internet - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 How To Test Internet Speed: तुमचा इंटरनेट प्रोव्हायडर देतोय का ठरलेला स्पीड? चुटकीसरशी करा चेक https://www.91mobiles.com/marathi/how-to-test-internet-speed/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-test-internet-speed/#respond Sun, 27 Nov 2022 04:00:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14083 How To Test Internet Speed: भारतात Airtel 5G Plus आणि Jio Ture 5G सेवा सुरु झाल्या आहेत. एक ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 5G लाँच केलं होतं, त्यानंतर एयरटेलनं देशात 8 शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली होती. तसेच रिलायन्स जियोनं 6 ऑक्टोबरला पाच शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली आहे. 5G सर्व्हिसमध्ये टेलिकॉम कंपन्यांनी हाय-स्पीड […]

The post How To Test Internet Speed: तुमचा इंटरनेट प्रोव्हायडर देतोय का ठरलेला स्पीड? चुटकीसरशी करा चेक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
How To Test Internet Speed: भारतात Airtel 5G Plus आणि Jio Ture 5G सेवा सुरु झाल्या आहेत. एक ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 5G लाँच केलं होतं, त्यानंतर एयरटेलनं देशात 8 शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली होती. तसेच रिलायन्स जियोनं 6 ऑक्टोबरला पाच शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली आहे. 5G सर्व्हिसमध्ये टेलिकॉम कंपन्यांनी हाय-स्पीड इंटरनेटचा दावा केला आहे. असा दावा तुमचे लोकल इंटरनेट प्रोव्हायडर देखील करतात. परंतु यात किती तथ्य आहे हे तुम्ही एका टेस्टनं जाणून घेऊ शकता. इंटरनेट स्पीड टेस्टच्या मदतीनं तुम्ही तुमचा इंटरनेट स्पीड मोजू शकता, मग लोकल प्रोव्हायडर असो किंवा तुमची टेलिकॉम कंपनी.

How To Test Internet Speed

इंटरनेट आता घरोघरी पोहोचलं आहे. त्यामुळे अधूनमधून इंटरनेट स्पीडचा प्रॉब्लम डोकं वर काढतो. जर तुम्हाला देखील इंटरनेट कनेक्शनचा स्पीड चेक करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला स्मार्ट पद्धत सांगणार आहोत, जिच्या मदतीनं तुम्ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरून चुटकीसरशी इंटरनेट स्पीड चेक करू शकता. इथे आम्ही तुम्हाला स्मार्टफोन आणि लॅपटॉपवरून इंटरनेट स्पीड चेक करण्याची माहिती आली आहे. हे देखील वाचा: झक्कास! 101 रुपयांमध्ये मिळतायेत Vivo Phone, दिवाळीच्या आधी कंपनीची जबराट ऑफर

Internet Speed Test

इंटरनेट स्पीड चेक करण्यासाठी तुम्हाला फोन किंवा फिर लॅपटॉपच्या ब्राउजर मध्ये Internet Speed असं सर्च करावं लागेल.

इथे तुम्हाला गुगल सर्च बॉक्समध्ये पहिला ऑप्शन गुगलच्या इंटरनेट स्पीड टेस्टचा दिसेल.

या बॉक्समध्ये तुम्हाला ‘रन स्पीड टेस्ट’ Run Speed Test वर क्लिक करावं लागेल, त्यानंतर तुमच्या इंटरनेट कनेक्शनचा डाउनलोड आणि अपलोड स्पीड चेक करता येईल.

तसेच fast.com किंवा speedtest.net सारख्या वेबसाइट देखील तुमच्या कनेक्शनचा इंटरनेट स्पीड सांगू शकतात.

स्मार्टफोनमध्ये App देखील करेल मदत

जर तुम्हाला फोनच्या ब्राउजरमधून इंटरनेट स्पीड चेक करायचा नसेल तर तुमच्या फोनमध्ये अ‍ॅप देखील इंस्टॉल करता येईल. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवरून Ookla App इंस्टॉल करावं लागेल. इंटरनेट स्पीड टेस्ट कारण्याच्याबाबतीत विश्वासू अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप आतापर्यंत 100 मिलियन पेक्षा जास्त वेळा इंस्टॉल करण्यात आलं आहे. हे देखील वाचा: 5G पेक्षा 4G उत्तम; ‘या’ 5 कारणांमुळे नव्या नेटवर्कपासून तुम्ही देखील दूर राहाल

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post How To Test Internet Speed: तुमचा इंटरनेट प्रोव्हायडर देतोय का ठरलेला स्पीड? चुटकीसरशी करा चेक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-test-internet-speed/feed/ 0
मोबाईल डेटा स्पीड मध्ये अशी आहे India ची रँकिंग, भारताची पुन्हा घसरण https://www.91mobiles.com/marathi/global-mobile-data-speed-india-ranked-131/ https://www.91mobiles.com/marathi/global-mobile-data-speed-india-ranked-131/#respond Wed, 28 Oct 2020 13:53:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8708 ग्लोबल मोबाईल डेटा स्पीड चार्ट मध्ये भारताचे शेजारी देश जसे कि नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका पण पुढे आहेत. हे तिन्ही देश या लिस्ट मध्ये क्रमशः 102, 116 आणि 117 नंबर वर येतात. तर भारत 131व्या नंबर वर येतो.

The post मोबाईल डेटा स्पीड मध्ये अशी आहे India ची रँकिंग, भारताची पुन्हा घसरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात मिळणारा डेटा जगात सर्वात स्वस्त आहे. पण असे असूनही ग्लोबल मोबाईल डेटा स्पीड चार्ट मध्ये भारत पुढे जात नाही. असा खुलासा एका लेटेस्ट रिपोर्ट मध्ये झाला आहे. मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोन यूजर बेस असूनही इतर देशांच्या तुलनेत भारत मोबाईल डेटा स्पीड लिस्ट मध्ये 131व्या नंबर वर आला आहे. याची माहिती Ookla Speedtest Global Index च्या सप्टेंबर 2020 रिपोर्ट मध्ये समोर आली आहे.

Ookla च्या रिपोर्टनुसार भारतात सरासरी मोबाईल डाउनलोड स्पीड 12.07Mbps आहे. तर ग्लोबल सरासरी मोबाईल डेटा स्पीड 35.26 आहे. इसके तसेच देशातील सरासरी मोबाईल अपलोड स्पीड आणि लेटन्सी क्रमशः 4.31Mbps आणि 52ms आहे. पण हा स्पीड ग्लोबल लेवल वर 11.22 आणि लेटन्सी रेट 42ms आहे. या नंबर्स मध्ये फरक स्पष्ट दिसत आहे.

