Vivo X60 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 06 Apr 2021 15:59:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo X70 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, Snapdragon 888 चिपसेट आणि Zeiss optics सह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-x70-series-specifications-leaked-may-comes-with-snapdragon-888-chipset-expected-to-launced-in-june-2021/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x70-series-specifications-leaked-may-comes-with-snapdragon-888-chipset-expected-to-launced-in-june-2021/#respond Tue, 06 Apr 2021 15:59:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10526 Vivo X60 Pro+ स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रेजलूशन 2,376 × 1,080 पिक्सल, रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz सह सादर केला आहे.

The post Vivo X70 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, Snapdragon 888 चिपसेट आणि Zeiss optics सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने भारतात अलीकडेच Vivo X60 सीरीजचे तीन स्मार्टफोन Vivo X60, Vivo X60 Pro, आणि Vivo X60 Pro+ लॉन्च केले आहेत. आता कंपनी Vivo X70 सीरीजवर काम करत आहे. चायनीज सोशल मीडिया साइट Weibo वर एका टिपस्टरने सांगितले आहे कि Vivo X70 सीरीजमध्ये 1/1.28-इंचापेक्षा मोठा कॅमेरा सेंसर, 4,500mAh बॅटरी, Zeiss ऑप्टिक्स, 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि Samsung E4 AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. Vivo X70 Pro+ स्मार्टफोनबद्दल बोलले जात आहे कि Snapdragon 888 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. टिपस्टरने या पोस्टमध्ये असा दावा केला आहे कि Vivo X70 सीरीज यावर्षी जूनमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. (Vivo X70 series specifications leaked may comes with Snapdragon 888 chipset expected to launced in June 2021)

Vivo X60 Pro+, X60 Pro, आणि X60 स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 Pro+ स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रेजलूशन 2,376 × 1,080 पिक्सल, रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz सह सादर केला आहे. वीवोचा हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 SoC सह 12GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 इंटरनल स्टोरेज सादर केला गेला होता. हा फोन Android 11 वर आधारित Funtouch OS 11.1 वर चालतो. हा फोन 4,200mAh च्या बॅटरीसह 55W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला गेला आहे. Vivo X60 Pro+ स्मार्टफोनमध्ये इन–डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi–Fi 6, Bluetooth 5.2, NFC, GPS, आणि USB Type–C पोर्ट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : IPL 2021: असे केल्यास Jio युजर बघू शकतील प्रत्येक मॅच मोफत

Vivo X60 Pro+ स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे ज्याचा प्राइमेरी कॅमेरा 50MP Samsung GN1 सेंसर आहे. तसेच 48MP Sony IMX598 सेंसर, आणि Gimbal Stabilization, 32MP पोर्टेट लेंस आणि 8MP चा पेरिस्कोप सेंसर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP चा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

Vivo X60 आणि X60 Pro दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच सेल्फी कॅमेरा सेंसरसाठी पंच होल कटआउट आणि Corning Gorilla Glass 6 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. वीवोचे दोन्ही स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 870 SoC सह 12GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर केला गेले आहेत. दोन्ही स्मार्टफोन Android 11 वर आधारित Funtouch OS 11.1 वर चालतात. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A32 वर मिळत आहे 11,000 रुपयांचा फायदा, अश्याप्रकारे घ्या लाभ

Vivo X60 आणि X60 Pro दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात प्राइमेरी कॅमेरा 48MP Sony IMX598 आहे, तसेच 13MP चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी पाहता Vivo X60 स्मार्टफोनमध्ये 4,300mAh च्या बॅटरीसह 33W फास्ट चार्ज आणि Vivo X60 Pro मध्ये 4,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Vivo X70 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, Snapdragon 888 चिपसेट आणि Zeiss optics सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x70-series-specifications-leaked-may-comes-with-snapdragon-888-chipset-expected-to-launced-in-june-2021/feed/ 0
Vivo X60 सीरीजने तोडला स्वतःचाच रेकॉर्ड, आजपासून सुरु होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-series-registers-more-than-200-percent-pre-book-first-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-series-registers-more-than-200-percent-pre-book-first-sale/#respond Fri, 02 Apr 2021 11:25:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10476 Vivo India चे ब्रँड स्ट्रॅटेजी डायरेक्टर निपुन मौर्या म्हणाले कि आम्ही खूप खुश आहोत कारण लेटेस्ट X60 सीरीजला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

