jio fiber - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 24 Mar 2020 12:35:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Jio Fiber यूजर्सना मिळेल दुप्पट डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळेल फायदा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-plan-inr-351-monthly-rs-199-weekly-10mbps-speed-internet-data-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-plan-inr-351-monthly-rs-199-weekly-10mbps-speed-internet-data-benefits/#respond Tue, 24 Mar 2020 12:34:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6873 जियो कोणत्याही सर्विस चार्ज विना बेसिक JioFiber कनेक्टिविटी देणार आहे, ज्यात 10Mbps च्या स्पीड सह जियोची हि सर्विस फ्री असेल.

The post Jio Fiber यूजर्सना मिळेल दुप्पट डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळेल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने अलीकडेच कोरोना वायरसमुळे वर्क फ्रॉम होम करत असलेल्या यूजर्ससाठी एक नवीन 251 रुपये असलेला प्लान सादर केला होता. मोबाईल यूजर्स नंतर आता कंपनीने ब्रॉडबँड यूजर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. जियो कोणत्याही सर्विस चार्ज विना बेसिक JioFiber कनेक्टिविटी देणार आहे, ज्यात 10Mbps च्या स्पीड सह जियोची हि सर्विस फ्री असेल.

जियो त्या सर्व ठिकाणी हि ब्रॉडबँड सर्विस देईल जिथे भौगोलिकदृष्टया शक्य असेल. तसेच जियोफाइबरच्या जुन्या ग्राहकांना सर्व प्लान्स मध्ये आता डबल डेटा मिळेल. जियोने हे पाऊल वर्क फ्रॉम होम मध्ये अडचण येऊ नये म्हणून उचलले आहे.

राउटरचे पॅसे द्यावे लागतील

जियो यूजर्ससाठी बेसिक फाइबर कनेक्टिविटी फ्री असेल. पण यूजर्सना फक्त राउटरसाठी पॅसे दयावे लागतील. इतकेच नव्हे तर जियोच्या बेसिक प्लान मध्ये कोणतीही फेयर यूजेज पॉलिसी (FUP) नसेल, ज्याचा अर्थ असा आहे कि यूजर्स चांगल्या स्पीड वर इंटरनेट वापरू शकेल . जियोफाइबरच्या मंथली प्लानची सुरवात 699 रुपयांपासून होते.

याव्यतिरिक्त कंपनीने अलीकडेच 251 रुपयांचा ‘Work From Home Pack’ सादर केला होता. जियोच्या ‘Work From Home Pack’ बद्दल बोलायचे तर या प्लानची किंमत 251 रुपये आहे आणि हा पॅक फक्त प्रीपेड ग्राहकांसाठी सादर केला गेला आहे. या पॅक मध्ये ग्राहकांना 2 जीबी डेटा रोज मिळेल. तसेच 2 जीबी डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेट स्पीड 64 kbps होईल. या पॅकची वॅलिडिटी 51 दिवस आहे.

त्याचबरोबर रिलायंस जियो ने घोषणा केली आहे कि ते आपल्या 4G डेटा ऍड-ऑन वाउचर्स वर दुप्पट डेटा देतील. कंपनीने 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये आणि 101 रुपयांचे डेटा वाउचर अपग्रेड केले होते. या लिस्ट मध्ये येणाऱ्या 251 रुपयांच्या वाउचर मध्ये कोणताही बदल केला गेला नाही. या वाउचर मध्ये जुनेच फायदे मिळतील.

रिलायंस जियोच्या 11 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी 400MB डेटा मिळत होता. पण बदलानंतर या प्लान मध्ये 800MB डेटा सह 75 मिनिट्स जियो ते नॉन जियो कॉलिंग मिनिट्स मिळत आहे. तर 21 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी कंपनी 1 GB डेटा देत होती. पण आता 2 GB डेटा दिला जात आहे. तसेच प्लान मध्ये नॉन जियो नेटवर्क वर 200 कॉलिंग मिनिट्स मिळत आहेत.

51 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी कंपनी 3GB डेटा देत होती. पण आता या वाउचर मध्ये 6 GB डेटा मिळत आहे. तसेच वाउचर मध्ये जियो टू नॉन जियो नेटवर्क वर कॉलिंगसाठी 500 मिनिट्स मिळत आहेत. 101 रुपयांच्या डेटा प्लान मध्ये कंपनी आधी 6 GB डेटा ऑफर करत होती, आता कंपनी यात 12 GB डेटा ऑफर करत आहे. त्याचबरोबर नॉन जियो नंबर्स वर कॉलिंगसाठी 1000 मिनिट्स मिळत आहेत.

The post Jio Fiber यूजर्सना मिळेल दुप्पट डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळेल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-plan-inr-351-monthly-rs-199-weekly-10mbps-speed-internet-data-benefits/feed/ 0
Jio Fiber चा झटका, वाई-फाई कनेक्ट केल्यावर स्पीड कमी होऊन होत आहे निम्मा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-offer-50mbps-speed-on-wifi-100mbps-plan-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-offer-50mbps-speed-on-wifi-100mbps-plan-benefits/#respond Wed, 25 Sep 2019 14:49:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5418 तांत्रिक विशेषज्ञानी सांगितले कि कंपनीकडून मिळणारा Wi-Fi router सिंगल-बँड आहे आणि 2.4गीगाहर्ट्ज फ्रिक्वेंसी वर चालतो. आणि याच कारणामुळे Jio Fiber शी वाई-फाई कनेक्ट केल्यावर 50Mbps चा स्पीड मिळत आहे.

The post Jio Fiber चा झटका, वाई-फाई कनेक्ट केल्यावर स्पीड कमी होऊन होत आहे निम्मा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने गेल्याच महिन्यात देशात आपल्या ब्रॉडबँड सर्विसची सुरवात करत Jio Fiber लॉन्च केला होता. Jio Fiber भारतात लॉन्च झालेली पहिली ब्रॉडबँड सर्विस आहे जी 1Gbps चा इंटरनेट स्पीड देण्यास सक्षम आहे. Jio Fiber चा सर्वात छोटा प्लान 699 रुपयांचा आहे ज्यात कंपनीकडून यूजर्सना 100Mbps स्पीडने इंटरनेट देण्याचा दावा केला गेला होता. आता जेव्हा Jio Fiber बाजारात रोलआउट झाली आहे आणि देशात Jio Fiber चे कनेक्शन जोडण्यास सुरवात झाली आहे, तेव्हा समोर आले आहे कि Jio Fiber शी वाई-फाई कनेक्ट केल्यावर यूजर्सना फक्त 50Mbps चा स्पीड मिळत आहे.

91मोबाईल्सने आपल्या रिपोर्ट मध्ये Jio Fiber संबंधित हि महत्वाची माहिती दिली आहे. 91मोबाईल्सने राजधानी दिल्ली मध्ये Jio Fiber चे कनेक्शन देणाऱ्या डीलरशी संपर्क करून माहिती घेतील आहे. प्राप्त माहिती नुसार Jio Fiber आपल्या सर्वात छोट्या प्लान्स मध्ये एक महिन्यासाठी 100GB डेटा देत आहे जो 100 Mbps स्पीडने चालतो. एखाद्या कंम्प्यूटर किंवा लॅपटॉप मध्ये Jio Fiber कनेक्ट केल्यास हा स्पीड अगदी योग्य म्हणजे 100 Mbps च्य आसपास असतो पण जेव्हा Jio Fiber शी वाई-फाई कनेक्ट करण्यात आला तेव्हा हा स्पीड अर्धा म्हणजे 50 Mbps झाला.

वाई-फाई कनेक्शन वर फक्त 50Mbps स्पीड

Jio Fiber शी वाई-फाई कनेक्ट केल्यावर इंटरनेट स्पीड 100Mbps वरून थेट 50Mbps वर आला. याबाबतीत जेव्हा Jio शी संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितले कि 100Mbps स्पीड असलेला प्लान विकत घेतल्यास LAN/Ethernet कनेक्शन सह Jio संपूर्ण 100Mbps चा स्पीड देईल. पण Jio Fiber जेव्हा Jio Wi-Fi Home gateway द्वारे एखाद्या स्मार्टफोन किंवा इतर डिवाईसशी कनेक्ट केली जाईल तेव्हा हा स्पीड 50Mbps पर्यंत येईल.

