Samsung Galaxy A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A सीरीजच्या 9 स्मार्टफोन्सचे झाले पेटेंट फाईल, बघा यांची नावे https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a-smartphone-patent-european-union-intellectual-property-office-2020/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a-smartphone-patent-european-union-intellectual-property-office-2020/#respond Wed, 31 Jul 2019 14:05:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4950 कंपनीने 9 स्मार्टफोन्सची नावे पेटेंट केली आहेत आणि हे सर्व फोन Samsung Galaxy A सीरीजचे आहेत.

The post Samsung Galaxy A सीरीजच्या 9 स्मार्टफोन्सचे झाले पेटेंट फाईल, बघा यांची नावे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने अनेक वर्षे इंडियन मोबाईल मार्केट वर राज्य केले आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये Xiaomi व इतर चीनी टेक कंपन्यांच्या वाढत्या दबदब्याने Samsung ला नंबर वनचे स्थान सोडावे लागेल. सतत खाली जात असलेल्या Samsung ने यावर्षी आपल्या स्ट्रॅटेजी मध्ये बदल केला आणि भारतात Galaxy A आणि Galaxy M सीरीजची सुरवात केली. कंपनीची हि नवीन रणनीती Samsung साठी फायदेशीर ठरली आणि शानदार लुक व स्पेसिफिकेशन्स कमी किंमतीत आणून Samsung ने नवीन यश मिळवले. Samsung Galaxy J ड्रॉप करून आणण्यात आलेली Galaxy A इंडिया मध्ये खूप हिट झाली आहे. तसेच समोर आलेल्या एका ताजा लीक मध्ये Galaxy A सीरीजच्या आगामी स्मार्टफोन संबंधित महत्वाचा खुलासा झाला आहे.

Samsung संबंधित या लीक मध्ये कंपनी द्वारा Galaxy A सीरीज अंतर्गत लॉन्च केल्या जाणाऱ्या आगामी स्मार्टफोन्सच्या नावाचा खुलासा केला गेला आहे. परदेशी मीडिया मध्ये आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजच्या आगामी स्मार्टफोन्स साठी पेटेंट फाईल केले गेले आहेत. हे पेटेंट यूरोपियन यूनियन इंटलेक्चुअल पॉपर्टी आफिसच्या डेटा मध्ये समोर आले आहेत. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनीने 9 स्मार्टफोन्सची नावे पेटेंट केली आहेत आणि हे सर्व फोन Samsung Galaxy A सीरीजचे आहेत.

रिपोर्टनुसार पेटेंट्स मध्ये Samsung Galaxy A सीरीजचे जे स्मार्टफोन्स समोर आले आहेत ते सर्व पुढच्यावर्षी 2020 मध्ये बाजारात येतील. या स्मार्टफोन्सची नावे अशाप्रकारे आहेत:

Galaxy A11

Galaxy A21

Galaxy A31

Galaxy A41

Galaxy A51

Galaxy A61

Galaxy A71

Galaxy A81

Galaxy A91

हे देखील वाचा: 4500एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च झाला Vivo Z5

विशेष म्हणजे पेटेंट मध्ये समोर आलेल्या स्मार्टफोन्सच्या नावात ‘s’ किंवा ‘e’ टाईटल जोडण्यात आलेले नाही. त्यामुळे पेटेंट मधील स्मार्टफोन्स व नावे खरंच पुढच्यावर्षी बाजारात येतील कि नाही ये सांगता येणार नाही . Galaxy A सीरीजच्या या नावांवर तोपर्यंत विश्वास ठेवता येणार नाही जोपर्यंत Samsung स्वतः या पेटेंट बद्दल काही बोलत नाही. विशेष म्हणजे सॅमसंगच्या गॅलेक्सी ए सीरीजचच्या आगामी डिवाईस Galaxy A30s ची निर्मिती भारतात सुरु झाली आहे जो लवकरच मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy A30s

Galaxy A30s स्मार्टफोन बद्दल सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल आणि हा फोन पण सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे इनफिनिटी वी डिस्प्ले वर बनलेला असेल. विशेष म्हणजे हा फोन काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट केला गेला आहे. गीकबेंच वरून समजले होते कि Galaxy A30s एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर सादर केला जाईल.