पाकिस्तानच्या पण मागे

ग्लोबल मोबाईल डेटा स्पीड चार्ट मध्ये भारताचे शेजारी देश जसे कि नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका पण पुढे आहेत. हे तिन्ही देश या लिस्ट मध्ये क्रमशः 102, 116 आणि 117 नंबर वर येतात. तर भारत 131व्या नंबर वर येतो.

ब्रॉडबॅंड मध्ये रँकिंग चांगली

ब्रॉडबॅंड मध्ये भारताची स्थिती थोडी चांगली आहे. 70व्या नंबर सह देशात सरासरी डाउनलोड स्पीड 46.47Mbps आहे. विशेष म्हणजे ग्लोबल स्पीड इंडेक्स दरवर्षी रोल आउट केली जाते आणि प्रत्येक वर्षी भारताची रँकिंग खालीच जात आहे.

अलीकडेच इंडस्ट्री ट्रॅकर ओपन सिग्नलने लेटेस्ट रिपोर्ट जारी केला होता, ज्यात त्या देशांची यादी होती जे 5G डाउनलोड स्पीड मध्ये टॉपला आहेत. हालांकि, यात भारताचे नाव नाही. पण जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल कि कोणत्या देशांनी यात बाजी मारली आहे तर पुढे आम्ही याची माहिती दिली आहे.

ओपन सिग्नलच्या रिपोर्टनुसार सौदी अरेबिया सरासरी 5G इंटरनेट स्पीड 377.2Mbps आहे, ज्यामुळे काही सेकंदात फुल एचडी फिल्म आणि आहेवी डेटा डाउनलोड केला जाऊ शकतो. त्यानंतर साउथ कोरियाचा नंबर येतो, जिथे सरासरी 5G इंटरनेट स्पीड जवळपास 336.1 मेगाबिट्स प्रति सेकंड (Mbps) आहे.

The post मोबाईल डेटा स्पीड मध्ये अशी आहे India ची रँकिंग, भारताची पुन्हा घसरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/global-mobile-data-speed-india-ranked-131/feed/ 0
फोन मध्ये वाय-फाई स्लो आहे का? मग असा करा फास्ट स्लो वाय-फाई https://www.91mobiles.com/marathi/how-to-increase-speed-of-wifi-in-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-increase-speed-of-wifi-in-smartphone/#respond Mon, 26 Oct 2020 13:26:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8667 आज आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत, जे वापरून तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मध्ये वेगाने वाय-फाई वापरू शकाल.

The post फोन मध्ये वाय-फाई स्लो आहे का? मग असा करा फास्ट स्लो वाय-फाई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात जेवढे लोक फोन मध्ये इंटरनेट वापरतात, तेवढे जगातील इतर कोणत्याही देशात वापरत नसतील. कोणत्याही बजेटचा कोणताही स्मार्टफोन असो, त्यात इंटरनेट नक्की मिळेल. इंटरनेटच्या फास्ट ऍक्सेससाठी, बिना दिक्कत व्हिडीओज बघण्यासाठी आणि मोबाईल मध्ये गेम खेळण्यासारख्या अनेक ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला कोणत्याही अडचणीविना स्मूद इंटरनेट चालू राहावे असे वाटते. तसेच यासाठी अधिकांश लोक फोन वाय-फाईशी कनेक्ट करतात. पण अनेकदा असे दिसले आहे कि फोन वाय-फाईशी कनेक्ट होऊन सुद्धा इंटरनेट खूप स्लो चालतो. त्यामुळे त्रास होतो आणि समजत नाही कि काय करावे. आज आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत, जे वापरून तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मध्ये वेगाने वाय-फाई वापरू शकाल.

फ्रिक्वेंसी बॅंड सेटिंग

स्मार्टफोन मध्ये वाय-फाई स्पीड स्लो किंवा वेगवान करण्यात फ्रिक्वेंसी बॅंडची महत्वाची भूमिका असते. आधी 2.5गीगहर्ट्ज बॅंडला सपोर्ट करणारे मोबाईल फोन्स यायचे, सध्या स्मार्टफोन्स मध्ये 5गीगाहर्ट्ज पर्यंतचा फ्रिक्वेंसी बॅंडचा सपोर्ट दिला जातो. तसे पाहता फ्रिक्वेंसी बॅंड सेटिंग मॅन्युअल पद्धतीने ऍडजस्ट केला जाऊ शकतो, पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि फ्रिक्वेंसी बॅंड ऑटो मोड वर सेट करा. असे केल्याने स्पेक्ट्रम बॅंड म्हणजे वाय-फाई डिवायस द्वारे येत असलेल्या फ्रिक्वेंसीनुसार स्मार्टफोन स्वतः त्यावर शिफ्ट होईल आणि बिना दिक्कत इंटरनेट चालू राहील.

कॅशे मेमरी

सतत वेगवेगळ्या वेबसाइट्स ऍक्सेस केल्यामुळे आणि त्यांच्यावर काम केल्यामुळे त्या वेबसाइट्सच्या नावावर सेव होत असलेली कॅशे मेमरी अनेकदा खूप जास्त स्टोर होते. बऱ्याचदा हि मेमरी एकटी हेवी होते कि ब्राउजर स्लो होतो आणि आपल्याला वाटते कि इंटरनेट स्लो आहे. अश्यावेळी इंटरनेट बदलण्याची नव्हे तर कॅशे मेमरी डिलीट करण्याची गरज असते. ब्राउजरच्या सेटिंग मध्ये जाऊन थेट कॅशे मेमरी क्लीन केली जाऊ शकते. असे केल्यावर ब्राउजर पुन्हा वेगाने चालेल.

हे देखील वाचा : दोन फोन मध्ये वापरा एकच WhatsApp, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

मॉडेमची प्लेसमेंट

बऱ्याचदा घरात वाय-फाई लावल्यानंतर एका खोलीत खूप चांगला स्पीड येतो, पण दुसऱ्या खोलीत स्पीड स्लो होतो. हि समस्या तुमच्या स्मार्टफोनची नाही तर त्या वाय-फाई राउटर किंवा मॉडेमची आहे. या समस्येचा अर्थ असा नाही कि तो खराब आहे, फक्त तो योग्य त्या ठिकाणी नाही. वाय-फाई मॉडेम एखाद्या खुल्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून राउटर मधून निघणाऱ्या वेव्स भिंती किंवा दरवाज्यामुळे अडकू नये आणि जिथे जिथे तुम्ही स्मार्टफोन घेऊन जाल तिथे फोन मध्ये फास्ट इंटरनेट चालू राहील.

