Samsung Galaxy A71 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 पावरफुल फोन Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-51-price-cut-in-india-rs-20999-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-51-price-cut-in-india-rs-20999-sale/#respond Thu, 07 Jan 2021 14:26:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9586 पुन्हा एकदा Samsung Galaxy A51 भारतात स्वस्त झाला आहे. यावेळी ‘A’ सीरीजच्या गॅलेक्सी ए51 सह कंपनीने गॅलेक्सी ए71 च्या किंमतीत पण कपात केली आहे.

The post पावरफुल फोन Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पुन्हा एकदा Samsung Galaxy A51 भारतात स्वस्त झाला आहे. यावेळी ‘A’ सीरीजच्या गॅलेक्सी ए51 सह कंपनीने गॅलेक्सी ए71 च्या किंमतीत पण कपात केली आहे. हे फोन्स कमी किंमतीत ऑफलाइन स्टोर्स वरून विकत घेता येतील. 91मोबाईल्सला ऑफलाइन स्टोर्स द्वारे मिळालेल्या माहितीनुसार गॅलेक्सी ए51 च्या दोन्ही वेरिएंटची किंमत कमी करण्यात आली आहे. तसेच कंपनीने याबाबत पुष्टी केली आहे.

नवीन किंमत

सर्वप्रथम सॅमसंग गॅलेक्सी ए51 बद्दल बोलायचे झाले तर याचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट आता ऑफलाइन 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच ग्राहक या फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज ऑप्शन 22499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतील. याआधी हा फोन क्रमश: 23,999 व 25,999 रुपयांमध्ये विकला जात होता.

हे देखील वाचा : POCO ने दिला नवीन वर्षाची भेट, 7 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 4000 रुपयांपर्यंत झाली किंमत कमी

गॅलेक्सी ए71 पहा हा फक्त 8GB रॅम आणि 128GB मेमरी सह येतो. हा डिवाइस आता ऑफलाइन स्टोर्स वर 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन आधी ऑफलाइन 30,999 रुपयांमध्ये विकला केला जात होता.

स्कीम काय आहे

कंपनी हे दोन्ही फोन काही काळ स्वस्तात विकत आहे. या डिस्काउंट स्कीमची सुरवात आज म्हणजे 7 जानेवारी 2020 पासून झाली आहे जी 31 जानेवारी 2020 पर्यंत सुरु राहील. पण आमच्या सोर्सनुसार फोन पुढे पण कमी किंमतीत विकला केला जाऊ शकतो. आतापर्यंत कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

हे देखील वाचा : दमदार फीचर्ससह लॉन्च झाला Realme V15 5G, किंमत 20 हजारांपेक्षा पण कमी

याआधी सॅमसंगने ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या Samsung Galaxy M01 तसेच Galaxy M01s च्या किंमतीत 500 रुपयांची कपात केली आहे. Samsung Galaxy M01 आतापर्यंत 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येत होता पण किंमतीत कपात केल्यानंतर या फोनची किंमत फक्त 7,499 रुपये झाली आहे. Samsung Galaxy M01s बाजारात 9,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता परंतु प्राइस कट नंतर किंमत कमी होऊन 8,999 रुपये झाली आहे.

The post पावरफुल फोन Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-51-price-cut-in-india-rs-20999-sale/feed/ 0
Samsung Galaxy A72 असेल कंपनीचा पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन, बघा किती असेल पावर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a72-will-support-penta-rear-camera-and-32-mp-selfie/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a72-will-support-penta-rear-camera-and-32-mp-selfie/#respond Fri, 25 Sep 2020 15:44:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8322 सेल्फीसाठी Samsung Galaxy A72 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे सांगण्यात आले आहे.

The post Samsung Galaxy A72 असेल कंपनीचा पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन, बघा किती असेल पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने यावर्षीच्या सुरवातीला 64 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा असलेला आपला पावरफुल स्मार्टफोन Samsung Galaxy A71 टेक मंचावर सादर केला होता. आपल्या लुक आणि स्पेसिफिकेशन्समुळे हा सॅमसंग फोन भारतीय यूजर्सना आवडला आहे जो सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे. आज बातमी आली आहे कि सॅमसंग या स्मार्टफोनचा अपग्रेडेड मॉडेल Samsung Galaxy A72 नावाने लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि हा सॅमसंगचा पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात 5 रियर कॅमेरा सेंसर्स दिले जातील.

Samsung Galaxy A72 ची माहिती एक लीकच्या माध्यमातून समोर आई आहे. लीक मध्ये दावा करण्यात आला आहे कि गॅलेक्सी ए72 सॅमसंग द्वारे पेंटा रियर कॅमेरा सेटअप सह बाजारात आणला जाईल. विशेष म्हणजे सॅमसंगने आतापर्यंत आपल्या कोणत्याही स्मार्टफोन मध्ये 5 रियर कॅमेरा सेंसर्स दिले नाहीत, त्यामुळे गॅलेक्सी ए72 पेंटा कॅमेराअसलेला सॅमसंगचा पहिला स्मार्टफोन असेल. या लीक मध्ये फोनच्या सर्व रियर कॅमेरा सेंसर्स सोबतच सेल्फी कॅमेऱ्याची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे.

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए72 च्या बॅक पॅनल वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 3एक्स झूम क्षमताअसलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस, 5 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करेल. तसेच सेल्फीसाठी Samsung Galaxy A72 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे सांगण्यात आले आहे.

Samsung Galaxy A71

Galaxy A71 बद्दल बोलायचे तर यात 6.7-इंचाचा फुल एचडी+ (1080 x2400) सुपर ऐमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा कोर (डुअल 2.2GHz + हेक्सा 1.8GHz) प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 6जीबी रॅम व 8जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हि स्टोरेज तुम्ही माइक्रोसएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवू शकता.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये 64MP चा मेन डेप्थ सेंसर F1.8, 5MP मॅक्रो सेंसर F2.2, 5MP अल्ट्रा वाइड F2.4 आणि 12MP F2.2 सेंसर आहे. तसेच फ्रंट कॅमेरा फोन मध्ये 32MP चा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंग सह येते.

The post Samsung Galaxy A72 असेल कंपनीचा पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन, बघा किती असेल पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a72-will-support-penta-rear-camera-and-32-mp-selfie/feed/ 0
Samsung Galaxy A51 आणि A71 झाले अजून स्वस्त, जाणून घ्या आता कोणत्या किंमतीत मिळत आहेत हे पावरफुल फोन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-gets-a-price-cut-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-gets-a-price-cut-in-india/#respond Fri, 11 Sep 2020 09:04:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8102 Galaxy A71 आणि Galaxy A51 सोबत कंपनीने इंडस्ट्री फर्स्ट इनोवेशन Quick Switch फिचर सादर केला होता,

The post Samsung Galaxy A51 आणि A71 झाले अजून स्वस्त, जाणून घ्या आता कोणत्या किंमतीत मिळत आहेत हे पावरफुल फोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पुन्हा एकदा जगात सर्वात जास्त विकला जाणारा लोकप्रिय एंडरॉयड स्मार्टफोन Samsung Galaxy A51 भारतात स्वस्त झाला आहे. यावेळी ‘A’ सीरीजच्या गॅलेक्सी ए51 सह कंपनीने गॅलेक्सी ए71 ची किंमत पण कमी केली आहे. हे फोन्स कमी किंमतीत ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोर्स वर विकत घेता येतील. चला जाणून घेऊया प्राइस कट नंतर दोन्ही फोन्स कोणत्या किंमतीत विकले जात आहेत.