Samsung Galaxy A30s लिस्टिंग मध्ये कंपनीच्या एक्सनोस 9610 चिपसेट सह दाखवण्यात आला होता जो 1.74 क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टाकोर प्रोसेसर वर चालेल. सोबतच Galaxy A30s मध्ये पावर बॅकअप साठी 3,900एमएएमच ची बॅटरी मिळू शकते. गीकबेंच वर Galaxy A30s 3जीबी रॅम सह दाखवण्यात आल्या आहे. तसेच बोलले जात आहे कि या फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट पण लॉन्च होईल.

हे देखील वाचा: फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर असेल डिस्प्ले, 12जीबी रॅम सह 8 ऑगस्टला लॉन्च होईल हा पावरफुल फोन

गीकबेंच स्कोर पाहता Galaxy A30s ला सिंगल-कोर मध्ये 1322 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या स्मार्टफोनला 4116 स्कोर मिळाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार Samsung आपला हा स्मार्टफोन Galaxy A30 पेक्षा जास्त एडवांस फीचर्स सह येऊ शकतो. Samsung Galaxy A30s ची निर्मिती भारतात सुरु झाली आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी लवकरच हा फोन लॉन्च करेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए80 वीडियो

The post Samsung Galaxy A सीरीजच्या 9 स्मार्टफोन्सचे झाले पेटेंट फाईल, बघा यांची नावे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a-smartphone-patent-european-union-intellectual-property-office-2020/feed/ 0
शाओमीला टक्कर देईल सॅमसंगचा हा खास स्मार्टफोन, यात आहे 4000 एमएएच ची दमदार बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-launch-in-india-with-4000mah-battery-with-3gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-launch-in-india-with-4000mah-battery-with-3gb-ram-in-marathi/#respond Thu, 28 Feb 2019 11:38:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3744 कंपनी ने ए सीरीजचे हे स्मार्टफोन मुंबई मध्ये आयोजित एक इवेंट मध्ये सादर केले आहेत.

The post शाओमीला टक्कर देईल सॅमसंगचा हा खास स्मार्टफोन, यात आहे 4000 एमएएच ची दमदार बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने आज आपल्या गॅलेक्सी ए सीरीजचे स्मार्टफोन्स भारतात लॉन्च केले आहेत. सॅमसंगने आपल्या या सीरीज अंतर्गत गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनी ने ए सीरीजचे हे स्मार्टफोन मुंबई मध्ये आयोजित एक इवेंट मध्ये सादर केले आहेत.

कंपनीने गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 स्मार्टफोन आधीच सादर केले आहेत. सॅमसंगची नवीन गॅलेक्सी ए-सीरीजचे स्मार्टफोन इनफिनिटी-यू आणि इनफिनिटी-वी डिस्प्ले पॅनल सह सादर केले गेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया ए10 स्मार्टफोनची भारतीय किंमत आणि याचे स्पेसिफिकेशंस.

सॅमसंगने भारतात आणले दोन दमदार फोन गॅलेक्सी ए50 आणि ए30, यात आहे 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम

किंमत आणि उपलब्धता
गॅलेक्सी ए10 च्या 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरीएंटची किंमत 8,490 रुपये आहे. कंपनी हा डिवाइस 20 मार्चपासून सॅमसंग ऑनलाइन स्टोर सोबत सर्व मोठ्या ई-कॉमर्स साइट वर सेल साठी उपलब्ध करेल. गॅलेक्सी10 ची बॉडी प्लास्टिकची असल्याचा दावा आहे. हा ब्लॅक आणि गोल्ड रंगात उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए10 चे स्पेसिफिकेशन्स
याचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.2 इंचाचा एचडी+ इनफिनिटी वी डिस्प्ले आणि एक्सीनॉस 7884बी ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. गरज पडल्यास माइक्रोएसडी कार्ड पण वापरला जाऊ शकतो.

