Samsung Galaxy A20e - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 01 Jun 2020 12:26:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A20e मध्ये लागली आग, Galaxy Note 7 च्या आठवणी झाल्या जाग्या https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-caught-fire-phone-burnt-blast-smartphone-into-flames/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-caught-fire-phone-burnt-blast-smartphone-into-flames/#respond Mon, 01 Jun 2020 12:23:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7236 सॅमसंग संबंधित एक धक्कादायक बातमी पण समोर आली आहे, ज्यातून समजले आहे कि कंपनीच्या Samsung Galaxy A20e स्मार्टफोन मध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.

The post Samsung Galaxy A20e मध्ये लागली आग, Galaxy Note 7 च्या आठवणी झाल्या जाग्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung गेल्या काही दिवसांत वेगाने पुढे जात आहे. नवीन टेक्नोलॉजी आणि शानदार डिजाईन व स्पेसिफिकेशन्स असलेले सॅमसंग फोन आता कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध होत आहेत, जे सॅमसंगचा यूजर बेस मजबूत करत आहेत. सध्या भारतात पण सॅमसंग फोनच्या चाहत्यांची संख्या वाढत आहे. याच महिन्यात Samsung ने अनेक स्मार्टफोन्स बाजारात घेऊन येणार आहे, ज्याची वाट यूजर्स पण बघत आहेत. पण यात आता सॅमसंग संबंधित एक धक्कादायक बातमी पण समोर आली आहे, ज्यातून समजले आहे कि कंपनीच्या Samsung Galaxy A20e स्मार्टफोन मध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.

Samsung Galaxy A20e आग लागण्याची घटना भारतातील नाही, हि कॅलिफोर्निया मध्ये समोर आली आहे. DailyMail च्या बातमी वरून समजले आहे कि कॅलिफोर्नियाचे रहिवाशी Kenji Yanase सॅमसंगचा गॅलेक्सी ए20ई स्मार्टफोन वापरत होते आणि त्यांच्या फोन मध्ये आग लागली आहे. केंजी यांनी आपल्या फोनचा वीडियो इंटरनेट वर अपलोड पण केला आहे जिथे जळालेल्या फोन आणि त्याचे तुटलेले पार्टस दिसत आहेत. रिपोर्टनुसार यूजरचा दावा आहे कि फोन बॅटरी मधून आधी ठिणग्या येऊ लागल्या आणि त्यानंतर संपूर्ण डिवाईस मध्ये आग लागली तसेच त्याचे घर पण काळ्या धुराने भरून गेले.

रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए20ई फोनची स्क्रीन डेड झाली होती, त्यानंतर यूजर केंजी यांनी फोनचा बॅक पॅनल उघडून बघण्यास सुरवात केली. केंजी यांनी सांगितले कि फोन त्यांच्या हातातच होता आणि अचानक बॅटरी मधून ठिणग्या येऊ लागल्या आणि काही क्षणात फोन एखाद्या फाटक्या प्रमाणे जळू लागला. फोन वर पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला गेला पण आगा थांबली नाही.

यूजरने सांगितले कि फोन जाळल्यामुळे त्याच्या घरात काळा धूर झाला आणि वेगळा दुर्गंध येऊ लागला. आग न विझल्यामुळे केंजी यांनी जळत असलेला Samsung Galaxy A20e एका भांड्यात ठेऊन घराबाहेर काढला. मीडिया रिपोर्टनुसार यूजरच्या मते फोनच्या बॅटरी मध्ये आग लागली होती तसेच नंतर त्यांनी बघितले कि फोनचा मदरबोर्ड स्पष्ट दिसत होता.

