Samsung Galaxy F62 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 23 Jan 2023 06:05:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000 रुपयांनी स्वस्त झाला 7,000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy F62 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-rs-6000-discount-on-flipkart-till-7-may-effective-price-17999/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-rs-6000-discount-on-flipkart-till-7-may-effective-price-17999/#respond Tue, 04 May 2021 12:22:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10807 फेब्रुवारीमध्ये लॉन्च झालेल्या 7,000एमएएच बॅटरी आणि 64एमपी कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Samsung Galaxy F62 स्पेशल सेलअंतगर्त विकला जात आहे जिथे फोनवर थेट 6,000 रुपयांची सूट मिळत आहे.

The post 6,000 रुपयांनी स्वस्त झाला 7,000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy F62 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोना काळात कमी किंमतीत एखादा चांगले स्पेसिफिकेशन्स असलेला स्मार्टफोन मिळवण्याचा लोक प्रयत्न करत आहेत. नवीन फोन पण घेता यावा आणि पैसे पण वाचावे. अश्याच लोकांसाठी शॉपिंग साइट फ्लिपकार्टने शानदार ऑफर सादर केली आहे. फेब्रुवारीमध्ये लॉन्च झालेल्या 7,000एमएएच बॅटरी आणि 64एमपी कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Samsung Galaxy F62 स्पेशल सेलअंतगर्त विकला जात आहे जिथे फोनवर थेट 6,000 रुपयांची सूट मिळत आहे. (Samsung Galaxy F62 Rs 6,000 discount on Flipkart till 7 may effective price 17999)

Samsung Galaxy F62 फ्लिपकार्टवर 6,000 रुपयांच्या दमदार डिस्काउंट ऑफरसह विकत घेता येईल. या स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 23,999 रुपये आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 25,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. पण आता ऑफरअंतगर्त गॅलेक्सी एफ62 फोनचा 6 जीबी रॅम वेरिएंट फक्त 17,999 रुपये आणि 8 जीबी रॅम वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. म्हणजे दोन्ही वेरिएंट्सवर थेट 6,000 रुपयांची सूट हि जबरदस्त ऑफर फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलअंतगर्त उपलब्ध आहे जो येत्या 7 मे पर्यंत सुरु राहील.

Samsung Galaxy F62

सॅमसंग गॅलेक्सी एफ62 मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ सुपरएमोलेड प्लस इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 16एम कलर्स, 420 Nits ची पीक ब्राइटनेस आणि 1000000 च्या कॉन्ट्रास्ट रेश्योला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 आणि वन युआय 3.1ला सपोर्टसह येतो. ज्यात प्रोसेसिंगसाठी सॅमसंगचा एक्सनॉस 9825 चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे जो फास्ट व स्मूद प्रोसेसिंग देतो. तसेच फोनमध्ये युजर्सना AltZLife फीचर पण मिळतो जो स्मार्टफोनची गोपनीयता वाढवतो.

हे देखील वाचा : Samsung Galaxy Z Fold3 मध्ये असू शकतो अंडर डिस्प्ले कॅमेरा, S Pen आणि नवीन कॅमेरा डिजाइन

Samsung Galaxy F62 ची बॅटरी कपॅसिटी

फोटोग्राफीसाठी फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 64MP सोनी आईएमएक्स 682 प्राइमरी सेंसर आहे. तसेच गॅलेक्सी F62 वर 12MP अल्ट्रा-वाइड लेंस आहे जी 123-डिग्री व्यू कॅप्चर करते. फोनमध्ये 5MP मॅक्रो लेंस क्लोज-अप शॉट्स कॅप्चर करण्यासाठी मिळेल. गॅलेक्सी F62 च्या 5MP डेप्थ सेंसर लेंसमध्ये लाइव फोकससह अद्भुत पोर्ट्रेट शॉट घेता येतील. तसेच फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी F62 चा 32MP फ्रंट कॅमेरा 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि स्लो-मो सेल्फीला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy F62 यूएसपी फ्लॅगशिप प्रोसेसर सोबतच पावरफुल 7000mAh ची बॅटरी पण आहे. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच फोनमध्ये इन-बॉक्स टाइप C 25W सुपरफास्ट चार्जर मिळतो जो स्मार्टफोनची 7000mAh ची बॅटरी 2 तासांपेक्षा कमी काळात चार्ज करतो. गॅलेक्सी एफ 62 मध्ये रिवर्स चार्जिंग पण देण्यात आली आहे जी अजून कोणताही फोन चार्ज करू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी एफ62 व्हिडीओ

The post 6,000 रुपयांनी स्वस्त झाला 7,000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy F62 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-rs-6000-discount-on-flipkart-till-7-may-effective-price-17999/feed/ 0
Samsung Galaxy F62 स्मार्टफोनवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या कशी होईल 10,000 रुपयांची बचत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-price-in-india-discounted-first-time-benefits-up-to-rs-10000/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-price-in-india-discounted-first-time-benefits-up-to-rs-10000/#respond Mon, 12 Apr 2021 12:31:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10565 Samsung Galaxy F62 स्मार्टफोनवर मिळत असलेल्या 2000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन 6GB RAM वेरिएंट 21,999 रुपये आणि 8GB RAM वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Samsung Galaxy F62 स्मार्टफोनवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या कशी होईल 10,000 रुपयांची बचत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने भारतात Galaxy F62 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. हा स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये लॉन्च केला गेला होता. लॉन्चनंतर पहिल्यांदाच ऑफलाइन मार्केटमध्ये या स्मार्टफोनवर 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. 91mobiles च्या ऑफलाइन रिटेल सोर्सनुसार या स्मार्टफोनवर प्रथमच 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटसह आता Samsung Galaxy F62 स्मार्टफोन भारतात 21,999 रुपयांची बेस किंमतीत विकत घेता येईल. याआधी कंपनीने हा फोन 23,999 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला होता. (Samsung Galaxy F62 price in India discounted first time benefits up to RS 10000)