शाओमीचा नवीन स्ट्रोक : रेडमी नोट 7 प्रो झाला भारतात लॉन्च, सोबत आला रेडमी नोट 7

याव्यतिरिक्त सॅमसंग गॅलेक्सी ए10 मध्ये मागील बाजूस एफ/ 1.9 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. फ्रंट पॅनल वर एफ/ 2.0 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेंसर दिला जाईल. याची बॅटरी 4,000 एमएएच ची असेल. या फोन मध्ये कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही. फोन अनलॉक करण्यासाठी फेस अनलॉक फीचर वापरता येईल. तसेच चार्जिंग आणि डेटा ट्रांसफर साठी यात माइक्रो-यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

The post शाओमीला टक्कर देईल सॅमसंगचा हा खास स्मार्टफोन, यात आहे 4000 एमएएच ची दमदार बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-launch-in-india-with-4000mah-battery-with-3gb-ram-in-marathi/feed/ 0
28 फेब्रुवारीला लॉन्च होतील सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन हॅन्डसेट https://www.91mobiles.com/marathi/new-galaxy-a-series-launch-in-india-set-for-february-28-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/new-galaxy-a-series-launch-in-india-set-for-february-28-in-marathi/#respond Fri, 22 Feb 2019 11:14:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3693 गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन फोन ऑफलाइन स्टोर मध्ये येतील.

The post 28 फेब्रुवारीला लॉन्च होतील सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन हॅन्डसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी सॅमसंग ने माहिती दिली होती कि ते लवकरच ए सीरीज मध्ये नवीन फोन लॉन्च करणार आहे. आतापर्यंत कंपनी ने आपल्या एम आणि एस सीरीज मध्ये हॅन्डसेट लॉन्च केले आहेत. लीक मधून मिळालेल्या बातमीनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए20 कंपनी सर्वात आधी लॉन्च करेल. काही दिवसांपूर्वी आम्ही सॅमसंग गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए20 ची एक्सक्लूसिव माहिती दिली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार गॅलेक्सी ए सीरीज 28 फेब्रुवारीला लॉन्च केली जाईल.

याची माहिती सॅम मोबाईल द्वारा समोर आली आहे. सॅमसंग मेंबर्स ऍप मधील एका नोटिफिकेशन मधून असे समोर आले आहे कि भारतात सॅमसंग गॅलेक्सी ए-सीरीज 28 फेब्रुवारी 2019 ला समोर येईल मेंबर्स ऍप बऱ्याचदा नवीन सॉफ्टवेयर अपडेट आणि लेटेस्ट ऑफर्सच्या नोटिफिकेशन देतो, पण आता ऍप मधील एका नोटिफिकेशन वरून गॅलेक्सी ए-सीरीजच्या भारतीय लॉन्चची तारीख समजली आहे.

4 मार्चला लॉन्च होईल रियलमी 3, शाओमीला मिळेल टक्कर

मेंबर्स ऍप मधील नोटिफिकेशन मध्ये एक गोष्ट विशेष लक्ष देण्यालायक आहे ती म्हणजे कंपनी कोलकत्ता, हैदराबाद आणि मुंबई मध्ये इवेंटचे आयोजन करेल. कंपनी मेंबर्स ऍपच्या यूजर्सना आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आईडी नोंदवण्यास सांगत आहे जेणेकरून त्यांच्या शहरातील लॉन्च इवेंटसाठी इनवाइट त्यांना मिळावे.

काही दिवसांपूर्वी रिपोर्ट आला होता कि मार्च पासून जून पर्यंत सॅमसंग प्रत्येक महिन्याला एक नवीन गॅलेक्सी ए-सीरीजचा स्मार्टफोन आणेल. तर काही रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए-सीरीज अंतर्गत गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 येतील.