91मोबाईल्सला दोन्ही फोन्सच्या किंमत मध्ये कपात झाल्याची माहिती मोबाईल रिटेल स्टोर्स कडून मिळाली आहे. सॅमसंगने Galaxy A-सीरीजचे हे दोन्ही डिवाइस यावर्षीच्या सुरवातीला सादर केले होते. तसेच यातील Samsung Galaxy A51 ला काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात जास्त विकला जाणारा लोकप्रिय पॉप्युलर एंडरॉयड स्मार्टफोनचा अवॉर्ड मिळाला होता.

नवीन किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए51 बद्दल बोलायचे झाले तर या फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट आता ऑफलाइन 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच ग्राहक या फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज ऑप्शन 25,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतात. या किंमतीत फोन कंपनीच्या साइट वर पण लिस्ट आहे.

गॅलेक्सी ए71 फक्त 8GB रॅम आणि 128GB मेमरी सह येतो. हा डिवाइस आता ऑफलाइन स्टोर्स वर 30,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर फोन याच किंमतीत विकला जात आहे.

विशेष म्हणजे जीएसटीचे दर वाढल्यामुळे इतर मोबाईल फोन कंपन्यांसोबतच सॅमसंगने पण आपल्या फोन्सच्या किंमती वाढवल्या होत्या. पण आता कंपनी आपल्या फोन्सच्या किंमती कमी करत आहे.

Galaxy A71

Galaxy A71 आणि Galaxy A51 सोबत कंपनीने इंडस्ट्री फर्स्ट इनोवेशन Quick Switch फिचर सादर केला होता, त्याचबरोबर “On-Device AI” आधारित Content Suggestions पण प्राइवेसीला अजून सिक्योर बनवतो. GenZ आणि Millennials आज रोज प्राइवेसी इश्यूचा सामना करतात आणि याच गोष्टी लक्षात ठेऊन Quick Switch सारखा यूनिक सोल्युशन तयार केला गेला होता.

Samsung Galaxy A71 च्या स्पेसिफिकेशन्ससाठी इथे क्लिक करा.

Samsung Galaxy A51 च्या स्पेसिफिकेशन्ससाठी इथे क्लिक करा.

सॅमसंग गॅलेक्सी ए51 वीडियो

The post Samsung Galaxy A51 आणि A71 झाले अजून स्वस्त, जाणून घ्या आता कोणत्या किंमतीत मिळत आहेत हे पावरफुल फोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-gets-a-price-cut-in-india/feed/ 0
Samsung Galaxy A71: एक ऑलराउंडर फोन ज्यात आहे शानदार डिजाईन, उत्तम डिस्प्ले आणि अप्रतिम कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-awesome-design-screen-camera-all-rounder/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-awesome-design-screen-camera-all-rounder/#respond Tue, 02 Jun 2020 13:52:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7274 जर तुम्ही मिड रेंज सेग्मेंट मध्ये एक चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे Samsung Galaxy A71 बद्दल जाणून घेण्याची. सध्या मिड रेंज सेग्मेंट मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व स्मार्टफोन मध्ये याला बेस्ट म्हणता येईल. या फोन मध्ये अनेक चांगले फीचर्स उपलब्ध आहेत जे याला दुसऱ्या फोन्सच्या तुलनेत पुढे नेऊन ठेवतात. […]

The post Samsung Galaxy A71: एक ऑलराउंडर फोन ज्यात आहे शानदार डिजाईन, उत्तम डिस्प्ले आणि अप्रतिम कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही मिड रेंज सेग्मेंट मध्ये एक चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे Samsung Galaxy A71 बद्दल जाणून घेण्याची. सध्या मिड रेंज सेग्मेंट मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व स्मार्टफोन मध्ये याला बेस्ट म्हणता येईल. या फोन मध्ये अनेक चांगले फीचर्स उपलब्ध आहेत जे याला दुसऱ्या फोन्सच्या तुलनेत पुढे नेऊन ठेवतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल कि कोणत्या अश्या गोष्टी आहेत ज्यामुळे हा फोन वेगळा ठरतो? तर Galaxy A71 मध्ये अश्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मोठा परिणाम करतात. आता पर्यंत तुम्ही याच्या स्टाइलिश, डिजाईन, मोठी बॅटरी लाइफ, शानदार क्वाड कॅमेरा आणि दमदार परफॉर्मन्सने प्रभावित झाला असाल पण यात अनेक असे मजेदार फीचर्स पण आहेत जे या प्राइस रेंज मध्ये या फोनला बेस्ट फोन बनवतात. चला एका नजर टाकूया त्या फीचर्स वर.

Samsung Pay सह करा स्विफ्ट आणि सुरक्षित पेमेंट

आजकाल POS टर्मिनल्सवर स्मार्टफोन आधारित पेमेंट फक्त NFC च्या माध्यमातून केले जात होते, Samsung Pay एक क्रांतिकारी सेवेच्या स्वरूपात समोर आला, खासकरून त्या बाजारांमध्ये जिथे NFC-enabled टर्मिनल्स उपलब्ध नव्हते. पेमेंटची हि नवीन टेक्नॉलॉजी Galaxy A71 मध्ये पण उपलब्ध आहे जिथे तुम्ही MST च्या माध्यमातून कोणत्याही खरेदीचे पेमेंट आपल्या फोन वरून करू शकता. याचा अर्थ असा कि, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा वापर कोणत्याही अश्या टर्मिनल वर करू शकता, जिथे तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड सुरक्षितरित्या स्वाइप करण्यासाठी POS मशीन उपलब्ध आहे. सर्वात खास बाब म्हणजे Samsung Pay अशाप्रकारची सुविधा देणारे एकमेव सर्विस आहे.

कारण यात माहिती टोकनाइज्ड फॉरमॅट मध्ये ठेवली जाते आणि मग POS वर पाठवली जाते, त्यामुळे जेव्हा तुम्ही Samsung Pay चा वापर करता तेव्हा सुनिश्चित करतो कि तुमच्या कार्डची सर्व माहिती सुरक्षित राहील. Galaxy A71 मध्ये याचा वापर सोप्पा पण आहे. होम बटन वर स्वाइप करून तुम्ही Samsung Pay मध्ये स्टोर केल्या गेलेले सर्व कार्ड ऍक्सेस करू शकता. तसेच जेव्हा तुम्हाला एखादे पेमेंट करायचे असेल तेव्हा पेमेंट टर्मिनल वर फोन टॅप करण्याआधी तुम्हाला फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन देऊन तो ऍक्टिव्ह करावा लागेल. जर तुम्हाला वाटत असेल कि इतकी सुरक्षा पुरेशी नाही तर तुम्हाला सांगू इच्छितो कि यात Samsung Knox ची सिक्योरिटी आहे जी संभावित धोक्यासाठी तुमच्या फोन वर नजर ठेवते. चांगली बाब अशी कि जर तुमचा फोन हरवला तर तुम्ही Samsung Pay रिमोटली डिएक्टिवेट करू शकता. इतकेच नव्हे तर जर कधी तुमचे कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर ‘Find My Mobile’ सर्विस मध्ये जाऊन एकदाच तुम्ही सर्व कार्ड ब्लॉक करू शकता.

