POCO C55 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 14:52:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 या स्मार्टफोनच्या किंमतीवर जाऊ नका! 6GB RAM, 5,000mAh बॅटरीसह POCO C55 भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-smartphone-poco-c55-launch-in-india-price-specifications-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-smartphone-poco-c55-launch-in-india-price-specifications-sale-details/#respond Tue, 21 Feb 2023 07:25:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18003 पोकोनं काही दिवसांपूर्वी आपल्या एक्स सीरिजमध्ये Poco X5 Pro सादर केला होता. हा मिडरेंजमध्ये आलेला शानदार स्मार्टफोन आहे. तर आज कंपनीनं बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. आज भारतीय बाजारात POCO C55 लाँच झाला आहे. हा एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो फक्त 9,499 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत बाजारात आला आहे. पोको सी55 मध्ये […]

The post या स्मार्टफोनच्या किंमतीवर जाऊ नका! 6GB RAM, 5,000mAh बॅटरीसह POCO C55 भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • POCO C55 मध्ये 6.71 इंचाची मोठी स्क्रीन आहे.
  • हा IP52 रेटेड Splash Proof स्मार्टफोन आहे.
  • 50MP Camera आणि 5,000mAh Battery देखील मिळते.

पोकोनं काही दिवसांपूर्वी आपल्या एक्स सीरिजमध्ये Poco X5 Pro सादर केला होता. हा मिडरेंजमध्ये आलेला शानदार स्मार्टफोन आहे. तर आज कंपनीनं बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. आज भारतीय बाजारात POCO C55 लाँच झाला आहे. हा एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो फक्त 9,499 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत बाजारात आला आहे. पोको सी55 मध्ये 50MP Camera, 6GB RAM, MediaTek Helio G85 चिपसेट आणि 5,000mAh Battery सारखे फीचर्स मिळतात ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

POCO C55 Price

पोको सी55 भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये आला आहे. यातील बेस व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज मिळते. तर 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज असलेला मोठा मॉडेल 10,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनची विक्री 28 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरु होईल, तसेच पहिल्या दिवशी 500 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळेल. हा फोन Cool Blue, Power Black आणि Forest Green कलरमध्ये खरेदी करता येईल.

POCO C55 Specifications

  • 6.71″ HD+ 60Hz Display
  • 6GB RAM + 128GB Storage
  • MediaTek Helio G85
  • 50MP Dual Rear Camera
  • 10W 5,000mAh Battery

पोको सी55 स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करती आहे. या फोनचा डिस्प्ले 268पीपीआय, 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 70% एनटीएससी रेशियो सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. हे देखील वाचा: रेडमी-पोकोच्या अडचणीत वाढ; स्वस्त आणि मस्त Realme C55 झाला वेबसाइटवर लिस्ट

POCO C55 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 वर लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एआरएम माली जी52 एमसी2 जीपीयू आहे. हा पोको फोन LPDDR4X RAM टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी पोको सी55 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जो सेकंडरी क्यूवीजीए लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा पोको फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: IPL 2023 live streaming: 31 मार्चपासून सुरु होणार क्रिकेटचा महासंग्राम; ‘इथे’ बघता येणार मोफत

POCO C55 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. पोकोनं आपला फोन आयपी52 स्प्लॅश प्रूफ बनवला आहे. या फोनचे डायमेंशन 168.76×76.41×8.77एमएम आणि वजन 192ग्राम आहे.

The post या स्मार्टफोनच्या किंमतीवर जाऊ नका! 6GB RAM, 5,000mAh बॅटरीसह POCO C55 भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-smartphone-poco-c55-launch-in-india-price-specifications-sale-details/feed/ 0
POCO C55 च्या भारतीय लाँचची कंपनीनं दिली माहिती; फ्लिपकार्टवरून होणार विक्री https://www.91mobiles.com/marathi/poco-c55-launch-in-india-soon-teased-officially/ https://www.91mobiles.com/marathi/poco-c55-launch-in-india-soon-teased-officially/#respond Thu, 16 Feb 2023 06:31:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17865 पोको बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की कंपनी आपल्या ‘सी’ सीरीज अंतगर्त नवीन मोबाइल फोन घेऊन येईल जो पोको सी55 नावानं मार्केटमध्ये एंट्री घेईल. तसेच आज पोको इंडियानं स्वतःहून या स्मार्टफोनच्या लाँचची माहिती दिली आहे. कंपनीनं टीज केलं आहे की भारतात POCO C55 लाँच केला जाणार आहे आणि याची विक्री फ्लिपकार्टवरून केली जाईल. […]

The post POCO C55 च्या भारतीय लाँचची कंपनीनं दिली माहिती; फ्लिपकार्टवरून होणार विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • POCO C55 इंडिया लाँच कंपनीनं ऑफिशियली टीज केला आहे.
  • हा फोन चीनमध्ये आलेल्या Redmi 12C चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो.
  • पोको सी55 मध्ये 50MP Camera आणि MediaTek Helio G85 दिला जाऊ शकतो.

पोको बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की कंपनी आपल्या ‘सी’ सीरीज अंतगर्त नवीन मोबाइल फोन घेऊन येईल जो पोको सी55 नावानं मार्केटमध्ये एंट्री घेईल. तसेच आज पोको इंडियानं स्वतःहून या स्मार्टफोनच्या लाँचची माहिती दिली आहे. कंपनीनं टीज केलं आहे की भारतात POCO C55 लाँच केला जाणार आहे आणि याची विक्री फ्लिपकार्टवरून केली जाईल. या फोनमध्ये 50MP Camera, MediaTek Helio G85 आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात.

