Samsung Galaxy A20 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 23 Sep 2019 15:36:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A20s ग्लोबल मार्केट मध्ये झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20s-officially-launched-triple-rear-camera-4000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20s-officially-launched-triple-rear-camera-4000mah-battery/#respond Mon, 23 Sep 2019 15:36:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5392 Samsung Galaxy A20s भारतात कधी लॉन्च होईल हे निश्चित सांगता येणार नाही.

The post 4 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A20s ग्लोबल मार्केट मध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने काही दिवसांपूर्वी फिलिपिंस मध्ये आपली ‘गॅलेक्सी ए’ सीरीज वाढवत Galaxy A20s स्मार्टफोन सादर केला होता जो ट्रिपल रियर कॅमेरा सह आला आहे. आता सॅमसंग ने आपला हा डिवाईस ग्लोबल मंचावर पण लॉन्च केला आहे. सॅमसंग ने आज आपल्या ग्लोबल वेबसाइट वर गॅलेक्सी ए20एस चे प्रोडक्ट पेज बनवून प्रेस रिलीजच्या माध्यमातून हा फोन अधिकृतपणे लॉन्च केला आहे. Samsung Galaxy A20s टेक मंचावर ऑफिशियल केल्यामुळे हा डिवाईस लवकरच भारतात येण्याची शक्यता वाढली आहे.

Samsung Galaxy A20s डिजाईन

सॅमसंग ने गॅलेक्सी ए20एस स्मार्टफोन इनफिनिटी डिस्प्ले वर सादर केला आहे ज्याच्या वर ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्ले दोन्ही बाजूंनी बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला रुंद बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Samsung Galaxy A20s च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटन देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे.

Samsung Galaxy A20s स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए20एस चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.5 इंचाच्या एचडी+ Infinity V डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.4डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. Samsung Galaxy A20s एंडरॉयड 9 पाई आधारित वन यूआई वर लॉन्च केला गेला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वरील क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 506 जीपीयू आहे. आशा आहे कि इंडिया मध्ये पण हा स्मार्टफोन या चिपसेट सह लॉन्च होईल.

Samsung Galaxy A20s ग्लोबल मंचावर दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A20s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A20s डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत एफएम रेडियो पण आहे. सिक्योरिटी साठी हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Samsung Galaxy A20s मध्ये 4000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. पण Samsung Galaxy A20s भारतात कधी लॉन्च होईल हे निश्चित सांगता येणार नाही.

The post 4 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A20s ग्लोबल मार्केट मध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20s-officially-launched-triple-rear-camera-4000mah-battery/feed/ 0
Samsung Galaxy A20s मध्ये असेल ट्रिपल रियर कॅमेरा, सर्टिफिकेशन्स साइट वर फोन झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20s-tenaa-listing-specifications-triple-rear-camera-image-design/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20s-tenaa-listing-specifications-triple-rear-camera-image-design/#respond Mon, 02 Sep 2019 14:15:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5205 ब्लूटूथ लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि फोन नवीन ब्लूटूथ 5.0 वर्जन च्या ऐवजी ब्लूटूथ 4.2 ला सपोर्ट करेल.

The post Samsung Galaxy A20s मध्ये असेल ट्रिपल रियर कॅमेरा, सर्टिफिकेशन्स साइट वर फोन झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung आपली गॅलेक्सी ए सीरीज वाढवत काही दिवसांपूर्वी दोन नवीन स्मार्टफोन Galaxy A50s आणि Galaxy A30s अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केले आहेत. सॅमसंग इतक्यवार थांबणार नाही तर आता या सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस Galaxy A20s आणण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy A20s ब्लूटूथ एसआईजी आणि वाई-फाई अलायंस वर दिसला होता. आता हा स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण लिस्ट झाला आहे.

Samsung Galaxy A20s च्या टेना लिस्टिंग मध्ये फोनचा फोटो आणि स्पेसिफिकेशन्स दोन्ही समोर आले आहेत. टेनाची हि लिस्टिंग 28 ऑगस्टची आहे जी आता अपडेट करण्यात आली आहे. या लिस्टिंग मध्ये Galaxy A20s SM-A2070 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. सर्वात आधी फोनचा लुक आणि डिजाईन पाहता टेना वर स्पष्ट झाले आहे कि Samsung Galaxy A20s ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च होईल.