Alive Intelligence फीचर्स खास तुमच्यासाठी

Make for India कार्यक्रमच्या अंतर्गत एक पाऊल टाकत Samsung ने अनेक खास Alive Intelligence फीचर्स सादर केले आहेत. जसे कि Useful cards, Multilingual typing, Finder & Smart crop. हे नवीन फीचर्स Gen Z वापरकर्त्यांसाठी खूप उपयोगी आहे ज्यांना फास्ट आणि आर्गेनाइज्ड लाइफ हवी आहे.

Useful Cards फीचर्स तुमच्या इनबॉक्स मधून महत्वपूर्ण मेसेजेसची ओळख करून ते चांगल्या आणि योग्य पद्धतीने कार्ड स्टाइल मध्ये व्यवस्थित करतो. यामुळे फक्त तुम्हाला इनबॉक्स सुव्यवस्थित होतो तसेच सहज वापरण्यालायक पण बनतो, त्यामुळे कोणताही महत्वपूर्ण मेसेज नजरेतून सुटत नाही. उदाहरणार्थ जर तुम्ही ऑनलाइन वरून काही ऑर्डर केले आणि त्या संबंधित आर्डर ट्रॅक करण्यासाठी एखादा मेसेज आला, तर हा फीचर फक्त तुमचे मेसेज ऑर्गेनाइज करत नाही तर तुम्हाला इन्स्टंट कॉल बटन उपलब्ध करून देण्यास पण मदत करेल, ज्यामुळे तुम्ही सहज आर्डर ट्रॅक करू शकाल. यामुळे माहिती मॅन्युअली शोधावी लागत नाही.

Multilingual typing, Alive Intelligence चा अजून एक मजेदार फीचर आहे. Multilingual keyboard मेसेजिंग फीचर क्षेत्रीय भाषा, ज्यांचा तुम्ही तुमच्या फोन मध्ये वापर करता, त्याच अंदाजात शब्द प्रडिक्ट करतो आणि तुम्हाला शब्द सुचवतो. यामुळे तुम्ही जसे बोलता त्याप्रमाणे मेसेजिंग पण करू शकता. Alive Intelligence मध्ये पावरफुल सर्च बार पण आहे ज्याला Finder चे नाव देण्यात आले आहे. याच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट तुमच्या आवडीच्या इंटरनटेनमेंट, फूड डिलिवरी, ट्रॅव्हल  आणि ई-कॉमर्स ऍप मध्ये इथूनच थेट सर्च करू शकता. ते ऍप ओपेन करून सर्च करण्याची गरज नाही. शेवटी यातील अजून एका खास फीचरचा उल्लेख कारेन जयचे नाव आहे Smart Crop; जेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट घेता तेव्हा हा स्वतःहून महत्वपूर्ण एरिया शोधून मार्क करेल. ज्यामुळे तुम्ही एका क्लिक मध्ये तो Crop करू शकाल.

शानदार परफॉर्मन्स आणि मोठी बॅटरी लाइफ

Samsung Galaxy A71 2.2GHz क्लॉक स्पीडच्या ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 730 चिपसेट सह येतो जो खात्रीशीररित्या यूजर्सना लॅग फ्री आणि फास्ट परफॉर्मन्स देण्याचे काम करतो. फोन मधील Adreno 618 GPU आणि Game Booster ची जोडी ग्राफिक्सना चांगले ठेवते तसेच PUBG सारख्या HD games मध्ये स्मूद फ्रेम रेट पण देतो. तसेच 8GB RAM असून Galaxy A71 कधीहि स्लो होत नाही. फोन मध्ये 128GB बिल्ट-इन स्टोरेज देण्यात आली आहे जी microSD कार्डच्या माध्यमातून 512GB पर्यंत वाढवता येते. त्यामुळे ऍप्स, गेम्स, फोटोज, वीडियोज, डॉक्यूमेंट्स इत्यादी साठी तुम्हाला कधीही स्टोरेज कमी पडणार नाही.

बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy A71, 4,500mAh च्या मोठ्या बॅटरी सह येतो जी संपूर्ण दिवसभराचा बॅकअप देते. या पावरफुल बॅटरी वर 16 तासांची 4G वेब ब्राउजिंग आणि 24 तास वीडियो प्लेबॅक मिळतो. अर्थात तुम्ही तासन तास सोशल मीडिया आणि वीडियो स्ट्रीमिंग वर राहू शकता. तसेच जेव्हा बॅटरी कमी होईल तेव्हा सॅमसंगच्या 25W Super-Fast Charging टेक्नोलॉजी सह वेगाने चार्ज केला जाऊ शकतो. हे सर्व आस्पेक्ट मिळून यूजरला पावर बॅकअपच्या चिंतेविना प्रत्येक कंडिशन मध्ये बेस्ट परफॉर्मन्स देतात.

सुंदर डिजाईन आणि अप्रतिम डिस्प्ले

Samsung ने लोकप्रिय कर्व्ड एज डिजाईन आणि 7.7mm स्लिम बॉडीच्या मदतीने Galaxy A71 ला असे बनवले आहे जेणेकरून हा फोन सहज हातात बसेल. तसेच हा स्मार्टफोन खूप हलका आहे आणि याचे वजन 180 ग्राम पेक्षा पण कमी आहे, याचा अर्थ असा आहे कि तुम्ही याचा वापर तासन तास चित्रपट बघण्यासाठी, गेम खेळण्यासाठी आणि इतर कामे करण्यासाठी करू शकता, यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. बॅक पॅनल वर Rhythmical पॅटर्न आणि Prism Crush Black, Blue आणि Silver pastel कलर या फोनला मिड रेंज सेग्मेंटच्या गर्दीत दुसऱ्या  स्मार्टफोन्स पेक्षा वेगळा बनवतात. हा फोन Infinity-O display सह येतो. कंपनीने Centre-Aligned Punch-Hole डिजाईनचा वापर केला आहे जो तुम्हाला विश्वास देतो कि तुम्ही दीर्घकाळ कोणत्याही अडचणीविना रोज याचा वापर करू शकाल. स्क्रीन पॅनल खाली Fingerprint Scanner पण देण्यात आला आहे, तसेच खालच्या पॅनल मध्ये हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट मिळेल.

आता डिस्प्ले कडे वळूया, Samsung Galaxy A71 मध्ये 6.7-inch चा Super AMOLED Plus डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे जो Full-HD+ पिक्सल रेजल्यूशन सह येतो. याचा प्रीमियम डिस्प्ले पॅनल आणि हाई रेजोल्यूशन पिक्सल क्लियर आणि शार्प विजुअल सह गडद काळ्या रंगासह तुम्हाला शानदार कॉन्ट्रास्ट लेवल पण देतो. हे सर्व मिळून फोनचा डिस्प्ले आकर्षक आणि व्हायब्रण्ट बनतो, तसेच यामुळे बॅटरी सेविंग पण होते.

