रेडमी-पोकोच्या अडचणीत वाढ; स्वस्त आणि मस्त Realme C55 झाला वेबसाइटवर लिस्ट

Highlights

  • Realme C55 लवकरच मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो.
  • हा एक लो बजेट स्मार्टफोन असेल जो कम किंमतीत विकला जाईल.
  • रियलमी सी55 Realme C35 का अ‍ॅडव्हान्स व्हर्जन असू शकतो.

Realme C55 च्या बातम्या गेल्या दोन महिन्यांपासून येत आहेत. हा मोबाइल फोन अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला आहे आणि आता याला SIRIM certification देखील मिळालं आहे. हा एक कमी किंमत असलेला लो बजेट स्मार्टफोन असेल जो बाजारातील Realme C35 चा नेक्स्ट व्हर्जन असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढे तुम्ही रियलमी सी55 मधील फीचर्स व स्पेेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता.

Realme C55

रियलमी सी55 एसआयआरआयएम सर्टिफिकेशन्स साइटवर RMX3710 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. याआधी हा फोन NBTC, EEC आणि FCC सह भारतीय सर्टिफिकेशन साईट BIS वर देखील दिसला होता. बीआयएसवरून स्पष्ट झालं आहे की Realme C55 लवकरच भारतात देखील एंट्री करेल. तसेच ताज्या लिस्टिंगमध्ये खुलासा झाला आहे की या फोनमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,880एमएएचची बॅटरी दिली जाईल. हे देखील वाचा: चिनी नव्हे स्वदेशी कंपनीनं देणार स्वस्तात 7GB रॅम; Lava Yuva 2 Pro ची किंमत व स्पेसिफिकेशन लीक

Realme C35

रियलमी सी55 ची जास्त माहिती समोर आली नाही परंतु जुना सी35 स्मार्टफोन पाहता यात 6.6 इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. अँड्रॉइड 12 सह हा फोन रियलमी युआय 2.0 वर चालतो ज्यात 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टा-कोर Unisoc T616 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Realme C35 फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि एफ/2.8 अपर्चर असलेला ब्लॅक अँड व्हाईट वीजीए सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी सी35 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा रियलमी मोबाइल ड्युअल सिमला सपोर्ट करतो, जोडीला 4जी एलटीई, 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळतात. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तसेच या मोबाइलमध्ये फेस अनलॉक फीचरचा सपोर्टही आहे. तसेच पावर बॅकअपसाठी या रियलमी फोनमध्ये 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 18वॉट फास्ट चार्जिंगसह येते. हे देखील वाचा: Oppo Reno8 T सारखा आणखी नवीन 5G स्मार्टफोन; कंपनीनं सुरु केली भारतात टेस्टिंग

Realme C35 Price

रियलमी सी35 भारतीय बाजारात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 11,999 रुपये आहे. तर फोनच्या 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. सर्वात मोठा मॉडेल 13,999 रुपयांमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी देतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here