सॉफ्टवेयर अपडेट

स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर फोन मध्ये वाय-फाई स्लो चालण्याचे कारण फोनचे सॉफ्टवेयर/फर्मवेयर अपडेट न होणे पण असू शकते. एखादा नवीन अपडेट आला आहे कि नाही हे स्वतःहून चेक करणे नेहमीच चांगले. आणि जर नवीन अपडेट उपलब्ध असेल तर फोन मध्ये तो इंस्टाल करा आणि स्मार्टफोन अपडेट करा. अश्या अपडेट्स नंतर एकदा फोन रिस्टार्ट करणे चांगले. स्टेप्स फॉलों केल्यानंतर फोन मध्ये पुन्हा वाय-फाई वेगाने चालेल.

फोनचा कवर पण असू शकतो मोठे कारण

आजकल स्मार्टफोनला स्टाईलिश लुक देण्यासाठी वेगवेगळे आर्कषक मोबाईल कवर बाजारात मिळतात. पण हे मोबाईल कवर पण स्मार्टफोन मध्ये वाय-फाई आणि इंटरनेटचा स्पीड कमी करतात. मेटल कवर किंवा हार्ड प्लास्टिक शेल फोनच्या अँटिना बॅंड्स वर येतात. तसेच अश्या कवरमूळे वाय-फाई वेव्स पण डिस्ट्रॉट होतात, ज्यामुळे इंटरनेटचा स्पीड कमी होतो. एकदा चेक करा कि कवरविना वाय-फाई नीट चालत आहे कि नाही. जर चालत असेल तर तो कवर न वापरणे नेहमीच चांगले.

The post फोन मध्ये वाय-फाई स्लो आहे का? मग असा करा फास्ट स्लो वाय-फाई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-increase-speed-of-wifi-in-smartphone/feed/ 0
लॉकडाउन नंतर 70 टक्क्यांनी वाढला इंटरनेटचा वापर, स्पीड घटला 30 टक्क्यांनी https://www.91mobiles.com/marathi/internet-speed-slower-down-data-consumption-increased-due-to-coronavirus-work-from-home-mobile-broadband/ https://www.91mobiles.com/marathi/internet-speed-slower-down-data-consumption-increased-due-to-coronavirus-work-from-home-mobile-broadband/#respond Mon, 30 Mar 2020 13:20:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6937 बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांत इंटरनेट डेटाचा वापर 70 टक्क्यांनी वाढला आहे.

The post लॉकडाउन नंतर 70 टक्क्यांनी वाढला इंटरनेटचा वापर, स्पीड घटला 30 टक्क्यांनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coronavirus ने भारताला जणू थांबवले आहे. संपूर्ण देश लॉकडाउन आहे आणि सर्व नागरिक आपला काम धंदा सोडून घरी बसले आहेत. गेल्याच आठवड्यात आम्ही हे जाणले होते आणि घरी बसल्यावर लोक इंटरनेटच्या मदतीने लोक टाईमपास करत आहेत. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही सांगितले होते कि इंडियन यूजर्स कशाप्रकारे आपला इंटरनेट डेटा वाचवू शकतात आणि बराच काळ चालू शकता. आता देशातील इंटरनेटचा वेगाने वाढत असलेल्या वापराचे आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत. रिपोर्ट मध्ये खुलासा झाला आहे कि गेल्या आठवड्यातच देशात इंटरनेटचा वापर 30 टक्क्यांनी वाढला आहे.

ईटी च्या रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि Coronavirus मुळे देशात झालेल्या लॉकडाउन नंतर देशात इंटरनेटच्या वापरात वेगाने वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार या काळात भारतात इंटरनेटचा वापर 30 टक्क्यांनी वाढला आहे. फक्त इतकेच नव्हे तर इंटरनेटचा वापर आधीच्या तुलनेत जास्त झाला आहे तर दुसरीकडे हा वापरामुळे इंटरनेटच्या स्पीड मध्ये पण 20 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

स्पीड अजून झाला कमी

रिपोर्टनुसार ISPAI म्हणजे इंटरनेट सर्विसेज प्रोवाइडर्स एसोसिएशन ऑफ इंडियाने सांगितले आहे कि गेल्या आठवड्यात भारतात झालेल्या लॉकडाउन नंतर देशात इंटरनेटच्या वापरात वाढ झाली आहे. इंटरनेटचा वापर जास्त झाल्यामुले स्पेक्ट्रम वर भार पडला आहे आणि इंटरनेट स्पीड घटला आहे. सध्या हि घसरण 20 टक्क्यांची आहे पण अजून दोन आठवडे सुरु राहणाऱ्या लॉकडाउन मध्ये इंटरनेटचा स्पीड अजून कमी होईल. रिपोर्ट नुसार इंटरनेट स्पीड 25 ते 30 टक्क्यांनी अजून कमी होऊ शकतो. विश्लेषकांच्या मते सरासरी इंटरनेट स्पीड 9Mbps ते 10Mbps पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

70 टक्क्यांनी वाढला आहे वापर

लॉकडाउन नंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. घरातून ऑफिसचे काम करताना सर्वांना इंटरनेटचा वापर जास्त करावा लागत आहे. देशात इंटरनेटचा वापर सरासरी 30 टक्क्यांनी वाढला आहे. मागील काही दिवसांत वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेट यूजर्सची संख्या तीन पटीने वाढली आहे. रिपोर्ट नुसार लॉकडाउन सुरु झाल्यावर बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांत इंटरनेट डेटाचा वापर 70 टक्क्यांनी वाढला आहे.

अनावश्यक मीडिया फाइल्स करू नका शेयर

इंटरनेटचा वाढता वापर आणि त्यामुळे कमी होत असलेला स्पीड लक्षात घेता इंटरनेट यूजर्सने विनंती केली जात आहे व्हाट्सऍप किंवा इतर सोशल मीडिया व मेसेंजिंग ऍप्स वर अनावश्यक मीडिया फाइल्स शेयर करणे टाळा. डेटा कंजक्शन पासून वाचण्याचा सल्ला दिला जात आहे कि खासकरून वीडियोजची देवाण घेवाण कमी केली पाहिजे ज्यामुळे विनाकारण इंटरनेट स्पेक्ट्रम व नेटवर्क वर भार पडतो.