The post Vivo X60 सीरीजने तोडला स्वतःचाच रेकॉर्ड, आजपासून सुरु होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने काही दिवसांपूर्वी आपली नवीन X60 फ्लॅगशिप सीरीज लॉन्च केली होती. आता कंपनीच्या या सीरीजसाठी युजर्सना शानदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 30 मार्च 2021 पर्यंत Vivo X60 सीरीज ज्यात Vivo X60, Vivo X60 Pro आणि हाई-एन्ड फीचर्स असलेल्या Vivo X60 Pro Plus चा समावेश आहे, ने गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या X50 सीरीजपेक्षा 200 टक्के जास्त प्री-बुकिंग्स मिळत आहेत. याची माहिती कंपनीने दिली आहे. प्री-बुकिंग वरून स्पष्ट झाले आहे कि ग्राहक वीवो एक्स60 विकत घेण्यासाठी किती उत्सुक आहेत. (vivo x60 series registers more than 200 percent pre book first sale)

कंपनीचे विधान

Vivo India चे ब्रँड स्ट्रॅटेजी डायरेक्टर निपुन मौर्या म्हणाले कि आम्ही खूप खुश आहोत कारण लेटेस्ट X60 सीरीजला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हाच पुरावा आहे कि आम्ही आमच्या युजरसाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रोडक्ट सादर करत आहोत. प्रीमियम डिजाइन, अपग्रेडेड गिंबल कॅमेरा सेटअप आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉनच्या 800 सीरीजच्या चिपसेटसह Vivo X60 सीरीज युजर्सच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे.

यादिवशी होईल सेल

अजूनतरी ग्राहकांसाठी अधिकृतपणे डिवाइस उपलब्ध झाला नाही. वीवो इंडियाचे ई-स्टोर, Amazon.in, Flipkart आणि इतर प्रमुख ई-कॉमर्स वेबसाईट्सवर 2 एप्रिल 2021 पासून सुरु होणाऱ्या सेलमध्ये वीवो एक्स60 सीरीज विकत घेता येईल. तसेच देशभरातील Vivo च्या ऑफलाइन पार्टनर रिटेल स्टोर्सवर फोनची विक्री केली जाईल.

वीवो एक्स 60 आणि एक्स 60 प्रो मिडनाइट ब्लॅक आणि शिमर ब्लू कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होतील, तर एक्स 60 प्रो + सम्राट ब्लू कलर ऑप्शन मध्ये येईल.

संपूर्ण वीवो एक्स 60 सीरीज शक्तीशाली क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 8 श्रृंखला 5 जी चिपसेटचा वापर करते. या स्मार्टफोन्सचे प्रमुख आकर्षण इन-बिल्ट गिंबल स्टॅबिलाइजेशन आहे, ज्याचा उद्देश्य स्थिर शॉट्स क्लिक करण्यास मदत करणे आहे.

The post Vivo X60 सीरीजने तोडला स्वतःचाच रेकॉर्ड, आजपासून सुरु होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-series-registers-more-than-200-percent-pre-book-first-sale/feed/ 0
Vivo X60 Pro Plus सह वीवोने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात वेगवान प्रोसेसर आणि पावरफुल कॅमेऱ्यासह भारतात झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-officially-launched-in-india-price-snapdragon-888-soc-specs-offer-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-officially-launched-in-india-price-snapdragon-888-soc-specs-offer-sale/#respond Thu, 25 Mar 2021 12:29:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10390 Vivo X60 Pro+ कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे.

The post Vivo X60 Pro Plus सह वीवोने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात वेगवान प्रोसेसर आणि पावरफुल कॅमेऱ्यासह भारतात झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आज जगातील सर्वात मोठ्या मोबाईल बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आपली ‘एक्स60’ सीरीज सादर केली आहे. आपले शक्तिप्रदर्शन करत वीवोने एकसाथ तीन नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत ज्यात Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro Plus चा समावेश आहे. आकर्षक लुक सोबतच हि सीरीज पावरफुल स्पेसिफिकेशन्स, दमदार कॅमेरा आणि ताकदवान बॅटरीसह आली आहे. सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल वीवो एक्स60 प्रो प्लस आपल्या टाकीदेच्या जीवावर Apple व Samsung च्या फ्लॅगशिप डिवायसेज सोबतच वनप्लसच्या लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus 9 Pro ला थेट टक्कर देतो.

डिजाईन

Vivo X60 Pro+ कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. फोनचा डिस्प्ले SCHOTT Xensation® Up ने प्रोटेक्टेड आहे तसेच बॅक पॅनलसाठी Vegan leather मैटेरियलचा वापर केला आहे. हा फोन डायमेंशन 158.59×73.35×9.10एमएम आणि वजन 191ग्राम आहे

डिस्प्ले

वीवो एक्स60 प्रो प्लस कंपनीने 2376 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. हि स्क्रीन एमोलेड पॅनलवर बनली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करते. 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करणारा हा डिस्प्ले 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 398पीपीआई आणि 6000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारख्या फीचर्ससह येतो. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 92.7 टक्के आहे.