हे आहे कारण

91मोबाईल्सशी बोलताना Reliance Jio च्या तांत्रिक विशेषज्ञानी सांगितले कि कंपनीकडून मिळणारा Wi-Fi router सिंगल-बँड आहे आणि 2.4गीगाहर्ट्ज फ्रिक्वेंसी वर चालतो. आणि याच कारणामुळे Jio Fiber शी वाई-फाई कनेक्ट केल्यावर 50Mbps चा स्पीड मिळत आहे.

उपाय पण आहे

फक्त 50Mbps चा स्पीड मिळण्याच्या कारणासोबतच 91मोबाईल्सने हा स्पीड वाढवण्याचा उपाय पण शोधला आहे. Reliance Jio कडून जो Jio Fiber सह सिंगल-बँड Wi-Fi router दिला जात आहे तोच बदलून यूजर डुअल-बँड Wi-Fi router पण वापरू शकतात. Jio Fiber सह वाई-फाई वर पण 100Mbps पर्यंतचा स्पीड मिळवण्यासाठी 5गीगाहर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेंसी असेलला राउटर वापरावा लागेल. पण त्यासाठी यूजर्सना वेगळे पैसे द्यावे लागतील.

फ्री टीवी ऑफर

Reliance Jio HD/4K LED TV आणि 4K Setup Box कंपनीच्या Jio Fiber ब्राडबँड सोबत फ्री देत आहे. म्हणजे Jio Fiber विकत घेतल्यास यूजर्सना टेलीविजन आणि सेटअप बॉक्स मोआफ्ट मिळवण्याची संधी मिळेल. कंपनीच्या स्कीम अंतर्गत जियो फाइबरचा वार्षिक प्लान घेतल्यास यूजर्सना हि मोफत सुविधा मिळेल. कंपनीने आपल्या या प्लानचे नाव ‘Jio Forever Annual Plan’ ठेवले आहे.

कंपनीने Jio Fiber च्या प्लानची बेस किंमत 700 रुपये प्रतिमाह ठेवली आहे. तसेच Jio Fiber चा सर्वात मोठा प्लान 10,000 रुपये प्रतिमाहचा आहे. Jio Fiber चा कोणताही प्लान एक वर्षासाठी घेतल्यास कंपनी कडून यूजर्सना HD/4K LED TV आणि 4K Setup Box मोफत मिळेल. टीवी आणि सेटअप बॉक्स साठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे दयावे लागणार नाहीत.

उदाहरणार्थ जर तुम्ही Jio Fiber चा 700 रुपयांचा प्लान Jio Forever Annual Plan सह घेतला तर तुम्हाला संपूर्ण वर्षात एकूण 8,400 रुपये द्यावे लागतील. या 8,400 रुपयांमध्ये तुम्हाला Jio Fiber + HD/4K LED TV + 4K Setup Box मिळेल. म्हणजे एका सर्विसच्या किंमतीत अजून दोन सर्विस मोफत.

The post Jio Fiber चा झटका, वाई-फाई कनेक्ट केल्यावर स्पीड कमी होऊन होत आहे निम्मा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-offer-50mbps-speed-on-wifi-100mbps-plan-benefits/feed/ 0
Reliance Jio चे 3 वर्ष पूर्ण, जाणून घ्या 3 वर्षांतील 30 मोठे कारनामे https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-3rd-anniversary-india-jio-fiber-broadband-jiophone-volte-4g-data-free-voice-call-ott-dth-set-top-box/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-3rd-anniversary-india-jio-fiber-broadband-jiophone-volte-4g-data-free-voice-call-ott-dth-set-top-box/#respond Fri, 06 Sep 2019 15:09:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5251 आम्ही तुम्हाला कंपनीच्या 30 मोठे कारनामे सांगणार आहोत ज्यांच्यामुळे Reliance Jio फक्त भारतात नाही तर जागतिक स्थरावर प्रसिद्ध झाली आहे.

The post Reliance Jio चे 3 वर्ष पूर्ण, जाणून घ्या 3 वर्षांतील 30 मोठे कारनामे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आज पासून 3 वर्षांपूर्वी भारतीय मोबाईल यूजर्सनि असा विचार पण केला नव्हता कि त्यांना फ्री कॉलिंग, खुप स्वस्त दराने इंटरनेट आणि मोफत लाइव टीव्ही सारख्या सेवा मिळतील. 3 वर्षांपूवी 2GB 3G डेटा साठी महिन्याला 700 रुपयांपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागत होते पण आज 500 रुपयांपेक्षा पण कमी रुपयांत 91 दिवस रोज 2GB 4G डेटा दिला जात आहे. इतकेच नव्हे तर फ्री कॉलिंग आणि रोमिंग सह टीव्ही आणि मूवी सारख्या सेवा मोफत आहेत. आणि हे सर्व शक्य झाले आहे Reliance Jio मुळे. कंपनीने 5 सेप्टेंबर 2016 मध्ये आपल्या 4G सर्विसची सुरवात केली होती आणि त्यानंतर संपूर्ण भारतीय मोबाईल बाजार बदलला. Jio ला आज 3 वर्ष झाली आहेत आणि या 3 वर्षात कंपनीने असे कारनामे केले आहेत जे अनेक कंपन्या अनेक वर्षांत करू शकल्या नाहीत. Jio ला 3 वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून आम्ही तुम्हाला कंपनीच्या 30 मोठे कारनामे सांगणार आहोत ज्यांच्यामुळे Reliance Jio फक्त भारतात नाही तर जागतिक स्थरावर प्रसिद्ध झाली आहे.

1. 6 महिन्यांपर्यंत फ्री सर्विस

Jio ची एंट्री एखाद्या हीरो सारखीच झाली होती. बाजारात येताच Reliance Jio ने घोषणा केली होती कि कंपनीची प्रत्येक सर्विस लोकांना 6 महिन्यांपर्यंत पूर्णपणे फ्री दिली जाईल. तुमच्या लक्षात असेल कि तेव्हा कशाप्रकारे Jio सिम मिळवण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. फक्त 26 दिवसांत कंपनीने एक कोटी यूजर बेसचा आकडा गाठला होता. अशाप्रकरची सर्विस जगात आतापर्यंत कुठेच दिसली नाही.

2. Free कॉलिंग

Reliance Jio भारतातील पहली टेलीकॉम कंपनी आहे जिने आपल्या यूजर्सना फ्री वॉयस कॉलिंगची सुविधा दिली. Jio नेटवर्क वरून 6 महिन्यांपर्यंत लोकांनी अगदी मोफत कॉलिंग केली तर नंतर पण कंपनीने स्पष्ट केले कि ते फक्त डेटाचे पॅसे घेतील आणि वॉयस कॉलिंग आयुष्यभरासाठी फ्री असेल.

3. Free रोमिंग

Jio चे वॉयस कॉल पूर्णपणे निशुल्क आहेतच तसेच या फ्री कॉलिंग सेवेचा वापर रोमिंग मध्ये पण मोफत आहे. जियो नेटवर्क वर सर्व नॅशनल रोमिंग फ्री आहे.

4. स्वस्त डेटा

Jio चे सुरवातीचे 6 महीने यूजर्स साठी पूर्णपणे फ्री होते. तर 6 महिने झाल्यावर पण Reliance Jio ने आपले प्लान्स खुप स्वस्तात सादर केले होते. Jio चे डेटा प्लान इतर टेलीकॉम कंपन्यांपेक्षा सर्वात स्वस्त होते. आधी 1 जीबी डेटा साठी 400 रुपये द्यावे लागायचे. तर आज 400 मध्ये 84 दिवस रोज 1.5जीबी डेटा मिळत आहे.

5. फक्त 4G

Reliance Jio भारतातील एकमेव टेलीकॉम कंपनी आहे जी फक्त 4G नेटवर्क वर चालते. Jio ने थेट 4G पासून सुरवात केली होती. या कंपनी कडे 2G किंवा 3G नेटवर्क नाही.

6. Free VAS

फ्री कॉलिंग आणि रोमिंग सोबत जियो ने आपल्या यूजर्सना फ्री वॅस सर्विस पण दिल्या आहेत ज्यासाठी आधी यूजर्स 45 रुपये महिन्याला देत होते. कॉलर ट्यून यातील एक सर्विस आहे. आधी एका ट्यून साठी तुम्हाला 45 रुपये द्यावे लागत होते पण आज तुम्ही प्रत्येक मिनिटाला ट्यून बदलू शकता तेही मोफत.

7. Free मूवी

Reliance Jio ने आपल्या यूजर्सना मोबाईल वर मोफत मध्ये मूवी बघण्याची सुविधा पण दिली आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही तसेच हे चित्रपट कंपनीच्या इंटरनेट डेटा वरच चालतात. जियो सिनेमा ऍप वरून तुम्ही हे ऑनलाईन बघू शकता. तर काही मूवी ऑफलाइन डाउनलोड करता येतात.