पोको इंडियानं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून माहिती दिली आहे की कंपनी भारतात POCO C55 लाँच करणार आहे. ब्रँडकडून अद्याप लाँच डेटची माहिती देण्यात आली नाही परंतु आशा आहे की फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला पोको सी55 देशात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. फोनची इतर माहिती अजून समोर अली नाही, परंतु अशी चर्चा आहे की हा पोको फोन चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi 12C चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. हे देखील वाचा: अत्यंत स्वस्तात लाँच होईल Samsung Galaxy A24 फोन; Realme ला टक्कर देण्याची प्लॅनिंग

POCO C55चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 50MP Camera
  • 6.71″ HD+ Display
  • MediaTek Helio G85
  • 6GB RAM + 128GB Storage
  • 10W 5,000mAh Battery

पोको सी55 जर खरंच चीनमध्ये आलेल्या रेडमी 12सीचा ही रीब्रँडेड व्हर्जन असेल तर यातील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा अंदाज लावता येईल. रेडमी 12सी चीनमध्ये 20.6:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या स्क्रीनवर 500निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात.

Redmi 12C 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करतो आणि हा चिपसेट पोको सी55 मध्ये देखील मिळू शकतो. हा फोन अँड्रॉइड आधारित मीयुआय 13 वर चालतो. चीनमध्ये हा फोन 4जीबी + 64जीबी आणि 6जीबी + 128 जीबी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे आणि हे मॉडेल भारतात येऊ शकतात. हे देखील वाचा: 108Km रेंज सह येतेय 2023 Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर! लवकरच होणार लाँच

फोटोग्राफीसाठी रेडमी 12सी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

The post POCO C55 च्या भारतीय लाँचची कंपनीनं दिली माहिती; फ्लिपकार्टवरून होणार विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-c55-launch-in-india-soon-teased-officially/feed/ 0
Poco X5 Pro नंतर आता आली POCO C55 ची बातमी https://www.91mobiles.com/marathi/poco-c55-to-launch-in-india-as-rebranded-redmi-12c-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/poco-c55-to-launch-in-india-as-rebranded-redmi-12c-specifications-revealed/#respond Wed, 11 Jan 2023 04:52:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16746 पोको संबंधित एक बातमी कालच आली होती की कंपनी चीनमध्ये आलेला Redmi Note 12 Pro Speed Edition भारतात POCO X5 Pro 5G नावानं लाँच करू शकते. तर आता या ब्रँडची आणखी एक बातमी समोर आली आहे की चीनमध्ये लाँच झालेला Redmi 12C स्मार्टफोन देखील भारतीय बाजारात POCO C55 च्या रूपात पदापर्ण करू शकतो. कंपनीनं या […]

The post Poco X5 Pro नंतर आता आली POCO C55 ची बातमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पोको संबंधित एक बातमी कालच आली होती की कंपनी चीनमध्ये आलेला Redmi Note 12 Pro Speed Edition भारतात POCO X5 Pro 5G नावानं लाँच करू शकते. तर आता या ब्रँडची आणखी एक बातमी समोर आली आहे की चीनमध्ये लाँच झालेला Redmi 12C स्मार्टफोन देखील भारतीय बाजारात POCO C55 च्या रूपात पदापर्ण करू शकतो. कंपनीनं या फोन्सच्या नावांबद्दल किंवा लाँचबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु असे दिसते आहे की चीनमध्ये जे फोन रेडमी ब्रँड अंतगर्त आले आहेत तेच पोको ब्रँड अंतगर्त भारतात येऊ शकतात.

POCO C55 इंडिया लाँच

पोकोफोन लाँच संबंधित ही मोठी माहिती परदेशी टिपस्टर कॅस्परनं शेयर केली आहे. त्यानुसार POCO C55 स्मार्टफोन Redmi 12C चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. हा रेडमी मोबाइल अलीकडेच चीनमध्ये लाँच झाला होता जो आता पोको सी55 च्या रूपात ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. याआधी टिपस्टर योगेश बरारनं दावा केला होता की Xiaomi नं चीनमध्ये लाँच केलेला Redmi Note 12 Pro Speed Edition स्मार्टफोनच भारतात POCO X5 Pro नावानं येऊ शकतो आणि हा फोन याच महिन्यात अर्थात जानेवारी 2023 च्या अखेरपर्यंत भारतात लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येईल Samsung Galaxy A14 5G फोन; भारतीय लाँचपूर्वीच किंमत लीक

POCO C55 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.71 इंच डिस्प्ले
  • 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज
  • मीडियाटेक हीलियो जी85
  • 50एमपी ड्युअल कॅमेरा
  • 10वॉट 5,000एमएएच बॅटरी

लक्षात असू दे की पोको कंपनीनं आतापर्यंत सी55 स्मार्टफोन संबंधित कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे आता आम्ही रेडमी 12सी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पोको सी55 मध्ये मिळतील असा अंदाज लावत आहोत. हा रेडमी फोन चीनमध्ये 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. या फोनची स्क्रीन 500निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करते. या फोनचे डायमेंशन 68.76×76.41×8.77एमएम आणि वजन 192ग्राम आहे.

Redmi 12C अँड्रॉइड ओएस आधारित मीयुआय 13 वर चालतो. या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये माली-जी52 एमपी2 जीपीयू देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4जीबी LPDDR4X RAM आणि 256जीबी eMMC 5.1 ROM ला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Pathaan Trailer Released: चार वर्षानंतर शाहरुख प्रमुख भूमिकेत; ‘पठाण’ चा ट्रेलर रिलीज

फोटोग्राफीसाठी रेडमी 12सी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 3.5एमएम जॅक आहे.

The post Poco X5 Pro नंतर आता आली POCO C55 ची बातमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-c55-to-launch-in-india-as-rebranded-redmi-12c-specifications-revealed/feed/ 0