बेहतरीन कॅमेरा एक्सपीरियंस

Galaxy A71 मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो हाई-रेजल्यूशन वाले 64MP कॅमेऱ्यासह येतो आणि कंपनीने हा f/1.8 अपर्चर सह सादर केला. हा सेंसर नियमित फोटोग्राफीच्या कामी येतो आणि शानदार फोटो क्लिक करण्याची क्षमता ठेवतो. मेन सेंसर 12MP Ultra-wide-angle सेंसर सह येतो जो 123-Degrees Wide फोटोग्राफी करू शकतो. हा सेंसर फोनला Ultra Wide Night mode ची ताकद पण देतो ज्यामुळे फोन खूप कमी प्रकाशात शानदार फोटोग्राफी करतो.

Samsung Galaxy A71 चा तीसरा सेंसर 5MP चा आहे आणि हि Macro लेंस आहे जी छोट्या छोट्या गोष्टींचे फोटो घेण्याची क्षमता ठेवते. अनेक स्मार्टफोन मध्ये हि सुविधा नसते. क्चाड कॅमेरा सेटअप मध्ये चौथी लेंस 5MP ची आहे जी Depth-sensing चे काम करते. हा कॅमेरा तुम्हाला परफेक्ट पोर्टेट शॉट घेण्यास मदत करतो ज्यामुळे तुमचा सोशल मीडिया प्रेजेंस शानदार होतो.

Samsung Galaxy A71 मध्ये तुम्हाला Live Focus फीचर मिळेल जिथे तुम्ही स्वतः ठरवू शकाल कि आणि वीडियो मध्ये बॅकग्राउंड किती ब्लर करायचा आहे. या स्मार्टफोनच्या दुसऱ्या यूनिक फीचर Slow-Mo सेल्फीचा पण उल्लेख करणे गरजेचे आहे. फोन मध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे आणि हा Slow-Mo वीडियो कॅप्चर करतो. त्यामुळे तुम्ही आपले खास क्षण Slow-mo मध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियाच्या या गेम मध्ये इतरांपेक्षा पुढे जाऊ शकता. कॅमेऱ्याचा अजून एक खास फीचर आहे Super Steady Mode. हा फीचर आता पर्यंतच्या तुमच्या स्मार्टफोन वीडियो एक्सपीरियंसला बदलून टाकेल. वीडियो रेकॉर्डिंग करताना हात हलल्यास पण हा फीचर वीडियो स्टेबल ठेवतो आणि तुम्हाला परफेक्ट शेक फ्री वीडियो रेकॉर्ड करण्यास मदत करतो.

शेवटी कॅमेरा सेक्शनच्या अजून एका चांगल्या फीचरचा उल्लेख करू इच्छितो. Samsung Galaxy A71 मध्ये AR Doodle फीचर आहे जो ऑग्यूमेंटेड रियालिटीच्या मदतीने 3डी एलिमेंट वीडियोज मध्ये टाकतो. हा फक्त ऑन करावा लागेल आणि जे हवे ते चित्र काढा आणि जिथे हवे तिथे ठेवा. तुम्ही जाल तिथे हे चित्र तुमच्यासोबत येईल. एकंदरीत Samsung Galaxy A71 तुमच्या क्रिऐटिविटीला वाढ मिळावी यांचे प्रयत्न करतो.

किंमत आणि उपलब्धता
Samsung Galaxy A71 भारतीय बाजारात जवळपास सर्व प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल चॅनेल्स वर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनची किंमत 32,999 रुपये आहे आणि शानदार डिस्प्ले, मोठी बॅटरी, क्वाड रियर कॅमेरा, मोठी स्टोरेज आणि Alive Intelligence सारख्या चांगल्या सुविधांसह येतो. ज्यांचा आम्ही वर उल्लेख केला आहे ती सर्व वैशिष्ट्ये लक्षात घेता Samsung Galaxy A71 मिड-रेंज सेग्मेंट मध्ये सर्वात बेस्ट स्मार्टफोन पैकी एक आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही आणि हा आता तुम्ही भारतात पण विकत घेऊ शकता.

The post Samsung Galaxy A71: एक ऑलराउंडर फोन ज्यात आहे शानदार डिजाईन, उत्तम डिस्प्ले आणि अप्रतिम कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-awesome-design-screen-camera-all-rounder/feed/ 0
Samsung Galaxy A71 चा दमदार कॅमेरा तुमच्या सोशल प्रोफाइलला बनवेल खूप आकर्षक, जाणून घ्या कसे ते https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-social-media-camera-brilliance/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-social-media-camera-brilliance/#respond Mon, 01 Jun 2020 15:02:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7245 Samsung Galaxy A71 मध्ये 32MP चा पावरफुल फ्रंट कॅमेरा आहे जो फोन मध्ये देण्यात आलेल्या Infinity-O, Super AMOLED plus डिस्प्लेच्या आत उपलब्ध आहे. हा फोन रियलटाइम Bokeh Effects व्यतिरिक्त Slow-Motion क्लिप रेकॉर्ड करू शकतो.

The post Samsung Galaxy A71 चा दमदार कॅमेरा तुमच्या सोशल प्रोफाइलला बनवेल खूप आकर्षक, जाणून घ्या कसे ते first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आज मिड रेंज सेग्मेंट मध्ये Samsung Galaxy A71 स्मार्टफोनची खूप चर्चा आहे. त्यामागे अनेक कारणे पण आहेत. हा ऑलराऊंडर फोन दमदार कॅमेरा, शानदार डिस्प्ले आणि मोठ्या बॅटरी लाइफ सह येतो. हा स्लीक आणि पावरफुल डिवाइस आपल्या वैशिष्ट्यांमुळे आपल्या रेंज मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व फोन्सना चांगली टक्कर देण्याची क्षमता ठेवतो. या व्यतिरिक्त याचा दमदार फ्रंट कॅमेरा फक्त हाई रेजल्यूशन सेल्फी क्लिक करतो असे नाही तर हा इतर आधुनिक वैशिष्टयांनी पण परिपूर्ण आहे जे दुसऱ्या फोन मध्ये मिळत नाहीत. यातील एक म्हणजे ‘Slow-mo Selfie’. हे फीचर खूप दमदार आहे पण या फोन मध्ये इतकी वैशिष्ट्ये आहेत कि कदाचित हे फिचर गर्दीत हरवून जाऊ शकते. याच कारणांमुळे आज आम्ही तुम्हाला Slow-mo Selfie बद्दल सविस्तर सांगणार आहोत.