मीडिया रिपोर्टनुसार सॅमसंग पब्लिक स्टेटमेंट प्रसिद्ध करत सांगितले आहे कि कंपनीचा Galaxy A सीरीज स्मार्टफोन्सच्या क्वॉलिटी वर पुरेपूर विश्वास आहे आणि सॅमसंगला आपल्या यूजर्सच्या सुरक्षेची काळजी पण आहे. कॅलिफोर्निया मध्ये सॅमसंगने यूजरकडून फोन घेतला आहे आणि आग लागण्याच्या कारणांची तसेच छेडछाडीच्या कारणांची तपासणी चालू आहे. Samsung Galaxy A20e मध्ये आग लागण्याच्या या घटनेमुळे जवळपास 4 वर्षांपूर्वीच्या Galaxy Note 7 च्या ब्लास्टच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

The post Samsung Galaxy A20e मध्ये लागली आग, Galaxy Note 7 च्या आठवणी झाल्या जाग्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-caught-fire-phone-burnt-blast-smartphone-into-flames/feed/ 0
लवकरच लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए20ई, कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-listed-on-fcc-price-specification-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-listed-on-fcc-price-specification-and-features/#respond Wed, 03 Apr 2019 08:44:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4004 आज एफसीसी वर लिस्ट झाल्यामुळे निश्चित झाले आहे कि कंपनी लवकरच हा लॉन्च करणार आहे.

The post लवकरच लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए20ई, कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि सॅमसंग 10 एप्रिलला थायलंड मध्ये एका इवेंटचे आयोजन करणार आहे आणि यादिवशी कंपनी आपले नवीन गॅलेक्सी ए सीरीज मध्ये अनेक फोन लॉन्च करू शकते. माहितीनुसार सॅमसंग द्वारा Galaxy A90, Galaxy A60 आणि Galaxy A40 सहित इतर काही डिवाइस लॉन्च होऊ शकतात. आज कंपनीचा अजून एक मॉडेल Samsung Galaxy A20e अमेरिकन सर्टिफिकेशन एफसीसी वर लिस्ट झाला आहे. काही दिवसांपूर्वी हा मॉडेल दुसऱ्या काही सर्टिफिकेशन साइट वर दिसला होता. आज एफसीसी वर लिस्ट झाल्यामुळे निश्चित झाले आहे कि कंपनी लवकरच हा लॉन्च करणार आहे.

विशेष म्हणजे फेब्रुवारी मध्ये कंपनी ने गॅलेक्सी ए20 लॉन्च केला होता आणि ए20 ई याचाच छोटा व्हर्जन असल्याचे बोलले जात आहे. एफसीसी वर हा फान मॉडेल नंबर एसएम—ए202एफ/डीएस नावाने लिस्ट केला गेला आहे. तुम्हाला तर माहित आहे डीएसचा वापर कंपनी डुअल सिम साठी करते. फोनच्या इतर स्पेसिफिकेशनची माहिती सध्या इथे नाही पण काही दिवसांपूर्वी एक लीक आला होता ज्यात थोडी माहिती होती.

हे देखील वाचा: 4,000एमएएच बॅटरी असलेले बेस्ट स्मार्टफोन, जे यावर्षी झाले आहेत भारतात लॉन्च

विशेष म्हणजे कंपनीच्या घोषणेच्या आधीच 91मोबाईल्स ने काही दिवसांपूर्वी गॅलेक्सी ए20ई चा केस रेंडर दाखवला होता. या रेंडर वरून गॅलेक्सी ए20ई च्या ​लुक आणि डिजाईनची माहिती समोर आली होती. केस रेंडरनुसार हा फोन पण गॅलेक्सी ए सीरीज अलीकडेच ​लॉन्च झालेल्या स्मार्टफोन्स प्रमाणे इनफिनिटी यू डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन मिळेल ज्यावर छोटीशी ‘यू’ शेप नॉच असेल. या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा असेल. फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस असतील तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट असेल.

हे देखील वाचा: 3 आठवड्यात विकले गेले 5 लाखांपेक्षा जास्त रियलमी 3 फोन, शाओमीला मोठा धक्का

Samsung Galaxy A20e चे स्पेसिफिकेशन
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सचा अंदाज लावला जाऊ शकतो. बोलले जाते कि हा फोन लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए20 चा छोटा व्हर्जन असेल. लीक्स व माहितीनुसार गॅलेक्सी ए20ई एंडरॉयड ओएस एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला जाईल. गॅलेक्सी ए20ई सॅमसंगच्या एक्सनॉस 7884 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 3जीबी रॅम मिळेल.