Samsung Galaxy F62 स्मार्टफोनवर हा डिस्काउंट ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर सुरु असलेल्या Flipkart Flagship Fest sale वर पण मिळत आहे. फ्लिपकार्टवर हा सेल 15 एप्रिल पर्यंत सुरु राहील. Samsung चा स्मार्टफोन 7,000mAh बॅटरी, फ्लॅगशिप Exynos चिपसेट आणि AMOLED Plus डिस्प्लेसह सादर केला गेला आहे.

Samsung Galaxy F62 ची ऑफर काय आहे

Samsung Galaxy F62 स्मार्टफोनवर मिळत असलेल्या 2000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन 6GB RAM वेरिएंट 21,999 रुपये आणि 8GB RAM वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच सॅमसंगच्या अपग्रेड प्रोग्रामअंतगर्त या स्मार्टफोनवर कंपनी 8000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे सॅमसंगच्या या स्मार्टफोनवर ग्राहकांना एकूण 10000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. या फोनवर ऑफलाइन डिस्काउंट 19 एप्रिलपर्यंत मिळेल. तसेच ऑनलाइन मार्केटमध्ये हा डिस्काउंट फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या फ्लॅगशिप फेस्ट सेल 15 एप्रिल पर्यंत सुरु राहील.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A32, A52 आणि A72 स्वस्तात विकत घेण्याची संधी, 6000 रुपयांपर्यंत मिळत आहे डिस्काउंट

Samsung Galaxy F62 स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F62 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ AMOLED Plus डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात सेल्फीसाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन कंपनीच्या फ्लॅगशिप चिपसेट Exynos 9825 सह सादर केला गेला आहे. सॅमसंगचा हा फोन 8GB पर्यंतच्या RAM आणि 128GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. या फोनची स्टोरेज microSD कार्डच्या माध्यमातून 512GB पर्यंत वाढवता येते. Galaxy F62 मध्ये दमदार 7,000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 12,000 रुपयांनी स्वस्तात मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S21+ स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी

Samsung Galaxy F62 स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 64MP मेगापिक्सलचा आहे, ज्यात 12MP वाइड अँगल लेंस, 5MP चा डेप्थ सेंसर आणि 5MP मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी कॅमेरा सेंसर पाहता फोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 4G LTE, डुअल-बॅंड Wi-Fi, Bluetooth, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

The post Samsung Galaxy F62 स्मार्टफोनवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या कशी होईल 10,000 रुपयांची बचत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-price-in-india-discounted-first-time-benefits-up-to-rs-10000/feed/ 0
लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy F62, यात आहे 7,000एमएएच बॅटरी आणि 64MP चा जबरदस्त कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-launch-in-india-with-7000mah-battery-exynos-9825-soc-sale-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-launch-in-india-with-7000mah-battery-exynos-9825-soc-sale-flipkart/#respond Mon, 15 Feb 2021 11:44:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10028 Galaxy F62 कंपनीने दोन मेमरी वेरिएंट- 6/128GB आणि 8GB/128GB मध्ये सादर केला गेला आहे. तसेच फोन तीन कलर ऑप्शन-Laser Green, Laser Blue आणि Laser Grey मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy F62, यात आहे 7,000एमएएच बॅटरी आणि 64MP चा जबरदस्त कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आज भारतात आपली Galaxy F-सीरीज वाढवत नवीन मिड-रेंज स्मार्टफोन Galaxy F62 लॉन्च केला आहे. अनेक दिवसांपासून या फोन बद्दल बातम्या समोर येत होत्या, ज्यांच्यावर आज पूर्णविराम लागला आहे. तुम्हाला माहित असेल कि कंपनीने गेल्यावर्षी एफ-सीरीज मध्ये सर्वप्रथम गॅलेक्सी एफ41 भारतात लॉन्च केला होता. त्याचप्रमाणे गॅलेक्सी एफ62 जगात सर्वप्रथम भारतातच लाॅन्च केला गेला आहे.

लुक व डिजाइन

सर्वप्रथम सॅमसंग गॅलेक्सी एफ62 च्या लुक व डिजाइन बद्दल बोलायचे तर हा फोन कंपनीने पंच-होल डिस्प्लेवर सादर केला आहे. फ्रंट पॅनलवर तीन कडा बेजललेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. हा होल बेजल पासून थोडा दूर डिस्प्लेवर आहे. तसेच Samsung Galaxy F62 च्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे चौकोनी आकारात आहे. या सेटअपच्या खाली फ्लॅश दिसेल आहे तसेच पॅनलवर सर्वात खाली वर्टिकली Samsung लोगो आहे.