Slow Motion selfie चा अनुभव घ्या

Samsung Galaxy A71 मध्ये 32MP चा पावरफुल फ्रंट कॅमेरा आहे जो फोन मध्ये देण्यात आलेल्या Infinity-O, Super AMOLED plus डिस्प्लेच्या आत उपलब्ध आहे. हा फोन रियलटाइम Bokeh Effects व्यतिरिक्त Slow-Motion क्लिप रेकॉर्ड करू शकतो. Slow Motion selfie बद्दल बोलायचे तर आधी फक्त काही फ्लॅगशिप फोन पर्यंत मर्यादित होता हा फिचर पण Samsung ने हा आता या मिड रेंज सेग्मेंटच्या फोन मध्ये पण दिला आहे जी एक मोठी बाब आहे. Slow Motion selfie मध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी सामान्य वेगाच्या तुलनेत कमी वेगाने रेकॉर्ड करू शकता ज्या फक्त तुमच्या Instagram ची शान वाढवणार नाहीत तर तुम्ही तुमचे उडते केस, तुमची नवीन कर्ल स्टाइल सहित खूप काही वेगळ्या ढंगात रेकॉर्ड करू शकता. तसेच रेकॉर्डिंग नंतर जेव्हा तुम्ही हे बघाल तेव्हा याचा Super Smooth Slow Motion शानदार दिसेल. स्क्रीन वर हा तुम्हाला एखाद्या जादुई अनुभवापेक्षा कमी वाटणार नाही.

शानदार Infinity-O Display

या Slow Motion selfie ची मजा कमी झाली असती जर फोनचा डिस्प्ले इतका शानदार नसता. या फोन मध्ये 6.7-inch Super AMOLED Plus स्क्रीन पॅनल आहे जो फुल full HD+ रेजल्यूशन सह येतो. त्याचबरोबर फोनचे बेजल खूप बारीक आहेत आणि डिस्प्लेचा अनुभव अप्रतिम आहे. Infinity-O पॅनल स्क्रीन तुम्हाला real-to-life म्हणजे अगदी वास्तविक रंगांचा अनुभव देऊ शकते. आणि यानंतर जेव्हा Super AMOLED डिस्प्लेची साथ मिळते तेव्हा हा अनुभव द्विगुणित होतो. Super AMOLED पिक्सल्सना वेगवेगळे कंट्रोल करतो आणि आवश्यकतेनुसार on/off करतो ज्यामुळे तुम्हाला जास्त डार्क आणि नॅचरल ब्लॅक मिळतो. हा डिस्प्ले साधरण स्क्रीनच्या तुलनेत जास्त जिवंत वाटतो.

स्टोरेज आणि परफॉर्मेंस मध्ये पण आहे दमदार

स्टाइलिश डिजाइन व्यतिरिक्त पण फोन मध्ये खूप काही आहे. हा फोन 8nm फॅब्रिकेशनच्या Qualcomm Snapdragon 730 चिपसेट वर चालतो आणि यात तुम्हाला 2.2GHz octa-core प्रोसेसर मिळेल. तसेच Adreno 618 GPU आहे जो याची परफॉर्मेंस शानदार बनवतो. राहिला प्रश्न मल्टीटास्किंगचा तर त्यासाठी पण काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण यात 8 GB RAM मेमरी देण्यात आली आहे. एकंदरीत तुम्ही बघू शकता फोनचा सेटअप इतका शानदार आहे कि यात तुम्ही हेवी गेम खेळा किंवा मग एखादे मोठे ऍप्लिकेशन चालावा, हा हँग होणार नाही किंवा ऍप क्रॅश सारखी समस्या येणार नाही. त्याचबरोबर फोन मध्ये AI-powered Game Booster टेक्नोलॉजी आहे जी गेम खेळताना डेडिकेटेड मॅक्सिमम पवार सह फ्रेम रेट बूस्ट करते यामुळे डिस्ट्रॅक्शन होत नाही आणि तुम्ही गेम वर लक्ष केंद्रित करू शकता. तसेच यात 128GB ची स्टोरेज आहे जी खूप आहे. परंतु तरीही तुम्हाला जर हि स्टोरेज कमी पडली तर यात microSD कार्ड स्लॉट आहे जिथे तुम्ही 512GB पर्यंतच्या कार्डचा वापर करू शकता.

मोठी बॅटरी लाइफ

दमदार हार्डवेयरला पावर देण्यासाठी या फोन मध्ये 4,500mAh ची मोठी बॅटरी आहे. तुम्ही एकदा चार्जिंग केल्यास संपूर्ण एक दिवस वीडियोज बघू शकता. या फोन मध्ये 24 तासांचा वीडियो प्ले बॅक टाइम आहे. त्याचबरोबर बॅटरी बाबत खास बाब अशी म्हणता येईल कि Galaxy A71 मध्ये 25W ची Super-Fast चाजिंग देण्यात आली आहे जी फोन कमी वेळात संपूर्ण चार्ज करते.

अप्रतिम कॅमेरा

Samsung Galaxy A71 च्या रियर पॅनल वर कॅमेरा लस्टर आहे जिथे एक साथ 4 कॅमेरे आहेत. याचा मेन कॅमेरा 64MP चा आहे जो वाइड f/1.8 अपर्चर सह येतो. तर दुसरा सेंसर 12MP चा आहे आणि हा Ultra-wide-angle ला सपोर्ट करतो. याव्यतिरिक्त अजून दोन सेंसर्स आहेत जे 5MP रेजल्यूशन सह येतात. यातील एक Macro लेंस आहे तर दुसरा Live Focus शूटसाठी Depth sensor आहे. फोन मध्ये या कॅमेऱ्यांसह अनेक फोटोग्राफी सीनारियो इनेबल आहेत. तसेच यात Super Steady mode सारखे फीचर पण आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही गिंबल प्रमाणे वीडियो स्टेबलाइजेशन मिळवू शकता.

अजून काही खास फीचर्स पण आहेत यात
आज तुमच्यासाठी आणि तुमच्या आर्गेनाइजेशनसाठी सिक्योरिटी खूप महत्वाची आहे आणि तुमच्या सुरक्षेची Samsung Galaxy A71 मध्ये पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. कंपनीने हा फोन Under-Display Fingerprint Scanner सह सादर केला आहे. सोबतच यात ऍडव्हान्स ग्रेड सुरक्षा लेयर Knox आहे जी तुमचा डेटा आणि फाइल्स सुरक्षित ठेवते.

Galaxy A71 असेल तर शॉपिंगच्या वेळी कॅश आणि कार्डची काळजी करण्याची गरज नाही. हा फोन स्मार्ट पेमेंट सिस्टम Samsung Pay सह येतो. Samsung Pay फोन वरच तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्ड टोकेनाइजेशनच्या माध्यमातून सुरक्षितरित्या जोडू शकता आणि Point Of Sale (POS) जिथे कार्ड स्वाइप केला जातो तिथे कोणत्याही कार्ड विना तुम्ही तुमचा फोन टॅप करून पेमेंट करू शकता. यानंतर एक खास उल्लेख करणे गरजेचे आहे. Samsung Galaxy A71 मध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे. याचा अर्थ असा कि तुम्ही यात तुमचा फेवरेट हडफोन वापरू शकता.

किंमत आणि उपलब्धता
Samsung Galaxy A71 भारतातील सर्व प्रमुख रिटेल स्टोर वर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच Samsung Opera House, Samsung.com सहित देशातील प्रमुख ऑनलाइन स्टोर्स वरून 32,999 पासून पण विकत घेता येईल. हि किंमत 128GB मेमरी आणि 8GB RAM असलेल्या मॉडलसाठी आहे. हा फोन Prism Crush Silver, Prism Crush Blue आणि Prism Crush Black सहित तीन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे.

