Samsung Galaxy A14 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 May 2023 11:05:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्वस्त सॅमसंग फोन Galaxy A14 भारतात लाँच, पाहा किती आहे किंमत आणि कसे आहेत स्पेसिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a14-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a14-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/#respond Mon, 22 May 2023 11:05:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21078 सॅमसंगनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Galaxy A14 लाँच केला आहे. हा मोबाइल फोन फक्त 13,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत बाजारात आला आहे. ज्याच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह प्राइस व सेलची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी प्राइस व ऑफर 4GB RAM + 64GB Memory = 13,999 रुपये 4GB RAM + […]

The post स्वस्त सॅमसंग फोन Galaxy A14 भारतात लाँच, पाहा किती आहे किंमत आणि कसे आहेत स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • सिंगल चार्जमध्ये हा फोन 2 दिवस चालू शकतो.
  • हा 2 वर्षांच्या OS upgrade सह येतो.
  • फोनमध्ये 4 वर्षांचे security update देखील मिळतात.

सॅमसंगनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Galaxy A14 लाँच केला आहे. हा मोबाइल फोन फक्त 13,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत बाजारात आला आहे. ज्याच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह प्राइस व सेलची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी प्राइस व ऑफर

  • 4GB RAM + 64GB Memory = 13,999 रुपये
  • 4GB RAM + 128GB Memory = 14,999 रुपये

Samsung Galaxy A14 4G फोन 4जीबी रॅमसह भारतात लाँच करण्यात आला आहे जो दोन स्टोरेज ऑप्शन्समध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. ह्यात 64जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे तर 128जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. सुरुवातीला सेलमध्ये कंपनी फोनवर 1,000 रुपयांचा कॅशबॅक देखील देत आहे त्यामुळे गॅलेक्सी ए14 ची प्रारंभिक किंमत 12,999 रुपये होईल. हा सॅमसंग फोन Light Green, Black आणि Silver कलरमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ Display
  • LCD Panel

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी फोनमध्ये 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉच स्टाईलवर बनला आहे. ह्या फोनमध्ये पीएलएस एलसीडी पॅनलचा वापर करण्यात आला आहे ज्यावर 60हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो. नवीन सॅमसंग फोनचे डायमेंशन 167.7 x 78.0 x 9.1एमएम आणि वजन 201 ग्राम आहे.

  • RAM Plus
  • Exynos 850

Samsung Galaxy A14 4G फोन अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5 वर लाँच झाला आहे. यात प्रोसेसिंगसाठी सॅमसंग एक्सनॉस 850 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. हा मोबाइल फोन रॅम प्लस फीचरसह येतो त्यामुळे फोनची इंटरनल 4जीबी रॅममध्ये एक्स्ट्रा 4जीबी रॅम जोडून 8जीबी रॅमची पावर दिली जाऊ शकते.

  • 50MP Rear Camera
  • 13MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी ए14 च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह येतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

  • 2 Days Backup
  • 5,000mAh Battery

पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A14 4G फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यावर हा मोबाइल फोन सरासरी वापर केल्यास 2 दिवस बॅकअप देऊ शकतो. तसेच ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 15वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

The post स्वस्त सॅमसंग फोन Galaxy A14 भारतात लाँच, पाहा किती आहे किंमत आणि कसे आहेत स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a14-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/feed/ 0
Samsung Galaxy A14 4G ची भारतातील किंमत आली समोर; स्पेसिफिकेशनचाही खुलासा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a14-4g-price-in-india-launch-and-sale-date-leaked-with-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a14-4g-price-in-india-launch-and-sale-date-leaked-with-specifications/#respond Mon, 22 May 2023 07:27:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21062 Samsung Galaxy A14 4G फोन संबंधित बातम्या अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. हा मोबाइल फोन ग्लोबली ऑफिशियल झाला आहे आणि आता भारतीय बाजारात एंट्री करण्याची तयारी करत आहे. कंपनी आपल्या भारतीय फॅन्सना सरप्राइज देऊ पाहत आहे म्हणून फोन लाँचची माहिती लपवून ठेवण्यात आली आहे. परंतु एका नवीन लीकमध्ये गॅलेक्सी ए14 च्या भारतीय किंमतीचा खुलासा झाला […]

The post Samsung Galaxy A14 4G ची भारतातील किंमत आली समोर; स्पेसिफिकेशनचाही खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • किंमत 13,999 रुपांपासून सुरु होईल.
  • हा दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये विकला जाईल.
  • 31 मेला मार्केटमध्ये होईल लाँच.