Galaxy A20s च्या बॅक पॅनल वर डावीकडे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या रियर पॅनल वरच मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर त्याखाली Samsung ची ब्रॅण्डिंग आहे. टेना वर Samsung Galaxy A20s वॉटरड्रॉप नॉच सह दाखवण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. Samsung Galaxy A20s च्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A20s चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना वर हा फोन 6.49-इंचाच्या डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे. लिस्टिंग नुसार गॅलेक्सी ए20एस चे डायमेंशन 163.31 x 77.52 x 7.99 असतील. टेना वरून समजले आहे कि Galaxy A20s डुअल सिम सपोर्ट असलेला फोन असेल आणि पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल. त्याचबरोबर टेना वर Galaxy A20s एंडरॉयड ओएस आणि 4जी एलटीई सपोर्टेड असल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे Samsung Galaxy A20s वाई-फाई अलायंस वर चार मॉडेल नंबर: SM-A207F, SM-A207M/DS, SM-A207M आणि SM-A2070 सह लिस्ट केला गेला होता. या व्यतिरिक्त Bluetooth SIG सर्टिफिकेशनस साइट वर SM-A207F/DS मॉडेल पण लिस्ट केला गेला आहे. वाई-फाई सर्टिफिकेशन्स मध्ये समोर आले आहे कि Samsung Galaxy A20s सिंगल बॅंड 2.4 गीगाहर्ट्ज वाई-फाई नेटवर्क सोपर्ट आणि एंडरॉयड पाई ऑपरेटिंग सिस्टम वर चालले. तसेच ब्लूटूथ लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि फोन नवीन ब्लूटूथ 5.0 वर्जन च्या ऐवजी ब्लूटूथ 4.2 ला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy A20

Galaxy A20 मध्ये 6.4-इंचाचा एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी वी डिस्प्ले देण्यात आली आहे. फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 7884 चिपसेट आहे. यात 3जीबी रॅम मेमरी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच गॅलेक्सी ए20 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9.0 पाई आधारित सॅमसंग वन यूआई वर चालतो.

The post Samsung Galaxy A20s मध्ये असेल ट्रिपल रियर कॅमेरा, सर्टिफिकेशन्स साइट वर फोन झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20s-tenaa-listing-specifications-triple-rear-camera-image-design/feed/ 0
सॅमसंगचा धमाका : Galaxy A20, Galaxy A30 आणि Galaxy M20 वर मिळत आहे मोठा डिस्काउंट, इथे आहेत संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-a30-m20-offer-discount-price-drop-sale-availability/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-a30-m20-offer-discount-price-drop-sale-availability/#respond Thu, 02 May 2019 10:24:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4208 गॅलेक्सी ए सीरीजच्या Galaxy A20 आणि Galaxy A30 स्मार्टफोन सोबत Galaxy M20 1,500 रुपयांपर्यंत रुपये स्वस्तात विकला जाईल.

The post सॅमसंगचा धमाका : Galaxy A20, Galaxy A30 आणि Galaxy M20 वर मिळत आहे मोठा डिस्काउंट, इथे आहेत संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने भारतात आपली गॅलेक्सी ए आणि गॅलेक्सी एम सीरीज अंतर्गत एकापेक्षा एक लॉन्च केले आहेत. या दोन्ही सीरीज अश्या स्मार्टफोन्स सहयेतात जे कमी किंमतीत यूजर्सना शानदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स देतात. आपल्या फॅन्सना अजून एक भेट देत सॅमसंगने या दोन्ही सीरीजच्या हिट स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. सॅमसंगने खास ऑफर्सची सुरवात केली आहे ज्यात गॅलेक्सी ए सीरीजच्या Galaxy A20 आणि Galaxy A30 स्मार्टफोन सोबत Galaxy M20 1,500 रुपयांपर्यंत रुपये स्वस्तात विकला जाईल.

गॅलेक्सी ए सीरीज
आधी सॅमसंग द्वारा गॅलेक्सी ए सीरीज वर चालू असलेल्या ऑफर बद्दल बोलायचे तर या अंतर्गत Galaxy A20 आणि Galaxy A30 च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन्स भारतात एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केले आहेत. Galaxy A20 सॅमसंग द्वारा 12,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच Galaxy A30 कंपनीने 16,990 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे.