निष्कर्ष
आजच्या गर्दीत जिथे तुमचा सोशल गेम तुम्हाला इतरांपासून वेगळा ठरवतो त्यामुळे Samsung Galaxy A71 आपल्या दमदार फीचर्समुळे तुम्हाला या सोशल गर्दीत मोठे यश मिळवून देऊ शकतो. यातील शानदार कॅमेरा फीचर्स जे तुमच्या फोटो मध्ये फक्त चार चांद लावणार नाही तर यात तुम्ही तुमची क्रिएटिविटी पण दाखवू शकता आणि एक फोटोग्राफर प्रमाणे वरच्या दर्जाची फोटोग्राफी करू शकता. त्याचबरोबर याचे Slow Motion selfie फीचर म्हणजे केक वरील चेरी आहे जो फक्त शोभा वाढवत नाही तर त्या सर्व गोष्टी करण्यास मदत करतो ज्या तुम्ही एका फोन मध्ये करू इच्छिता.

The post Samsung Galaxy A71 चा दमदार कॅमेरा तुमच्या सोशल प्रोफाइलला बनवेल खूप आकर्षक, जाणून घ्या कसे ते first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-social-media-camera-brilliance/feed/ 0
Samsung Galaxy A71 5G चा फोटो आला समोर, क्वॉड कॅमेऱ्यासह मिळेल पंच-होल डिस्प्ले आणि मोठी बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-5g-images-leaked-look-design-specs-price-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-5g-images-leaked-look-design-specs-price-revealed/#respond Wed, 08 Apr 2020 17:57:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7040 Samsung Galaxy A71 5G या फोटोज मध्ये बऱ्याच अंशी सॅमसंगच्या Galaxy A51 5G सारखा दिसत आहे.

The post Samsung Galaxy A71 5G चा फोटो आला समोर, क्वॉड कॅमेऱ्यासह मिळेल पंच-होल डिस्प्ले आणि मोठी बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung आपली ‘गॅलेक्सी ए’ सीरीज अपग्रेड करत आहे आणि सीरीज अंतर्गत नवीन 5जी फोन आणेल. चर्चा अशी आहे कि कंपनी Galaxy A51 5G आणि Galaxy A71 5G फोन लॉन्च करेल जे भारतात आधीच लॉन्च झालेल्या Galaxy A71 आणि Galaxy A51 चे नवीन मॉडेल्स असतील. काही दिवसनपूर्वी यातील एक सॅमसंग गॅलेक्सी ए71 5जी चीनी बेंचमार्किंग साइट वर लिस्ट केला गेला होता त्यानंतर फोनचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते, आज Samsung Galaxy A71 चे फोटोज पण समोर आले आहेत. हे फोटोज समोर आल्यामुळे फोनच्या डिजाईन सोबतच अनेक स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

अशी असेल डिजाईन

सर्वात आधी सांगायचे तर Samsung Galaxy A71 5G या फोटोज मध्ये बऱ्याच अंशी सॅमसंगच्या Galaxy A51 5G सारखा दिसत आहे. फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर तिथे बेजल लेस पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा पूर्णपणे साईड ऐजेजला स्पर्श करतात. तर डिस्प्लेच्या खालच्या बाजूला पण खूप बारीक बेजल्स आहेत. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध पंच-होल देण्यात आला आहे. हा होल वरच्या ऐज पासून थोडा लांब आहे आणि यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे.

Samsung Galaxy A71 5G एंटिना बॅंड डिजाईन वर बनला आहे. फ्रंट पॅनल वरच वरच्या बाजूला स्पीकर फोटो मध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे डाव्या पॅनल वर सिम स्लॉट मिळेल. फोनचा बॅक पॅनल पाहता क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौकोनी आकारात पॅनल वर उजवीकडे आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए71 5जी च्या या कॅमेरा सेटअप मध्ये चार सेंसर देण्यात आले आहेत जे L-शेप मध्ये आहेत. तीन कॅमेरा सेंसर उजवीकडे वर्टिकल लगे आहेत तर एक सेंसर डावीकडे आहे. या चौथ्या सेंसरच्या वर फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही तसेच खालच्या बाजूला Samsung ची ब्रॅण्डिंग आहे. समोर आलेल्या फोटोज मध्ये फोनच्या लोवर पार्ट वर 3.5एमएम जॅक पण दिसत आहे. आशा आहे कि या जॅकच्या बाजूला यूएसबी टाईप-सी पोर्ट पण देण्यात येईल. या फोनच्या ब्लू, ब्लॅक आणि वाईट कलर वेरिएंटचा खुलासा आला आहे.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A71 5G बाबत बोलले जात आहे कि हा डिवाईस सॅमसंगच्या एक्सनॉस 980 चिपसेट वर लॉन्च केला जाईल ज्यात 5जी मॉडेम इंटिग्रेटेड असेल. गीकबेंच वर गॅलेक्सी ए71 5जी 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. Galaxy A71 5G गीकबेंच वर एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह लिस्ट केला गेला होता तसेच फोन मध्ये 1.79गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर मिळणार असल्याचे समोर आले होते. लीकनुसार या फोन मध्ये 4370एमएएच ची बॅटरी दिली जाईल जो 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लीकनुसार Samsung Galaxy A71 5G च्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 64 मेगापिक्सलचा मिळेल. त्याचबरोबर फोन मध्ये 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी गॅलेक्सी ए71 5जी मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. लीकनुसार Samsung Galaxy A71 5G ची किंमत 35,000 रुपयांच्या आसपास असेल.

The post Samsung Galaxy A71 5G चा फोटो आला समोर, क्वॉड कॅमेऱ्यासह मिळेल पंच-होल डिस्प्ले आणि मोठी बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-5g-images-leaked-look-design-specs-price-revealed/feed/ 0
8जीबी रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung Galaxy A71, या दिवशी होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-launched-8-gb-ram-64mp-camera-sale-date-price-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-launched-8-gb-ram-64mp-camera-sale-date-price-flipkart/#respond Wed, 19 Feb 2020 15:21:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6645 Galaxy A71 24 फेब्रुवारी पासून सर्व रिटेल स्टोर्स, सॅमसंग ओपेरा हाउस, सॅमसंग ई-शॉपिंग आणि सर्व मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइट वर विकला जाईल.

The post 8जीबी रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung Galaxy A71, या दिवशी होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91Mobiles ने आजच एक्सक्लूसिवली सॅमसंग गॅलेक्सी ए71 च्या भारतीय किंमतीची माहिती दिली होती. तर आता कंपनीने हा अधिकृतपणे भारतात लॉन्च केला आहे. लक्षात घ्या कि गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये कंपनीने वियतनाम मध्ये Galaxy A51 सोबत Galaxy A71 सादर केला होता. तसेच कंपनी 25 फेब्रुवारीला भारतात आपल्या ‘एम’ सीरीज मध्ये गॅलेक्सी एम31 सादर करणार आहे.

किंमत

पुन्हा एकदा 91मोबाईल्सच्या बातमीवर शिकामोर्तब झाला आहे. कंपनीने इंडिया मार्केट मध्ये Samsung Galaxy A71 29,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा डिवाइस कंपनीने Prism Crush Silver, Blue आणि Black कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. Galaxy A71 24 फेब्रुवारी पासून सर्व रिटेल स्टोर्स, सॅमसंग ओपेरा हाउस, सॅमसंग ई-शॉपिंग आणि सर्व मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइट वर विकला जाईल. भारतात हा डिवाइस फक्त 8/128 GB वेरिएंट मधेच सादर केला गेला आहे.

