POCO X5 5G फोन भारतात लाँच; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

Highlights

  • POCO X5 5G फोन 7 5जी बँड सपोर्टसह भारतात लाँच
  • हा फोन Qualcomm Snapdragon 695 वर चालतो
  • स्मार्टफोनमध्ये आर्कषक 120Hz Super AMOLED डिस्प्ले

काही दिवसांपूर्वी ही POCO X5 Pro 5G फोन भारतात लाँच केल्यानंतर आता कंपनीनं या सीरीजचा नवीन मॉडेल POCO X5 5G देखील भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन अ‍ॅमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 48एमपी ट्रिपल कॅमेरा आणि 5000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे. पोको एक्स5 5जी फोनमध्ये 7 5G Bands चा सपोर्ट असल्यामुळे रिलायन्स जियो आणि एयरटेल दोन्हीची 5जी सर्व्हिस यात वापरता येईल. पुढे POCO X5 5G ची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता.

पोको एक्स5 5जीची किंमत

POCO X5 5G फोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 6जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन 5जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह आला आहे जी फोनला 13जीबी टर्बो रॅम परफॉर्मन्स देते. तसेच पोको एक्स5 5जी मध्ये 1टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो. हे देखील वाचा: Xiaomi 11 Lite NE मध्ये झाला स्फोट, युजरनं शेयर केला व्हिडीओ

किंमत पाहता 6GB POCO X5 5G ची किंमत 18,999 रुपये आहे तर 8GB POCO X5 5G 20,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. या फोनची खरेदीवर आयसीआयसीआय बँक युजर्सना 2,000 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळेल. पोको एक्स5 5जी येत्या 21 मार्च पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होईल जिथे हा मोबाइल Jaguar Black, Wildcat Blue आणि Supernova Green कलरमध्ये विकत घेता येईल.

पोको एक्स5 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67″ 120Hz AMOLED display
  • Qualcomm Snapdragon 695
  • 48MP triple rear camera
  • 33W 5,000mAh battery

POCO X5 5G फोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. स्क्रीनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. या फोनच्या डिस्प्लेवर 1200निट्स ब्राइटनेस व 45,00,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात.

पोको एक्स5 5जी फोन अँड्रॉइड 13 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा पोको फोन सात 5जी बँडना सपोर्ट करतो ज्यामुळे भारतातील 5जी सर्व्हिस बिनदिक्कत वापरता येईल.

फोटोग्राफीसाठी POCO X5 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 50 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह रियलमी सी33 2023 लाँच; जाणून घ्या किंमत

POCO X5 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यावर 5जी आणि 4जी दोन्ही वापरता येतं. या फोनमध्ये एनएफसी आणि आयआर ब्लास्टर सहित 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा पोको फोन आयपी53 सर्टिफाइड आहे त्यामुळे काही प्रमाणात पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here