रिपोर्टनुसार भारतात सध्या 68.76 कोटींच्या आसपास इंटरनेट यूजर आहेत आणि यातील जवळपास 66.5 कोटी यूजर वायरलेस पद्धतीने इंटरनेट वापरतात. यात स्मार्टफोन आणि डॉन्गल आणि वाईफाई चा समावेश आहे. लॉकडाउन नंतर आमच्यासारख्या अनेक लोकांना घरातून ऑफिसचे काम करावे लागत आहे. फक्त वर्क फ्रॉम होम नाही तर अनेक प्रकारच्या मूलभूत गरजा व सर्विसेज पण ऑनलाईन वापरल्या जात आहेत. त्यामुळे 91मोबाईल्स पण विंनती करत आहे कि विनाकारण इंटरनेट नेटवर्क वर बोझा पडू देऊ नका जेणेकरून बिनदिक्कत सर्वांना डेटा नेटवर्क मिळू शकेल.

The post लॉकडाउन नंतर 70 टक्क्यांनी वाढला इंटरनेटचा वापर, स्पीड घटला 30 टक्क्यांनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/internet-speed-slower-down-data-consumption-increased-due-to-coronavirus-work-from-home-mobile-broadband/feed/ 0
कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/#respond Fri, 27 Mar 2020 16:17:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6929 आज आम्ही तुम्हाला अश्या 7 टिप्स एंड ट्रिक्स सांगत आहोत ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या इंटरनेटचा वापर कमी करू शकता आणि डेटा जास्त काळ वापरू शकता.

The post कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coronavirus ने संपूर्ण भारताला थांबवले आहे. किंवा महामारीमुळे संपूर्ण भारत देश 21 दिवसांचा Lockdown सहन करत आहे जो 14 एप्रिलला संपेल. 91मोबाईल्सची पण अपील आहे कि तुम्ही तुमच्या घरात राहावे आणि कोरोनचा प्रभाव वाढू देऊ नका. आम्ही समजू शकतो कि पूर्ण दिवस घरी राहिल्यावर फक्त एक इंटरनेटच आहे जो तुमची सर्वात जास्त साथ देतो. इंटरनेटमुळे लोकांचा टाईमपास होत आहे. पण अनेक यूजर्स असे आहेत ज्यांचा इंटरनेट डेटा रात्रीपर्यंत संपतो. काही कंपन्या आपल्या प्लान्स मध्ये एफयूपी लिमिट पण देत आहेत, पण त्यात पण डेटा स्पीड खूप कमी होतो. तुमची हि समस्या लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला अश्या 7 टिप्स एंड ट्रिक्स सांगत आहोत ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या इंटरनेटचा वापर कमी करू शकता आणि डेटा जास्त काळ वापरू शकता.

1) ऑटो सिंक करा बंद

जेव्हा नवीन स्मार्टफोन घेता तेव्हा त्यात गूगल अकाउंटने लॉग-इन केली जाते. फोन मध्ये मेल आईडीच्या माध्यमातून सेटअप होतो आणि ऍप स्टोर ऍक्टिव्ह होतो. बऱ्याचदा लोक गूगल अकाउंट सेटअप केल्यावर मेलचा ऑटो सिंक ऑन करतात. ऑटो सिंकमुळे एखादा नवीन मेल आल्यावर नोटिफिकेशन्स येते. जर तुम्ही मेलचा जास्त वापर करत जरी नसला तरी पण बॅकग्राउंड मध्ये मेल इंटरनेटशी कनेक्टड असतो आणि सतत सिंक होत असतो. ऑटो सिंकमुळे फोनचा इंटरनेट डेटा पण सतत वापरला जातो. ऑटो सिंक टर्न ऑफ केल्यावर डेटाचा वापर कमी होईल.

2) WhatsApp मध्ये मीडिया ऑटो डाउनलोड करा ऑफ

आज देशात व्हाट्सऍपचा वापर सर्वात जास्त होतो. घरातील प्रत्येकाच्या फोन मध्ये हा मेसेंजिंग ऍप आहे. इतके ग्रुप असतात कि सारखी फोनची घंटी वाजत असते. बऱ्याचदा लोक WhatsApp मध्ये मीडिया ऑटो डाउनलोड ऑन ठेवतात. त्यामुळे एखादी नवीन ईमेज किंवा वीडियो फाईल व्हाट्सऍप वर आल्यावर आपोआप डाउनलोड होऊन फोन गॅलरी मध्ये सेव होतात. काही फाईल छोट्या तर काही मोठ्या असतात. सध्या तर Corona चे मेसेज धडाधड येत आहेत आणि ते डाउनलोड झाल्यावर डेटाचा वापर पण होतो. त्यामुळे जर व्हाट्सऍप वर मीडिया ऑटो डाउनलोड ऑफ केले तर इंटरनेट डेटा वाचेल.

3) ऍप करा बंद

फोन मध्ये गेम खेळात असताना काम आल्यावर होम बटण दाबून किंवा फोन लॉक करके तुम्ही तुम्ही काम करू लागता. इंटरनेट सर्फिंग, सोशल मीडिया ऍप किंवा कॅमेऱ्याच्या वापरानंतर पण अनेक लोक होम बटण दाबून ते बंद करतात. पण फक्त होम बटण दाबल्याने हे फंक्शन पूर्णपणे बंद होत नाहीत उलट बॅकग्रांउड मध्ये ऍक्टिव्ह राहतात आणि सतत बॅटरीचा वापर करतात. त्यामुळे कोणत्याही ऍप किंवा फीचरचा वापर केल्यावर ते बंद करा.

4) डेटा सेवर मोड येईल कामी

जवळपास सर्व ब्रँडसच्या स्मार्टफोन्स मध्ये डेटा सेवरचा ऑप्शन दिला जातो. फोन मधील ऍप्स द्वारा वापरला जाणारा डेटा कन्सम्प्शन मर्यादित करता यावा म्हणून हे फिचर दिलेले असते. हा मोड ऑन करून यूजर फोन मध्ये इंस्टाल्ड ऍपचा इंटरनेट वापर कमी करू शकतात. काही स्मार्टफोन्स मध्ये ‘लिमिट बॅकंग्राउंड डेटा यूज’ चा ऑप्शन पण असेल. हा ऑन केल्यावर ऍप्स द्वारे वापरला जाणारा इंटरनेट डेटा नियंत्रित केला जाऊ शकतो.

5) लोकेशन सर्विस करा बंद

जेव्हा एखादा नवीन ऍप फोन मध्ये इंस्टाल केला जातो तेव्हा त्यांना लोकेशनचा ऍक्सेस पण दिला जातो. फोन मध्ये अनेक असे ऍप्स असतात जे सतत लोकेशन ऍक्सेस करत असतात. हे ऍप्स सतत लोकेशन सर्विसशी कनेक्टेड असतात आणि यामुळे इंटरनेटचा पण सतत वापर होत असतो. ज्या ऍप्सची गरज नाही त्यांची लोकेशन सर्विस स्टॉप करा आणि आवश्यकता नसल्यास लोकेशन सर्विसच बंद करा. काही प्रमाणात इंटरनेट डेटाचा वापर कमी होईल.