पावरफुल प्रोसेसर

Samsung Galaxy G62 मध्ये कंपनीने स्वतःचा Exynos 9825 चिपसेट दिला आहे. हा चिपसेट कंपनीच्या फ्लॅगशिप फोन Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ मध्ये देण्यात आला होता. बेस्ट-इन-क्लास AnTutu 8 452000+ स्कोरसह Samsung फ्लॅगशिप 7nm Exynos 9825 मध्ये अनेक इंडस्ट्री-फर्स्ट फीचर्स आहेत. कंपनीनुसार या प्रोससेसरच्या मदतीने Samsung Galaxy F62 एक ऑल-राउंड #FullOnSpeedy डिवाइस बनतो.

पावरफुल बॅटरी

या फोनची यूएसपी फ्लॅगशिप प्रोसेसर सोबत पावरफुल 7000mAh ची बॅटरी पण आहे. फोन मध्ये देण्यात आलेली बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच फोन मध्ये इन-बॉक्स टाइप C 25W सुपरफास्ट चार्जर मिळतो जो स्मार्टफोनची 7000mAh ची बॅटरी 2 तासांपेक्षा कमी वेळात चार्ज करतो. गॅलेक्सी एफ 62 मध्ये रिवर्स चार्जिंग पण देण्यात आली आहे जी दुसरा कोणताही फोन चार्ज करू शकते.

दमदार कॅमेरा

गॅलेक्सी एफ62 मध्ये मागे चौकोनी क्वाड-कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 64MP मेन सोनी आईएमएक्स 682 सेंसर आहे. तसेच गॅलेक्सी F62 वर 12MP अल्ट्रा-वाइड लेंस आहे जी 123-डिग्री व्यू कॅप्चर करते. त्याचबरोबर फोन मध्ये 5MP मॅक्रो लेंस क्लोज-अप शॉट्स कॅप्चर करण्यासाठी मिळेल. गॅलेक्सी F62 च्या 5MP डेप्थ सेंसर लेंस मध्ये लाइव फोकस सह अद्भुत पोर्ट्रेट शॉट घेता येतील. फोन मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी F62 चा 32MP फ्रंट कॅमेरा 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि स्लो-मो सेल्फीला पण सपोर्ट करतो.

सुंदर डिस्प्ले

गॅलेक्सी F62 मध्ये 6.7 “FHD + सुपर AMOLED प्लस इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे जो एक इमर्सिव व्यूइंग एक्सपीरियंस देतो. डिस्प्ले 16M कलर्स, 420 Nits पीक ब्राइटनेस आणि 1000000: 1 च्या कॉन्ट्रास्ट रेशिओला सपोर्ट करतो. फोन फक्त 9.5 मिमी जाड आहे आणि याचे वजन फक्त 218 ग्राम आहे.

सॉफ्टवेयर

गॅलेक्सी F62 अँड्रॉइड 11 आणि वन युआय 3.1 सपोर्टसह येतो. तसेच फोन मध्ये युजर्सना AltZLife फीचर पण मिळतो जो स्मार्टफोनची गोपनीयता वाढवतो. गॅलेक्सी एफ 62 आर्मी ग्रेड नॉक्स सिक्योरिटी असलेला पहिला गॅलेक्सी एफ सीरीजचा फोन आहे. गॅलेक्सी F62 सॅमसंग पे (NFC) ला पण सपोर्ट करेल जो तुमच्या फोनमधून UPI, वॉलेट्स, बिल पेमेंट आणि गिफ्टकार्ड तसेच NFC इनेबल्ड POS मशिन्सवर क्रेडिट आणि डेबिट कार्ड ऑफलाइन पेमेंट करेल.

किंमत आणि वेरिएंट्स

Galaxy F62 कंपनीने दोन मेमरी वेरिएंट- 6/128GB आणि 8GB/128GB मध्ये सादर केला गेला आहे. तसेच फोन तीन कलर ऑप्शन-Laser Green, Laser Blue आणि Laser Grey मध्ये लॉन्च केला गेला आहे. Galaxy F62 ची किंमत पाहता कंपनीने 6/128GB वेरिएंट 23,999 रुपये आणि 8GB/128GB वेरिएंट 25,999 रुपयांमध्ये सादर केला आहे.

सेल डेट आणि ऑफर

सॅमसंग गॅलेक्सी एफ62 Flipkart.com, Reliance Digital आणि My Jio retail स्टोर्ससह Samsung.com वर 22 फेब्रुवारीपासून दुपारी 12 वाजता विक्रीसाठी येईल. फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्रोग्राम (एफएसयूपी) चा वापर करून ग्राहक प्रोडक्टची फक्त 70% किंमत देऊन गॅलेक्सी एफ 62 विकत घेऊ शकतील आणि एकवर्षांनंतर ग्राहक एका नवीन गॅलेक्सी सीरीज स्मार्टफोन मध्ये अपग्रेड करू शकतील. त्यामुळे युजर्सना फक्त उर्वरित 30% पैसे देऊन नवीन डिवाइस विकत घेण्याचा ऑप्शन मिळेल. तसेच Reliance Digital / My Jio Store ऑफर मध्ये युजर्सना 10000 पर्यंत एकूण लाभ मिळतील.