8. Free म्यूजिक

जियो सर्विस लॉन्च सोबत कंपनीने जियो म्यूजिकची सुरवात केली होती. सध्या हि जियो सावन नावाने ओळखील जाते. यात तुम्ही मोफत ऑन लाइन म्यूजिक स्ट्रीम करू शकता.

9. Free लाईव टीव्ही

Reliance Jio आपल्या युजर्सना मोबाईल वर मोफत लाईव टीव्ही बघण्याची सुविधा पण देते. यासाठी यूजर्सना फक्त Jio TV ऍप फोन मध्ये घ्यावे लागेल.

10. होम सिम डिलीवरी

साहजिक आहे Jio चे इतके फायदे बघून अनेकांना कंपनीशी जोडले जायचे असेल. अशाच यूजर्स साठी Reliance Jio ने मोफत सिम डिलीवरी सर्विस पण सुरु केली होती, ज्यात यूजर्सना घरी जाऊन त्यांचा Jio SIM दिला जात होता.

11. VoLTE सर्विस

वर सांगितल्याप्रमाणे Reliance Jio भारतात फक्त 4G नेटवर्क देते. कंपनीने भारतात पहिल्यांदा 4जी वोएलटीई ची सर्विस दिली. या नेटवर्क वर हाईडेफिनेशन कॉलिंग दिली. नंतर दुसऱ्या कंपन्यांनी पण आपली 4जी वोएलटीई कॉलिंग सर्विस सुरु केली.

12. सर्वात जास्त डेटा वापर

Reliance Jio ने स्वस्तात डेटा पॅक दिल्यामुळे थोड्या वेळात जियो नंबर वन नेटवर्क ठरला ज्यावर सर्वात जास्त इंटरनेट डेटा वापरला गेला. 2017 च्या एका रिपोर्ट नुसार Jio नेटवर्क वर प्रत्येक महिन्याला सरासरी 110 कोटी जीबी पेक्षा पण जास्त डेटा वापरला गेला होता आणि Jio नेटर्वक वर एका महिन्यात 220 कोटी मिनिटांपेक्षा पण जास्त वेळ लोकांनी घालवला होता जो जगात सर्वात जास्त आहे आणि एक रेकॉर्ड आहे.

13. नंबर वन चा खिताब

4G नेटवर्क, फ्री सर्विस, स्वस्त डेटा आणि मोफत कॉलिंग सारख्या सेवांमुळे Reliance Jio जलद गतीने वाढली आहे. रिलायंस जियो ने स्वतःला सिद्ध करत कंपनीला 3 वर्ष पूर्ण होण्याआधीच स्वतःला नंबर वन इंडियन टेलीकॉम कंपनी बनवले आहे. आज Jio चा युजरबेस भारतात सर्वात जास्त आहे.

14. सर्वात बड़ा 4G नेटवर्क

Reliance Jio फक्त युजर जोडत नाही तर 4जी नेटवर्क कवरेज मध्ये पण देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. कंपनीचा दावा आहे कि 99 टक्के भारतीय लोकसंख्येपर्यंत जियो नेटवर्कचे कवरेज आहे.

15. डाउनलोड स्पीड

‘फक्त फ्री किंवा स्वस्त डेटा सर्विस देणे पुरेसे नाही तर त्या सर्विस मध्ये इंटरनेट स्पीड पण फास्ट असावा’, हे Reliance Jio ला चांगलेच माहित आहे. इंडियन टेलीकॉम रेग्यूलेटरी अथारिटी ट्राई ने आपल्या रिपोर्ट मध्ये अनेकदा सांगितले आहे कि Jio भारतात सर्वात वेगवान 4G डाउनलोड स्पीड देते.

16. सर्वप्रथम KYC आधारित वेरिफिकेशन

आधी सिम घेण्यासाठी भलीमोठी प्रक्रिया कारवी लागत होती. परंतु जियो ने फक्त आधार नंबर द्वारे सिम देण्यास सुरवात केली आणि देशात हि पहिली कंपनी होती जिने आधार द्वारे KYC सर्विस दिली आणि फार्म न भरता आणि फोटो न देता सिम दिले.

17. 10 कोटी ऍप डाउनलोड

Reliance Jio ने आपल्या अनेक सेवा एकाच प्लॅटफॉर्म वर देत My Jio App ची सुरवात केली होती. हि ऍप सर्विस यूजर्सना इतकी आवडली कि My Jio App पहिला भारतीय ऍप बनला जो 10 कोटी पेक्षा पण जास्त वेळा डाउनलोड केला गेला.

18. Jio Phone

टेलीकॉम क्षेत्रात कमाल दाखवल्यानंतर रिलायंस जियो ने मोबाईल बाजारात पण पाऊल टाकले आणि Jio Phone लॉन्च केला. Jio Phone ग्रामीण भागातील लोकांना लक्षात ठेऊन बनवण्यात आला होता जो खूप लोकप्रिय ठरला. याची मार्केटिंग पण कंपनीने अनोख्या पद्धतीने केली.

19. 4G फीचर फोन

Jio Phone लॉन्च करणे Reliance Jio चा मोठा कारनामा होता पण या मोबाईलच्या रूपात इंडियन यूजर्सना देशातील पहिला 4जी फीचर फोन मिळाला. Jio Phone असा फीचर फोन आहे जो 4G नेटवर्क वर चालतो.

20. सर्वात स्वस्त मासिक कॉलिंग आणि डेटा प्लान

Jio Phone साठी कंपनीने 49 रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे ज्यात महिनाभर फ्री कॉलिंग सह तुम्हाला 2 जीबी 4जी डेटा मोफत मिळतो. डेटा आणि कॉलिंग साठी हा सर्वात स्वस्त मासिक प्लान आहे.

21. Free Jio Phone

रिलायंस जियो सर्विस प्रमाणे जियो 4जी फोन पण मोफत दिला जात होता. जियो फोन साठी शुल्क 1,500 रुपये ठेवण्यात आले होते पण हे सिक्योरिटी डिपॉजिट होते. हे पैसे 3 वर्षांनंतर परत दिले जातील आणि फोन पूर्णपणे मोफत होईल.

22. Jio बनली सर्वात मोठी फीचर फोन निर्माता

Jio Phone कंपनी साठी मोठे यश घेऊन आला. हा 4जी फीचर फोन लोकांना इतका आवडला कि Jio Phone चे करोडो यूनिट विकले गेले. Reliance Jio भारतातील नाही तर जगातील सर्वात जास्त फीचर फोन विकणारी कंपनी बनली.

23. Jio Fiber

Reliance Jio ची लेटेस्ट सर्विस आहे Jio Fiber. जियो फाइबर सह रिलायंस जियो ने देशातील ब्रॉडबँड बाजारात एंट्री केली आहे. Jio Fiber ऑप्टिल फाइबर केबल द्वारे अल्ट्रा फास्ट स्पीड इंटरनेट आणि अनेक अतिरिक्त सुविधा मिळतात. हि 5 सेप्टेंबरला Reliance Jio ला तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे बाजारात आली आहे.

24. 1 GBPS स्पीड

रिलायंस जियोच्या Jio Fiber सर्विसची सर्वात मोठी खासियत याची सुपर फास्ट इंटरनेट आहे. कंपनीच्या दाव्यानुसार Jio Fiber वर यूजर्सना 1GBPS पर्यंतचा इंटरनेट स्पीड मिळेल. या स्पीडने सेकंदात संपूर्ण मूवी डाउनलोड होईल. भारतात आतापर्यंत 1जीबीपीएस स्पीड देणारी हि पहिली सर्विस आहे.

25. Free Set-Top Box

Jio Fiber चे कनेक्शन घेणाऱ्या यूजर्सना Reliance Jio मोफत Set-Top Box पण देत आहे. कंपनी ‘Jio Forever Annual Plan’ घेणाऱ्या यूजर्सना हि मोफत सुविधा मिळेल. सेट-टॉप बॉक्स सोबत कपंनी डीटीएच सर्विस पण देईल. या सर्विस मध्ये OTT ऍप्स पण असतील ज्या सोबत मोफत सब्सक्रिप्शन पण दिले जाईल.

26. Free TV

जेव्हा कंपनीने फ्री कॉलिंग, फ्री रोमिंग आणि फ्री फोन नंतर मोफत टीव्ही देण्याची घोषणा केली तेव्हा हद्दच झाली. Reliance Jio Jio Fiber यूजर्सना Set-Top Box व्यतिरिक्त HD/4K LED TV पण मोफत देईल. Jio Fiber चे वार्षिक प्लान्स घेणाऱ्या लोकांना कपंनी मोफत टेलीविजन देईल.

