात लागू आहे की नाही ते तपासून घे.

आयुष्मान भारत कार्ड कसं डाउनलोड करायचं

जर तुमच्या राज्यात आयुष्मान भारत योजना लागू असेल आणि तुम्ही आयुष्मान भारत योजनेस पात्र असाल तर तुम्ही घर बसल्या हे कार्ड डाउनलोड करू शकता. इथे आम्ही तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत सांगणार आहोत.

स्टेप 1: आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी https://bis.pmjay.gov.in/BIS/selfprintCard लिंक ओपन करा.

स्टेप 2: इथे तुम्हाला आधार कार्डवर क्लिक करण्यास सांगितलं जाईल. त्यासाठी सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर जनरेट OTP वर क्लिक करा.

स्टेप 3: OTP दिल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्मान कार्डची पीडीएफ फाईल डाउनलोड होईल. हे कार्ड सोबत बाळगून तुम्ही आयुष्मान भारतच्या पॅनलमधील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकता.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Ayushman Bharat Card Download: आयुष्मान भारत कार्ड घर बसल्या करा डाउनलोड, 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ayushman-bharat-card-download/feed/ 0