Samsung Galaxy A20s मध्ये असेल ट्रिपल रियर कॅमेरा, सर्टिफिकेशन्स साइट वर फोन झाला लिस्ट

Samsung आपली गॅलेक्सी ए सीरीज वाढवत काही दिवसांपूर्वी दोन नवीन स्मार्टफोन Galaxy A50s आणि Galaxy A30s अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केले आहेत. सॅमसंग इतक्यवार थांबणार नाही तर आता या सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस Galaxy A20s आणण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy A20s ब्लूटूथ एसआईजी आणि वाई-फाई अलायंस वर दिसला होता. आता हा स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण लिस्ट झाला आहे.

Samsung Galaxy A20s च्या टेना लिस्टिंग मध्ये फोनचा फोटो आणि स्पेसिफिकेशन्स दोन्ही समोर आले आहेत. टेनाची हि लिस्टिंग 28 ऑगस्टची आहे जी आता अपडेट करण्यात आली आहे. या लिस्टिंग मध्ये Galaxy A20s SM-A2070 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. सर्वात आधी फोनचा लुक आणि डिजाईन पाहता टेना वर स्पष्ट झाले आहे कि Samsung Galaxy A20s ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च होईल.

Galaxy A20s च्या बॅक पॅनल वर डावीकडे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या रियर पॅनल वरच मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर त्याखाली Samsung ची ब्रॅण्डिंग आहे. टेना वर Samsung Galaxy A20s वॉटरड्रॉप नॉच सह दाखवण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. Samsung Galaxy A20s च्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A20s चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना वर हा फोन 6.49-इंचाच्या डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे. लिस्टिंग नुसार गॅलेक्सी ए20एस चे डायमेंशन 163.31 x 77.52 x 7.99 असतील. टेना वरून समजले आहे कि Galaxy A20s डुअल सिम सपोर्ट असलेला फोन असेल आणि पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल. त्याचबरोबर टेना वर Galaxy A20s एंडरॉयड ओएस आणि 4जी एलटीई सपोर्टेड असल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे Samsung Galaxy A20s वाई-फाई अलायंस वर चार मॉडेल नंबर: SM-A207F, SM-A207M/DS, SM-A207M आणि SM-A2070 सह लिस्ट केला गेला होता. या व्यतिरिक्त Bluetooth SIG सर्टिफिकेशनस साइट वर SM-A207F/DS मॉडेल पण लिस्ट केला गेला आहे. वाई-फाई सर्टिफिकेशन्स मध्ये समोर आले आहे कि Samsung Galaxy A20s सिंगल बॅंड 2.4 गीगाहर्ट्ज वाई-फाई नेटवर्क सोपर्ट आणि एंडरॉयड पाई ऑपरेटिंग सिस्टम वर चालले. तसेच ब्लूटूथ लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि फोन नवीन ब्लूटूथ 5.0 वर्जन च्या ऐवजी ब्लूटूथ 4.2 ला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy A20

Galaxy A20 मध्ये 6.4-इंचाचा एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी वी डिस्प्ले देण्यात आली आहे. फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 7884 चिपसेट आहे. यात 3जीबी रॅम मेमरी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच गॅलेक्सी ए20 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9.0 पाई आधारित सॅमसंग वन यूआई वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here