सॅमसंग आता Special Support स्कीम अंतर्गत हे दोन्ही स्मार्टफोन्स स्वस्तात विकत आहे. कंपनीने Galaxy A30 च्या किंमतीत थेट 1,500 रुपये आणि Galaxy A20 च्या किंमतीत 1,000 रूपयांची कपात केली आहे. या प्राइज कट नंतर Galaxy A30 15,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल तर Galaxy A20 11,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

गॅलेक्सी एम सीरीज
गॅलेक्सी ए सीरीज प्रमाणे सॅमसंग ने गॅलेक्सी एम सीरीज चा Galaxy M20 पण 1,000 रुपयांनी स्वस्त केला आहे. हा स्मार्टफोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता Galaxy M20 चा 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता फोन मध्ये 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 12,990 होती. आता सॅमसंगच्या खास ऑफर अंतर्गत फोन मध्ये 3जीबी रॅम वेरिएंट फक्त 9,990 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंट 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

कुठून आणि केव्हा विकत घ्यावा
सॅमसंगने गॅलेक्सी ए सीरीज Galaxy A20 आणि Galaxy A30 स्मार्टफोन ऑनलाईन प्लॅटफार्म सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर विकला जात आहे. कंपनी ने सादर केलेली नवीन ऑफर आज म्हणजे 2 मे पासून सुरू झाली आहे जी 15 मे पर्यंत चालेल या काळात हे दोन्ही स्मार्टफोन स्वस्तात सेल साठी उपलब्ध होतील.

Galaxy A20
Samsung Galaxy M20 बद्दल बोलायचे तर कंपनी ने हे स्मार्टफोन सॅमसंग वेबसाइट व्यतिरिक्त फक्त शॉपिंग साइट अमेजॉन वर उपलब्ध करण्यात आले आहेत. ऑफर अंतर्गत मिळणार्‍या प्राइज कट व्यतिरिक्त एसबीआई बँक कार्डने शॉपिंग केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त कॅशबॅक पण मिळेल. तसेच हा फोन 6 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआई वर पण विकत घेता येईल. हे फोन 4 मे पासून 6 मे पर्यंत या ऑफर अंतर्गत सेल साठी उपलब्ध होतील.

The post सॅमसंगचा धमाका : Galaxy A20, Galaxy A30 आणि Galaxy M20 वर मिळत आहे मोठा डिस्काउंट, इथे आहेत संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-a30-m20-offer-discount-price-drop-sale-availability/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी ए20 भारतात झाला लॉन्च, याची किंमत, लुक आणि स्पेसिफिकेशन रेडमी नोट 7 प्रो ला देतील टक्कर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-launched-in-india-price-12490rs-specifications-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-launched-in-india-price-12490rs-specifications-sale/#respond Fri, 05 Apr 2019 08:08:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4021 या फोनचा सेल येत्या 10 एप्रिल पासून सुरू होईल. गॅलेक्सी ए20 रेड, ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट्स मध्ये विकत घेता येईल.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए20 भारतात झाला लॉन्च, याची किंमत, लुक आणि स्पेसिफिकेशन रेडमी नोट 7 प्रो ला देतील टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने गेल्याच महिन्यात अंर्तराष्ट्रीय मंचा वर आपली गॅलेक्सी ए सीरीज वाढवत लो बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 लॉन्च केला होता. सॅमसंग ने हा रशियन बाजारात आणला होता जो आज भारतात पण आला आहे. सॅमसंगने गॅलेक्सी ए20 आज भारतात लॉन्च केला आहे. गॅलेक्सी ए20 सॅमसंग द्वारा यावर्षी भारतात लॉन्च केला गेलेला चौथा ‘गॅलेक्सी ए’ सीरीज फोन आहे. इनफिनिटी वी डिस्प्ले सह हा फक्त आर्कषक लुक देत नाही तर सोबत लो बजेट मध्ये चांगले स्पेसिफिकेशन्स सह येतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 किंमत
गॅलेक्सी ए20 सॅमसंग द्वारा भारतात फक्त एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. कंपनीने या फोनची किंमत 12,490 रुपये ठेवली आहे. गॅलेक्सी ए20 आनलाईन प्लॅटफार्म सोबत ऑफलाईन बाजारात पण आला आहे. या फोनचा सेल येत्या 10 एप्रिल पासून सुरू होईल. गॅलेक्सी ए20 रेड, ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट्स मध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 लुक
गॅलेक्सी ए20 सॅमसंग द्वारा पॉलीकार्बोनेट बॉडी सह ​इनफिनिटी यू डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. समोरून हा फोन तुम्हाला गॅलेक्सी ए10 किंवा गॅलेक्सी ए30 सारखा वाटेल. डिस्प्लेच्या वर छोटी ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. डिस्प्ले तिन्ही बाजुंनी बेजल लेस आहे आणि खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. नॉचच्या वर स्पीकर आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. यूएसबी आणि ऑडियो जॅक ​फोनच्या खालच्या पॅनल वर देण्यात आले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगने गॅलेक्सी ए20 720 x 1560 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या एचडीप्लस सुपर एमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले वर सादर केला आहे. गॅलेक्सी ए20 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9.0 पाई आधारित सॅमसंग वन यूआई वर लॉन्च केला गेला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 7884 चिपसेट वर चालतो.