6) ऑनलाईन कंटेंट ‘लो’ क्वॉलिटी वर वापरा

आधी गाणी ऐकण्यासाठी फोनच्या मेमरी मध्ये शेकडो गाणी सेव केली जात होती. पण सध्या गाणी ऐकण्यासाठी किंवा वीडियो बघण्यासाठी थेट Youtube उघडतात. त्यामुळे फक्त ऑडियो ऐकायचा असेल तर यूट्यूब मध्ये वीडियो क्वॉलिटी सर्वात कमी रेज्ल्यूशन वर ठेवा. त्याचप्रमाणे जर एखादी ऑडियो स्ट्रीमिंग ऍप वापरत असाल तर तुमची आवडती गाणी किंवा जी तुम्ही रोज ऐकता ती ऑफलाईन गॅलरी मध्ये सेव करण्याचा प्रयत्न करा. यामुळे इंटरनेट डेटाचा वापर कमी होईल.

7) फ्लाइट मोडची मदत घ्या

जर तुम्ही तुमच्या फोन मध्ये एखादा असा गेम खेळत असाल जो ऑनलाईन नेटवर्क वर चालत नाही किंवा फोन मध्ये डाउनलोडेड एखादा वीडियो बघत असाल आणि अश्यावेळी एखादा महत्वाचा कॉल किंवा मेसेज येणार नसेल तर तुम्ही काही काळासाठी फोन फ्लाइट मोड वर ठेवू शकता. या स्थितीत जीपीएस वर खर्च होणारा इंटरनेट डेटा पण वाचेल. विशेष म्हणजे फोन फ्लाइट मोड वर टाकल्यावर फोनची बॅटरी पण जास्त टिकेल.

The post कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/feed/ 0
Corona मुळे सुधारेल इंटरनेटची परिस्थिती अजून वाढेल स्पीड, जाणून घ्या अधिक माहिती https://www.91mobiles.com/marathi/corona-covid-19-better-internet-speed-for-work-from-home-act-free-300mbps-speed-data-kerala-cm-pinarayi-vijayan/ https://www.91mobiles.com/marathi/corona-covid-19-better-internet-speed-for-work-from-home-act-free-300mbps-speed-data-kerala-cm-pinarayi-vijayan/#respond Thu, 12 Mar 2020 13:09:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6773 COVID-19 म्हणजे कोरोनाच्या उपायावर संशोधन चालू आहे. हा वायरस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकत आहे.

The post Corona मुळे सुधारेल इंटरनेटची परिस्थिती अजून वाढेल स्पीड, जाणून घ्या अधिक माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीन मधून सुरु झालेल्या एका संकटाने आज संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. Corona वायरसचा प्रकोप जगात पसरला आहे आणि भारत पण यातून वाचू शकला नाही. देशात कोरोनाच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सरकार लोकांना सुरक्षित राहण्याचे दिशानिर्देश देत आहे. तर सामान्य लोक पण या घातक वायरस पासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. COVID-19 म्हणजे कोरोनाच्या उपायावर संशोधन चालू आहे. हा वायरस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकत आहे. आता एक अशीच बातमी समोर येत आहे ज्यातून समजले आहे कि कोरोना वायरसमुळे देशातील इंटरनेटची स्थिती सुधारणार आहे.

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांना त्यांच्या विभागातील इंटरनेट व्यवस्था मजबूत करण्याचा आदेश दिला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे लोक आपल्या घरातून बाहेर कमी निघत आहेत आणि लोक Work from home म्हणजे आपल्या घरातून ऑफिसचे काम करत आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वापर जास्त होत आहे आणि जास्त वापरामुळे इंटरनेट मॉडम वर पण अतिरिक्त बोझ पडत आहे. हे हातळण्यासाठी इंटरनेट दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले कि इंटरनेट सर्विस प्रोवाइडर्सना आपल्या नेटवर्कचा बॅंडविड्थ वाढवावा लागेल तसेच ब्रॉडबॅंड इंटरनेटच्या रेंज मध्ये पण वाढ करावी लागेल. तसेच इंटरनेट देणाऱ्या कंपन्यांना पण आपली सर्विस आधीपेक्षा वेगवान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे केरळच्या सीएम व्यतिरिक्त इंटरनेट ब्रॉडबॅंड सर्विस कंपनी एसीटी पण आपल्या ग्राहकांना Corona मुळे अतिरिक्त बेनिफिट देत आहे.

एसीटी ब्रॉडबॅंडने आपल्या यूजर्सना 300Mbps च्या स्पीड वर इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे या कंपनीचे ग्राहक आता 300एमबीपीएस च्या स्पीड वर इंटरनेट देऊ शकतील आणि तसेच त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क पण द्यावे लागणार नाही. त्याचबोरबर हि कंपनी आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड एफयूपी कॉलिंगची सुविधा पण देत आहे. एसीटी सध्या 31 मार्च पर्यंत हि सुविधा देत आहे जी पुढे वाढवली जाऊ शकते.

The post Corona मुळे सुधारेल इंटरनेटची परिस्थिती अजून वाढेल स्पीड, जाणून घ्या अधिक माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/corona-covid-19-better-internet-speed-for-work-from-home-act-free-300mbps-speed-data-kerala-cm-pinarayi-vijayan/feed/ 0
Jio ला मागे टाकत फास्ट इंटरनेट स्पीड देण्याच्या बाबतीत टॉपला हि कंपनी, जाणून घ्या इतर कंपन्यांची हालत https://www.91mobiles.com/marathi/act-fibernet-top-on-fixed-broadband-download-speeds-in-april-sept/ https://www.91mobiles.com/marathi/act-fibernet-top-on-fixed-broadband-download-speeds-in-april-sept/#respond Tue, 05 Nov 2019 14:27:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5692 जियो बद्दल बोलायचे तर ऑगस्ट मध्ये जियोचा स्पीड कमी होऊन 17.52Mbps झाला होता जो सप्टेंबर मध्ये गीगाफाइबर सर्विसच्या लॉन्च नंतर 41.99Mbps झाला.

The post Jio ला मागे टाकत फास्ट इंटरनेट स्पीड देण्याच्या बाबतीत टॉपला हि कंपनी, जाणून घ्या इतर कंपन्यांची हालत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंटरनेट स्पीड टेस्ट करणारी कंपनी Ookla ने आपला लेटेस्ट रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्ट मध्ये फिक्स्ड ब्रॉडबॅंड स्पीड देणाऱ्या कंपन्यांची यादी देण्यात आली आहे. या रिपोर्ट नुसार या बाबतीती जियो आणि एयरटेलला मागे टाकत ACT Fibernet ने पहिले स्थान मिळवले आहे.