27. VR सर्विस

Jio Fiber सोबत Reliance Jio यूजर्सना VR म्हणजे वर्चुअल रियालिटी सर्विस पण दिली जाईल. या सर्विसचा वापर अभ्यास, मनोरंजन आणि शॉपिंग साठी करता येईल. रिलायंस जियो या सर्विस साठी VR हँडसेट पण विकेल जे स्वस्तात विकत घेता येतील.

28. Free मल्टी यूजर वीडियो कॉफ्रेंसिंग

Reliance Jio आपल्या Jio Fiber सर्विस मध्ये मल्टी यूजर वीडियो कॉफ्रेंसिंगची सुविधा पण देईल. या सर्विस मुळे कोणत्याही शुल्काविना यूजर्स कुठूनही आपल्या नातेवाईक व मित्रांशी लाईव वीडियो चॅट करू शकतील. खास बाब अशी कि हि वीडियो चॅट मोबाईल वर नाही तर TV वर होईल.

29. Free लँडलाईन

Jio Fiber मध्ये Reliance Jio यूजर्सना कंपनी कडून लँडलाईन सेट दिला जाईल जो फाइबर केबलशी कनेक्टड असेल. या सर्विस मध्ये कंपनी सुपर फास्ट इंटरनेट डेटा तर देत आहे त्याचबरोबर लँडलाईनने यूजर्स मोफत वॉयस कॉल पण करू शकतील आणि खास बाब अशी कि लँडलाइन फोन मध्ये लोकल आणि एसटीडी कॉल पूर्णपणे फ्री आहेत.

30. स्वस्त इंटरनॅशनल कॉल

Reliance Jio ने Jio Fiber यूजर्स साठी खुपच स्वस्त इंटरनॅशनल रोमिंग पॅक पण सादर केला आहे. Jio ची हि सर्विस वापरणारे लोक अमेरिका आणि कॅनडात फक्त 500 रुपयांमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉल करू शकतील. आतापर्यंत हि सर्वात स्वस्त इंटरनॅशनल कॉलिंग सर्विस आहे.

The post Reliance Jio चे 3 वर्ष पूर्ण, जाणून घ्या 3 वर्षांतील 30 मोठे कारनामे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-3rd-anniversary-india-jio-fiber-broadband-jiophone-volte-4g-data-free-voice-call-ott-dth-set-top-box/feed/ 0
जाणून घ्या Jio Fiber च्या कोणत्या प्लान मध्ये मोफत मिळेल किती मोठी TV https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-know-which-jioforever-annual-plans-offer-free-tv/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-know-which-jioforever-annual-plans-offer-free-tv/#respond Fri, 06 Sep 2019 11:06:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5239 गोल्ड आणि त्यापेक्षा महाग प्लान निवडणाऱ्या ग्राहकांना टेलीविजन सेट पण मोफत दिल जाईल.

The post जाणून घ्या Jio Fiber च्या कोणत्या प्लान मध्ये मोफत मिळेल किती मोठी TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जगातील सर्वात मोठ्या मोबाईल डेटा नेटवर्क Jio ने गुरुवारी भारतातील 1,600 शहरांत फाइबर टू द होम सर्विस JioFiber ची सुरवात केली आहे. जियो फाइबरचे प्लान 699 रुपये प्रति माह पासून सुरु होऊन 8,499 रुपयांपर्यंत आहेत. जियो फाइबरच्या प्रत्येक प्लान मध्ये कमीत कमी 100 एमबीपीएस चा स्पीड मिळेल.

जियो फाइबरचे प्लान वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये विभागले गेले आहेत. म्हणजे – ब्रॉन्ज, सिल्वर, गोल्ड, डायमंड, प्लॅटिनम आणि टाइटेनियम. या प्लान मध्ये वेगवेगळे लाभ दिले जातील. वेलकम ऑफर के तहत, JioForever annual plans निवडणाऱ्या सब्सक्राइबर्सना जियो होम गेटवे, जियो 4K सेट टॉप बॉक्स, ओटीटी ऍप्सचे सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस कॉल आणि डेटा मिळेल. तसेच गोल्ड आणि त्यापेक्षा महाग प्लान निवडणाऱ्या ग्राहकांना टेलीविजन सेट पण मोफत दिल जाईल.

अजूनही कोणत्या प्लान सोबत टीव्ही फ्री मिळेल हे समजले नसेल तर पुढे आम्ही त्या प्लानची संपूर्ण माहिती दिली आहे, ज्यांच्यासोबत तुम्हाला टीव्ही मोफत दिली जाईल. चला जाणून घेऊया या प्लान बद्दल सर्वकाही.

Jio Fiber Gold Plan

गोल्ड प्लान सब्सक्राइबर्सना मोफत मध्ये 24-इंचाचा Smart HD TV (याची किंमत 12,990 रुपये) मिळेल. पण यासाठी दोन वर्षांचा प्लान निवडावा लागेल. या प्लानची मासिक किंमत 1,299 रुपये आहे. पण जर तुम्ही हा प्लान दोन वर्षांसाठी घेतला तर तुम्हाला 31,176 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर सब्सक्राइबर्सना या प्लान मध्ये 250एमबीपीएस स्पीड वर डबल डेटा 2400जीबी दिला जाईल.

जियो फाइबर गोल्ड प्लान दोन वर्षांसाठी घेणाऱ्या सब्सक्राइबर्सना टेलीविजन सोबतच 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. त्याचबरोबर ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल. वर दिलेल्या इमेज मध्ये डेटा 1200जीबी आहे. पण तुम्हाला एकूण 2400जीबी डेटा मिळेल.

Jio Fiber Diamond Plan

जियो फाइबर डायमंड प्लानचे मासिक भाडे 2,499 रुपये आहे. पण जर तुम्ही हा प्लान एका वर्षेसाठी घेतला तर तुम्हाला या प्लान सोबत फ्री मध्ये 24-इंचाचा Smart HD TV (याची किंमत 12,990 रुपये) मिळेल. हा प्लान एका वर्षासाठी घेतल्यास ग्राहकांना 29,988 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे सब्सक्राइबर्सना या प्लान मध्ये 500एमबीपीएस स्पीड वर डबल डेटा 30,000 दिला जाईल.

गोल्ड प्लान प्रमाणेच डायमंड प्लान मध्ये पण सब्सक्राइबर्सना HD टेलीविजन सोबत 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. तसेच ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल.

Jio Fiber Platinum

जियो फाइबर प्लॅटिनम प्लानचे मासिक भाडे 3,999 रुपये आहे. पण एक वर्षाचा प्लान घेतल्यास तुम्हाला यात 32-इंचाचा एचडी टीव्ही मिळेल. एका वर्षासाठी तुम्हाला 47,988 रुपये द्यावे लागतील. तसेच सब्सक्राइबर्सना HD टेलीविजन सोबतच 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. त्याचबरोबर ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल. इतकेच नव्हे तर या प्लान मध्ये यूजर्सना 1जीबीपीएस स्पीड वर डबल डेटा ऑफर 60,000 मिळेल.

Jio Fiber Titanium

आता बोलूया मिळेल जियो फाइबर टाइटेनियम प्लान बद्दल. या प्लानचे मासिक भाडे 8,499 रुपये आहे. प्लान एका वर्षासाठी घेतल्यास 4K 43-इंचाचा टीव्ही मिळेल. तसेच यात पण 1 जीबीपीएस पर्यंतच्या स्पीडने यूजर्स एकूण डबल डेटा ऑफर 1,20,000जीबी वापर करू शकतील. वर्षासाठी प्लान घेतल्यावर यूजर्सना 1,01,988 रुपये द्यावे लागतील. टेलीविजन सोबतच 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. त्याचबरोबर ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल.

जियो फाइबर या सर्व प्लान मध्ये डेटा अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा आहे. टीव्ही वीडियो कॉलिंग/ कॉन्फ्रेंसिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच जीरो लेटेंसी गेमिंग सेवा मोफत मिळेल. डिवाइस सिक्योरिटी पण मिळेल. सोबतच वीआर एक्सपीरियंस आणि प्रीमियम कंटेंटची सेवा पण या प्लान मध्ये आहे. सर्व वार्षिक प्लान्स सोबत डेटा डबल मिळेल.

