7,000एमएएच बॅटरीसह येत आहे पावरफुल Samsung Galaxy F62, 15 फेब्रुवारीला होईल भारतात लाॅन्च

Samsung ने दोन दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि कंपनी येत्या 15 फेब्रुवारीला भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F62 लाॅन्च करणार आहे. गॅलेक्सी एफ सीरीज अंतगर्त लाॅन्च होणारा हा दुसरा स्मार्टफोन असेल तसेच गॅलेक्सी एफ62 जगात सर्वप्रथम भारतात लाॅन्च केला जाईल. आज फोन बाजारात येण्याआधी सॅमसंगने अशी माहिती पण दिली आहे कि Samsung Galaxy F62 7,000एमएएच बॅटरीसह लाॅन्च केला जाईल.

Samsung Galaxy F62 ची माइक्रोसाइट व प्रोडक्ट पेज सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर पण लाईव करण्यात आला आहे जिथे फोनचा लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. प्रोडक्ट पेजवर आधी जिथे सांगण्यात आले होते कि सॅमसंग गॅलेक्सी एफ62 स्मार्टफोन 7नॅनोमीटर फेब्रिकेशनवर बनलेल्या सॅमसंग एक्सनॉस 9825 चिपसेटवर रन करेल तर आज असे स्पष्ट झाले आहे कि Samsung Galaxy F62 मध्ये 7,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाईल.

लुक व डिजाईन

सॅमसंग गॅलेक्सी एफ62 पंच- होल डिस्प्ले डिजाईनवर बनवण्यात आला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीन तीन बाजूंना बेजल आहे तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच- होल देण्यात आला आहे. हा होल बेजल पासून थोडा दूर डिस्प्लेवर आहे. तर Samsung Galaxy F62 च्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे असलेल्या चौकोनी आकारात आहे. या सेटअपच्या खाली फ्लॅश आहे तसेच पॅनलवर सर्वात खाली वर्टिकली Samsung लोगो आहे. फोनच्या रियर पॅनलवरून फिंगरप्रिंट सेंसर गायब आहे.

हे देखील वाचा : लेनोवो पण घेऊन येत आहे चीनी कंपन्यांना टक्कर देण्यास नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Lenovo K13, असे असतील स्पेसिफिकेशन

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगने अजूनही गॅलेक्सी एफ62 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण वेगवेगळ्या लीक्सवरून मिळवली माहिती पाहता हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेवर लॉन्च होऊ शकतो जो एमोलेड पॅनलवर बनला असेल. फोन अँड्रॉइड 11 ओएससह सॅमसंग वन युआयवर लॉन्च केला जाऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 7एनएम एक्सनॉस 9825 चिपसेट दिला जाईल, हि माहिती सॅमसंगने दिली आहे. तसेच फोन मध्ये 8 जीबी रॅम मिळू शकतो.

Samsung Galaxy F62 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीक्सनुसार या कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 64 मेगापिक्सलचा दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा पंच-होल कॅमेरा असल्याचे लीक मध्ये सांगण्यात आले आहे. सॅमसंगच्या घोषणेनंतर स्पष्ट झाले आहे कि गॅलेक्सी एफ62 7,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करेल. Samsung Galaxy F62 स्मार्टफोन 15 फेब्रुवारीच्या दुपारी 12 वाजता भारतात लॉन्च होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here