स्पेसिफिकेशन्स

गॅलेक्सी ए71 बद्दल बोलायचे तर यात 6.7-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) सुपर ऐमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले आहे, ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. तसेच फोन मध्ये दमदार क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730 ऑक्टा-कोर एसओसी आहे, ज्यात 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज आहे. भारतात सध्या हा डिवाइस सिंगल वेरिएंट मधेच सादर केला गेला आहे.

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 64-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर f/1.8 लेंस आणि 12-मेगापिक्सल सेकंडरी सेंसर f/2.2 अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस असेल. तसेच फोन मध्ये 5-मेगापिक्सल डेप्थ सेंसर f/2.2 लेंस आणि 5-मेगापिक्सल सेंसर f/2.4 मॅक्रो लेंस आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिविटी ऑप्शन साठी फोन मध्ये 4G VoLTE, वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस/ ए-जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500mAh बॅटरी सह 25W फास्ट चार्जिंग ऑप्शन सह देण्यात आली आहे. फोन एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए71 वीडियो

The post 8जीबी रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung Galaxy A71, या दिवशी होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a71-launched-8-gb-ram-64mp-camera-sale-date-price-flipkart/feed/ 0
Samsung घेऊन येऊ शकते Galaxy A70e नावाचा नवीन फोन, फोटो आणि वीडियो आला समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70e-render-image-leaked-design-triple-rear-camera-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70e-render-image-leaked-design-triple-rear-camera-revealed/#respond Mon, 17 Feb 2020 12:53:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6609 गॅलेक्सी ए71 च्या लॉचच्या आधी आता सॅमसंगचा अजून एक नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A70e नावाने समोर आला आहे.

The post Samsung घेऊन येऊ शकते Galaxy A70e नावाचा नवीन फोन, फोटो आणि वीडियो आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने या महिन्याच्या सुरवातीला आपल्या ‘गॅलेक्सी ए’ सीरीज मधील स्मार्टफोन Samsung Galaxy A70s ची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर असे बोलले जात होते कि आता सॅमसंग लवकरच Samsung Galaxy A71 बाबत भारतात एखादी घोषणा करू शकते. पण गॅलेक्सी ए71 च्या लॉचच्या आधी आता सॅमसंगचा अजून एक नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A70e नावाने समोर आला आहे. या रिपोर्ट मध्ये या स्मार्टफोनचे फोटोज शेयर करण्यात आले आहेत ज्यावरून फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे.

Samsung Galaxy A70e ची रेंडर ईमेज प्रसिद्ध टिप्सटर आनलीक्स सोबत शेयर करण्यात आली आहे. समोर आलेल्या फोटोज मध्ये फोन सर्व अँगलने दाखवण्यात आला आहे ज्यात फोनच्या सर्व पॅनल्स, पोर्ट्स आणि सेंसर्सचा खुलासा झाला आहे. थेट फोनची डिजाईन पाहता रेंडर ईमेज नुसार गॅलेक्सी ए70ई स्मार्टफोन बेजल लेस इनफिनिटी यू डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी ए70 आणि गॅलेक्सी ए70एस मध्ये पण अशीच नॉच देण्यात आली होती. डिस्प्लेच्या खालच्या बाजूला चिन पार्ट पण आहे.

अशी असेल डिजाईन

फोनची डिजाईन पाहता Samsung Galaxy A70e च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये रक्तच रांगेत तीन कॅमेरा सेंसर्स आणि खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि खालच्या बाजूला Samsung ची ब्रॅंडिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. तसेच Samsung Galaxy A70e च्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक आहे तर खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आहे. लोवर पॅनल वर यूएसबी पोर्टच्या उजवीकडे स्पीकर आणि डावीकडे सिम स्लॉट देण्यात आला आहे. रेंडर आणि वीडियो मध्ये Samsung Galaxy A70e सफेद आणि ब्लॅक कलर मध्ये दाखवण्यात आला आहे.

Samsung Galaxy A70s

सॅमसंग गॅलेक्सी ए70एस भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता ज्यात 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅम आहे. हे दोन्ही वेरिएंट 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. फोनचा 6 जीबी रॅम वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता तर 8 जीबी रॅम वेरिएंट 30,999 रुपयांमध्ये बाजारात आला होता. आता या दोन्ही वेरिएंट्सच्या किंटमी 2,000 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. प्राइस कट नंतर Samsung Galaxy A70s चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 26,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy A70s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येतो ज्यात स्क्रीन वर टच करताच फोन अनलॉक होतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला होता जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. Samsung Galaxy A70s डुअल सिम व 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A70s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 64-मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरला सपोर्ट करतो. सोबत फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि 8-मेगापिक्सलचा थर्ड सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए70एस मध्ये 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Samsung घेऊन येऊ शकते Galaxy A70e नावाचा नवीन फोन, फोटो आणि वीडियो आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70e-render-image-leaked-design-triple-rear-camera-revealed/feed/ 0
8GB रॅम, 4000mAh बॅटरी आणि 48MP क्वॉड रियर कॅमेऱ्यासह Samsung Galaxy A51 भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-launched-in-india-quad-rear-camera-4000mah-battery-8gb-ram-specs-price-sale-availability-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-launched-in-india-quad-rear-camera-4000mah-battery-8gb-ram-specs-price-sale-availability-offer/#respond Wed, 29 Jan 2020 13:35:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6426 सॅमसंग गॅलेक्सी ए51 31 जानेवारी पासून विकत घेता येईल.

The post 8GB रॅम, 4000mAh बॅटरी आणि 48MP क्वॉड रियर कॅमेऱ्यासह Samsung Galaxy A51 भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung गेले अनेक दिवस आपल्या इंडियन फॅन्सना वाट बघायला लावत आहे कि कंपनी भारतात ‘गॅलेक्सी ए सीरीज’ चा विस्तार करत दोन नवीन फोन घेऊन येत आहे. हि प्रतीक्षा कमी करत आज कंपनीने इंडियन मार्केट मध्ये Samsung Galaxy A51 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन आज भारतीय बाजारात आणला आहे जो येत्या 31 जानेवारी पासून ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेलसाठी उपलब्ध होईल.

किंमत व सेल

Samsung Galaxy A51 दोन वेरिएंट मध्ये भारतात आला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज आहे. किंमत पाहता फोनचा 6 जीबी + 128 जीबी वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे तसेच Samsung Galaxy A51 च्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत लवकरच समजेल. सॅमसंग गॅलेक्सी ए51 31 जानेवारी पासून विकत घेता येईल.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy A51 कंपनीने पंच-होल डिस्प्ले वर सादर केला आहे जो प्रिजम डिजाईन वर बनला आहे. हा फोन बेजल लेस डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्यात वरच्या बाजूला एक छोटासा होल आहे. या होल मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. गॅलेक्सी ए51 ची स्क्रीन तीन बाजुंनी पूर्णपणे बेजल लेस आहे तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनचा बॅक पॅनल पाहता यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप उजवीकडे चौकोनी आआकारात देण्यात आला आहे ज्यात कॅमेरा सेंसर्स L-शेप मध्ये आहे.