बघा सॅमसंग गॅलेक्सी एस10, एस10+ आणि एस10ई ची भारतातील किंमत, आहेत का आयफोन पेक्षा महाग

अशा आहे कि नवीन मॉडेल इनफिनिटी-वी आणि इनफिनिटी-यू डिस्प्ले पॅनल सह येतील. अलीकडेच आलेल्या रिपोर्ट नुसार गॅलेक्सी ए50 मध्ये 6.14—इंचाची सुपर एमोलेड स्क्रीन मिळू शकते. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन फुल एचडी प्लस असेल आणि कंपनी हा 19:9 आसपेक्ट रेशियो सह सादर करू शकते. तसेच आम्हाला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार हा पण कंपनी वी शेप इनफिनिटी सह सादर होईल जो सॅमसंग गॅलेक्सी एम20 मध्ये आहे.

याव्यतिरिक्त 91मोबाईल्सला सॅमसंग गॅलेक्सी ए20 च्या डिजाइन बद्दल अजून काही माहिती मिळाली होती. जसे कि या फोन मध्ये दोन सिम सोबत एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात येईल. तसेच गॅलेक्सी एम20 आणि एम10 प्रमाणे गॅलेक्सी ए20 मध्ये पण तुम्हाला वी शेप नॉच मिळेल. तसेच बातमीनुसार कंपनीची ए सीरीज ऑफलाइन स्टोर साठी असू शकते. अलीकडेच लॉन्च सॅमसंग गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 कंपनी ने ऑनलाइन स्टोर मध्ये सादर केले होते पण गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन फोन ऑफलाइन स्टोर मध्ये येतील.

The post 28 फेब्रुवारीला लॉन्च होतील सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन हॅन्डसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-galaxy-a-series-launch-in-india-set-for-february-28-in-marathi/feed/ 0
सॅमसंग घेऊन येत आहे पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला गॅलेक्सी ए90 फोन, वीवो आणि ओपोची होऊ शकते सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/galaxy-a90-will-be-samsungs-first-pop-up-front-camera-phone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/galaxy-a90-will-be-samsungs-first-pop-up-front-camera-phone-in-marathi/#respond Mon, 04 Feb 2019 09:41:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3533 हा सॅमसंगचा पहिला फ्रंट पॉप-अप कॅमेरा असलेला फोन असेल

The post सॅमसंग घेऊन येत आहे पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला गॅलेक्सी ए90 फोन, वीवो आणि ओपोची होऊ शकते सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षीपासूनच बातमी येत आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज सोबत गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन मॉडेल याचवर्षी साल लॉन्च करेल. अलीकडेच 91मोबाईल्स ने गॅलेक्सी ‘ए’ सीरीज मधील गॅलेक्सी ए50 च्या फ्रेम आणि पॅनल्स चा एक फोटो एक्सक्लूसिवली शेयर केला होता. ज्यावरून या फोनच्या डिजाइनचा अंदाज लावला जाऊ शकतो. आता याच सीरीज मधील गॅलेक्सी ए90 बद्दल माहिती समोर आली आहे.

पॉप्युलर टिप्सटर ‘आइस यूनिवर्स’ ने आपल्या ट्विटर हँडेल वर खुलासा केला आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए90 स्मार्टफोन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल.’ आइस यूनिवर्स ने ट्वीट मध्ये सांगितले आहे कि ‘ए90′ पर्फेक्ट आहे. हा सॅमसंगचा पहिला फ्रंट पॉप-अप कॅमेरा असलेला फोन असेल, याची स्क्रीन परफेक्ट आहे, यात कोणतीही नॉच किंवा होल नसेल.’

