पावरफुल फोन Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

पुन्हा एकदा Samsung Galaxy A51 भारतात स्वस्त झाला आहे. यावेळी ‘A’ सीरीजच्या गॅलेक्सी ए51 सह कंपनीने गॅलेक्सी ए71 च्या किंमतीत पण कपात केली आहे. हे फोन्स कमी किंमतीत ऑफलाइन स्टोर्स वरून विकत घेता येतील. 91मोबाईल्सला ऑफलाइन स्टोर्स द्वारे मिळालेल्या माहितीनुसार गॅलेक्सी ए51 च्या दोन्ही वेरिएंटची किंमत कमी करण्यात आली आहे. तसेच कंपनीने याबाबत पुष्टी केली आहे.

नवीन किंमत

सर्वप्रथम सॅमसंग गॅलेक्सी ए51 बद्दल बोलायचे झाले तर याचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट आता ऑफलाइन 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच ग्राहक या फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज ऑप्शन 22499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतील. याआधी हा फोन क्रमश: 23,999 व 25,999 रुपयांमध्ये विकला जात होता.

हे देखील वाचा : POCO ने दिला नवीन वर्षाची भेट, 7 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 4000 रुपयांपर्यंत झाली किंमत कमी

गॅलेक्सी ए71 पहा हा फक्त 8GB रॅम आणि 128GB मेमरी सह येतो. हा डिवाइस आता ऑफलाइन स्टोर्स वर 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन आधी ऑफलाइन 30,999 रुपयांमध्ये विकला केला जात होता.

स्कीम काय आहे

कंपनी हे दोन्ही फोन काही काळ स्वस्तात विकत आहे. या डिस्काउंट स्कीमची सुरवात आज म्हणजे 7 जानेवारी 2020 पासून झाली आहे जी 31 जानेवारी 2020 पर्यंत सुरु राहील. पण आमच्या सोर्सनुसार फोन पुढे पण कमी किंमतीत विकला केला जाऊ शकतो. आतापर्यंत कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

हे देखील वाचा : दमदार फीचर्ससह लॉन्च झाला Realme V15 5G, किंमत 20 हजारांपेक्षा पण कमी

याआधी सॅमसंगने ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या Samsung Galaxy M01 तसेच Galaxy M01s च्या किंमतीत 500 रुपयांची कपात केली आहे. Samsung Galaxy M01 आतापर्यंत 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येत होता पण किंमतीत कपात केल्यानंतर या फोनची किंमत फक्त 7,499 रुपये झाली आहे. Samsung Galaxy M01s बाजारात 9,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता परंतु प्राइस कट नंतर किंमत कमी होऊन 8,999 रुपये झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here