Galaxy A51 च्या बॅक पॅनल वर इतर कोणताही सेंसर देण्यात आलेला नाही तसेच खालच्या बाजूला Samsung ची ब्रँडिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. Samsung Galaxy A51 च्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे ज्याच्या उजवीकडे स्पीकर ग्रिल आहे आणि डावीकडे 3.5एमएम ऑडियो जॅक देण्यात आला आहे.

शानदार फोटोग्राफी

फोटोग्राफी सेग्मेंट सॅमसंग गॅलेक्सी ए51 च्या प्रमखु यूएसपी पैकी एक आहे. त्याबद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 12 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Samsung Galaxy A51 मध्ये 32 मेगापिक्सलचा पंच-होल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. सॅमसंगने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह सादर केला आहे ज्यात स्क्रीन वर टच करताच फोन अनलॉक होतो. सॅमसंग गॅलेक्सी ए51 एंडरॉयड 10 आधारित वन यूआई 2.0 वर लॉन्च झाला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो.

इंडियन मार्केट मध्ये Samsung Galaxy A51 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे तसेच दोन्ही वेरिएंट 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. सॅमसंग गॅलेक्सी ए51 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A51 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते.

The post 8GB रॅम, 4000mAh बॅटरी आणि 48MP क्वॉड रियर कॅमेऱ्यासह Samsung Galaxy A51 भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-launched-in-india-quad-rear-camera-4000mah-battery-8gb-ram-specs-price-sale-availability-offer/feed/ 0
Samsung Galaxy A21s असले कंपनीचा आगामी लो बजेट स्मार्टफोन, दोन स्टोरेज वेरिएंट आले समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-sm-a217f-leaked-storage-variant-2mp-macro-camera-specs/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-sm-a217f-leaked-storage-variant-2mp-macro-camera-specs/#respond Fri, 24 Jan 2020 12:52:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6378 रिपोर्टनुसार Galaxy A21s दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात बेस मॉडेल 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 64 जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते.

The post Samsung Galaxy A21s असले कंपनीचा आगामी लो बजेट स्मार्टफोन, दोन स्टोरेज वेरिएंट आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung टेक विश्वाच्या बातम्यांमध्ये जवळपास रोज येत आहे. फ्लॅगशिप फोन लॉन्च असो किंवा मीड बजेट मोबाईलचे पदार्पण, सॅमसंग सतत काही ना काही तरी नवीन करत आहे. या व्यतिरिक्त लीक्स न्यूज मध्ये पण सॅमसंगचे नाव सगळीकडे दिसत आहे. यातच आज पुन्हा सॅमसंग संबंधित एक मोठी बातमी आली आहे. ताज्या लीक मध्ये Samsung Galaxy A21s चे नाव समोर आले आहे. या लीक मध्ये फक्त ‘गॅलेक्सी ए सीरीज’ च्या नवीन फोनची माहिती देण्यात आलेली नाही तर सोबत Galaxy A21s चे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

Samsung Galaxy A21s संबंधित हि बातमी सॅममोबाईलने आपल्या एक्सक्लूसिव न्यूज मध्ये दिली आहे. सॅममोबाईलने सांगितले आहे कि सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी ए सीरीजच्या नवीन स्मार्टफोन वर काम सुरु केले आहे आणि कंपनी हा डिवाईस Samsung Galaxy A21s नावाने बाजारात आणेल. रिपोर्टनुसार गॅलेक्सी ए21एस चा मॉडेल नंबर SM-A217F असेल. आपल्या रिपोर्ट मध्ये वेबसाइटने असा अंदाज व्यक्त केला आहे कि कदाचित सॅमसंग गॅलेक्सी ए21एस ग्लोबल मंचाच्या कोणत्याही मार्केट्स मध्ये लॉन्च न होता कंपनी निवडक बाजारांमध्ये हा फोन Samsung Galaxy A21s नावाने सादर करेल.

Samsung Galaxy A21s

समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए21एस चे काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण देण्यात आली आहे. वेबसाइटनुसार हा मोबाईल एक लो बजेट फोन असेल जो एंट्री लेवल स्पेसिफिकेशन्स सह येईल. रिपोर्टनुसार Galaxy A21s दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात बेस मॉडेल 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 64 जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते.

Samsung Galaxy A21s चा रियर कॅमेरा सेटअप किती सेंसर्स सह येईल हे समजले नाही पण रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी ए21एस च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये एक मॅक्रो सेंसर पण देण्यात येईल जो 2 मेगापिक्सलचा असेल. तसेच सॅमसंग गॅलेक्सी ए21एस ब्लू, ब्लॅक, व्हाईट आणि रेड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. Samsung Galaxy A21s इंडियन मार्केट मध्ये येईल कि नाही हे स्पष्ट झाले नाही.

Samsung Galaxy A51 – Galaxy A71

Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 च्या इंडिया लॉन्च बद्दल द मोबाईल इंडियन वेबसाइटने दावा केला आहे कि सॅमसंग आपले हे दोन्ही स्मार्टफोन फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात लॉन्च करेल. या रिपोर्ट मध्ये फोनच्या लॉन्चची तारीख समजली नाही किंवा लॉन्चच्या नंतर किती दिवसांनी हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात सेलसाठी उपलब्ध होतील हे देखील समजले नाही. वेबसाइटच्या रिपोर्टनुसार या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत इंडियन मार्केट मध्ये 30,000 रुपयांपेक्षा कमी असेल. विशेष म्हणजे 91मोबाईल्सला आपल्या सूत्रांकडून माहिती मिळाली होती कि Samsung Galaxy A51 भारतीय बाजारात 22,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल तर Galaxy A71 ची किंमत 29,990 रुपये असेल.

Samsung India ने कपंनी माइक्रोसाइट वर ‘Galaxy A’ नावाने नवीन प्रोडक्ट पेज बनवले आहे. कंपनीने या प्रोडक्ट पेज वर Awesome is for everyone लिहिले आहे. प्रोडक्ट पेज वर कंपनीने स्मार्टफोनचा फोटो पण शेयर केला आहे ज्यात फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे. फोटो मध्ये पंच-होल डिस्प्ले दाखवण्यात आला आहे ज्यात होल डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मधोमध आहे. तसेच प्रोडक्ट पेज वर रियर कॅमेरा प्लेटमेंट पण दाखवण्यात आली आहे जी L-शेप मध्ये आहे. या पेज वर फोन मध्ये Awesome Camera, Awesome Screen आणि Awesome Battery असल्याचे सांगण्यात आले आहे. सॅमसंगने अधिकृतपणे गॅलेक्सी ए51 आणि ए71 स्मार्टफोनसाठी ‘Notify Me’ बटण आणेल आहे.

The post Samsung Galaxy A21s असले कंपनीचा आगामी लो बजेट स्मार्टफोन, दोन स्टोरेज वेरिएंट आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-sm-a217f-leaked-storage-variant-2mp-macro-camera-specs/feed/ 0