या वार्षिक प्लान्स साठी जियो बँकांसोबत टाइ-अप करत आहे, त्यानंतर ग्राहक 3, 6 आणि 12 महिन्यांच्या ईएमआई प्लानच्या मदतीने हे प्लान घेऊ शकतील.

The post जाणून घ्या Jio Fiber च्या कोणत्या प्लान मध्ये मोफत मिळेल किती मोठी TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-know-which-jioforever-annual-plans-offer-free-tv/feed/ 0
जाणूना घ्या Jio Fiber म्हणजे काय, किती आहे स्पीड आणि कसे करावे रजिस्ट्रेशन https://www.91mobiles.com/marathi/what-is-reliance-fiber-and-how-to-register-for-the-service/ https://www.91mobiles.com/marathi/what-is-reliance-fiber-and-how-to-register-for-the-service/#respond Sun, 25 Aug 2019 12:01:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5114 वायरलेस सर्विसच्या तुलनेत वायर्ड अर्थात केबल द्वारे जी सर्विस दिली जाते तिचा स्पीड खूप जास्त असतो

The post जाणूना घ्या Jio Fiber म्हणजे काय, किती आहे स्पीड आणि कसे करावे रजिस्ट्रेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जशी गेल्या काही वर्षांत भारतात मोबाईलच्या 4G सर्विस बद्दल खूप चर्चा होती. तसेच यावर्षीपासून Fiber ब्रॉड बँड ची चर्चा सुरु झाली आहे. दोघांमध्ये एका गोष्टीचे साम्य आहे कि यामागे Reliance आहे. आधी कंपनीने फ्री सहा महिने लोकांना 4G इंटरनेट दिली आणि नंतर खूप स्वस्तात 4G सर्विस. आता जियो ने आपल्या Broadband सर्विस Jio Fiber ची घोषणा केली आहे. खास बाब अशी कि यासोबतच कंपनी फ्री मध्ये एचडी पासून 4के एलईडी टीव्ही पर्यंत मोफत देत आहे. त्यामुळे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे कि जियो फाइबर म्हणजे काय, याचे फायदे कोणते आणि यासाठी कसे करावे रजिस्ट्रेशन. चला तर जियोच्या नवीन फाइबर सर्विस बद्दल सविस्तर बोलूया.

जियो फाइबर म्हणजे काय

Jio Fiber, रिलायंसची फिक्सड लाइन ब्रॉड बँड सर्विस आहे ज्यात केबलच्या माध्यमातून करत किंवा ऑफिस मध्ये सुपर फास्ट इंटरनेट सेवा दिली जाईल. नावावरून समजले असेल कि यात फाइबर ऑप्टिक केबल द्वारे इंटरनेट सेवा दिली जाईल. इंटरनेट साठी फाइबर ऑप्टिक केबल सर्वात बेस्ट मानली जाते आणि म्हणूनच कंपनीने या ब्रॉडबँड सर्विसचे नाव जियो फाइबर ठेवले आहे.

कितनी आहे स्पीड

लक्षात घ्या वायरलेस सर्विसच्या तुलनेत वायर्ड अर्थात केबल द्वारे जी सर्विस दिली जाते तिचा स्पीड खूप जास्त असतो आणि जियोची हि सर्विस अल्ट्रा फास्ट इंटरनेट सर्विसच्या स्वरूपात दिली जाईल.

रिलायंस Jio Fiber ब्रॉडबँड सर्विसचा स्पीड 90 MBPS पासून सुरु होतो तर कंपनीचा कमाल स्पीड 1 GBPS पर्यंत आहे. मोबाईल वर साधारणत: 5 MBPS चा स्पीड मिळतो आणि त्यात तुम्ही सहज लॅपटॉप आणि पीसी पण कनेक्ट करता. विचार करा कि 90 एमबीपीएस आणि 1 जीबीपीएस अर्थात 1,000 एमबीपीएस मध्ये तुम्ही काय काय करू शकाल.

कधी मिळेल सर्विस

रिलायंस जियो फाइबरची सर्विस भारतात 5 सप्टेंबर 2019 पासून व्यवसायिकरित्या ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. कंपनीने याची टेस्टिंग 2017 मधेच सुरु केली होती पण तेव्हा काही निवडक ठिकाणी हि सेवा उपलब्ध होती. आता हि भारतातील अनेक शहरांत उपलब्ध होईल.

किती आहे किंमत

रिलायंसने आपल्या या सर्विसची घोषणा याच महिन्यात केली आहे. लॉन्च मध्ये कंपनीने फक्त दोनच प्लान बद्दल सांगितले आहे. बेसिक 90 एमबीपीएस चा प्लान ज्यासाठी तुम्हाला 700 रुपये दरमहा द्यावे लागतील. तर दुपार 1 जीबीपीएस चा प्लान ज्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये दरमहा द्यावे लागतील.

एक गोष्ट सांगणे आवश्यक आहे कि जियोच्या या सर्विस मध्ये तुम्हाला मासिक शुल्कासोबत सिक्योटरी डिपॉजिट पण दयावे लागेल. कंपनीने आतापर्यंत याविषयी सांगितले नाही पण लॉन्चच्या आधीपर्यंत काही वर्ष हि सर्विस टेस्ट साठी उपलब्ध होती आणि तेव्हा 4,500 रुपयांचे सिक्योटरी डिपॉजिट घेतले जात होते.

कशाप्रकारे मिळतील सेवा

Jio Fiber सर्विस मध्ये कंपनी इंटरनेट व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या बंडल सेवा उपलब्ध आहेत ज्या आतापर्यंत इतर कोणत्याही सर्विस प्रोव्हायडरने दिल्या नाहीत. जर तुम्ही जियो फाइबर सर्विस घेतलीत तर सर्वात आधी तुम्हाला एक टेलीफोन लाइन मिळेल. खास बाब अशी कि यात लोकल आणि एसटीडी कॉल पूर्णपणे फ्री असतील.

त्याचबरोबर तुम्हाला वाईफाई राउटर दिला जाईल. या वाईफाई राउटरची रेंज 1000 स्क्वायर फीट असेल. अर्थात या रेंज मध्ये तुम्ही कोणताही वाई-फाई इनेबल डिवाइस कनेक्ट करून इंटरनेट सेवा वापरू शकाल. जसे कि- मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप इत्यादी.

कंपनी जियो फाइबर सर्विस सोबत सेट-टॉप बॉक्स पण मोफत देत आहे. यातून तुम्ही तुमच्या टीव्ही वर केबल प्रमाणे टीव्ही चॅनल्स बघू शकाल. इतकेच नव्हे तर तुम्हाला अनेक चॅनल्सचे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल.

Jio Fiber सर्विस लॉन्चच्या वेळी कंपनीने अशी माहिती दिली होती कि या ब्रॉडबँड कनेक्शन सोबत तुम्हाला ओटीटी अर्थात अनेक वीडियो स्ट्रीम सर्विस मोफत मिळतील. कंपनीने कोणतेही नाव दिले नाही पण जियो 4जी सर्विस सोबत अल्ट बालाजी आणि झी5 इत्यादी मिळतात, त्यामुळे याच सर्विसेज तुम्हाला जियो फाइबर मध्ये पण मिळतील.

कशी मिळवावी जियो फाइबर सर्विस

Jio Fiber सर्विस साठी कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी तुम्ही इथे क्लिक करून कंपनीच्या वेबसाइट वर जाऊ शकता. त्याचप्रमाणे जवळच्या जियो स्टोर वर जाऊन पण तुम्ही आपल्या क्षेत्रातील जियो फाइबर सर्विस बद्दल माहिती मिळवू शकता.

किती शहरांमध्ये आहे जियो फाइबरची सर्विस

कंपनीने लॉन्चच्या दिवशी माहिती दिली होती कि 5 सप्टेंबर पासून जियो फाइबर सर्विसची सुरवात होत आहे आणि हि देशातील 1,100 शहरांत उपलब्ध होईल. तसेच हळूहळू हीच विस्तार संपूर्ण देसाहत होईल.

The post जाणूना घ्या Jio Fiber म्हणजे काय, किती आहे स्पीड आणि कसे करावे रजिस्ट्रेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/what-is-reliance-fiber-and-how-to-register-for-the-service/feed/ 0
मुकेश अंबानींनी सादर केला Jio Postpaid Plus, जाणून घ्या याचे सर्व फायदे https://www.91mobiles.com/marathi/jio-postpaid-plus-fiber-plan-benefit-offer-india/ https://www.91mobiles.com/marathi/jio-postpaid-plus-fiber-plan-benefit-offer-india/#respond Wed, 14 Aug 2019 12:14:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5039 Jio Postpaid Plus मध्ये कंपनी कडून होम सोल्यूशन्स सर्विस दिली जाईल.