रशियन बाजारात गॅलेक्सी ए20 3जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे. हा फोन 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंटी पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए20 भारतात झाला लॉन्च, याची किंमत, लुक आणि स्पेसिफिकेशन रेडमी नोट 7 प्रो ला देतील टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-launched-in-india-price-12490rs-specifications-sale/feed/ 0
एक्सक्लूसिव : सॅमसंग गॅलेक्सी ए20ई च्या डिजाईनचा खुलासा, बघा कसा असेल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-exclusive-case-renders-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-exclusive-case-renders-specifications/#respond Fri, 29 Mar 2019 15:53:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3974 गॅलेक्सी ए20 किंवा गॅलेक्सी ए20ई स्मार्टफोन एप्रिल मध्ये भारतीय बाजारात येतील.

The post एक्सक्लूसिव : सॅमसंग गॅलेक्सी ए20ई च्या डिजाईनचा खुलासा, बघा कसा असेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने काही दिवसांपूर्वीच गॅलेक्सी ए स्मार्टफोन सीरीजचा विस्तार करत नवा स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केला होता. सॅमसंग गॅलेक्सी ए20 सध्या रशियन बाजारात लॉन्च झाला आहे जो येत्या दिवसांत भारतात येऊ शकतो. गॅलेक्सी ए20 लॉन्चच्या एका आठवड्यांनंतर याच सीरीजच्या अजून एका स्मार्टफोन गॅलेक्सी ए20ई ची माहिती समोर आली होती. गॅलेक्सी ए20ई ब्लूटूथ आणि वाईफाई सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट करण्यात आला होता जिथे फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समजले होते. सॅमसंगने अजूनतरी गॅलेक्सी ए20ई च्या लॉन्चची माहिती दिली नाही पण कंपनीच्या घोषणे आधीच 91मोबाईल्स ने गॅलेक्सी ए20ई चे केस रेंडर सादर केले आहेत. या रेंडर वरून गॅलेक्सी ए20ई च्या ​लुक आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे.

अशी असेल डिजाईन
सॅमसंग गॅलेक्सी ए20ई च्या केस रेंडरचा फोटो समोर आल्याने समजले आहे कि हा फोन पण गॅलेक्सी ए सीरीजच्या अलीकडेच ​लॉन्च स्मार्टफोन्स प्रमाणे इनफिनिटी यू डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन असेल ज्यावर छोटीशी ‘यू’ शेप नॉच दिली जाईल. याच नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा असेल. फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट असेल.

गॅलेक्सी ए20ई च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. फोनचा रियर कॅमेरा बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल त्याखाली फ्लॅश लाईट असेल. गॅलेक्सी ए20ई च्या बॅक पॅनल वरच सिक्योरिटी आणि फोन अनलॉकिंग साठी फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण दिले जाईल तसेच खालच्या बाजूला 3.5एमएम आडियो जॅक, स्पीकर ​ग्रिल तसेच यूएसबी पोर्ट असेल.