The post लवकरच लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए20ई, कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-listed-on-fcc-price-specification-and-features/feed/ 0
एक्सक्लूसिव : सॅमसंग गॅलेक्सी ए20ई च्या डिजाईनचा खुलासा, बघा कसा असेल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-exclusive-case-renders-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-exclusive-case-renders-specifications/#respond Fri, 29 Mar 2019 15:53:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3974 गॅलेक्सी ए20 किंवा गॅलेक्सी ए20ई स्मार्टफोन एप्रिल मध्ये भारतीय बाजारात येतील.

The post एक्सक्लूसिव : सॅमसंग गॅलेक्सी ए20ई च्या डिजाईनचा खुलासा, बघा कसा असेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने काही दिवसांपूर्वीच गॅलेक्सी ए स्मार्टफोन सीरीजचा विस्तार करत नवा स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केला होता. सॅमसंग गॅलेक्सी ए20 सध्या रशियन बाजारात लॉन्च झाला आहे जो येत्या दिवसांत भारतात येऊ शकतो. गॅलेक्सी ए20 लॉन्चच्या एका आठवड्यांनंतर याच सीरीजच्या अजून एका स्मार्टफोन गॅलेक्सी ए20ई ची माहिती समोर आली होती. गॅलेक्सी ए20ई ब्लूटूथ आणि वाईफाई सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट करण्यात आला होता जिथे फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समजले होते. सॅमसंगने अजूनतरी गॅलेक्सी ए20ई च्या लॉन्चची माहिती दिली नाही पण कंपनीच्या घोषणे आधीच 91मोबाईल्स ने गॅलेक्सी ए20ई चे केस रेंडर सादर केले आहेत. या रेंडर वरून गॅलेक्सी ए20ई च्या ​लुक आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे.

अशी असेल डिजाईन
सॅमसंग गॅलेक्सी ए20ई च्या केस रेंडरचा फोटो समोर आल्याने समजले आहे कि हा फोन पण गॅलेक्सी ए सीरीजच्या अलीकडेच ​लॉन्च स्मार्टफोन्स प्रमाणे इनफिनिटी यू डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन असेल ज्यावर छोटीशी ‘यू’ शेप नॉच दिली जाईल. याच नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा असेल. फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट असेल.

गॅलेक्सी ए20ई च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. फोनचा रियर कॅमेरा बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल त्याखाली फ्लॅश लाईट असेल. गॅलेक्सी ए20ई च्या बॅक पॅनल वरच सिक्योरिटी आणि फोन अनलॉकिंग साठी फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण दिले जाईल तसेच खालच्या बाजूला 3.5एमएम आडियो जॅक, स्पीकर ​ग्रिल तसेच यूएसबी पोर्ट असेल.

हे देखील वाचा: चालता चालता चार्ज होईल तुमचा फोन, दिल्लीच्या दोन मुलांनी शोधली अनोखी टेक्नॉलॉजी

गॅलेक्सी ए20ई
सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स अजूनतरी समोर आले नाहीत पण बोलले जात आहे कि हा फोन लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए20 चा छोटा वर्जन असेल. विशेष म्हणजे गॅलेक्सी ए20ई सॅमसंगचा पाहिला फोन असेल जो गॅलेक्सी ए सीरीज मध्ये ‘ई’ मोनिकर सह लॉन्च होईल. सर्टिफिकेशन्स साइट्स वरून समजले आहे कि गॅलेक्सी ए20ई एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला जाईल. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक्सनुसार गॅलेक्सी ए20ई सॅमसंगच्या एक्सनॉस 7884 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 3जीबी रॅम मिळू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग द्वारा रशियन बाजारात लॉन्च गॅलेक्सी ए20 बद्दल बोलायचे तर हा फोन 720 x 1560 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या एचडीप्लस सुपर एमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले वर सादर केला आहे. गॅलेक्सी ए20 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9.0 पाई आधारित सॅमसंग वन यूआई वर लॉन्च केला गेला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 7884 चिपसेट वर चालतो.

रशियन बाजारात गॅलेक्सी ए20 3जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे. हा फोन 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंटी पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: खुशखबर : देशातील 1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई ने सुसज्ज, बघा कोणते स्टेशन्स आहेत या लिस्ट मध्ये

सॅमसंग गॅलेक्सी ए20 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बोलले जात आहे कि गॅलेक्सी ए20 किंवा गॅलेक्सी ए20ई स्मार्टफोन एप्रिल मध्ये भारतीय बाजारात येतील.