अजूनतरी या फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आलेली नाही. पण आशा आहे कि यावर्षीच्या शेवट्पर्यंत दुसऱ्या डिवाइस सोबत हा लॉन्च केला जाईल.विशेष म्हणजे सॅमसंग ने गेल्यावर्षी आपल्या ‘ए’ सीरीज मध्ये तीन आणि चार रियर कॅमेरा असलेले स्मार्टफोन्स सादर केले होते. या रेंजची सुरवात गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये कंपनी ने आपला पहिला ‘क्वॉड-रियर कॅमेरा’ (चार रियर कॅमेरे असलेला) गॅलेक्सी A9 लॉन्च करून केली होती.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 चे स्पेसिफिकेशन पाहता हा फोन अलीकडेच गीकबेंच वर लिस्ट केला गेला होता तिथे हा एसएम-ए505जीएन मॉडेल नंबर सह उपलब्ध होता. लिस्ट केले गेलेल्या फोन मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला होता तसेच हा एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर चालतो. लिस्ट केला गेलेला फोन एक्सनोस 9610 चिपसेट वर उपलब्ध होता 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरची माहिती देण्यात आली होती. पण लॉन्चच्यावेळी क्लॉक स्पीड अजून जास्त असू शकतो.

सोबतच फोनबद्दल आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यात 128जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या या डिवाइसचा मुख्य सेंसर 24-मेगापिक्सलचा असू शकतो. पावर बॅकअप साठी यात 4,000एमएएच ची दमदार बॅटरी मिळू शकते.

The post सॅमसंग घेऊन येत आहे पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला गॅलेक्सी ए90 फोन, वीवो आणि ओपोची होऊ शकते सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/galaxy-a90-will-be-samsungs-first-pop-up-front-camera-phone-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज सह लॉन्च होऊ शकतो सॅमसंग गॅलेक्सी ए90 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-colors-and-storage-details-leaked-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-colors-and-storage-details-leaked-in-marathi/#respond Wed, 16 Jan 2019 09:55:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3389 सॅमसंग तीन अशा स्मार्टफोन्स वर काम करत आहे ज्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल.

The post 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज सह लॉन्च होऊ शकतो सॅमसंग गॅलेक्सी ए90 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही महिन्यांपूर्वी असा रिपोर्ट आला होता कि सॅमसंग आपल्या गॅलेक्सी ए सीरीजच्या स्मार्टफोन वर काम करत आहे, जे 2019 मध्ये सादर केले जाऊ शकतात. या सीरीज मधील गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 ची बातमी आली होती. या आठवड्यात समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार कंपनी ए सीरीज मध्ये गॅलेक्सी ए70 आणि ए90 वर पण काम करत आहे. आता गॅलेक्सी ए90 स्मार्टफोनचे अनेक डिटेल्स समोर आले आहेत, ज्यावरून स्मार्टफोन कोणत्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स सह सादर केला जाईल याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

सॅममोबाइलच्या बातमीनुसार समोर आले आहे कि गॅलेक्सी ए90 चा मॉडेल नंबर एसएम-ए905एफ असेल. तसेच हॅन्डसेट बद्दल अफवा आहे कि कंपनी हा तीन रंगांत सादर करू शकते, ज्यात बॅक, सिल्वर आणि गोल्ड रंग असतील. तसेच अशा आहे कि गॅलेक्सी ए90 128जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला जाईल. लीक मध्ये दावा केला गेला आहे कि स्मार्टफोन फक्त या स्टोरेज सह सादर केला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए90 कंपनी ने गेल्यावर्षी सादर केलेल्या गॅलेक्सी ए9 (2018) चा अपग्रेडेड वेरिएंट असू शकतो. गॅलेक्सी ए9 (2018) मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेश्यो इनफिनिटी डिस्प्ले डिजाइन होती. पण गॅलेक्सी ए90 मध्ये पंच होल स्क्रीन असेल कि इनफिनिटी डिस्प्ले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अलीकडेच समोर आलेल्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि सॅमसंग तीन अशा स्मार्टफोन्स वर काम करत आहे ज्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. बोलले जात आहे कि हे तिन्ही फोन गॅलेक्सी ए सीरीजचे असतील आणि हे गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए70 तसेच गॅलेक्सी ए50 नावाने बाजारात येतील. कोरियन मीडियानुसार हे तिन्ही स्मार्टफोन मी​ड बजेट मध्ये लॉन्च केले जातील.