हे देखील वाचा: चालता चालता चार्ज होईल तुमचा फोन, दिल्लीच्या दोन मुलांनी शोधली अनोखी टेक्नॉलॉजी

गॅलेक्सी ए20ई
सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स अजूनतरी समोर आले नाहीत पण बोलले जात आहे कि हा फोन लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए20 चा छोटा वर्जन असेल. विशेष म्हणजे गॅलेक्सी ए20ई सॅमसंगचा पाहिला फोन असेल जो गॅलेक्सी ए सीरीज मध्ये ‘ई’ मोनिकर सह लॉन्च होईल. सर्टिफिकेशन्स साइट्स वरून समजले आहे कि गॅलेक्सी ए20ई एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला जाईल. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक्सनुसार गॅलेक्सी ए20ई सॅमसंगच्या एक्सनॉस 7884 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 3जीबी रॅम मिळू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग द्वारा रशियन बाजारात लॉन्च गॅलेक्सी ए20 बद्दल बोलायचे तर हा फोन 720 x 1560 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या एचडीप्लस सुपर एमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले वर सादर केला आहे. गॅलेक्सी ए20 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9.0 पाई आधारित सॅमसंग वन यूआई वर लॉन्च केला गेला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 7884 चिपसेट वर चालतो.

रशियन बाजारात गॅलेक्सी ए20 3जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे. हा फोन 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंटी पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: खुशखबर : देशातील 1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई ने सुसज्ज, बघा कोणते स्टेशन्स आहेत या लिस्ट मध्ये

सॅमसंग गॅलेक्सी ए20 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बोलले जात आहे कि गॅलेक्सी ए20 किंवा गॅलेक्सी ए20ई स्मार्टफोन एप्रिल मध्ये भारतीय बाजारात येतील.

The post एक्सक्लूसिव : सॅमसंग गॅलेक्सी ए20ई च्या डिजाईनचा खुलासा, बघा कसा असेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-exclusive-case-renders-specifications/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-official-launched-4000mah-battery-specifications-feature-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-official-launched-4000mah-battery-specifications-feature-price/#respond Tue, 19 Mar 2019 12:16:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3896 एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गॅलेक्सी ए20 भारतात पण लॉन्च होईल.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज कंपनी सॅमसंगने कालच घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 10 एप्रिलला ‘गॅलेक्सी ईवेंट’ चे आयोजन करणार आहे. सॅमसंग ने अजूनतरी सांगितले नाही कि या ईवेंट मध्ये कोणते प्रोडक्ट लॉन्च केले जातील पण बोलले जात आहे कि 10 एप्रिलला सॅमसंग अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या गॅलेक्सी ए सीरीजचा विस्तार करत गॅलेक्सी ए90 आणि सोबत गॅलेक्सी ए70 तसेच गॅलेक्सी ए40 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. पण 10 एप्रिलला आयोजित या ईवेंटच्या आधीच सॅमसंग ने आज गॅलेक्सी ए सीरीजचा अजून एक स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 अधिकृतपणे सादर केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए20 रशियन बाजारात ऑफिशियल केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 किंमत
सॅमसंगने गॅलेक्सी ए20 सध्या फक्त रशियन मार्केट मध्ये आणला आहे जो येत्या काळात भारतासहित इतर बाजारांत येईल. रशिया मध्ये सॅमसंग ने गॅलेक्सी ए20 ची किंमत तिथल्या करंसीनुसार 13,900 ठेवण्यात आली आहे. हि किंमत इंडियन करंसीनुसार जवळपास 14,900 रुपये असेल. रशिया मध्ये हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. अशा आहे कि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गॅलेक्सी ए20 भारतात पण लॉन्च होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 चा लुक
गॅलेक्सी ए20 सॅमसंग द्वारा पॉलीकार्बोनेट बॉडी सह ​इनफिनिटी यू डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. समोरून हा फोन तुम्हाला गॅलेक्सी ए10 किंवा गॅलेक्सी ए30 सारखा वाटेल. डिस्प्लेच्या वर छोटी ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. डिस्प्ले तिन्ही बाजुंनी बेजल लेस आहे आणि खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. नॉचच्या वर स्पीकर आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. यूएसबी आणि ऑडियो जॅक ​फोनच्या खालच्या पॅनल वर देण्यात आले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगने गॅलेक्सी ए20 720 x 1560 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या एचडीप्लस सुपर एमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले वर सादर केला आहे. गॅलेक्सी ए20 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9.0 पाई आधारित सॅमसंग वन यूआई वर लॉन्च केला गेला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 7884 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा: शाओमीने भारतात लॉन्च केली पेमेंट सर्विस ‘मी पे’, पेटीएम आणि मोबिक्विकला मिळेल टक्कर