The post एक्सक्लूसिव : सॅमसंग गॅलेक्सी ए20ई च्या डिजाईनचा खुलासा, बघा कसा असेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-exclusive-case-renders-specifications/feed/ 0
लॉन्च जवळ असलेले सॅमसंग गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई फोन, असतील हे खास फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-galaxy-a40-and-galaxy-a20e-listed-on-official-uk-website/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-galaxy-a40-and-galaxy-a20e-listed-on-official-uk-website/#respond Tue, 12 Mar 2019 14:49:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3843 कंपनीच्या यूनाइटेड किंगडम वेबसाइट ने सॅमसंग गॅलेक्सी ए90, सॅमसंग गॅलेक्सी ए40 आणि सॅमसंग गॅलेक्सी ए20ई ची माहिती दिली आहे.

The post लॉन्च जवळ असलेले सॅमसंग गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई फोन, असतील हे खास फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए10 स्मार्टफोन सादर केले होते. हे दोन्ही फोन ए सीरीज मध्ये सादर केले गेले होते. आता कंपनी आपल्या या सीरीज मध्ये लवकरच अजून तीन नवीन स्मार्टफोन सादर करण्यास तयार आहे. कंपनीच्या यूनाइटेड किंगडम वेबसाइट ने सॅमसंग गॅलेक्सी ए90, सॅमसंग गॅलेक्सी ए40 आणि सॅमसंग गॅलेक्सी ए20ई ची माहिती दिली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए20ई, गॅलेक्सी ए सीरीजचा पहिला फोन असेल जो “ई” मोनीकर सह येईल. काही दिवसांपूर्वी यूरोप मध्ये गॅलेक्सी ए40 चा सपोर्ट पेज लाइव झाला होता आणि याला एफसीसी कडून सर्टिफिकेशन पण मिळाले होते. कंसेप्ट रेंडर्स मधून गॅलेक्सी ए90 मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा असल्याची माहिती पण समोर आली होती.

सॅमसंगच्या यूके की वेबसाइट वर गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई चे वेगवेगळे प्रोडेक्ट पेज लाइव झाले आहेत. प्रोडक्ट पेज वर स्पेसिफिकेशनची माहिती दिली नाही. पण या वेबपेज वरून गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन हॅन्डसेट लवकरच लॉन्च केले जाणार आहेत हे स्पष्ट झाले आहे.

89 टक्के ग्राहकांना स्मार्टफोन मध्ये हवा दमदार कॅमेरा, बघा रिपोर्ट

आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए40 इनफिनिटी यू डिसप्ले वर लॉन्च केला जाईल. हा फोन एंडरॉयड ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित असेल तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 7885 चिपसेट दिला जाऊ शकतो. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन 4जीबी रॅम वर लॉन्च होईल.

शाओमीचा स्वस्तातला फोन रेडमी 7, 18 मार्चला होईल लॉन्च

काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए90 मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचा दावा केला गेला होता. पण यांनतर अजून एक रिपोर्ट आला ज्यात या फोन मध्ये फक्त एक कॅमेरा सेटअप असेल जो स्लाइड अप आणि स्लाइड डाउन होईल असे सांगण्यात आले आहे. जुन्या रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए90 मध्ये एंंडरॉयड पाई आधारित वन यूआई, 6.41-इंचाचा डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगॉन 710 प्रोसेसर असेल.

गॅलेक्सी ए सीरीजच्या स्मार्टफोनची भारतीय किंमती
सॅमसंग द्वारा भारतात लॉन्च केल्या गेलेल्या गॅलेक्सी ए सीरीजचे स्मार्टफोन्स पाहता कंपनीने गॅलेक्सी ए10 के 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच गॅलेक्सी ए30 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. सॅमसंगचा गॅलेक्सी ए50 के 4जीबी व 64जीबी मेमरी वेरिएंट 19,990 रुपये तसेच 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 22,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post लॉन्च जवळ असलेले सॅमसंग गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई फोन, असतील हे खास फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-galaxy-a40-and-galaxy-a20e-listed-on-official-uk-website/feed/ 0