The post लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy F62, यात आहे 7,000एमएएच बॅटरी आणि 64MP चा जबरदस्त कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-launch-in-india-with-7000mah-battery-exynos-9825-soc-sale-flipkart/feed/ 0
Samsung Galaxy M62 कंपनीच्या इंडियन साइटवर लिस्ट, लवकरच होईल भारतात लाॅन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m62-support-page-live-on-indian-website-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m62-support-page-live-on-indian-website-launch-soon/#respond Fri, 12 Feb 2021 11:12:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10017 Samsung Galaxy Tab M62 चे याहून जास्त स्पेसिफिकेशन्स तर सध्या समोर आले नाहीत पण काही दिवसांपूर्वी झालेल्या एफसीसी लिस्टिंगवरून समजले आहे कि हा फोन 7,000एमएएचच्या मोठ्या बॅटरी सह लाॅन्च केला जाईल.

The post Samsung Galaxy M62 कंपनीच्या इंडियन साइटवर लिस्ट, लवकरच होईल भारतात लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी भारतात आपल्या ‘एफ’ सीरीजचा विस्तार करत 15 फेब्रुवारीला Samsung Galaxy F62 स्मार्टफोन लाॅन्च करणार आहे. हा मोबाईल फोन 7,000एमएएच बॅटरी आणि सॅमसंग एक्सनॉस 9825 चिपसेटवर लाॅन्च केला जाईल. गॅलेक्सी एफ62 बाजारात येण्याआधी आता सॅमसंगच्या अजून एका नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एम62 ची माहिती समोर येत आहे, जो कंपनीच्या ऑफिशियल इंडियन वेबसाइटवर लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंगवरून समजले आहे कि Samsung Galaxy M62 पण लवकरच भारतात लाॅन्च होणार आहे.

Samsung Galaxy M62 चा सपोर्ट पेज कंपनीच्या ऑफिशियल इंडियन वेबसाइटवर लाईव करण्यात आला आहे. या वेबसाइटवर फोन मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे. सपोर्ट पेजवर फोनचे कोणतेही स्पेसिफिकेशन किंवा फीचर दाखवण्यात आले नाहीत पण हा पेज समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि सॅमसंग कंपनी आता लवकरच गॅलेक्सी एफ62 स्मार्टफोन पण भारतीय बाजारात लाॅन्च करणार आहे. कदाचित येत्या काही दिवसांत हा फोन टीज केला जाईल.

Samsung Galaxy M62

मागे 91मोबाईल्सने शेयर केलेल्या Samsung Galaxy Tab M62 चे फोटोज पाहता यांत फोनच्या निर्मिती दाखवण्यात आली होती. हे फोटोज इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून मिळाले आहेत. गॅलेक्सी टॅब एम62 च्या फोटोज वरून समजले आहे कि हा डिवायस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो स्क्रीनच्या वरच्या भागात मध्यभागी असेल. या इंटरनल पॅनलच्या फोटो वर M62 टायटल पण दिसत आहे.

हे देखील वाचा : amsung चा मास्टरस्ट्रोक, लाॅन्च केला कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन Samsung Galaxy A32, प्रत्येक आहे स्पेसिफिकेशन दमदार

Samsung Galaxy Tab M62 चे याहून जास्त स्पेसिफिकेशन्स तर सध्या समोर आले नाहीत पण काही दिवसांपूर्वी झालेल्या एफसीसी लिस्टिंगवरून समजले आहे कि हा फोन 7,000एमएएचच्या मोठ्या बॅटरी सह लाॅन्च केला जाईल. तसेच बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी या फोन मध्ये 25 वाॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट पण मिळेल. लिस्टिंग मध्ये फोनचा 256जीबी इंटरनल स्टोरेज असलेला वेरिएंट पण समोर आला आहे. त्यामुळे आशा आहे कि यावर्षी पहिल्या तिमाहीत सॅमसंग हा फोन सादर करेल.

बेंचमार्क लिस्टिंग

काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy Tab M62 स्मार्टफोन को चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला होता जिथे फोन SM-M625F मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला आहे. सर्वप्रथम बेंचमार्किंग स्कोर पाहता सॅमसंग गॅलेक्सी टॅब एम62 ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 786 पॉईंट्स मिळाले आहेत तर मल्टी-कोर मध्ये एम62 ला 1995 स्कोर देण्यात आला आहे. गीकबेंच लिस्टिंग मध्ये फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

हे देखील वाचा : 7,000एमएएच बॅटरीसह येत आहे पावरफुल Samsung Galaxy F62, 15 फेब्रुवारीला होईल भारतात लाॅन्च

गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी टॅब एम62 अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 वर लाॅन्च केला जाईल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 1.95गीगाहर्ट्ज बेस क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनाॅस 9825 चिपसेट मिळेल. गीकबेंच वर Samsung Galaxy Tab M62 6 जीबी रॅम सह येणार असे सांगण्यात आले आहे. पण अशी आशा आहे कि बाजारात हा फोन एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट्स मध्ये लाॅन्च होईल.

