Jio Fiber चा झटका, वाई-फाई कनेक्ट केल्यावर स्पीड कमी होऊन होत आहे निम्मा

Reliance Jio ने गेल्याच महिन्यात देशात आपल्या ब्रॉडबँड सर्विसची सुरवात करत Jio Fiber लॉन्च केला होता. Jio Fiber भारतात लॉन्च झालेली पहिली ब्रॉडबँड सर्विस आहे जी 1Gbps चा इंटरनेट स्पीड देण्यास सक्षम आहे. Jio Fiber चा सर्वात छोटा प्लान 699 रुपयांचा आहे ज्यात कंपनीकडून यूजर्सना 100Mbps स्पीडने इंटरनेट देण्याचा दावा केला गेला होता. आता जेव्हा Jio Fiber बाजारात रोलआउट झाली आहे आणि देशात Jio Fiber चे कनेक्शन जोडण्यास सुरवात झाली आहे, तेव्हा समोर आले आहे कि Jio Fiber शी वाई-फाई कनेक्ट केल्यावर यूजर्सना फक्त 50Mbps चा स्पीड मिळत आहे.

91मोबाईल्सने आपल्या रिपोर्ट मध्ये Jio Fiber संबंधित हि महत्वाची माहिती दिली आहे. 91मोबाईल्सने राजधानी दिल्ली मध्ये Jio Fiber चे कनेक्शन देणाऱ्या डीलरशी संपर्क करून माहिती घेतील आहे. प्राप्त माहिती नुसार Jio Fiber आपल्या सर्वात छोट्या प्लान्स मध्ये एक महिन्यासाठी 100GB डेटा देत आहे जो 100 Mbps स्पीडने चालतो. एखाद्या कंम्प्यूटर किंवा लॅपटॉप मध्ये Jio Fiber कनेक्ट केल्यास हा स्पीड अगदी योग्य म्हणजे 100 Mbps च्य आसपास असतो पण जेव्हा Jio Fiber शी वाई-फाई कनेक्ट करण्यात आला तेव्हा हा स्पीड अर्धा म्हणजे 50 Mbps झाला.

वाई-फाई कनेक्शन वर फक्त 50Mbps स्पीड

Jio Fiber शी वाई-फाई कनेक्ट केल्यावर इंटरनेट स्पीड 100Mbps वरून थेट 50Mbps वर आला. याबाबतीत जेव्हा Jio शी संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितले कि 100Mbps स्पीड असलेला प्लान विकत घेतल्यास LAN/Ethernet कनेक्शन सह Jio संपूर्ण 100Mbps चा स्पीड देईल. पण Jio Fiber जेव्हा Jio Wi-Fi Home gateway द्वारे एखाद्या स्मार्टफोन किंवा इतर डिवाईसशी कनेक्ट केली जाईल तेव्हा हा स्पीड 50Mbps पर्यंत येईल.

हे आहे कारण

91मोबाईल्सशी बोलताना Reliance Jio च्या तांत्रिक विशेषज्ञानी सांगितले कि कंपनीकडून मिळणारा Wi-Fi router सिंगल-बँड आहे आणि 2.4गीगाहर्ट्ज फ्रिक्वेंसी वर चालतो. आणि याच कारणामुळे Jio Fiber शी वाई-फाई कनेक्ट केल्यावर 50Mbps चा स्पीड मिळत आहे.

उपाय पण आहे

फक्त 50Mbps चा स्पीड मिळण्याच्या कारणासोबतच 91मोबाईल्सने हा स्पीड वाढवण्याचा उपाय पण शोधला आहे. Reliance Jio कडून जो Jio Fiber सह सिंगल-बँड Wi-Fi router दिला जात आहे तोच बदलून यूजर डुअल-बँड Wi-Fi router पण वापरू शकतात. Jio Fiber सह वाई-फाई वर पण 100Mbps पर्यंतचा स्पीड मिळवण्यासाठी 5गीगाहर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेंसी असेलला राउटर वापरावा लागेल. पण त्यासाठी यूजर्सना वेगळे पैसे द्यावे लागतील.

फ्री टीवी ऑफर

Reliance Jio HD/4K LED TV आणि 4K Setup Box कंपनीच्या Jio Fiber ब्राडबँड सोबत फ्री देत आहे. म्हणजे Jio Fiber विकत घेतल्यास यूजर्सना टेलीविजन आणि सेटअप बॉक्स मोआफ्ट मिळवण्याची संधी मिळेल. कंपनीच्या स्कीम अंतर्गत जियो फाइबरचा वार्षिक प्लान घेतल्यास यूजर्सना हि मोफत सुविधा मिळेल. कंपनीने आपल्या या प्लानचे नाव ‘Jio Forever Annual Plan’ ठेवले आहे.

कंपनीने Jio Fiber च्या प्लानची बेस किंमत 700 रुपये प्रतिमाह ठेवली आहे. तसेच Jio Fiber चा सर्वात मोठा प्लान 10,000 रुपये प्रतिमाहचा आहे. Jio Fiber चा कोणताही प्लान एक वर्षासाठी घेतल्यास कंपनी कडून यूजर्सना HD/4K LED TV आणि 4K Setup Box मोफत मिळेल. टीवी आणि सेटअप बॉक्स साठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे दयावे लागणार नाहीत.

उदाहरणार्थ जर तुम्ही Jio Fiber चा 700 रुपयांचा प्लान Jio Forever Annual Plan सह घेतला तर तुम्हाला संपूर्ण वर्षात एकूण 8,400 रुपये द्यावे लागतील. या 8,400 रुपयांमध्ये तुम्हाला Jio Fiber + HD/4K LED TV + 4K Setup Box मिळेल. म्हणजे एका सर्विसच्या किंमतीत अजून दोन सर्विस मोफत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here