ACT Fibernet चा डाउनलोड स्पीड 45.31 Mbps ते 47.74Mbps दरम्यान होता. Ookla नुसार भारतात साल 2019 च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत फिक्स्ड ब्रॉडबॅंड स्पीड मध्ये 16.5 टक्क्यांची वाढ झाली आणि सप्टेंबर मध्ये 34.07Mbps च्या पार पोचला.

ब्रॉडबॅंड इंटरनेट स्पीडच्या बाबतीती Hathway दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्थानी Hathway अनेक दिवसांपासून कायम आहे. या रिपोर्ट नुसार दुसऱ्या क्रमांकावरील Hathway चा टॉप स्पीड 33.69Mbps होता.

जियो बद्दल बोलायचे तर ऑगस्ट मध्ये जियोचा स्पीड कमी होऊन 17.52Mbps झाला होता जो सप्टेंबर मध्ये गीगाफाइबर सर्विसच्या लॉन्च नंतर 41.99Mbps झाला. आशा आहे कि येत्या काळात खूप मोठा बदल दिसेल.

देशातील 15 मोठ्या शहरांत फिक्स्ड आणि मोबाईल डाउनलोड स्पीडच्या तुलनेत जियोला साल 2019 च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत 5 मोठ्या शहरांत सर्वात वेगवान फिक्स्ड ब्रॉडबॅंड इंटरनेट स्पीड देण्याचा खिताब मिळाला. ACT 4 शहरांमध्ये फास्टेस्ट इंटरनेट प्रोवाइडर होती. हॅथवे चेन्नई मध्ये सर्वात जास्त स्पीड देणारी इंटरनेट सर्विस प्रोवाइडर बनली. तर लखनऊ आणि जयपुर मध्ये ACT फाइबरनेटला सर्वात जास्त स्पीड स्कोर मिळाला.

काही दिवसांपूर्वी ओपन सिग्नलच्या अक्टूबर 2019 च्या मोबाईल एक्सपीरियंस रिपोर्ट मध्ये एयरटेलची 4G उपलब्धता 89.2% असल्याचे सांगण्यात आले होते. जी मागील रिपोर्ट पेक्षा 3.6% जास्त आहे. तर ओपन सिग्नल ने 1 जून 2019 ते 29 ऑगस्ट 2019 मध्ये 4G कनेक्टिविटी आणि उप्लब्धतेबद्दल डेटा कलेक्ट केला. या काळात एयरटेलचा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 9.6Mbps आहे. तर जियोचा 4G डाउनलोड स्पीड 6.7Mbps होता. तर वोडाफोनचा स्पीड 7.9Mbps आहे.

The post Jio ला मागे टाकत फास्ट इंटरनेट स्पीड देण्याच्या बाबतीत टॉपला हि कंपनी, जाणून घ्या इतर कंपन्यांची हालत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/act-fibernet-top-on-fixed-broadband-download-speeds-in-april-sept/feed/ 0
जाणून घ्या Jio Fiber च्या कोणत्या प्लान मध्ये मोफत मिळेल किती मोठी TV https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-know-which-jioforever-annual-plans-offer-free-tv/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-know-which-jioforever-annual-plans-offer-free-tv/#respond Fri, 06 Sep 2019 11:06:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5239 गोल्ड आणि त्यापेक्षा महाग प्लान निवडणाऱ्या ग्राहकांना टेलीविजन सेट पण मोफत दिल जाईल.

The post जाणून घ्या Jio Fiber च्या कोणत्या प्लान मध्ये मोफत मिळेल किती मोठी TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जगातील सर्वात मोठ्या मोबाईल डेटा नेटवर्क Jio ने गुरुवारी भारतातील 1,600 शहरांत फाइबर टू द होम सर्विस JioFiber ची सुरवात केली आहे. जियो फाइबरचे प्लान 699 रुपये प्रति माह पासून सुरु होऊन 8,499 रुपयांपर्यंत आहेत. जियो फाइबरच्या प्रत्येक प्लान मध्ये कमीत कमी 100 एमबीपीएस चा स्पीड मिळेल.

जियो फाइबरचे प्लान वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये विभागले गेले आहेत. म्हणजे – ब्रॉन्ज, सिल्वर, गोल्ड, डायमंड, प्लॅटिनम आणि टाइटेनियम. या प्लान मध्ये वेगवेगळे लाभ दिले जातील. वेलकम ऑफर के तहत, JioForever annual plans निवडणाऱ्या सब्सक्राइबर्सना जियो होम गेटवे, जियो 4K सेट टॉप बॉक्स, ओटीटी ऍप्सचे सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस कॉल आणि डेटा मिळेल. तसेच गोल्ड आणि त्यापेक्षा महाग प्लान निवडणाऱ्या ग्राहकांना टेलीविजन सेट पण मोफत दिल जाईल.

अजूनही कोणत्या प्लान सोबत टीव्ही फ्री मिळेल हे समजले नसेल तर पुढे आम्ही त्या प्लानची संपूर्ण माहिती दिली आहे, ज्यांच्यासोबत तुम्हाला टीव्ही मोफत दिली जाईल. चला जाणून घेऊया या प्लान बद्दल सर्वकाही.

Jio Fiber Gold Plan

गोल्ड प्लान सब्सक्राइबर्सना मोफत मध्ये 24-इंचाचा Smart HD TV (याची किंमत 12,990 रुपये) मिळेल. पण यासाठी दोन वर्षांचा प्लान निवडावा लागेल. या प्लानची मासिक किंमत 1,299 रुपये आहे. पण जर तुम्ही हा प्लान दोन वर्षांसाठी घेतला तर तुम्हाला 31,176 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर सब्सक्राइबर्सना या प्लान मध्ये 250एमबीपीएस स्पीड वर डबल डेटा 2400जीबी दिला जाईल.

जियो फाइबर गोल्ड प्लान दोन वर्षांसाठी घेणाऱ्या सब्सक्राइबर्सना टेलीविजन सोबतच 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. त्याचबरोबर ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल. वर दिलेल्या इमेज मध्ये डेटा 1200जीबी आहे. पण तुम्हाला एकूण 2400जीबी डेटा मिळेल.