The post Samsung Galaxy M62 कंपनीच्या इंडियन साइटवर लिस्ट, लवकरच होईल भारतात लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m62-support-page-live-on-indian-website-launch-soon/feed/ 0
7,000एमएएच बॅटरीसह येत आहे पावरफुल Samsung Galaxy F62, 15 फेब्रुवारीला होईल भारतात लाॅन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-support-7000mah-battery-with-exynos-9825-soc-india-launch-on-15-february/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-support-7000mah-battery-with-exynos-9825-soc-india-launch-on-15-february/#respond Wed, 10 Feb 2021 13:06:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9984 सॅमसंगने अजूनही गॅलेक्सी एफ62 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण वेगवेगळ्या लीक्सवरून मिळवली माहिती पाहता हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेवर लॉन्च होऊ शकतो जो एमोलेड पॅनलवर बनला असेल.

The post 7,000एमएएच बॅटरीसह येत आहे पावरफुल Samsung Galaxy F62, 15 फेब्रुवारीला होईल भारतात लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने दोन दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि कंपनी येत्या 15 फेब्रुवारीला भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F62 लाॅन्च करणार आहे. गॅलेक्सी एफ सीरीज अंतगर्त लाॅन्च होणारा हा दुसरा स्मार्टफोन असेल तसेच गॅलेक्सी एफ62 जगात सर्वप्रथम भारतात लाॅन्च केला जाईल. आज फोन बाजारात येण्याआधी सॅमसंगने अशी माहिती पण दिली आहे कि Samsung Galaxy F62 7,000एमएएच बॅटरीसह लाॅन्च केला जाईल.

Samsung Galaxy F62 ची माइक्रोसाइट व प्रोडक्ट पेज सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर पण लाईव करण्यात आला आहे जिथे फोनचा लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. प्रोडक्ट पेजवर आधी जिथे सांगण्यात आले होते कि सॅमसंग गॅलेक्सी एफ62 स्मार्टफोन 7नॅनोमीटर फेब्रिकेशनवर बनलेल्या सॅमसंग एक्सनॉस 9825 चिपसेटवर रन करेल तर आज असे स्पष्ट झाले आहे कि Samsung Galaxy F62 मध्ये 7,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाईल.

लुक व डिजाईन

सॅमसंग गॅलेक्सी एफ62 पंच- होल डिस्प्ले डिजाईनवर बनवण्यात आला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीन तीन बाजूंना बेजल आहे तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच- होल देण्यात आला आहे. हा होल बेजल पासून थोडा दूर डिस्प्लेवर आहे. तर Samsung Galaxy F62 च्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे असलेल्या चौकोनी आकारात आहे. या सेटअपच्या खाली फ्लॅश आहे तसेच पॅनलवर सर्वात खाली वर्टिकली Samsung लोगो आहे. फोनच्या रियर पॅनलवरून फिंगरप्रिंट सेंसर गायब आहे.

हे देखील वाचा : लेनोवो पण घेऊन येत आहे चीनी कंपन्यांना टक्कर देण्यास नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Lenovo K13, असे असतील स्पेसिफिकेशन

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगने अजूनही गॅलेक्सी एफ62 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण वेगवेगळ्या लीक्सवरून मिळवली माहिती पाहता हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेवर लॉन्च होऊ शकतो जो एमोलेड पॅनलवर बनला असेल. फोन अँड्रॉइड 11 ओएससह सॅमसंग वन युआयवर लॉन्च केला जाऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 7एनएम एक्सनॉस 9825 चिपसेट दिला जाईल, हि माहिती सॅमसंगने दिली आहे. तसेच फोन मध्ये 8 जीबी रॅम मिळू शकतो.

Samsung Galaxy F62 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीक्सनुसार या कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 64 मेगापिक्सलचा दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा पंच-होल कॅमेरा असल्याचे लीक मध्ये सांगण्यात आले आहे. सॅमसंगच्या घोषणेनंतर स्पष्ट झाले आहे कि गॅलेक्सी एफ62 7,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करेल. Samsung Galaxy F62 स्मार्टफोन 15 फेब्रुवारीच्या दुपारी 12 वाजता भारतात लॉन्च होईल.

The post 7,000एमएएच बॅटरीसह येत आहे पावरफुल Samsung Galaxy F62, 15 फेब्रुवारीला होईल भारतात लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-support-7000mah-battery-with-exynos-9825-soc-india-launch-on-15-february/feed/ 0
7,000mAh बॅटरी असलेला Samsung चा पावरफुल फोन Galaxy F62 लवकरच होईल लॉन्च, किंमत असेल 25,000 रुपयांपेक्षा कमी! https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-rumoured-to-come-7000mah-battery-6gb-ram-price-under-rs-25000/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-rumoured-to-come-7000mah-battery-6gb-ram-price-under-rs-25000/#respond Thu, 04 Feb 2021 13:54:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9902 दुसरीकडे टेक वेबसाइट Mysmartprice वर ईशान अग्रवालने माहिती दिली आहे कि Galaxy F62 चा मॉडेल नंबर SM-E625f असेल.

The post 7,000mAh बॅटरी असलेला Samsung चा पावरफुल फोन Galaxy F62 लवकरच होईल लॉन्च, किंमत असेल 25,000 रुपयांपेक्षा कमी! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग कथितरित्या भारतीय बाजारात F-सीरीज मध्ये दुसरा स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. याआधी कंपनीने Galaxy F41 सादर केला आहे. आतापर्यंत F-सीरीजचा अपकमिंग फोन Galaxy F62 अनेक सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट केला गेला आहे, ज्यात ब्यूरो ऑफ इंडिया स्टॅंडर्ड (BIS) आणि ब्लूटूथ एसआईजीचा समावेश आहे. आशा आहे कि कंपनी लवकरच टेक मंचावर हा फोन सादर करेल. ऑफिशियल होण्याआधी फोनची किंमत आणि काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा एका नवीन रिपोर्ट मध्ये झाला आहे.