The post मुकेश अंबानींनी सादर केला Jio Postpaid Plus, जाणून घ्या याचे सर्व फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने त्या दिवशी आपल्या 42व्या ऍन्युल जनरल मीटिंग (AGM) च्या मंचावरून अनेक मोठ्या घोषणा केल्या ज्यात Jio Fiber आणि SetTop Box सारख्या सर्विसेजचा समावेश आहे. या सेवा सादर कारण्यासोबतच रिलायंस कंपनीने स्पेशल मोबिलिटी सर्विस Jio Postpaid Plus पण अधिकृतपणे घोषित केला आहे. आतापर्यंत Jio ने फक्त प्रीपेड व पोस्टपेड प्लान आणले होते तर आता पोस्टपेड प्लस द्वारे कंपनी आपल्या प्लान्स मध्ये नवीन सुरवात करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कि कंपनीच्या इतर प्लान्स पेक्षा काय वेगळेपणा आहे Jio Postpaid Plus मध्ये आणि काय मिळेल या प्लान मध्ये खास.

Jio Postpaid प्लान रिलायंस जियोचे सिम वापरणाऱ्या त्या ग्राहकांना मिळेल जे मासिक दराने पैसे देतात. तसेच कंपनीचा नवीन Jio Postpaid Plus प्लान कंपनी आपल्या सिम सोबत देत नाही. या प्लस सेवेचा लाभ जियो द्वारा Jio Fiber वर दिले जाईल. असे यूजर जे Jio Fiber वर प्लॅटिनम ग्रेड सर्विस व कंपनीच्या प्रोडक्ट एक्सपीरियंसचा लाभ घेऊ इच्छित आहेत त्यांना Jio Postpaid Plus ची सुविधा दिली जाईल.

Jio Postpaid Plus ची खासियत :

1. मुकेश अंबानींच्या मते Jio Postpaid Plus घेणाऱ्या यूजर्सना कंपनी कडून ‘डोर स्टेप’ सुविधा दिली जाईल. जियो कडून यूजर्सच्या घरी जाऊन सिम कार्ड पासून सिम सेटअप आणि कनेक्शन पर्यंतची सर्विस मोफत दिली जाईल.

2. Jio Postpaid Plus मध्ये डेटा आणि वॉयस सर्विस खूप शानदार मिळेल. या सर्विसचा वापर घरात आणि बाहेर प्रत्येक ठिकाणी करता येईल.

3. Jio Postpaid Plus कंपनी फॅमिली प्लान्स सह घेऊन येईल. म्हणजे एकाच प्लानचा वापर अनेक लोक करू शकतील. वोडाफोनच्या फॅमिली प्लान प्रमाणे एक नंबर वर क्रेडिट झालेला डेटा एकापेक्षा जास्त लोक वापरू शकतील.

4. या प्लान मध्ये कंपनी कडून खूप स्वस्तात इंटरनेशनल कॉलिंग पॅक दिला जाईल. Jio Postpaid Plus वरून अमेरिका आणि कॅनडा मध्ये फक्त 500 रुपयांमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉल करता येतील.

5. Jio Postpaid Plus मध्ये कंपनी यूजर्सना त्यांचा फोन अपग्रेड करण्याची संधी मिळेल. बोलले जात आहे कि या प्लान मध्ये कंपनी जुना फोन बदलून नवीन फोन घेण्याची सुविधा पण देऊ शकते.

6. Jio Postpaid Plus मध्ये कंपनी कडून होम सोल्यूशन्स सर्विस दिली जाईल.

विशेष म्हणजे Reliance Jio जियोच्या तिसऱ्या वर्धापनदिनी येत्या 5 सेप्टेंबरला Jio Fiber सामान्य जनतेसाठी सादर केली जाईल. याच दिवशी कंपनी जियो फाइबरच्या टॅरिफ व प्लान्सचा खुलासा करेल आणि सोबतच Jio Postpaid Plus च्या किंमती पण समोर येतील. सर्व प्लान्स व टॅरिफ माय जियो डॉट कॉम सोबत माय जियो ऍप वर पण दिसतील.

The post मुकेश अंबानींनी सादर केला Jio Postpaid Plus, जाणून घ्या याचे सर्व फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-postpaid-plus-fiber-plan-benefit-offer-india/feed/ 0
असा मिळेल मोफत जियोचा 4K LED टीवी? https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-free-jio-4k-led-tv/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-free-jio-4k-led-tv/#respond Tue, 13 Aug 2019 11:43:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5031 नॅशनल कॉलिंग मोफत असेल.

The post असा मिळेल मोफत जियोचा 4K LED टीवी? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्हाला लक्षात असेल 5 सप्टेंबर 2016 चा दिवस जेव्हा मुकेश अंबानी यांनी आपली कंपनी Reliance Jio ने भारतात आपली सर्विस सुरवात केली होती. कंपनीने सुरवातीला वेलकम ऑफर अंतर्गत 3 महीने सर्व सेवा मोफत दिल्या होत्या. त्यानंतर हॅपी न्यू ईयर ऑफरच्या नावाने पुन्हा 3 महिन्यांसाठी सेवा मोफत दिल्या होत्या. अशाप्रकारे एकूण सहा महिन्यांसाठी जियोची सेवा मोफत मिळाली आणि जेव्हा कंपनीने शुल्क घेतले तेव्हा खूप कमी होते. इतके कमी कि कोणी विचार केला नव्हता. त्याचप्रमाणे जेव्हा कंपनीने 2017 मध्ये जियोच्या नवीन ब्रॉडबॅंड सर्विस बद्दल सांगितले होते तेव्हा पण लोकांना अशीच अपेक्षा होती. दोन वर्षांच्या ट्रायल नंतर आता मुकेश अंबानी यांनी Jio Broadband सर्विस Jio Fiber च्या अधिकृत लॉन्चची घोषणा केली आहे. आणि यावेळी पण कंपनीने इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. पण यावेळी डेटा किंवा सर्विस नाही तर 4K LED TV कंपनी मोफत देत आहे. त्यामुळे प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे कि कशाप्रकारे टीवी मोफत मिळेल. चला तर मग जाणून घेऊया मोफत टीवी बद्दल.

अशाप्रकारे मिळेल मोफत टीवी

मुकेश अंबानी यांनी काल आपल्या जियो फाइबर प्लान बद्दल सविस्तर सांगितले. त्यांनी सांगितले कि 5 सप्टेंबर पासून जियो फाइबर सर्विस अधिकृतपणे लॉन्च केली जाईल आणि भारतीय यूजर या ब्रॉडबॅंड सर्विसचा लाभ घेऊ शकतील.

कंपनी आपल्या जियो फाइबर ब्रॉडबॅंड सर्विस अंतर्गत 100 एमबीपीएस पासून 1 जीबीपीएस पर्यंतचे प्लान सादर करेल ज्यासाठी 700 रुपयांपासून 10,000 रुपयांपर्यंतचे मासिक शुल्क असेल. यात अनेक प्लान असतील पण अजूनतरी याची सविस्तर माहिती मिळाली नाही. 5 सप्टेंबरला संपूर्ण माहिती समोर येईल.

मोफत टीवी बद्दल बोलायचे तर कंपनी ने जियो मोबाईल सर्विस प्रमाणे आपल्या फाइबर सर्विस साठी वेलकम ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत जियो फोरएवर ऍन्युल प्लॅन्स कंपनीने लॉन्च केले आहेत आणि हा प्लान घेणाऱ्या लोकांना मोफत एलईडी टीवी दिली जाईल. अर्थात जर तुम्ही प्लानचे सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी घेतले तर तुम्हाला टीवी मिळेल. अधिक माहिती तुम्ही इथून घेऊ शकता.

लॉन्चच्या वेळी कंपनीने माहिती दिली आहे कि यूजर्सना एचडी पासून 4के एलईडी टीवी मोफत दिली जाईल. कोणत्या प्लॅन्स मध्ये टीवी उपलब्द होईल आणि कोणत्या प्लान मध्ये किती इंचाचा टीवी दिला जाईल हे सर्व 5 सप्टेंबर पर्यंत स्पष्ट होईल.

