फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर असेल डिस्प्ले, 12जीबी रॅम सह 8 ऑगस्टला लॉन्च होईल हा पावरफुल फोन

ZTE च्या सब-ब्रँड Nubia ने गेल्याच आठवड्यात अधिकृतपणे माहिती दिली होती कि कंपनी येत्या 8 ऑगस्टला आपल्या झेड सीरीजचा विस्तार करत Nubia Z20 सादर करणार आहे. या दिवशी कंपनी चीन मध्ये ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून कंपनीचा आगामी फ्लॅगशिप फोन टेक मंचावर येईल. फोनच्या लॉन्चची माहिती देत नुबियाने लॉन्च टीजर पण शेयर केला होता ज्यात Nubia Z20 फोटो सेंट्रिक स्मार्टफोन असल्याची माहिती मिळाली होती. आता लॉन्चच्या आधी नुबियाच्या या दमदार स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

Nubia Z20 लॉन्चच्या आधीच चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर दिसला आहे. टेना वर फोन Nubia NX627J मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनचा फोटो तर दाखवण्यात आला नाही पण Nubia Z20 फुल स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट आहे. लिस्टिंग मध्ये स्पष्ट झाले आहे कि नुबिया आपला हा स्मार्टफोन डुअल डिस्प्ले सह बाजारात आणेल. म्हणजे फोनच्या फ्रंट पॅनल आणि बॅक पॅनल दोन्ही बाजूला स्क्रीन दिली जाईल.

दोन्ही डिस्प्ले असतील OLED

टेना नुसार Nubia Z20 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल. फोनच्या फ्रंट पॅनल वर 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.42-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाईल जो ओएलईडी पॅनल वर बनलेला असेल. त्याचप्रमाणे फोनच्या बॅक पॅनल वरील डिस्प्लेचे रेज्ल्यूशन पण 1080 x 2340 पिक्सल सांगण्यात आले आहे. हा रियर डिस्प्ले पण ओएलईडी असेल आणि याची साईज 5.1-इंचाची असेल.

हे देखील वाचा: मोठ्या बॅटरी सह येईल Samsung Galaxy M20s, समोर आली माहिती

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Nubia Z20 चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार झेड सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन 2.956गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर वर सादर केला जाईल जो क्वालकॉमच्या सर्वात नवीन व पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ वर चालेल. तसेच हा फोन टेना वर एंडरॉयड 9 पाई सह दाखवण्यात आला आहे. टेना वर Nubia Z20 तीन रॅम वेरिएंट मध्ये दाखवण्यात आला आहे ज्यात 6जीबी रॅम, 8जीबी रॅम आणि 12जीबी रॅमचा समावेश आहे.

तीन रॅम वेरिएंट्स मध्ये येणारा Nubia Z20 चार स्टोरेज वेरिएंट्स मध्ये बाजारात येऊ शकतो. या वेरिएंट्स मध्ये 64जीबी मेमरी, 128जीबी स्टोरेज, 256जीबी मेमरी सोबत 512जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. लिस्टिंग नुसार Nubia Z20 मध्ये माइक्रोएसडी कार्ड वापरता येणार नाही. फोनच्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर टेना वर Nubia Z20 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे Nubia Z20 बद्दल बोलले जात आहे कि या फोनच्या एकाच पॅनल वर कॅमेरा दिला जाईल.

हे देखील वाचा: Xiaomi भारतात लॉन्च करेल स्वस्त गेमिंग स्मार्टफोन, बदलून जाईल गेमिंगचे जग

Nubia Z20 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. लीक मध्ये फोनच्या तिन्ही कॅमेरा सेंसर्सची माहिती समोर आली नाही पण बोलले जात आहे कि Nubia Z20 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी मिळू शकते. टेना नुसार Nubia Z20 रेड आणि ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here