रशियन बाजारात गॅलेक्सी ए20 3जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे. हा फोन 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंटी पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: शाओमी रेडमी गो झाला भारतात लॉन्च, किंमत फक्त 4,499 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी ए20 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बोलले जात आहे कि भारतात पण गॅलेक्सी ए20 याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च होईल.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-official-launched-4000mah-battery-specifications-feature-price/feed/ 0
एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी ए20 मध्ये असेल डुअल कॅमेरा आणि माइक्रोयूएसबी स्लॉट https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-back-panel-leak-dual-camera-and-microusb-support-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-back-panel-leak-dual-camera-and-microusb-support-in-marathi/#respond Mon, 18 Feb 2019 14:29:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3654 गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन फोन ऑफलाइन स्टोर मध्ये येतील.

The post एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी ए20 मध्ये असेल डुअल कॅमेरा आणि माइक्रोयूएसबी स्लॉट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अलिकडेच सॅमसंग ने एक माहिती दिली आहे की कंपनी लवकरच ए सीरीजचे नवीन फोन लॉन्च करणार आहे. तसेच कंपनी ने असे पण सांगितले आहे की प्रत्येक महिन्याला एक फोन लॉन्च करेल. 2019 मध्ये सॅमसंग खुप वेगळ्या योजना घेऊन आल्या आहेत आणि याची सुरवात त्यांनी गॅलेक्सी एम सीरीज लॉन्च करून केली आहे. बोलले जात आहे की कंपनीच्या नव्या गॅलेक्सी ए सीरीजचे फोन पण खुप दमदार असतील. सॅमसंग ने अधिकृतपणे गॅलेक्सी ए सीरीजच्या फोनची माहिती दिली नाही पण लीक मधून मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए20 कंपनी सर्वात आधी लॉन्च करणार आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही सॅमसंग गॅलेक्सी ए50 चा बॅक पॅनलचा लीक प्रकाशित केला होता. तर आज आमच्याकडे गॅलेक्सी ए20 ची एक्सक्लूसिव माहिती आहे.

आम्हाला सॅमसंग गॅलेक्सी ए20 चा बॅक कवर मिळाला आहे. या कवर वरून तुम्ही फोन डिजाइन बद्दल अंदाज लावू शकता. तुम्ही बघू शकता याची बॉडी पॉलिकार्बोनेटची आहे. फोनच्या बॅक कवर मध्ये डुअल कॅमेरा स्लॉट देण्यात आला आहे आणि त्याखाली लाउडस्पीकर ग्रिल आहे. पण बॅक पॅनल मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेला नाही. त्यामुळे आशा आहे की या फोन मध्ये फेस अनलॉक सपोर्ट असेल.

तसेच फोनच्या खालच्या पॅनल वर तुम्हाला माइक्रो यूसबी 2.0 स्लॉट दिसेल. सोबत 3.5 एमएम आॅडियो जॅक पण आहे. तसेच छोटासा होल आहे जो माइक्रोफोन साठी आहे. तुम्ही बघू शकता की साइड पॅनल मध्ये एका बाजूला पावर बटन आणी वॉल्यूम साठी स्लॉट देण्यात आला आहे तर दुसर्‍या बाजूला एक स्लॉट आहे जो सिम साठी असू शकतो.

91मोबाईल्सला सॅमसंग गॅलेक्सी ए20 च्या डिजाइन बद्दल अजुन काही माहिती मिळाली आहे. जसे की या फोन मध्ये दोन सिम सोबत एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. तसेच गॅलेक्सी एम20 आणि एम10 प्रमाणे गॅलेक्सी ए20 मध्ये पण तुम्हाला वी शेप नॉच मिळेल. आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार कंपनीचा ए सीरीज ऑफलाइन स्टोर साठी येऊ शकतो. विशेष म्हणजे नुकतेच लॉन्च झालेले सॅमसंग गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 कंपनीने ऑनलाइन स्टोर मध्ये सादर केले होते तर गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन फोन ऑफलाइन स्टोर मध्ये येतील.