जियो ने वर्ष 2017 मधेच जियोच्या फिक्सड लाइन ब्रॉडबॅंड सर्विसची सुरुवातकेली होती पण आता हि अधिकृतपणे लॉन्च करण्यात आली आहे. या सर्विस मध्ये तुम्हाला फिक्सड लाइन टेलीफोन सर्विस मिळेल. ज्या अंतर्गत टीवी व्यतिरिक्त तुम्हाला मोफत सेट टॉप बॉक्स आणि अनेक ओटीवी सेवा मिळतील. ज्यात तुम्ही इंटरनेट सोबत मोफत लाइव टीवी, मूवी आणि सीरियल बघू शकला. एकेच नव्हे तर नॅशनल कॉलिंग मोफत असेल.

The post असा मिळेल मोफत जियोचा 4K LED टीवी? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-get-free-jio-4k-led-tv/feed/ 0
Jio देत आहे इंटरनेट सोबत 4K LED TV आणि Setup Box अगदी Free https://www.91mobiles.com/marathi/reliance-industries-agm-high-speed-broadband-jio-fiber-with-free-4k-led-tv-setup-box-india-offer/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-industries-agm-high-speed-broadband-jio-fiber-with-free-4k-led-tv-setup-box-india-offer/#respond Mon, 12 Aug 2019 11:52:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5018 एका सर्विसच्या किंमतीत दोन इतर सर्विसेसचा लाभ मोफत घेता येईल.

The post Jio देत आहे इंटरनेट सोबत 4K LED TV आणि Setup Box अगदी Free first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Industries ने आज आपल्या 42व्या एनुअल जनरल मीटिंग (AGM) च्या मंचावरून देशवासियांना अनेक चांगल्या चांगल्या सुविधा दिल्या आहेत. कंपनीने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत ज्यात Jio GiGaFiber आणि Jio set top box चा पण समावेश आहे. Jio चा इतिहास आहे जेव्हा कंपनीने आपली एखादी नवीन सर्विस बाजारात आणते तेव्हा सुरवातीला मोफत देण्यात येते. कंपनीने सर्वात आधी फ्री मध्ये इंटरनेट डेटा व वॉयस कॉलिंग सर्विस दिली तर नंतर कंपनीने JioPhone पण मोफत दिला. तर आज भारतीयांना जबरदस्त भेट देत Jio ने घोषणा केली आहे कि कंपनी आता आपल्या यूजर्सना 4K LED TV पण मोफत देईल.

Reliance Jio ने आपली सुपर फास्ट इंटरनेट ब्रॉडबँड सर्विस Jio Fiber अधिकृतपणे लॉन्च केली आहे. हि सर्विस येत्या 5 सप्टेंबर पासून देशात सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध होईल. या सर्विस सोबतच Jio ने सांगितले कि जे यूजर्स कंपनीची ब्रॉडबँड सर्विस घेतील त्यांना कंपनी कडून वेलकम ऑफर अंतर्गत एक 4K LED TV आणि एक Jio Setup Box मोफत देईल.

अशी आहे ऑफर

Reliance Jio HD/4K LED TV आणि 4K Setup Box कंपनीच्या Jio Fiber ब्रॉडबँड सह मोफत देत आहे. म्हणजे Jio Fiber विकत घेतल्यास यूजर्सना टेलीविजन आणि सेटअप बॉक्स मोफत मिळवण्याची संधी मिळेल. कंपनीच्या स्कीम अंतर्गत जियो फाइबरचा वार्षिक प्लान घेतल्यास यूजर्सना हि मोफत सुविधा मिळेल. कंपनीने आपल्या या प्लानचे नाव ‘Jio Forever Annual Plan’ असे ठेवले आहे.

प्लानची माहिती

कंपनीने Jio Fiber च्या प्लानची बेसिक किंमत 700 रुपये प्रतिमाह ठेवली आहे. तर Jio Fiber चा सर्वात मोठा प्लान 10,000 रुपये प्रतिमाहचा आहे. Jio Fiber चा कोणताही प्लान संपूर्ण वर्षभरासाठी एकसाथ घेतल्यास कंपनीकडून यूजर्सना HD/4K LED TV आणि 4K Setup Box मोफत दिला जाईल. टीवी आणि सेटअप बॉक्स साठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.

उदाहरणार्थ जर तुम्ही आपल्या Jio Fiber चा 700 रुपयांचा प्लान Jio Forever Annual Plan सह घेतला तर तुम्हाला वर्षभरासाठी एकूण 8,400 रुपये द्यावे लागतील. या 8,400 रुपयांमध्ये तुम्हाला Jio Fiber + HD/4K LED TV + 4K Setup Box मिळेल. म्हणजे एका सर्विसच्या किंमतीत दोन इतर सर्विसेसचा लाभ मोफत घेता येईल.

विशेष म्हणजे Jio Fiber च्या 700 रुपये प्रतिमाह वाल्या प्लान मध्ये यूजर्सना 100एमबीपीएस च्या स्पीडने इंटरनेट डेटा मिळेल. तसेच कंपनीच्या सर्वात मोठ्या 10,000 रुपयांच्या प्लान मध्ये 1जीबीपीएस च्या स्पीडने इंटरनेट डेटा दिला जाईल. Jio Fiber सोबत यूजर्सना अल्ट्रा एचडी एंटरटेनमेंट, मल्टी पार्टी वीडियो कॉन्फ्रेंसिंग सारख्या सर्विसेज मिळतील. तसेच टीवी सेटअप बॉक्स मध्ये तुम्ही आपल्या टीवी स्क्रीन वर अल्ट्रा एचडी एंटरटेनमेंटची मजा घेता येईल.

The post Jio देत आहे इंटरनेट सोबत 4K LED TV आणि Setup Box अगदी Free first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-industries-agm-high-speed-broadband-jio-fiber-with-free-4k-led-tv-setup-box-india-offer/feed/ 0
जियो गीगाफाइबर वर मिळेल प्रत्येक महिन्याला 100जीबी सुपर फास्ट इंटरनेट, जियो होम टीवी पण लवकर होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-gigafiber-triple-play-plan-offer-100gb-data-jio-home-tv/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-gigafiber-triple-play-plan-offer-100gb-data-jio-home-tv/#respond Tue, 26 Mar 2019 16:59:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3943 एका मीडिया रिपोर्ट मध्ये जियो गीगाफाइबरच्या नवीन प्लान ‘ट्रिपल प्ले’ ची माहिती समोर आली आहे.

The post जियो गीगाफाइबर वर मिळेल प्रत्येक महिन्याला 100जीबी सुपर फास्ट इंटरनेट, जियो होम टीवी पण लवकर होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो ने गेल्यावर्षी टेलीकॉम सर्विस मध्ये यश मिळवल्यानंतर कंपनीची ब्रॉडबँड सर्विस सुरु करत ‘जियो गीगाफाइबर’ लॉन्च केली होती. 4जी इंटरनेट आणि वॉयस कॉल स्वस्त्यात देणाऱ्या या कंपनी ने अल्ट्रा फास्ट स्पीड असलेली ब्रॉडबँड सर्विस पण स्वस्तात सादर केली आहे. जियोची ​गीगाफाइबर सर्विस सध्या फक्त रिलांयस कर्मचारर्यांसाठी उपलब्ध झाली आहे तसेच कंपनीने देशातील 1100 शहरांमध्ये जियो गीगाफाइबरचे रजिस्ट्रेशन पण सुरु केले आहे. जियोने गीगाफाइबरचे पब्लिक प्लान्सचे डिटेल अजूनतरी सार्वजनिक केले नाहीत पण एका मीडिया रिपोर्ट मध्ये जियो गीगाफाइबरच्या नवीन प्लान ‘ट्रिपल प्ले’ ची माहिती समोर आली आहे.

ट्रिपल प्ले प्लान
रिलायंस जियोच्या गीगाफाइबर प्लान ‘ट्रिपल प्ले’ ची माहिती टेलीकॉम टॉक ने आपल्या रिपोर्ट मध्ये दिली आहे. मीडिया रिपोर्ट मधून समजले आहे कि जियो गीगाफाइबरचा हा ट्रिपल प्ले प्लान 1 महिना म्हणजे 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येईल. या प्लान अंतर्गत गीगाफाइबर वर यूजर्सना एक महिण्यासाठी एकूण 100जीबी हाई स्पीड इंटरनेट डेटा दिला जाईल. या डेटा सोबत अनलिमिटेड वॉयस कॉलची सुविधा पण मिळाले.

जियो गीगाफाइबरच्या ट्रिपल प्ले प्लान मध्ये इंटरनेट डेटा सोबत जियो होम टीवी चे सब्सक्रिप्शन बद्दल पण सांगण्यात आले आहे. तसेच जियो ऍप्सची सुविधा पण या प्लान मध्ये कोणत्याही अतिरिक्त चार्ज विना दिली जाईल. विशेष म्हणजे ​रिलायंस जियोने आतापर्यंत ‘जियो होम टीवी’ ची अधिकृत घोषणा केली नाही. बोलले जात आहे कि येत्या काही दिवसांत कंपनी डीटीएच बाजारात एंट्री घेत जियो होम सादर करेल.

