Xiaomi 11 Lite NE मध्ये झाला स्फोट, युजरनं शेयर केला व्हिडीओ

Highlights

  • बिहारमध्ये Xiaomi 11 Lite NE चा स्फोट
  • बेडवर ठेवलेल्या फोनमधून येऊ लागला धूर
  • कंपनीनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही

शाओमी युजर्सना ही बातमी थोडा धक्का देऊ शकतो. कंपनीच्या Xiaomi 11 Lite NE फोन मॉडेलचा स्फोट झाला आहे. ही बातमी बिहारमधून आली जिथे मोहाद्दीनगर, जिल्हा भागलपुरमधील एक शाओमी मोबाइल फोन युजर संजीव राजा यांच्या फोनमधून अचानक धूर येऊ लागला आणि काही वेळाने त्या फोनमध्ये स्फोट झाला. फोन ब्लास्ट झाल्यानंतर संजीव यांनी 91मोबाइल्सशी संपर्क केला आणि या घटनेची सविस्तर माहिती दिली.

त्यांनी सांगितलं की, “सकाळी आठ साडे आठ वाजल्याचा सुमारास त्यांचा फोन शाओमी 11 लाइट एनई बेडवर ठेवला होता आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा फोन चार्जिंगवर नव्हता. त्याचा बेडवर दुसऱ्या बाजूला माझा भाऊ झोपला होता आणि मी चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या भावाने मला जोरात हाक मारली आणि सांगितलं की फोनमधून धूर येतोय आणि बघता-बघता या फोनमध्ये आवाज होऊन स्फोट झाला आणि माझा संपूर्ण बेड जळाला. ही संपूर्ण घटना मी दुसऱ्या फोनमधून रेकॉर्ड केली आणि तुम्हाला पाठवली.”

त्याचबरोबर संजीव यांनी आम्हाला फोनचा इन्व्हॉइस, मॉडेल नंबर, ईएमआय डिटेल्स आणि काही फोटोज देखील शेयर केले आहेत. आम्हाला माहिती मिळाली आहे त्यानुसार हा फोन 20 डिसेंबर 2021 ला मीच्या आनलाइन स्टोरच्या माध्यमातून खरेदी करण्यात आला होता. ही खरेदी सचिन पोद्दार यांच्या नावावर करण्यात आली आहे. मिलेल्या माहितीनुसार सचिन पोद्दार संजीव यांचे वडील आहेत आणि त्यांच्या नावावर हा फोन मागवण्यात आला होता जो ते वापरत होते. हे देखील वाचा: iQOO Z7i झाला चीनमध्ये लाँच; Dimensity 6020 प्रोसेसर असलेला पहिला फोन

शाओमी फोन स्फोटचा व्हिडीओ रेकॉर्ड

व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता आधी फोनमधून धूर येत आहे. साधारणतः जास्त गर्मी किंवा चार्जिंग दरम्यान फोनचा स्फोट होतो परंतु इथे तुम्ही पाहू शकता की बेडवर ठेवलेल्या फोनमध्येच आग लागली आहे. या भयानक आगीत फोनचा कव्हर आणि बॅक पॅनल पूर्णपणे जाळला आहे. तसेच स्फोट इतका मोठा होता की स्क्रीन देखील बाहेत आली आहे. संजीव यांनी व्हिडीओमध्ये हे दाखवलं आहे. फोनच्या आगीमुळे संजीव यांचा बेड पूर्णपणे जल जाळला आहे.

शाओमीची प्रतिक्रिया

शाओमी 11 लाइट एनई फोन ब्लास्टची ही बातमी आम्ही कंपनीला दिली आहे. परंतु आतापर्यंत याबाबत कंपनीनं कोणतंही विधान दिलं नाही. कंपनीकडून प्रतिसाद येताच आम्ही ही बातमी नक्कीच अपडेट करू. हे देखील वाचा: 50 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह रियलमी सी33 2023 लाँच; जाणून घ्या किंमत

याआधी देखील अनेकदा शाओमी फोनच्या स्फोटाच्या बातम्या आल्या आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीच्या Redmi 6A मॉडेलमध्ये स्फोट झाला होता ज्यात झोपलेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच जुलै 2021 मध्ये कंपनीच्या रेडमी 8 मॉडेलमध्ये स्फोट झाला होता आणि तेव्हा देखील शाओमीची जोरदार चर्चा सुरु झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here