PM Kisan Scheme: लवकरच येतोय 13 वा हप्ता; ऑनलाइन पूर्ण करा KYC, पाहा लाभार्थ्यांची यादी

PM Kisan 13th Instalments Date 2022: सरकारनं काही दिवसांपूर्वी पीएम किसान निधी योजनेचा (PM KISAN Scheme) 12वा हप्ता जारी केला आहे. आता शेतकऱ्यांना या योजनेच्या 13व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. PM-KISAN योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे 2000 रुपयांच्या तीन सामान हप्त्यांमध्ये दर चौथ्या महिन्यात मिळतात. या योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.

PM Kisan 13th Installment Date

पीएम किसान सम्मान निधीचा 13व्या हप्त्याच्या लाभार्थ्यांची यादी 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान रिलीज केली जाईल. ही लिस्ट ऑफिशियल वेबसाइट pmkisan.gov.in वर चेक करता येईल. त्यानंतर ही पीएम किसान निधीची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. परंतु पीएम किसान निधीच्या पुढील हप्त्याबाबत सरकारनं कोणतीही अधिकृत घोषणा केली आहे. हे देखील वाचा: Bank of Maharashtra Recruitment: 45 वर्षांपर्यंतच्या वयोमर्यादेसह सरकारी बँकेत नोकरी; पगार 1 लाखांपेक्षा जास्त

PM Kisan Samman Nidhi – ऑनलाइन रजिस्ट्रेशन

स्टेप 1: ऑफिशियल वेबसाइट pmkisan.gov.in वर लॉगइन करा.

स्टेप 2: होम वेबसाइटवर ‘फार्मर कॉर्नर’ मध्ये ‘बेनिफिशयरी स्टेटस’ वर क्लिक करा.

स्टेप 3: आता तुम्हाला तुमचा रजिस्टर आधार नंबर किंवा बँक अकाऊंट नंबर टाका.

स्टेप 4: त्यानंतर ‘गेट डेटा’ वर क्लिक करा.

स्टेप 5: आता तुम्हाला इंस्टॉलमेंट स्टेटस दिसेल.

ज्या शेतकऱ्यांनी आपली eKYC पूर्ण केली नाही, त्यांना योजनेचा 13वा हप्ता मिळणार नाही.

PM Kisan योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटनुसार, “पीएम किसान योजनेत रजिस्टर केल्या शेतकऱ्यांना eKYC करणे आवश्यक आहे. ई-केवायसी पीएमकिसान पोर्टलवर OTP च्या माध्यमातून करता येते.

PM Kisan e-KYC ऑनलाइन कशी करायची?

  • PM Kisan योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटवर लॉगइन करा आणि eKYC ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला Aadhaar Card नंबर, कॅप्चा कोड आणि आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबर टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला एक OTP मिळेल, तो एंटर करा. अशाप्रकारे तुमची eKYC प्रोसेस पूर्ण होईल.

हे देखील वाचा: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! तुमची ट्रेन कुठे आहे हे पाहा मोबाइलवर, जाणून घ्या सोपी पद्धत

रेशन कार्डची प्रत असणं आवश्यक

पीएम किसान निधीच्या 13 व्या हप्त्यासाठी रेशन कार्ड खूप आवश्यक आहे. शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशनसाठी शेतकऱ्यांना रेशन कार्ड द्यावं लागेल. शेतकऱ्यांना रेशन कार्डची हार्ड कॉपी नव्हे तर पीडीएफ कॉपी अपलोड करावी लागेल. त्यासाठी आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जावं लागेल. तसेच तुम्हाला रेशन कार्डची पीडीएफ फाईल बनवावी लागेल आणि तिथे तुमच्या रेशन कार्डची सॉफ्ट कॉपी जमा करावी लागेल. रेशन कार्डची फाईल अपलोड न केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here