The post 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज सह लॉन्च होऊ शकतो सॅमसंग गॅलेक्सी ए90 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-colors-and-storage-details-leaked-in-marathi/feed/ 0
सॅमसंगच्या स्वस्त गॅलेक्सी ए सीरीज फोन मध्ये पण असेल इन डिसप्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, आता ओपो आणि वीवोला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-in-display-fingerprint-scanner-in-a-series-phones-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-in-display-fingerprint-scanner-in-a-series-phones-in-marathi/#respond Mon, 26 Nov 2018 06:07:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2968 चीनी मोबाईल कंपन्यांकडून मिळणार्‍या स्पर्धेमुळे कंपनी आता नवीन इनोवेशन वर जास्त लक्ष देत आहे.

The post सॅमसंगच्या स्वस्त गॅलेक्सी ए सीरीज फोन मध्ये पण असेल इन डिसप्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, आता ओपो आणि वीवोला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या वर्षी वीवो ने एक्स21 ने इन डिसप्ले फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरवात केली होती. वीवो नंतर ओपो, वनप्लस आणि हुआवई सारख्या कंपन्यांनी आपले फोन सादर केले ज्यात स्क्रीनच्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला होता. या यादीत आता नवीन नाव सॅमसंगचे येणार आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी आपल्या फ्लॅगशिप फोन सॅमसंग गॅलेक्सी एस10 पासून याची सुरवात करू शकते. परंतु आता सॅमसंग फॅन्स साठी अजून एक चांगली बातमी आहे. माहितीनुसार कंपनी पुढल्या वर्षी लॉन्च होणार्‍या आपल्या स्वस्तातल्या ए सीरीजच्या फोन मध्ये पण इन डिसप्ले फिंगरप्रिंट सादर करू शकते. यासाठी वेंडर पण ठरवण्यात आला आहे.

सॅममोबाईल कडून आलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये येणारे गॅलेक्सी ए सीरीजच्या फोन मध्ये हा फीचर असू शकतो. यासाठी सॅमसंग ने चीनची एक कंपनी ऐगीज टेक्नोलॉजी सोबत बोलणी करत आहे आणि आता हा निर्णय अंतिम होत आला आहे. ही कंपनी फोन साठी आॅटिकल डिस्प्ले बेस्ट फिंगरप्रिंट स्कॅनर बनविण्याचे काम करते. पण यांचा आॅप्टिकल सेंसर क्वालकॉमच्या अल्ट्रासोनिक सेंसर पेक्षा अडवांस नाही. बातमीनुसार अल्ट्रासोनिक सेंसरचा वापर कंपनी गॅलेक्सी एस10 मध्ये करेल तर ऐगीज टेक्नोलॉजिच्या सेंसर्सचा वापर गॅलेक्सी ए सीरीज फोन मध्ये केला जाईल.

तुम्हाला तर माहिती आहे की आॅप्टिकल सेंसर प्रकाशावर चालतो. हा स्क्रीन वर लाइट इफेक्ट च्या माध्यामातून बोट स्कॅन करतो. हा यूनिक फिंगर पॅटर्न कॅप्चर करतो ज्याने फोन अनलॉक केला जाऊ शकतो. ही कंपनी आता पर्यंत दुसर्‍या निर्मात्यांसाठी पण सेंसर्स निर्माण करत आहे.

कंपनी याचा वापर कोणत्या मॉडेल सोबत करेल हे स्पष्ट झालेले नाही. परंतु सॅमसंग यूजर्स साठी चांगली बाब अशी की आता कमी रेंज मध्ये त्यांना प्रीमियम फीचर मिळतील.

चीनी मोबाईल कंपन्यांकडून मिळणार्‍या स्पर्धेमुळे कंपनी आता नवीन इनोवेशन वर जास्त लक्ष देत आहे. नुकतेच सॅमसंग ने गॅलेक्सी ए7 आणि गॅलेक्सी ए9 भारतीय बाजारात आणले आहेत आणि यात क्रमश: 3 आणि 4 रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. 91मोबाईल्स ने याबद्दल एक बातमी पण प्रकाशित केली आहे ज्यात याचा दावा करण्यात आला आहे की कंपनी आपला संपूर्ण पोर्टफोलियो बदलणार आहे. कमी रेंज मध्ये इन डिसप्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, 5जी फोन, 6 कॅमेर्‍याच्या फोन वरून हे प्रयत्न दिसून येतात.