जियो गीगाफाइबर
रिलायंस जियोच्या ब्रॉडबँड सर्विस जियो गीगाफाइबर बद्दल बोलायचे तर हि एफटीटीएच म्हणजे फाइबर टू द होम सर्विस आहे. जियोने हि सर्विस देशात सादर केली आहे पण सध्या हि टेस्टिंग फेज मध्ये आहे. जियोच्या कर्मचाऱ्यांना जियो गीगाफाइबरचे कनेक्शन्स देण्यात आले आहेत जेणेकरून गीगाफाइबरचा स्पीड व क्षमता बघता येईल. जियोचा दावा आहे कि जियो गीगाफाइबरचे ट्रायल कंपनी 10,000 पेक्षा जास्त शहरांत केले आहे. आणि लवकरच सामान्य लोकांसाठी पण हि सर्विस उपलब्ध होईल. विशेष म्हणजे रिलायंस जियोने जियो गीगाफाइबरचे रजिस्ट्रेशन सुरु केले आहे. ज्यासाठी माय जियो ऍप सोबत कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन रजिस्ट्रर करता येईल.

माय जियो ऍप मधून रजिस्ट्रेशन
ऍप मधून रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा माय जियो ऍप ओपन करावा लागेल. त्यांनतर तुमच्याकडे लोकेशन मागितले जाईल. तुम्ही चेंज वर क्लिक करून तुमच्या घराचे किंवा ऑफिसचे लोकेशन टाकू शकता.

लोकेशन अपडेट करताच तुमच्याकडे डिटेल्स मागितले जातील. जसे कि नाव आणि मोबाईल नंबर इत्यादी. ते देऊन तुम्ही ऍग्री करून सबमिट करा. तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. त्यांनतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकावा लागेल. पत्ता टाकताच तुमचे काम पूर्ण होईल. तुम्ही इतरांना पण रजिस्ट्रेशन साठी इन्वाइट पण करू शकता. रजिस्ट्रेशन प्रक्रिया मोफत आहे.

जियो वेबसाइट वरून रजिस्ट्रेशन
वेबसाइट वरून जियो गीगाफाइबरचे ​रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात आधी Jio.com वेबसाइट वर जा. तिथे इन्वाईट जियो गीगाफाइबर नाउ चा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा. असे करताच नवीन विंडो ओपन होईल तिथे तुम्हाला लोकेशन टाकावी लागेल. तुम्ही तुमच्या घराचे किंवा ऑफिसचे लोकेशन टाकू शकता. लोकेशन टाकण्यासाठी तुम्हाला चेंज वर क्लिक करावे लागेल आणि संपूर्ण पत्ता सविस्तर टाकावा लागेल.

लोकेशन टाकताच तुम्हाला नाव आणि मोबाईल नंबर विचारला जाईल. तो देताच मोबाईल वर ओटीपी येईल आणि तो सबमिट करून पुढे जा. त्यांनतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकावा लागेल. पत्ता दिल्यांनतर सबमिट करताच काम पूर्ण होईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इतरांना रजिस्ट्रेशन साठी इन्वाईट करू शकता.

The post जियो गीगाफाइबर वर मिळेल प्रत्येक महिन्याला 100जीबी सुपर फास्ट इंटरनेट, जियो होम टीवी पण लवकर होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-gigafiber-triple-play-plan-offer-100gb-data-jio-home-tv/feed/ 0
जियो फाइबर होणार आहे लॉन्च, 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल अनलिमिटेड वीडियो व वॉयस कॉल आणि 100एमबीपीएस स्पीड ने हाईस्पीड डाटा https://www.91mobiles.com/marathi/jio-fiber-100-mbps-broadband-unlimited-video-call-unlimited-voice-call-in-rs-1000-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jio-fiber-100-mbps-broadband-unlimited-video-call-unlimited-voice-call-in-rs-1000-in-marathi/#respond Thu, 31 May 2018 11:04:39 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=715 आगामी दिवसांमध्ये रिलायंस जियो आपली हाईस्पीड इंटरनेट​ सर्विस जियो फाइबर अधिकृत रीत्या लॉन्च करेल जी वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या सर्कल्स मध्ये रोल आउट होत राहील.

The post जियो फाइबर होणार आहे लॉन्च, 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल अनलिमिटेड वीडियो व वॉयस कॉल आणि 100एमबीपीएस स्पीड ने हाईस्पीड डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जियो बद्दल महिन्याच्या सुरवातीला बातमी आली होती की कंपनी ने ब्रॉडबँड सर्विस क्षेत्रात पाऊल टाकून आपल्या हाईस्पीड इंटरनेट सर्विस ‘जियो फाइबर’ ची सुरवात केली आहे. माहिती मिळाली होती की जियो ने हाई स्पीड फाइबर टू द होम (FTTH) ची सुरवात केली आहे आणि जियो ने काही निवडक सर्कल्स मध्ये हे ब्रॉडबँड कनेक्शन वापरण्यासाठी सादर केला आहे. जियो 4,500 रुपये सिक्योरिटी डिपॉजिट वर 100जीबी मोफत डाटा सह एक महीन्यात 1,100 जीबी पर्यंत डाटा देत होती. तसेच आता एक नवीन बातमी येत आहे की जियो लवकरच आपली ब्राॅडबँड सर्विस संपूर्ण देशात लॉन्च करणार आहे.

लाइवमिंट ने ​आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की जियो आपली हाईस्पीड इंटरनेट​ सर्विस ‘जियो फाइबर’ लवकरच संपूर्ण देशात कमर्शियल रुपात लॉन्च करू शकते. रिपोर्ट नुसार जियो फाइबर मध्ये ग्राहकांना 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हाईस्पीड इंटरनेट ​दिले जाईल जी 100 एमबीपीएस च्या स्पीड ने चालेल. जियो च्या या प्लान मध्ये फास्ट इंटरनेट सह अनलिमिटेड वॉयस कॉल आणि अनलिमिटेड वीडियो कॉल पण आहेत. जियो फाइबर चा हा प्लान 1,000 रुपयांपेक्षा कामी किंमतीत यूजर्सना वापरायला मिळेल.

विशेष म्हणजे सध्या जियो फाइबर काही ठिकाणी डेमो स्वरुपात काम करत आहे जी येणार्‍या दिवसांमध्ये कमर्शियली लॉन्च होईल. आता जियो फाइबर चे ब्राॅडबँड कनेक्शन मिळवण्यासाठी यूजर्सना 4,500 रुपये सिक्योरिटी डिपॉजिट द्यावे लागेल. हा हाई स्पीड फाइबर टू द होम (FTTH) वर चालतो. यात जियो यूजर्सना एका महिन्यात 25 वेळा डाटा रिचार्ज करण्याचा आॅप्शन मिळत आहे. ज्यात प्रत्येक वेळी कस्टमर 40जीबी डाटा पर्यंतचा रिचार्ज करू शकतात. तसेच कंपनी कडून 100 जीबी फ्री दिला जात आहे. अशा प्रकारे जियो फाइबर यूजर्सना एकूण एका महिन्यात 1,100 जीबी डाटा चा फायदा मिळत आहे.

पण जियो फाइबर देशात आॅफिशियली रोलआउट झाल्यावर कंपनी च्या आॅफर्स काय असतील आणि कोणत्या किंमतीत जियो यूजर्सना प्लान्स दिले जातील यासाठी जियो च्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल. विशेष म्हणजे जियो आपली अजून एक नवीन सर्विस इंटरनेट प्रोटोकॉल टेलीविजन (आईपीटीवी) वर पण काम करत आहे आणि याच्या मदतीने जियो फाइबर टीवी शी जोडता येईल.

आशा आहे की आगामी दिवसांमध्ये रिलायंस जियो आपली हाईस्पीड इंटरनेट​ सर्विस जियो फाइबर अधिकृत रीत्या लॉन्च करेल जी वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या सर्कल्स मध्ये रोल आउट होत राहील.

The post जियो फाइबर होणार आहे लॉन्च, 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल अनलिमिटेड वीडियो व वॉयस कॉल आणि 100एमबीपीएस स्पीड ने हाईस्पीड डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-fiber-100-mbps-broadband-unlimited-video-call-unlimited-voice-call-in-rs-1000-in-marathi/feed/ 0