Jio Fiber Diamond Plan

जियो फाइबर डायमंड प्लानचे मासिक भाडे 2,499 रुपये आहे. पण जर तुम्ही हा प्लान एका वर्षेसाठी घेतला तर तुम्हाला या प्लान सोबत फ्री मध्ये 24-इंचाचा Smart HD TV (याची किंमत 12,990 रुपये) मिळेल. हा प्लान एका वर्षासाठी घेतल्यास ग्राहकांना 29,988 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे सब्सक्राइबर्सना या प्लान मध्ये 500एमबीपीएस स्पीड वर डबल डेटा 30,000 दिला जाईल.

गोल्ड प्लान प्रमाणेच डायमंड प्लान मध्ये पण सब्सक्राइबर्सना HD टेलीविजन सोबत 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. तसेच ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल.

Jio Fiber Platinum

जियो फाइबर प्लॅटिनम प्लानचे मासिक भाडे 3,999 रुपये आहे. पण एक वर्षाचा प्लान घेतल्यास तुम्हाला यात 32-इंचाचा एचडी टीव्ही मिळेल. एका वर्षासाठी तुम्हाला 47,988 रुपये द्यावे लागतील. तसेच सब्सक्राइबर्सना HD टेलीविजन सोबतच 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. त्याचबरोबर ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल. इतकेच नव्हे तर या प्लान मध्ये यूजर्सना 1जीबीपीएस स्पीड वर डबल डेटा ऑफर 60,000 मिळेल.

Jio Fiber Titanium

आता बोलूया मिळेल जियो फाइबर टाइटेनियम प्लान बद्दल. या प्लानचे मासिक भाडे 8,499 रुपये आहे. प्लान एका वर्षासाठी घेतल्यास 4K 43-इंचाचा टीव्ही मिळेल. तसेच यात पण 1 जीबीपीएस पर्यंतच्या स्पीडने यूजर्स एकूण डबल डेटा ऑफर 1,20,000जीबी वापर करू शकतील. वर्षासाठी प्लान घेतल्यावर यूजर्सना 1,01,988 रुपये द्यावे लागतील. टेलीविजन सोबतच 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. त्याचबरोबर ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल.

जियो फाइबर या सर्व प्लान मध्ये डेटा अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा आहे. टीव्ही वीडियो कॉलिंग/ कॉन्फ्रेंसिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच जीरो लेटेंसी गेमिंग सेवा मोफत मिळेल. डिवाइस सिक्योरिटी पण मिळेल. सोबतच वीआर एक्सपीरियंस आणि प्रीमियम कंटेंटची सेवा पण या प्लान मध्ये आहे. सर्व वार्षिक प्लान्स सोबत डेटा डबल मिळेल.

या वार्षिक प्लान्स साठी जियो बँकांसोबत टाइ-अप करत आहे, त्यानंतर ग्राहक 3, 6 आणि 12 महिन्यांच्या ईएमआई प्लानच्या मदतीने हे प्लान घेऊ शकतील.

The post जाणून घ्या Jio Fiber च्या कोणत्या प्लान मध्ये मोफत मिळेल किती मोठी TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-know-which-jioforever-annual-plans-offer-free-tv/feed/ 0
मोबाईल इंटरनेट वापरण्यात भारतीय सर्वात पुढे, प्रत्येक महिन्याला एका फोन मध्ये वापरला जाणारा डेटा ऐकून तुम्ही व्हाल हैराण https://www.91mobiles.com/marathi/report-said-data-usage-per-smartphone-will-double-in-india-by-2024/ https://www.91mobiles.com/marathi/report-said-data-usage-per-smartphone-will-double-in-india-by-2024/#respond Fri, 21 Jun 2019 14:49:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4625 अमेरिकेत 2024 पर्यंत 63% लोक 5जी वापरतील आणि तिथे एक यूजर एका महिन्याला 39 जीबी डेटा वापरेल.

The post मोबाईल इंटरनेट वापरण्यात भारतीय सर्वात पुढे, प्रत्येक महिन्याला एका फोन मध्ये वापरला जाणारा डेटा ऐकून तुम्ही व्हाल हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही महिन्यांपूर्वी बातमी समोर आली होती ज्यात सांगण्यात आले होते कि मोबाईल स्पीडच्या बाबतीत भारताचा रँक घसरून 121वा झाला आहे. आता एरिक्सन मोबिलिटीच्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि मोबाईल वर इंटरनेटचा वापर करण्यात भारत जगात टॉप पोजिशन वर पोचला आहे.

रिपोर्ट नुसार 2018 च्या शेवटपर्यंत प्रत्येक महिन्याला एका फोन मध्ये 9.8जीबी डेटा वापरला जात होता. इतकेच नव्हे तर देशात एकूण मोबाईल डेटाचा वापर 4.6 अरब जीबी आहे, जो 2024 पर्यंत वाढून 16 अरब जीबी होईल. याचा अर्थ असा कि भारतात पाच वर्षानंतर मोबाईल डेटा प्रत्येक स्मार्टफोन मध्ये वापर डबल होईल.

या रिपोर्ट मध्ये माहिती देण्यात आली आहे कि साल 2024 पर्यंत इंडियन रीजन (इंडिया, नेपाल, भूटान) मध्ये स्मार्टफोन ग्राहकांच्या संख्या 11 टक्क्यांनी वाढून 1.1 अरब होईल. तसेच फक्त मोबाईल ब्रॉडबँड वापरणारे 61 कोटींवरून 2024 मध्ये सव्वा अरब होतील.

भारताव्यतिरिक्त इतर देश पाहता 2024 पर्यंत अमेरिका आणि यूरोप आपल्याला मागे टाकतील. अमेरिकेत 2024 पर्यंत 63% लोक 5जी वापरतील आणि तिथे एक यूजर एका महिन्याला 39 जीबी डेटा वापरेल.

विशेष म्हणजे अलीकडेच अमेरिकन डेटा स्पीड टेस्टर फर्म Ookla ने रिपोर्ट मध्ये भारतातील उपलब्ध इंटरनेट स्पीड संबंधित हि माहिती दिली होती. ओकला ने सांगितले होते कि गेल्यावर्षी भारताची ग्लोबल रँकिग 109 होती ती यावर्षी कमी होऊन 121 वर आली आहे. ओकलाचा हा रिपोर्ट या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या आकड्यांवर आधारित आहे.

