जाणून घ्या Jio Fiber च्या कोणत्या प्लान मध्ये मोफत मिळेल किती मोठी TV

जगातील सर्वात मोठ्या मोबाईल डेटा नेटवर्क Jio ने गुरुवारी भारतातील 1,600 शहरांत फाइबर टू द होम सर्विस JioFiber ची सुरवात केली आहे. जियो फाइबरचे प्लान 699 रुपये प्रति माह पासून सुरु होऊन 8,499 रुपयांपर्यंत आहेत. जियो फाइबरच्या प्रत्येक प्लान मध्ये कमीत कमी 100 एमबीपीएस चा स्पीड मिळेल.

जियो फाइबरचे प्लान वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये विभागले गेले आहेत. म्हणजे – ब्रॉन्ज, सिल्वर, गोल्ड, डायमंड, प्लॅटिनम आणि टाइटेनियम. या प्लान मध्ये वेगवेगळे लाभ दिले जातील. वेलकम ऑफर के तहत, JioForever annual plans निवडणाऱ्या सब्सक्राइबर्सना जियो होम गेटवे, जियो 4K सेट टॉप बॉक्स, ओटीटी ऍप्सचे सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस कॉल आणि डेटा मिळेल. तसेच गोल्ड आणि त्यापेक्षा महाग प्लान निवडणाऱ्या ग्राहकांना टेलीविजन सेट पण मोफत दिल जाईल.

अजूनही कोणत्या प्लान सोबत टीव्ही फ्री मिळेल हे समजले नसेल तर पुढे आम्ही त्या प्लानची संपूर्ण माहिती दिली आहे, ज्यांच्यासोबत तुम्हाला टीव्ही मोफत दिली जाईल. चला जाणून घेऊया या प्लान बद्दल सर्वकाही.

Jio Fiber Gold Plan

गोल्ड प्लान सब्सक्राइबर्सना मोफत मध्ये 24-इंचाचा Smart HD TV (याची किंमत 12,990 रुपये) मिळेल. पण यासाठी दोन वर्षांचा प्लान निवडावा लागेल. या प्लानची मासिक किंमत 1,299 रुपये आहे. पण जर तुम्ही हा प्लान दोन वर्षांसाठी घेतला तर तुम्हाला 31,176 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर सब्सक्राइबर्सना या प्लान मध्ये 250एमबीपीएस स्पीड वर डबल डेटा 2400जीबी दिला जाईल.

जियो फाइबर गोल्ड प्लान दोन वर्षांसाठी घेणाऱ्या सब्सक्राइबर्सना टेलीविजन सोबतच 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. त्याचबरोबर ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल. वर दिलेल्या इमेज मध्ये डेटा 1200जीबी आहे. पण तुम्हाला एकूण 2400जीबी डेटा मिळेल.

Jio Fiber Diamond Plan

जियो फाइबर डायमंड प्लानचे मासिक भाडे 2,499 रुपये आहे. पण जर तुम्ही हा प्लान एका वर्षेसाठी घेतला तर तुम्हाला या प्लान सोबत फ्री मध्ये 24-इंचाचा Smart HD TV (याची किंमत 12,990 रुपये) मिळेल. हा प्लान एका वर्षासाठी घेतल्यास ग्राहकांना 29,988 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे सब्सक्राइबर्सना या प्लान मध्ये 500एमबीपीएस स्पीड वर डबल डेटा 30,000 दिला जाईल.

गोल्ड प्लान प्रमाणेच डायमंड प्लान मध्ये पण सब्सक्राइबर्सना HD टेलीविजन सोबत 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. तसेच ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल.

Jio Fiber Platinum

जियो फाइबर प्लॅटिनम प्लानचे मासिक भाडे 3,999 रुपये आहे. पण एक वर्षाचा प्लान घेतल्यास तुम्हाला यात 32-इंचाचा एचडी टीव्ही मिळेल. एका वर्षासाठी तुम्हाला 47,988 रुपये द्यावे लागतील. तसेच सब्सक्राइबर्सना HD टेलीविजन सोबतच 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. त्याचबरोबर ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल. इतकेच नव्हे तर या प्लान मध्ये यूजर्सना 1जीबीपीएस स्पीड वर डबल डेटा ऑफर 60,000 मिळेल.

Jio Fiber Titanium

आता बोलूया मिळेल जियो फाइबर टाइटेनियम प्लान बद्दल. या प्लानचे मासिक भाडे 8,499 रुपये आहे. प्लान एका वर्षासाठी घेतल्यास 4K 43-इंचाचा टीव्ही मिळेल. तसेच यात पण 1 जीबीपीएस पर्यंतच्या स्पीडने यूजर्स एकूण डबल डेटा ऑफर 1,20,000जीबी वापर करू शकतील. वर्षासाठी प्लान घेतल्यावर यूजर्सना 1,01,988 रुपये द्यावे लागतील. टेलीविजन सोबतच 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. त्याचबरोबर ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल.

जियो फाइबर या सर्व प्लान मध्ये डेटा अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा आहे. टीव्ही वीडियो कॉलिंग/ कॉन्फ्रेंसिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच जीरो लेटेंसी गेमिंग सेवा मोफत मिळेल. डिवाइस सिक्योरिटी पण मिळेल. सोबतच वीआर एक्सपीरियंस आणि प्रीमियम कंटेंटची सेवा पण या प्लान मध्ये आहे. सर्व वार्षिक प्लान्स सोबत डेटा डबल मिळेल.

या वार्षिक प्लान्स साठी जियो बँकांसोबत टाइ-अप करत आहे, त्यानंतर ग्राहक 3, 6 आणि 12 महिन्यांच्या ईएमआई प्लानच्या मदतीने हे प्लान घेऊ शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here