इतर स्पेसिफिकेशन पाहता सॅमसंग गॅलेक्सी ए20 चे आतापर्यंत अनेक लीक आले आहेत. त्यानुसार हा फोन 3जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो आणि हा एंडरॉयड 9 पाई वर आधारित असेल. गॅलेक्सी ए20 सॅमसंगच्या एक्सनॉस 7885 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो त्यासोबत फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो.

The post एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी ए20 मध्ये असेल डुअल कॅमेरा आणि माइक्रोयूएसबी स्लॉट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-back-panel-leak-dual-camera-and-microusb-support-in-marathi/feed/ 0
शाओमीला मिळेल टक्कर, सॅमसंग घेऊन येत आहे तीन स्वस्तातले फोन गॅलेक्सी ए10, ए20 आणि ए30 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-a20-a30-to-launch-in-india-soon-price-rs-8490-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-a20-a30-to-launch-in-india-soon-price-rs-8490-in-marathi/#respond Tue, 05 Feb 2019 08:29:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3542 गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज चे हे तिन्ही स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित असतील

The post शाओमीला मिळेल टक्कर, सॅमसंग घेऊन येत आहे तीन स्वस्तातले फोन गॅलेक्सी ए10, ए20 आणि ए30 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने अलीकडेच आपली नवी स्मार्टफोन सीरीज ‘गॅलेक्सी एम’ नावाने सादर केली आहे. सॅमसंग ने हि सीरीज सर्वात आधी भारतात आणली आहे आणि या अंतर्गत गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन आज पासून आपल्या पहिल्या सेल साठी उपलब्ध झाले आहेत आणि हे लोकांना आवडत आहेत. सॅमसंग संबंधित अजून एक बातमी आली आहे कि कंपनी अजून तीन नवीन स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे आणि या स्मार्टफोनची किंमत खूप कमी असणार आहे.

सॅमसंग बद्दल बोलले जात आहे कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी ए सीरीज’ चे तीन नवीन स्मार्टफोन्स वर काम करत आहे आणि हे गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी ए20 आणि गॅलेक्सी ए30 नावांसह लॉन्च केले जातील. हि बातमी एमएसपी ने एक्सक्लूसिव कवर केली आहे. रिपोर्टनुसार सॅमसंगचे हे तिन्ही स्मार्टफोन खूप स्वस्त असणार आहेत तसेच लवकरच हे भारतीय बाजारात येतील.

रिपोर्टनुसार गॅलेक्सी ए10 ची किंमत भारतात 8,490 रुपयांपासून सुरु होईल आणि गॅलेक्सी ए20 आणि गॅलेक्सी ए30 पण लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च केले जातील. गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 च्या लॉन्च नंतर गॅलेक्सी ए सीरीज मध्ये स्वस्त स्मार्टफोन आणून सॅमसंग थेट शाओमी व रियलमी सारख्या ब्रॅण्ड्सना टक्कर देणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज बद्दल एमएसपीच्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हे तिन्ही स्मार्टफोन एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केले जातील. विशेष म्हणजे गॅलेक्सी एम10 आणि एम20 दोन्ही स्मार्टफोन मध्ये हा डिस्प्ले दिला गेला नव्हता. म्हणजे गॅलेक्सी ए10, ए20 आणि ए30 कंपनीच्या गॅलेक्सी एम सीरीज पेक्षा पण एडवांस फीचर्स सह येतील. विशेष म्हणजे हे फोन गीकबेंच वर पण दिसले आहेत तिथे यांचे स्पेसिफिकेशन्स लिस्ट आहेत.

गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज चे हे तिन्ही स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित असतील तसेच ऑक्टाकोर प्रोसेसर सह एक्सनॉस 7885 चिपसेट वर लॉन्च केले जातील. लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि गॅलेक्सी ए10 मध्ये 2जीबी चा रॅम असेल. तसेच गॅलेक्सी ए20 3जीबी रॅम मेमरी तसेच गॅलेक्सी ए30 4जीबी रॅम वर लॉन्च केले जाऊ शकतात. रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए10, ए20 आणि ए30 स्मार्टफोन देशात मार्चच्या शेवट्पर्यंत लॉन्च केले जाऊ शकतात.

The post शाओमीला मिळेल टक्कर, सॅमसंग घेऊन येत आहे तीन स्वस्तातले फोन गॅलेक्सी ए10, ए20 आणि ए30 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-a20-a30-to-launch-in-india-soon-price-rs-8490-in-marathi/feed/ 0