फोनची लीक प्राइस आणि फीचर्स पाहण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो कि हा स्मार्टफोन कथितरित्या Samsung India च्या सपोर्ट पेजवर पण लिस्ट केला गेला आहे. सर्वप्रथम 91मोबाईल्सने याची माहिती दिली होती कि सॅमसंगने या फोनचे प्रोडक्शन ग्रेटर नोयडाच्या फॅक्टरी मध्ये सुरु केले आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी गॅलेक्सी एफ62 ची रियल ईमेज दाखवण्यात आली होती, ज्यात सांगण्यात आले होते कि फोन मध्ये चौकोनी क्वाड रियर कॅमेरा मॉड्यूल असेल.

किंमत

टिप्सटर मुकुल शर्माने अलीकडेच ट्वीट करून माहिती दिली आहे कि Galaxy F62 स्मार्टफोन त्या प्रोसेसरसह येईल, ज्याचा गीकबेंचवर मल्टी-कोर स्कोर 2401 आहे. मुकुल शर्माने असा पण दावा केला कि हा स्मार्टफोन मार्केटचा #FullOnSpeedy हँडसेट असेल आणि यात फ्लॅगशिपस्तरीय अनुभव दिला जाईल. भारतात याची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

हे देखील वाचा : Nokia 5.4 स्मार्टफोन 10 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, Nokia 3.4 ची पण होईल सोबत एंट्री

स्पेसिफिकेशन्स

दुसरीकडे टेक वेबसाइट Mysmartprice वर ईशान अग्रवालने माहिती दिली आहे कि Galaxy F62 चा मॉडेल नंबर SM-E625f असेल. फोन मध्ये 7,000 mAh ची मोठी बॅटरी दिली जाईल. फोन मधील फास्ट चार्जिंगबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मोठी बॅटरी व्यतिरिक्त फोन मध्ये मोठा sAMOLED डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा आकार 6.7-इंचाचा असेल.

हा फोन ग्रीन आणि ब्लू कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. फोन 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो, टिपस्टरने प्रोसेसरबाबत माहिती दिली नाही. पण, Geekbench लिस्टिंगवरून समजले आहे कि हा Exynos 9825 SoC सह येईल. दुसरीकडे अफवा अशी पण आहे कि हा फोन दुसऱ्या मार्केट मध्ये Galaxy E62 नावाने सादर केला जाऊ शकतो.

The post 7,000mAh बॅटरी असलेला Samsung चा पावरफुल फोन Galaxy F62 लवकरच होईल लॉन्च, किंमत असेल 25,000 रुपयांपेक्षा कमी! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-rumoured-to-come-7000mah-battery-6gb-ram-price-under-rs-25000/feed/ 0
Exclusive : लॉन्चच्या आधी बघा पावरफुल Samsung Galaxy F62 चा खरा फोटो, लवकरच करेल भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-f62-panel-images-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-f62-panel-images-india-launch-soon/#respond Tue, 12 Jan 2021 13:42:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9636 Samsung Galaxy F62 काही दिवसांपूर्वी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला आहे.

The post Exclusive : लॉन्चच्या आधी बघा पावरफुल Samsung Galaxy F62 चा खरा फोटो, लवकरच करेल भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्या वर्षी भारतीय बाजारात आपल्या नव्या ‘एफ सीरीज’ ची सुरवात केली होती, त्या अंतर्गत Samsung Galaxy F41 स्मार्टफोन लॉन्च केला होता. साल 2021 मध्ये सॅमसंग आपल्या या सीरीज मध्ये काही नवे आणि मोठे बदल करणार आहे आणि याची सुरवात कंपनी नव्या स्मार्टफोन Samsung Galaxy F62 पासून करेल. 91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव माहिती दिली होती की भारतातील नोएडा मधील सॅमसंग फॅक्ट्री मध्ये गॅलेक्सी एफ62 स्मार्टफोनची निर्मिती सुरू झाली आहे. तसेच आज आम्ही लॉन्चच्या आधी या स्मार्टफोनची खरी ‘पॅनल ईमेज’ पण घेऊन आलो आहोत.

Samsung Galaxy F62 ची निर्मिती कंपनीने सुरू केली आहे आणि या ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोनचे प्रोडक्शन नोएडा मध्ये होत आहे. 91मोबाईल्सला या फोनचे इन-प्रोडक्शन फोटोज मिळाले आहेत त्यात फोन मधील पॅनल दाखविण्यात आला आहे. या पॅनल वरून फोनच्या रियर कॅमेरा सेटअपच्या प्लेसमेंट सह 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप-सी सारख्या पोर्ट्स तसेच साईड बटन्सच्या प्लेसमेंटची माहिती पण मिळाली आहे.

