Jio ला मागे टाकत फास्ट इंटरनेट स्पीड देण्याच्या बाबतीत टॉपला हि कंपनी, जाणून घ्या इतर कंपन्यांची हालत

इंटरनेट स्पीड टेस्ट करणारी कंपनी Ookla ने आपला लेटेस्ट रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्ट मध्ये फिक्स्ड ब्रॉडबॅंड स्पीड देणाऱ्या कंपन्यांची यादी देण्यात आली आहे. या रिपोर्ट नुसार या बाबतीती जियो आणि एयरटेलला मागे टाकत ACT Fibernet ने पहिले स्थान मिळवले आहे.

ACT Fibernet चा डाउनलोड स्पीड 45.31 Mbps ते 47.74Mbps दरम्यान होता. Ookla नुसार भारतात साल 2019 च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत फिक्स्ड ब्रॉडबॅंड स्पीड मध्ये 16.5 टक्क्यांची वाढ झाली आणि सप्टेंबर मध्ये 34.07Mbps च्या पार पोचला.

ब्रॉडबॅंड इंटरनेट स्पीडच्या बाबतीती Hathway दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्थानी Hathway अनेक दिवसांपासून कायम आहे. या रिपोर्ट नुसार दुसऱ्या क्रमांकावरील Hathway चा टॉप स्पीड 33.69Mbps होता.

जियो बद्दल बोलायचे तर ऑगस्ट मध्ये जियोचा स्पीड कमी होऊन 17.52Mbps झाला होता जो सप्टेंबर मध्ये गीगाफाइबर सर्विसच्या लॉन्च नंतर 41.99Mbps झाला. आशा आहे कि येत्या काळात खूप मोठा बदल दिसेल.

देशातील 15 मोठ्या शहरांत फिक्स्ड आणि मोबाईल डाउनलोड स्पीडच्या तुलनेत जियोला साल 2019 च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत 5 मोठ्या शहरांत सर्वात वेगवान फिक्स्ड ब्रॉडबॅंड इंटरनेट स्पीड देण्याचा खिताब मिळाला. ACT 4 शहरांमध्ये फास्टेस्ट इंटरनेट प्रोवाइडर होती. हॅथवे चेन्नई मध्ये सर्वात जास्त स्पीड देणारी इंटरनेट सर्विस प्रोवाइडर बनली. तर लखनऊ आणि जयपुर मध्ये ACT फाइबरनेटला सर्वात जास्त स्पीड स्कोर मिळाला.

काही दिवसांपूर्वी ओपन सिग्नलच्या अक्टूबर 2019 च्या मोबाईल एक्सपीरियंस रिपोर्ट मध्ये एयरटेलची 4G उपलब्धता 89.2% असल्याचे सांगण्यात आले होते. जी मागील रिपोर्ट पेक्षा 3.6% जास्त आहे. तर ओपन सिग्नल ने 1 जून 2019 ते 29 ऑगस्ट 2019 मध्ये 4G कनेक्टिविटी आणि उप्लब्धतेबद्दल डेटा कलेक्ट केला. या काळात एयरटेलचा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 9.6Mbps आहे. तर जियोचा 4G डाउनलोड स्पीड 6.7Mbps होता. तर वोडाफोनचा स्पीड 7.9Mbps आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here