Samsung Galaxy A14 4G फोन संबंधित बातम्या अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. हा मोबाइल फोन ग्लोबली ऑफिशियल झाला आहे आणि आता भारतीय बाजारात एंट्री करण्याची तयारी करत आहे. कंपनी आपल्या भारतीय फॅन्सना सरप्राइज देऊ पाहत आहे म्हणून फोन लाँचची माहिती लपवून ठेवण्यात आली आहे. परंतु एका नवीन लीकमध्ये गॅलेक्सी ए14 च्या भारतीय किंमतीचा खुलासा झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी प्राइस

  • 4GB RAM + 64GB Memory = 13,999 रुपये
  • 4GB RAM + 128GB Memory = 14,999 रुपये

Samsung Galaxy A14 4G मॉडेल दोन व्हेरिएंट्समध्ये भारतात लाँच होईल. बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज दिली जाईल ज्याची किंमत 13,999 रुपये असेल. तर मोठा व्हेरिएंट 4जीबी रॅमसह 128जीबी मेमरीला सपोर्ट करेल आणि ह्याची किंमत 14,999 रुपये असेल. ही किंमत सॅमइन्साइडर वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी इंडिया लाँच व सेल

Samsung Galaxy A14 4G चं सपोर्ट पेज सॅमसंग इंडियाच्या ऑफिशियल वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे फोनचे फोटोज सार्वजनिक आहेत. कंपनीनं अजूनतरी ह्याच्या लाँच डेटची माहिती दिली नाही परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार येत्या 31 मेला गॅलेक्सी ए14 4जी भारतीय बाजारात येईल आणि सॅमसंग फोनची विक्री देखील तेव्हाच सुरु होईल. Galaxy A14 4G ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर विकला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ Display
  • 50MP Triple Rear Camera
  • 6GB RAM Plus
  • 6GB RAM + 128GB Storage
  • 2.0GHz octa-core processor
  • 15W 5,000Mah Battery

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन पीएलएस एलसीडी पॅनलवर बनली आहे. या फोनचे डायमेंशन 167.7 x 78.0 x 9.1एमएम आणि वजन 201 ग्राम आहे. मलेशियन वेबसाइटवर हा फोन सध्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजसह समोर आला आहे.

Samsung Galaxy A14 4G फोन अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5 वर लाँच झाला आहे ज्यात 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीनं चिपसेटचं नाव सांगितलं नाही परंतु हा मोबाइल मीडियाटेक हीलियो जी80 सह विकला जाईल, अशी चर्चा आहे. गॅलेक्सी ए14 रॅम प्लस फीचरनं सुसज्जित आहे त्यामुळे फोनचा इंटरनल 6जीबी रॅम वाढवून 12जीबी करता येतो.

फोटोग्राफीसाठी हा सॅमसंग फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A14 4G फोनमध्ये ड्युअल सिमचा सपोर्ट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएचची मोठी बॅटरीला सपोर्ट करतो जी 15वॉट फास्ट चार्जिंगसह येते. तसेच सिक्योरिटीसाठी याच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन आहे. हा सॅमसंग फोन Black, Silver, Green आणि Dark Red कलरमध्ये सादर करण्यात आहे.

The post Samsung Galaxy A14 4G ची भारतातील किंमत आली समोर; स्पेसिफिकेशनचाही खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a14-4g-price-in-india-launch-and-sale-date-leaked-with-specifications/feed/ 0
8GB RAM सह Samsung Galaxy A23 5G भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a23-5g-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a23-5g-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/#respond Mon, 16 Jan 2023 12:57:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16925 Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G फोन आज भारतात लाँच झाले आहेत. गॅलेक्सी ए14 5जी कंपनीनं Exynos 1330 प्रोसेसरसह बाजारात आणला आहे. तसेच गॅलेक्सी ए23 5जी Qualcomm Snapdragon 695 वर लाँच झाला आहे जो 16GB RAM च्या शक्तीसह परफॉर्म करू शकतो. पुढे आम्ही या पावरफुल सॅमसंग 5जी मोबाइल फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली […]

The post 8GB RAM सह Samsung Galaxy A23 5G भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy A23 5G आणि A14 5G भारतात लाँच
  • RAM Plus सह 16GB RAM ची परफॉर्मन्स
  • फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 चिपसेट
  • 50MP क्वॉड कॅमेरा आणि 5,000mAh ची Battery

Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G फोन आज भारतात लाँच झाले आहेत. गॅलेक्सी ए14 5जी कंपनीनं Exynos 1330 प्रोसेसरसह बाजारात आणला आहे. तसेच गॅलेक्सी ए23 5जी Qualcomm Snapdragon 695 वर लाँच झाला आहे जो 16GB RAM च्या शक्तीसह परफॉर्म करू शकतो. पुढे आम्ही या पावरफुल सॅमसंग 5जी मोबाइल फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. गॅलेक्सी ए14 5जी डिटेल्स तुम्ही (इथे क्लिक करून) वाचू शकता.

Samsung Galaxy A23 5G ची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन को भारतीय बाजारात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB RAM + 128GB storage देण्यात आली आहे. तर मोठा व्हेरिएंट 8GB RAM + 128GB storage ला सपोर्ट करतो. प्राइस पाहता 6जीबी रॅम 22,999 रुपये तर 8जीबी रॅम 24,999 रुपयांमध्ये भारतात लाँच केला गेला आहे. हा 5जी सॅमसंग फोन देशात Silver, Light Blue आणि Orange कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची वाट लावण्यासाठी सॅमसंगचा डाव; अत्यंत कमी किंमतीत Galaxy A14 5G फोन भारतात लाँच

Samsung Galaxy A23 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6” HD+ 120Hz डिस्प्ले
  • 8GB RAM + 128GB storage
  • Qualcomm Snapdragon 695
  • 50MP Quad रियर कॅमेरा
  • 25W 5000mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले आहे जो पीएलएस एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. या गॅलेक्सी फोनचे डायमेंशन 165.4 x 76.9 x 8.4एमएम आणि वजन 197ग्राम आहे.