क्वॉड रियर कॅमेर्‍यासह होईल लॉन्च

कंपनीने आतापर्यंत सॅमसंग गॅलेक्सी एम62 स्मार्टफोनच्या लॉन्च आणि याच्या स्पेसिफिकेशन्स संबंधित माहिती दिली नाही पण 91मोबाईल्सला मिळालेल्या पॅनल फोटो वरून स्पष्ट झाले आहे की हा स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करेल. फोनच्या रियर कॅमेरा सेटअप पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात दिला जाईल. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाणार नाही त्यामुळे हा पावर बटन इम्बेडेड किंवा इन-डिस्प्ले सेंसर सह येऊ शकतो.

Samsung Galaxy F62 काही दिवसांपूर्वी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला आहे. या लिस्टिंगनुसार गॅलेक्सी एफ62 मध्ये Samsung आपला Exynos 9825 चिपसेट देईल. तसेच डिवाइस मध्ये 6GB रॅम आणि एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम दिली जाईल. Samsung Galaxy F62 च्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन बाबत सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. पण नवीन अपडेट येताच वाचकांना त्याची माहिती दिली जाईल.

The post Exclusive : लॉन्चच्या आधी बघा पावरफुल Samsung Galaxy F62 चा खरा फोटो, लवकरच करेल भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-f62-panel-images-india-launch-soon/feed/ 0
Exclusive: सॅमसंग पुन्हा घेऊन येत आहे का Galaxy E सीरीजचे फोन, स्टाइल सह असेल दमदार प्रोसेसर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-e62-rear-panel-images-triple-camera-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-e62-rear-panel-images-triple-camera-exclusive/#respond Wed, 09 Dec 2020 12:22:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9230 Geekbench लिस्टिंग नुसार गॅलेक्सी एफ62 मध्ये Samsung आपला Exynos 9825 चिपसेट देईल.

The post Exclusive: सॅमसंग पुन्हा घेऊन येत आहे का Galaxy E सीरीजचे फोन, स्टाइल सह असेल दमदार प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91mobiles ने टेक विश्वात सर्वप्रथम माहिती दिली होती कि कंपनी Samsung Galaxy F62 वर काम करत आहे, ज्याचा मॉडेल नंबर SM-E625F असेल. तसेच सॅमसंगच्या ग्रेटर नोयडा मधील फॅक्ट्री मध्ये फोनचे प्रोडक्शन पण सुरु झाले आहे. आता आम्हाला या फोनच्या रियर पॅनल आणि सिम ट्रेची ईमेज मिळाली आहेत, ज्यावरून डिजाइनची माहिती मिळाली आहे. समोर आलेल्या फोटोज पैकी एक ईमेज मध्ये SM-E62 मॉडेल नंबर लिहिण्यात आला आहे जो कि सॅमसंग गॅलेक्सी एफ62 असल्याचे बोलले जात आहे. पण आमच्या सोर्सने माहिती दिली आहे कि हा फोन Samsung Galaxy E62 नावाने सादर केला जाईल. जर असे झाले तर कंपनी पुन्हा एकदा मार्केट मध्ये आपल्या Galaxy E सीरीज सह कमबॅक करेल.

फोटोजनुसार Samsung Galaxy F62/E62 चा बॅक ग्लोसी फिनिश आणि चौकोनी आकाराच्या कॅमेरा मॉड्यूल सह येईल. कॅमेरा मॉड्यूल फोनच्या मागे टॉप लेफ्ट कॉनर्र वर असले. तसेच या सेटअप मध्ये ट्रिपल कॅमेरा लेंस असेल. फोटोज मध्ये मागे कोणताही फिंगरप्रिंट सेंसर दिसत नाही, त्यामुळे आशा व्यक्त केली जात आहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले सेंसर असेल. Galaxy F62/E62 च्या लाइव इमेज वरून समोर आले आहे कि फोन SIM कार्डला सपोर्ट सह येईल. तसेच असे वाटत आहे कि फोन polycarbonate चा असेल, ज्याला कंपनीने ‘glasstic’ असे नाव दिले आहे.

Geekbench लिस्टिंग नुसार गॅलेक्सी एफ62 मध्ये Samsung आपला Exynos 9825 चिपसेट देईल. तसेच, डिवाइस मध्ये 6GB रॅम आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम दिली जाईल. Samsung Galaxy F62 च्या डिजाइन बद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, येत्या काळात फोनची अजून माहिती मिळू शकते.

हे देखील वाचा : लॉन्चच्या आधी जाणून घ्या Nokia 5.4 चे फुल स्पेसिफिकेशन्स

Samsung ने काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात केली आहे. हि सीरीज ‘गॅलेक्सी एफ’ नावाने सादर केली गेली आहे जी जगात सर्वात आधी सर्वप्रथम भारतात सादर केली गेली होती. या सीरीजचा पहिला फोन Samsung Galaxy F41 होता.

The post Exclusive: सॅमसंग पुन्हा घेऊन येत आहे का Galaxy E सीरीजचे फोन, स्टाइल सह असेल दमदार प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-e62-rear-panel-images-triple-camera-exclusive/feed/ 0
Exclusive: भारतात सुरु झाले Samsung च्या सर्वात स्लिम फोन Galaxy F62 चे प्रोडक्शन, लवकरच करेल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-start-slimmest-phone-galaxy-f62-production-in-india-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-start-slimmest-phone-galaxy-f62-production-in-india-exclusive/#respond Tue, 08 Dec 2020 14:18:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9227 Geekbench लिस्टिंग नुसार गॅलेक्सी एफ62 मध्ये Samsung आपला Exynos 9825 चिपसेट देईल.

