एक्सक्लूसिव : सॅमसंग गॅलेक्सी ए20ई च्या डिजाईनचा खुलासा, बघा कसा असेल हा फोन

सॅमसंग ने काही दिवसांपूर्वीच गॅलेक्सी ए स्मार्टफोन सीरीजचा विस्तार करत नवा स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केला होता. सॅमसंग गॅलेक्सी ए20 सध्या रशियन बाजारात लॉन्च झाला आहे जो येत्या दिवसांत भारतात येऊ शकतो. गॅलेक्सी ए20 लॉन्चच्या एका आठवड्यांनंतर याच सीरीजच्या अजून एका स्मार्टफोन गॅलेक्सी ए20ई ची माहिती समोर आली होती. गॅलेक्सी ए20ई ब्लूटूथ आणि वाईफाई सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट करण्यात आला होता जिथे फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समजले होते. सॅमसंगने अजूनतरी गॅलेक्सी ए20ई च्या लॉन्चची माहिती दिली नाही पण कंपनीच्या घोषणे आधीच 91मोबाईल्स ने गॅलेक्सी ए20ई चे केस रेंडर सादर केले आहेत. या रेंडर वरून गॅलेक्सी ए20ई च्या ​लुक आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे.

अशी असेल डिजाईन
सॅमसंग गॅलेक्सी ए20ई च्या केस रेंडरचा फोटो समोर आल्याने समजले आहे कि हा फोन पण गॅलेक्सी ए सीरीजच्या अलीकडेच ​लॉन्च स्मार्टफोन्स प्रमाणे इनफिनिटी यू डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन असेल ज्यावर छोटीशी ‘यू’ शेप नॉच दिली जाईल. याच नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा असेल. फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट असेल.

गॅलेक्सी ए20ई च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. फोनचा रियर कॅमेरा बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल त्याखाली फ्लॅश लाईट असेल. गॅलेक्सी ए20ई च्या बॅक पॅनल वरच सिक्योरिटी आणि फोन अनलॉकिंग साठी फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण दिले जाईल तसेच खालच्या बाजूला 3.5एमएम आडियो जॅक, स्पीकर ​ग्रिल तसेच यूएसबी पोर्ट असेल.

हे देखील वाचा: चालता चालता चार्ज होईल तुमचा फोन, दिल्लीच्या दोन मुलांनी शोधली अनोखी टेक्नॉलॉजी

गॅलेक्सी ए20ई
सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स अजूनतरी समोर आले नाहीत पण बोलले जात आहे कि हा फोन लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए20 चा छोटा वर्जन असेल. विशेष म्हणजे गॅलेक्सी ए20ई सॅमसंगचा पाहिला फोन असेल जो गॅलेक्सी ए सीरीज मध्ये ‘ई’ मोनिकर सह लॉन्च होईल. सर्टिफिकेशन्स साइट्स वरून समजले आहे कि गॅलेक्सी ए20ई एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला जाईल. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक्सनुसार गॅलेक्सी ए20ई सॅमसंगच्या एक्सनॉस 7884 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 3जीबी रॅम मिळू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग द्वारा रशियन बाजारात लॉन्च गॅलेक्सी ए20 बद्दल बोलायचे तर हा फोन 720 x 1560 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या एचडीप्लस सुपर एमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले वर सादर केला आहे. गॅलेक्सी ए20 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9.0 पाई आधारित सॅमसंग वन यूआई वर लॉन्च केला गेला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 7884 चिपसेट वर चालतो.

रशियन बाजारात गॅलेक्सी ए20 3जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे. हा फोन 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंटी पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: खुशखबर : देशातील 1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई ने सुसज्ज, बघा कोणते स्टेशन्स आहेत या लिस्ट मध्ये

सॅमसंग गॅलेक्सी ए20 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बोलले जात आहे कि गॅलेक्सी ए20 किंवा गॅलेक्सी ए20ई स्मार्टफोन एप्रिल मध्ये भारतीय बाजारात येतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here