Samsung Galaxy A71 5G चा फोटो आला समोर, क्वॉड कॅमेऱ्यासह मिळेल पंच-होल डिस्प्ले आणि मोठी बॅटरी

Samsung आपली ‘गॅलेक्सी ए’ सीरीज अपग्रेड करत आहे आणि सीरीज अंतर्गत नवीन 5जी फोन आणेल. चर्चा अशी आहे कि कंपनी Galaxy A51 5G आणि Galaxy A71 5G फोन लॉन्च करेल जे भारतात आधीच लॉन्च झालेल्या Galaxy A71 आणि Galaxy A51 चे नवीन मॉडेल्स असतील. काही दिवसनपूर्वी यातील एक सॅमसंग गॅलेक्सी ए71 5जी चीनी बेंचमार्किंग साइट वर लिस्ट केला गेला होता त्यानंतर फोनचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते, आज Samsung Galaxy A71 चे फोटोज पण समोर आले आहेत. हे फोटोज समोर आल्यामुळे फोनच्या डिजाईन सोबतच अनेक स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

अशी असेल डिजाईन

सर्वात आधी सांगायचे तर Samsung Galaxy A71 5G या फोटोज मध्ये बऱ्याच अंशी सॅमसंगच्या Galaxy A51 5G सारखा दिसत आहे. फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर तिथे बेजल लेस पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा पूर्णपणे साईड ऐजेजला स्पर्श करतात. तर डिस्प्लेच्या खालच्या बाजूला पण खूप बारीक बेजल्स आहेत. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध पंच-होल देण्यात आला आहे. हा होल वरच्या ऐज पासून थोडा लांब आहे आणि यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे.

Samsung Galaxy A71 5G एंटिना बॅंड डिजाईन वर बनला आहे. फ्रंट पॅनल वरच वरच्या बाजूला स्पीकर फोटो मध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे डाव्या पॅनल वर सिम स्लॉट मिळेल. फोनचा बॅक पॅनल पाहता क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौकोनी आकारात पॅनल वर उजवीकडे आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए71 5जी च्या या कॅमेरा सेटअप मध्ये चार सेंसर देण्यात आले आहेत जे L-शेप मध्ये आहेत. तीन कॅमेरा सेंसर उजवीकडे वर्टिकल लगे आहेत तर एक सेंसर डावीकडे आहे. या चौथ्या सेंसरच्या वर फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही तसेच खालच्या बाजूला Samsung ची ब्रॅण्डिंग आहे. समोर आलेल्या फोटोज मध्ये फोनच्या लोवर पार्ट वर 3.5एमएम जॅक पण दिसत आहे. आशा आहे कि या जॅकच्या बाजूला यूएसबी टाईप-सी पोर्ट पण देण्यात येईल. या फोनच्या ब्लू, ब्लॅक आणि वाईट कलर वेरिएंटचा खुलासा आला आहे.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A71 5G बाबत बोलले जात आहे कि हा डिवाईस सॅमसंगच्या एक्सनॉस 980 चिपसेट वर लॉन्च केला जाईल ज्यात 5जी मॉडेम इंटिग्रेटेड असेल. गीकबेंच वर गॅलेक्सी ए71 5जी 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. Galaxy A71 5G गीकबेंच वर एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह लिस्ट केला गेला होता तसेच फोन मध्ये 1.79गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर मिळणार असल्याचे समोर आले होते. लीकनुसार या फोन मध्ये 4370एमएएच ची बॅटरी दिली जाईल जो 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लीकनुसार Samsung Galaxy A71 5G च्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 64 मेगापिक्सलचा मिळेल. त्याचबरोबर फोन मध्ये 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी गॅलेक्सी ए71 5जी मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. लीकनुसार Samsung Galaxy A71 5G ची किंमत 35,000 रुपयांच्या आसपास असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here