The post Exclusive: भारतात सुरु झाले Samsung च्या सर्वात स्लिम फोन Galaxy F62 चे प्रोडक्शन, लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91mobiles ने काही दिवसांपूर्वीच एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि सॅमसंगने आपल्या F-सीरीजच्या नवीन फोन Galaxy F62 वर काम करायला सुरवात केली आहे, ज्याचा मॉडेल नंबर SM-E625F असेल. आशा आहे कि फोन भारतात 2021 च्या पहिल्या तिमाहीत सादर केला जाईल. अलीकडेच SM-E625F मॉडेल नंबर असलेल्या फोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर स्पॉट केला गेला आहे. आता आम्हाला सूत्रांकडून बातमी मिळाली आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एफ62 चे प्रोडक्शन भारतात सुरु झाले आहे. कंपनीने आपल्या ग्रेटर नोयडाच्या फॅक्ट्री मध्ये या फोनचे प्रोडक्शन सुरु केले आहे. इतकेच नव्हे तर आमच्या सूत्रांनी आम्हाला माहिती दिली आहे कि हा फोन कंपनीचा सर्वात स्लिम फोन असेल.

Geekbench लिस्टिंग नुसार गॅलेक्सी एफ62 मध्ये Samsung आपला Exynos 9825 चिपसेट देईल. तसेच, डिवाइस मध्ये 6GB रॅम आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम दिली जाईल. Samsung Galaxy F62 च्या डिजाइन बद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, येत्या काळात फोनची अजून माहिती मिळू शकते.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M12 झाला वेबसाइट वर लिस्ट, लवकरच धमाका करण्यास येत आहे हा फोन

Samsung ने काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात केली आहे. हि सीरीज ‘गॅलेक्सी एफ’ नावाने सादर केली गेली आहे जी जगात सर्वात आधी सर्वप्रथम भारतात सादर केली गेली होती. या सीरीजचा पहिला फोन Samsung Galaxy F41 होता.

Samsung Galaxy F41

सॅमसंग गॅलेक्सी एफ41 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला होता जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंग एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F41 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 123डिग्री फिल्ड आफ व्यू क्षमता असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Exclusive: भारतात सुरु झाले Samsung च्या सर्वात स्लिम फोन Galaxy F62 चे प्रोडक्शन, लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-start-slimmest-phone-galaxy-f62-production-in-india-exclusive/feed/ 0
6GB रॅम आणि Exynos 9825 SoC सह Samsung Galaxy F62 झाला साइट वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-specs-appear-on-geekbench-exynos-9825-soc-6gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-specs-appear-on-geekbench-exynos-9825-soc-6gb-ram/#respond Mon, 07 Dec 2020 13:54:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9198 Geekbench लिस्टिंग नुसार गॅलेक्सी एफ62 मध्ये Samsung आपला Exynos 9825 चिपसेट देईल.

The post 6GB रॅम आणि Exynos 9825 SoC सह Samsung Galaxy F62 झाला साइट वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91mobiles ने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि सॅमसंगने आपल्या F-सीरीजच्या नवीन फोन Galaxy F62 वर काम करत आहे, ज्याचा मॉडेल नंबर SM-E625F असेल. आशा आहे कि फोन भारतात 2021 च्या पहिल्या क्वार्टर मध्ये सादर केला जाईल. तसेच, SM-E625F मॉडेल नंबर असलेला फोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर स्पॉट केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये Samsung Galaxy F62 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण समोर आली आहे. तसेच लिस्टिंग मध्ये हँडसेट सिंगल कोर मध्ये 763 प्वाइंट व मल्टी-कोर मध्ये 1952 प्वाइंट मिळाले आहेत. चला जाणून घेऊया फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल वेबसाइट वर अजून कोणती माहिती समोर आली आहे.

Geekbench लिस्टिंग नुसार गॅलेक्सी एफ62 मध्ये Samsung आपला Exynos 9825 चिपसेट देईल. तसेच, डिवाइस मध्ये 6GB रॅम आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम दिली जाईल. Samsung Galaxy F62 च्या डिजाइन बद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, येत्या काळात फोनची अजून माहिती मिळू शकते.

हे देखील वाचा : LG K42 आणि LG K52 लवकरच भारतात करतील एंट्री, लीक झाली महत्वाची माहिती

Samsung ने काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात केली आहे. हि सीरीज ‘गॅलेक्सी एफ’ नावाने सादर केली गेली आहे जी जगात सर्वात आधी सर्वप्रथम भारतात सादर केली गेली होती. या सीरीजचा पहिला फोन Samsung Galaxy F41 होता.

Samsung Galaxy F41

सॅमसंग गॅलेक्सी एफ41 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला होता जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंग एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा : 8जीबी रॅम आणि 6 कॅमेरा असलेल्या OPPO F17 Pro ची किंमत झाली खूप कमी, जाणून घ्या नवीन किंमत

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F41 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 123डिग्री फिल्ड आफ व्यू क्षमता असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 6GB रॅम आणि Exynos 9825 SoC सह Samsung Galaxy F62 झाला साइट वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-specs-appear-on-geekbench-exynos-9825-soc-6gb-ram/feed/ 0