The post मोबाईल इंटरनेट वापरण्यात भारतीय सर्वात पुढे, प्रत्येक महिन्याला एका फोन मध्ये वापरला जाणारा डेटा ऐकून तुम्ही व्हाल हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/report-said-data-usage-per-smartphone-will-double-in-india-by-2024/feed/ 0
खुशखबर : देशातील 1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई ने सुसज्ज, बघा कोणते स्टेशन्स आहेत या लिस्ट मध्ये https://www.91mobiles.com/marathi/railtel-1000-indian-railway-stations-get-free-wifi-zone/ https://www.91mobiles.com/marathi/railtel-1000-indian-railway-stations-get-free-wifi-zone/#respond Fri, 29 Mar 2019 13:12:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3968 फ्री वाई-फाई सर्विस ने सुसज्ज होणारे पहिले रेल्वे स्टेशन मुंबई सेंट्रल होते तर वाई-फाई झोन मध्ये परावर्तित होणाऱ्या 1,000व्या स्टेशनचा मान पण मुंबईतील रे रोड स्टेशनला मिळाला आहे.

The post खुशखबर : देशातील 1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई ने सुसज्ज, बघा कोणते स्टेशन्स आहेत या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या माणसाच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा यावरून अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल अश्या झाल्या आहेत. हे जरी मी विनोदाने बोललो असलो तरी बऱ्याच अंशी हे सत्य आहे. हातात मोबाईल आणि मोबाईल मध्ये इंटरनेट सर्वांचीच हि गरज बनली आहे. डिजीटल होत असलेल्या जगात इंटरनेट वेगाने वाढत आहे. टेलीकॉम कंपन्या स्वस्तात जास्त इंटरनेट बेनिफिट देत आहेत, तसेच भारत सरकार ने पण सार्व​जनिक ठिकाणी इंटरनेट देण्यासाठी अनेक कामे केली आहेत. याचसंदर्भात सामान्य माणसांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे कि भारतात 1,000 रेल्वे स्टेशन पूर्णपणे फ्री वाई-फाई ने सुसज्ज झाले आहेत.

1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई झोन
भारतीय रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना भेट देत भारत सरकार ने घोषणा केली आहे कि देशात 1,000 रेल्वे स्टेशन्स फ्री वाई-फाई सर्विस ने सुस्सज करण्यात आले आहे. या 1,000 रेल्वे स्टोशन्सचा संपूर्ण परिसर वाई-फाई झोन बनला आहे, जिथे कोणत्याही प्लॅटफॉर्म किंवा स्टेशनच्या कोणत्याही ठिकणी बसून कोणतेही शुल्क न देता फ्री वाई-फाई चा लाभ घेता येतो. इंडियन रेल्वे स्टेशन्स वाई-फाई ने सुसज्ज करण्याचे हे काम रेलटेल कॉरपोरेशन ऑफ इंडिया ने केले आहे.

रोज एका स्टेशनला मिळाला वाई-फाई
रेलटेल ने सांगितले आहे कि रेल्वे स्टेशन्सना फ्री वाई-फाई देण्याचे हे मिशन साल 2016 मध्ये सुरु करण्यात आले होते. 2 वर्ष आणि तीन महिन्यांत कॉरपोरेशनने देशातील 1,000 स्टेशन्स मध्ये वाई-फाई ची सुविधा दिली आहे. अशाप्रकारे रेलटेल ने सरासरी एका महिन्यात 37 स्टेशन्स वाई-फाई झोन मध्ये परावर्तित केले आहेत आणि रोज देशातील 1 रेल्वे स्टेशन फ्री वाई-फाई स्टेशन बनला आहे. रेलटेल 1,000 वाई-फाई स्टेशन्स बनवल्यानंतर पण आपला हाच वेग कायम ठेवणार आहे.

हे देखील वाचा: ‘गँग्स ऑफ वासेपुर’ मधील धनबाद 4जी मध्ये अव्वल, बघा तुमच्या शहराची परिस्तिथी

विशेष म्हणजे देशात फ्री वाई-फाई सर्विस ने सुसज्ज होणारे पहिले रेल्वे स्टेशन मुंबई सेंट्रल होते तर वाई-फाई झोन मध्ये परावर्तित होणाऱ्या 1,000व्या स्टेशनचा मान पण मुंबईतील रे रोड स्टेशनला मिळाला आहे. अलीकडेच रेलटेल ने टाटा ट्रस्ट सोबत रेल्वे स्टेशन्स वर वाई-फाई सेटअप देण्यासाठी भागीदारी केली आहे. त्यांनी 4,000 पेक्षा पण जास्त भारतीय रेल्वे स्टेशन्सना वेगवेगळ्या मुद्यांच्या आधारे वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये विभागले आहे ज्यात बी, सी, डी आणि ई कॅटेगरी आहेत.

भारतीय रेल्वेच्या प्रगतीबद्दल बोलायचे तर काही दिवसांपूर्वीच इंडियन रेल्वे ने एक नवीन प्रीमियम राजधानी एक्सप्रेस ट्रेन सुरु केली आहे जी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशन आणि मुबंईच्या छत्रपति शिवाजी महाराज ट्रमिनस दरम्यान चालते. हि ट्रेन फक्त देशातील सर्वात फास्ट ट्रेन्स पैकी नसून हिच्यात अत्याधुनिक आणि मनोरंजक टेक्नॉलॉजी पण आहे. प्रवासात इंटरनेट बेनिफिट देण्यासाठी ट्रेन मध्ये वाई-फाई हॉटस्पॉट आहे. हा वाई-फाई प्रवासी कोणताही अतिक्ति शुल्काविना आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपशी कनेक्ट करू शकता. ट्रेनचा या वाई-फाई चा वापर एकावेळी 500 तासांपर्यंत केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: शाओमीचा पोको एफ1 बनला देशातील नंबर वन स्मार्टफोन, वनप्लस 6 ला टाकले मागे

या ट्रेन मधील टीवी स्क्रीन 3डी ला पण सपोर्ट करते. या स्क्रीन वर 3डी वीडियोज प्ले होतात. आणि हा 3डी कंटेंट बघण्यासाठी ट्रेन स्टॉफ कडून 3डी चष्मे पण दिले जातात. तसेच ​ट्रेन प्रवासात एखादी अडचण आल्यास किंवा प्रवासातील जेवण, सफाई, सर्विस सारख्या गोष्टींचा तुमचा अनुभव कसा होता, हा सर्व फीडबॅक तुम्ही प्रवासातच देऊ शकता. भारतीय रेल्वे ने ‘आप की राय’ मोबाईल ऍप ची सुरवात केली आहे आणि या ऍप मधून तुमच्या प्रतिक्रिया रेल्वे विभागाला देऊ शकता.

फ्री वाई फाई असलेल्या 1,000 रेल्वे स्टोशन्सची संपूर्ण लिस्ट बघण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post खुशखबर : देशातील 1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई ने सुसज्ज, बघा कोणते स्टेशन्स आहेत या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/railtel-1000-indian-railway-stations-get-free-wifi-zone/feed/ 0