Samsung Galaxy M62 कंपनीच्या इंडियन साइटवर लिस्ट, लवकरच होईल भारतात लाॅन्च

Samsung अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी भारतात आपल्या ‘एफ’ सीरीजचा विस्तार करत 15 फेब्रुवारीला Samsung Galaxy F62 स्मार्टफोन लाॅन्च करणार आहे. हा मोबाईल फोन 7,000एमएएच बॅटरी आणि सॅमसंग एक्सनॉस 9825 चिपसेटवर लाॅन्च केला जाईल. गॅलेक्सी एफ62 बाजारात येण्याआधी आता सॅमसंगच्या अजून एका नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एम62 ची माहिती समोर येत आहे, जो कंपनीच्या ऑफिशियल इंडियन वेबसाइटवर लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंगवरून समजले आहे कि Samsung Galaxy M62 पण लवकरच भारतात लाॅन्च होणार आहे.

Samsung Galaxy M62 चा सपोर्ट पेज कंपनीच्या ऑफिशियल इंडियन वेबसाइटवर लाईव करण्यात आला आहे. या वेबसाइटवर फोन मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे. सपोर्ट पेजवर फोनचे कोणतेही स्पेसिफिकेशन किंवा फीचर दाखवण्यात आले नाहीत पण हा पेज समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि सॅमसंग कंपनी आता लवकरच गॅलेक्सी एफ62 स्मार्टफोन पण भारतीय बाजारात लाॅन्च करणार आहे. कदाचित येत्या काही दिवसांत हा फोन टीज केला जाईल.

Samsung Galaxy M62

मागे 91मोबाईल्सने शेयर केलेल्या Samsung Galaxy Tab M62 चे फोटोज पाहता यांत फोनच्या निर्मिती दाखवण्यात आली होती. हे फोटोज इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून मिळाले आहेत. गॅलेक्सी टॅब एम62 च्या फोटोज वरून समजले आहे कि हा डिवायस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो स्क्रीनच्या वरच्या भागात मध्यभागी असेल. या इंटरनल पॅनलच्या फोटो वर M62 टायटल पण दिसत आहे.

हे देखील वाचा : amsung चा मास्टरस्ट्रोक, लाॅन्च केला कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन Samsung Galaxy A32, प्रत्येक आहे स्पेसिफिकेशन दमदार

Samsung Galaxy Tab M62 चे याहून जास्त स्पेसिफिकेशन्स तर सध्या समोर आले नाहीत पण काही दिवसांपूर्वी झालेल्या एफसीसी लिस्टिंगवरून समजले आहे कि हा फोन 7,000एमएएचच्या मोठ्या बॅटरी सह लाॅन्च केला जाईल. तसेच बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी या फोन मध्ये 25 वाॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट पण मिळेल. लिस्टिंग मध्ये फोनचा 256जीबी इंटरनल स्टोरेज असलेला वेरिएंट पण समोर आला आहे. त्यामुळे आशा आहे कि यावर्षी पहिल्या तिमाहीत सॅमसंग हा फोन सादर करेल.

बेंचमार्क लिस्टिंग

काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy Tab M62 स्मार्टफोन को चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला होता जिथे फोन SM-M625F मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला आहे. सर्वप्रथम बेंचमार्किंग स्कोर पाहता सॅमसंग गॅलेक्सी टॅब एम62 ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 786 पॉईंट्स मिळाले आहेत तर मल्टी-कोर मध्ये एम62 ला 1995 स्कोर देण्यात आला आहे. गीकबेंच लिस्टिंग मध्ये फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

हे देखील वाचा : 7,000एमएएच बॅटरीसह येत आहे पावरफुल Samsung Galaxy F62, 15 फेब्रुवारीला होईल भारतात लाॅन्च

गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी टॅब एम62 अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 वर लाॅन्च केला जाईल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 1.95गीगाहर्ट्ज बेस क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनाॅस 9825 चिपसेट मिळेल. गीकबेंच वर Samsung Galaxy Tab M62 6 जीबी रॅम सह येणार असे सांगण्यात आले आहे. पण अशी आशा आहे कि बाजारात हा फोन एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट्स मध्ये लाॅन्च होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here