Samsung Galaxy A23 5G अँड्रॉइड आधारित वनयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन रॅम प्लस फीचरसह आला आहे. ज्यामुळे फोनची इंटरनल रॅममध्ये 8जीबी पर्यंतचा अतिरिक्त वचुर्अल रॅम जोडता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर आहे. हे देखील वाचा: पुन्हा घडणार शांतीत क्रांती; मराठी वेब सीरिज दुसऱ्या सीजनच्या शूटिंगचे काहीच दिवस शिल्लक

ड्युअल सिम सपोर्टेड या सॅमसंग फोनमध्ये 5जी व 4जी दोन्ही वापरता येतं. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबतच हा स्मार्टफोन पावर बॅकअपसाठी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. Samsung Galaxy A23 5G फोन 3.5एमएम जॅक व डॉल्बी अ‍ॅटमॉस सारख्या फीचर्ससह बाजारात आला आहे.

The post 8GB RAM सह Samsung Galaxy A23 5G भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a23-5g-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/feed/ 0
गिकबेंचवर दिसला Samsung Galaxy A14 4G; लवकरच येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/4-gb-ram-mediatek-helio-g80-phone-samsung-galaxy-a14-4g-specifications-leaked-on-geekbench/ https://www.91mobiles.com/marathi/4-gb-ram-mediatek-helio-g80-phone-samsung-galaxy-a14-4g-specifications-leaked-on-geekbench/#respond Tue, 01 Nov 2022 12:33:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14524 Samsung Galaxy A14 5G ची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती की हा स्मार्टफोन सॅमसंग कंपनीचा सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन असू शकतो जो 15 हजारांच्या रेंजमध्ये लाँच केला जाऊ शकतो. आता या सीरीजमधील Samsung Galaxy A14 4G स्मार्टफोनची माहिती समोर आली आहे. बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर सॅमसंग गॅलेक्सी ए14 दिसला आहे जिथे गॅलेक्सी फोन अनेक महत्वाच्या […]

The post गिकबेंचवर दिसला Samsung Galaxy A14 4G; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A14 5G ची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती की हा स्मार्टफोन सॅमसंग कंपनीचा सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन असू शकतो जो 15 हजारांच्या रेंजमध्ये लाँच केला जाऊ शकतो. आता या सीरीजमधील Samsung Galaxy A14 4G स्मार्टफोनची माहिती समोर आली आहे. बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर सॅमसंग गॅलेक्सी ए14 दिसला आहे जिथे गॅलेक्सी फोन अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला आहे. आशा आहे की Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A14 4G लवकरच टेक मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy A14 4G

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी फोन गीकबेंचवर Samsung SM-A145P मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. ही लिस्टिंग कालची म्हणजे 31 ऑक्टोबरची आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. गीकबेंचच्या माध्यमातून समजलं आहे की Samsung Galaxy A14 4G फोन सर्वात नवीन आणि लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होऊ शकतो तसेच 1.80गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी80 चिपसेटवर चालू शकतो. हे देखील वाचा: 31 दिवसांचे बेस्ट Plan, जास्त डेटासह कॉलिंग अगदी मोफत

Samsung Galaxy A14 4G फोन गीकबेंचवर 4 जीबी रॅमसह सर्टिफाइड करण्यात आला आहे, म्हणजे हा फोन 4जीबी रॅमवरच लाँच होऊ शकतो. परंतु एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये हा फोन बाजारात येण्याची शक्यता आहे. या सॅमसंग फोनमध्ये ग्राफिक्ससाठी माली जी-52 जीपीयू दिला जाऊ शकतो. बेंचमार्क स्कोर पाहता सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी ला सिंगल-कोर मध्ये 1668 आणि मल्टी-कोर मध्ये 5284 स्कोर मिळाला आहे.

Samsung Galaxy A14 5G

गॅलेक्सी ए14 5जी मॉडेल पाहता समोर आलेल्या लीक्सनुसार या मोबाइल फोनची किंमत 15,000 ते 18,000 रुपयांदरम्यान असू शकते. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिली जाऊ शकते. हा स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होऊ शकतो. फोनमधील चिपसेटची माहिती मिळाली नाही. हे देखील वाचा: एक नव्हे दोन वर्षांची वॉरंटी! फ्री Nokia Wired Buds सह Nokia G60 5G भारतात लाँच; इतकी आहे किंमत

Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोन 6 जीबी रॅमवर लाँच केला जाऊ शकतो जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. लीकनुसार या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सपोर्टसह दिली जाऊ शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post गिकबेंचवर दिसला Samsung Galaxy A14 4G; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4-gb-ram-mediatek-helio-g80-phone-samsung-galaxy-a14-4g-specifications-leaked-on-geekbench/feed/ 0