The post सॅमसंगच्या स्वस्त गॅलेक्सी ए सीरीज फोन मध्ये पण असेल इन डिसप्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, आता ओपो आणि वीवोला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-in-display-fingerprint-scanner-in-a-series-phones-in-marathi/feed/ 0
सॅमसंग ने केली 4 रियर कॅमेरे असलेल्या फोनची घोषणा, 11 ऑक्टोबरला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-a-galaxy-event-11-october-4x-quad-rear-camera-smartphone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-a-galaxy-event-11-october-4x-quad-rear-camera-smartphone-in-marathi/#respond Fri, 14 Sep 2018 12:48:52 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2132 सॅमसंग मोबाईल ने आपल्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून आपल्या या नवीन स्मार्टफोन ची माहिती दिली आहे. सॅमसंग ने एक ईमेज पोस्ट शेयर केली आहे ज्यावर ‘4एक्स फन’ लिहिण्यात आले आहे.

The post सॅमसंग ने केली 4 रियर कॅमेरे असलेल्या फोनची घोषणा, 11 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने गेल्या महिन्यात आपला सर्वात दमदार डिवाईस गॅलेक्सी नोट 9 लॉन्च केला आहे. हा फोन भारतात 67,900 रुपयांच्या बेस किंमतीत सेल साठी उपलब्ध झाला आहे. सॅमसंग टेक जगातील त्या निवडक कंपन्यांपैकी एक आहे जी आपली टेक्नोलॉजी व डिवाइसेज ठरलेल्या वेळीच लॉन्च करते. पण यावेळी सॅमसंग काही नवीन आणि वेगळे करणार आहे. सॅमसंग पहिल्यांदाच 4 रियर कॅमेरे असलेला फोन लॉन्च करणार आहे. सॅमसंग येत्या 11 ऑक्टोबरला हा फोन जगासमोर ठेवेल आणि या नवीन स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर 4 ​कॅमेरा सेंसर असतील.

सॅमसंग मोबाईल ने आपल्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून आपल्या या नवीन स्मार्टफोन ची माहिती दिली आहे. सॅमसंग ने एक ईमेज पोस्ट शेयर केली आहे ज्यावर ‘4एक्स फन’ लिहिण्यात आले आहे. सॅमसंग ने या लॉन्च ईवेंटला ‘ए गॅलेक्सी ईवेंट’ नाव दिले आहे. कंपनी ने गॅलेक्सी ईवेंट ची तारीख 11 ऑक्टोबर ठेवली आहे. सैमसंग ने आपल्या या आगामी डिवाईस च्या नावाची व यासंबंधीची इतर कोणतीही माहिती दिली नाही पण टेक बाजारात याची जोरात चर्चा सुरू आहे की 11 ऑक्टोबरला लॉन्च होणार्‍या फोन मध्ये 4 रियर कॅमेरा सेंसर मिळणार आहेत.

सॅमसंग च्या या आगामी डिवाईस बद्दल बोलले जात आहे की हा फोन गॅलेक्सी ए सीरीज मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. पण जोवर सॅमसंग कडून काही ठोस माहिती देण्यात येत नाही तोवर या आगामी फोनचे नाव व याच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल काहीच बोलता येणार नाही. विशेष म्हणजे नोकिया पण एका नवीन फोन वर काम करत आहे आणि लीक्स मधून समोर येत आहे की नोकियाचा हा फोन 5 रियर कॅमेरा सेंसर सह लॉन्च केला जाऊ शकतो.

The post सॅमसंग ने केली 4 रियर कॅमेरे असलेल्या फोनची घोषणा, 11 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-a-galaxy-event-11-october-4x-quad-rear-camera-smartphone-in-marathi/feed/ 0