POCO X5 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 14 Mar 2023 07:23:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 POCO X5 5G फोन भारतात लाँच; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/poco-x5-5g-launched-in-india-check-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x5-5g-launched-in-india-check-price-specifications/#respond Tue, 14 Mar 2023 07:23:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19457 काही दिवसांपूर्वी ही POCO X5 Pro 5G फोन भारतात लाँच केल्यानंतर आता कंपनीनं या सीरीजचा नवीन मॉडेल POCO X5 5G देखील भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन अ‍ॅमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 48एमपी ट्रिपल कॅमेरा आणि 5000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे. पोको एक्स5 5जी फोनमध्ये 7 5G Bands चा सपोर्ट असल्यामुळे रिलायन्स जियो आणि […]

The post POCO X5 5G फोन भारतात लाँच; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • POCO X5 5G फोन 7 5जी बँड सपोर्टसह भारतात लाँच
  • हा फोन Qualcomm Snapdragon 695 वर चालतो
  • स्मार्टफोनमध्ये आर्कषक 120Hz Super AMOLED डिस्प्ले

काही दिवसांपूर्वी ही POCO X5 Pro 5G फोन भारतात लाँच केल्यानंतर आता कंपनीनं या सीरीजचा नवीन मॉडेल POCO X5 5G देखील भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन अ‍ॅमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 48एमपी ट्रिपल कॅमेरा आणि 5000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे. पोको एक्स5 5जी फोनमध्ये 7 5G Bands चा सपोर्ट असल्यामुळे रिलायन्स जियो आणि एयरटेल दोन्हीची 5जी सर्व्हिस यात वापरता येईल. पुढे POCO X5 5G ची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता.

पोको एक्स5 5जीची किंमत

POCO X5 5G फोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 6जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन 5जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह आला आहे जी फोनला 13जीबी टर्बो रॅम परफॉर्मन्स देते. तसेच पोको एक्स5 5जी मध्ये 1टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो. हे देखील वाचा: Xiaomi 11 Lite NE मध्ये झाला स्फोट, युजरनं शेयर केला व्हिडीओ

किंमत पाहता 6GB POCO X5 5G ची किंमत 18,999 रुपये आहे तर 8GB POCO X5 5G 20,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. या फोनची खरेदीवर आयसीआयसीआय बँक युजर्सना 2,000 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळेल. पोको एक्स5 5जी येत्या 21 मार्च पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होईल जिथे हा मोबाइल Jaguar Black, Wildcat Blue आणि Supernova Green कलरमध्ये विकत घेता येईल.

पोको एक्स5 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67″ 120Hz AMOLED display
  • Qualcomm Snapdragon 695
  • 48MP triple rear camera
  • 33W 5,000mAh battery

POCO X5 5G फोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. स्क्रीनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. या फोनच्या डिस्प्लेवर 1200निट्स ब्राइटनेस व 45,00,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात.

पोको एक्स5 5जी फोन अँड्रॉइड 13 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा पोको फोन सात 5जी बँडना सपोर्ट करतो ज्यामुळे भारतातील 5जी सर्व्हिस बिनदिक्कत वापरता येईल.

फोटोग्राफीसाठी POCO X5 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 50 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह रियलमी सी33 2023 लाँच; जाणून घ्या किंमत

POCO X5 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यावर 5जी आणि 4जी दोन्ही वापरता येतं. या फोनमध्ये एनएफसी आणि आयआर ब्लास्टर सहित 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा पोको फोन आयपी53 सर्टिफाइड आहे त्यामुळे काही प्रमाणात पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहू शकतो.

The post POCO X5 5G फोन भारतात लाँच; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x5-5g-launched-in-india-check-price-specifications/feed/ 0
8GB RAM आणि 48MP Camera सह POCO X5 5G ग्लोबल मार्केटमध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-smartphone-poco-x5-5g-launch-price-features-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-smartphone-poco-x5-5g-launch-price-features-specifications-details/#respond Tue, 07 Feb 2023 10:53:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17555 POCO X5 Pro 5G फोन भारतात लाँच झाला आहे, तर POCO X5 5G नं ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. पोको एक्स5 एक बजेट स्मार्टफोन आहे जो Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरसह येतो. या फोनमध्ये 8GB RAM, 48MP Camera, 33W Fast Charging आणि 5,000mAh Battey सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात ज्यांची संपूर्ण माहिती आणि किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू […]

The post 8GB RAM आणि 48MP Camera सह POCO X5 5G ग्लोबल मार्केटमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • POCO X5 5G ग्लोबली लाँच झाला आहे.
  • हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो.
  • पोको एक्स5 मध्ये 48MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 33W चार्जिंग मिळते.

POCO X5 Pro 5G फोन भारतात लाँच झाला आहे, तर POCO X5 5G नं ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. पोको एक्स5 एक बजेट स्मार्टफोन आहे जो Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरसह येतो. या फोनमध्ये 8GB RAM, 48MP Camera, 33W Fast Charging आणि 5,000mAh Battey सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात ज्यांची संपूर्ण माहिती आणि किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

POCO X5 5G Price

पोको एक्स5 5जी फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये ग्लोबली लाँच झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 6जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. किंमत पाहता 6GB व्हेरिएंट $249 तर 8GB व्हेरिएंट $299 मध्ये आला आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार जवळपास 20,500 रुपये तर 24,500 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Black, Green आणि Blue कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Nothing Phone 2 मध्ये मिळणार हटके डिजाइन? स्पेसिफिकेशन आणि भारतीय लाँचची माहिती लीक

POCO X5 5G Specifications

  • 6.67″ 120Hz AMOLED display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 695
  • 48MP triple rear camera
  • 33W 5,000mAh battery

पोको एक्स5 5जी फोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. डिस्प्लेसह 1200निट्स ब्राइटनेस व 45,00,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स देखील मिळतात. तसेच सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 नं प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

POCO X5 5G फोन 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो, जोडीला एड्रेनो 619जीपीयू आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ड्युअल सिम, एनएफसी व 3.5एमएम जॅक सोबतच फोनमध्ये आयआर ब्लास्टर व आयपी53 सारखी टेक्नॉलॉजी मिळते. हे देखील वाचा: भारत सरकारनं घातली 232 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी; लोन आणि सट्टेबाजीवर डिजिटल स्ट्राइक

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स व 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या पोको फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

The post 8GB RAM आणि 48MP Camera सह POCO X5 5G ग्लोबल मार्केटमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-smartphone-poco-x5-5g-launch-price-features-specifications-details/feed/ 0