प्रोसेसिंग

Vivo X60 Pro Plus लेटेस्ट अँड्रॉइड ओएस अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटच ओएस 11.1 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टा-कोर (एक 2.842गीगाहर्ट्ज + तीन 2.419गीगाहर्ट्ज + चार 1.805गीगाहर्ट्ज) प्रोसेसेरसह 5नॅनोमीटर फेब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉमचा पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 660 जीपीयूला सपोर्ट करतो.

रॅम व स्टोरेज

Vivo X60 Pro Plus भारतात एकाच वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा हा वेरिएंट 12 जीबी पावरफुल रॅमला सपोर्ट करतो जो LPDDR4X टेक्नॉलॉजीसह काम करतो. वीवोचा हा पावरफुल स्मार्टफोन 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जो UFS 3.1 स्टोरेज टेक्नॉलॉजीसह येतो.

कॅमेरा

वीवो एक्स60 प्रो प्लस क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.57 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा GN1 सेंसर देण्यात आला आहे जो vivo OIS टेक्नॉलॉजीसह चालतो. हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सलच्या Sony IMX598 सेकंडरी सेंसरला सपोर्ट करतो जो गिंबल स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजीसह येतो.

Vivo X60 Pro+ च्या रियर पॅनलवर एफ/2.08 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/3.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी

Vivo X60 Pro Plus स्मार्टफोन पावरफुल बॅटरी सोबतच दमदार बॅटरीसाज पण येतो. कंपनीने आपला फोन 4,200एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी यात 55वॉट फ्लॅशचार्ज टेक्नोलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत फोनची बॅटरी 100 टक्के पर्यंत चार्ज करू शकते.

प्राइस व सेल

Vivo X60 Pro+ भारतात 69,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Emperor Blue कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. वीवो एक्स60 प्रो प्लसची प्री-बुकिंग आज म्हणजे 25 मार्चपासून सुरु झाली आहे आणि हा फोन येत्या 2 एप्रिलपासून विकत घेता येईल. वीवो एक्स60 प्रो प्लस कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व शॉपिंग साइट सोबतच रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Vivo X60 Pro Plus सह वीवोने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात वेगवान प्रोसेसर आणि पावरफुल कॅमेऱ्यासह भारतात झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-officially-launched-in-india-price-snapdragon-888-soc-specs-offer-sale/feed/ 0
दमदार कॅमेरा असलेले पावरफुल फोन Vivo X60 आणि Vivo X60 Pro भारतात झाले लॉन्च, OnePlus 9 ला मिळणार निश्चित आव्हान https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-and-vivo-x60-pro-launch-12gb-ram-4300mah-battery-india-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-and-vivo-x60-pro-launch-12gb-ram-4300mah-battery-india-price-sale-specification/#respond Thu, 25 Mar 2021 12:06:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10387 Vivo X60 आणि X60 Pro ची डिजाइन पण एकसारखी आहे. दोन्ही फोनच्या फ्रंटला मध्यभागी पंच होल कट-आउट देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. त्याचबरोबर दोन्ही फोनच्या कडा बेजल लेस आहेत.

The post दमदार कॅमेरा असलेले पावरफुल फोन Vivo X60 आणि Vivo X60 Pro भारतात झाले लॉन्च, OnePlus 9 ला मिळणार निश्चित आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आपल्या शानदार कॅमेरा आणि डिजाइन असलेल्या फोनसाठी प्रसिद्ध Vivo ने आज भारतीय बाजारात आपली ताकदवान सीरीज Vivo X60 सादर केली आहे. चीनमध्ये गेल्यावर्षी लॉन्च झाल्यानंतर या सीरीजच्या फोन्सची भारतात आतुरतेने वाट बघितली जात होती जी आज संपली आहे. कंपनीने वीवो एक्स60 सीरीजमध्ये Vivo X60, Vivo X60 Pro आणि हाई-अँड फीचर्ससह Vivo X60 Pro Plus पण भारतीय टेक मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. तिन्ही फोन मध्ये 5G ची ताकद आहे जी OnePlus 9 सीरीजला चांगलेच आव्हान देईल. पुढे या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला वीवो एक्स 60 आणि वीवो एक्स 60 प्रो बाबत संपूर्ण माहिती देणार आहोत. या फोन्सची माहिती देण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो कि Vivo X60 की स्पेसिफिकेशन जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. पण, बॅटरी क्षमताच्या बाबतीत दोन्ही वेगळे आहेत.

डिजाइन आहे परफेक्ट

स्पेसिफिकेशनच नाही तर Vivo X60 आणि X60 Pro ची डिजाइन पण एकसारखी आहे. दोन्ही फोनच्या फ्रंटला मध्यभागी पंच होल कट-आउट देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. त्याचबरोबर दोन्ही फोनच्या कडा बेजल लेस आहेत. फोन्सच्या बॉटमला स्पीकर ग्रिल आणि टाइप-सी पोर्ट आहे. रियर लुक पाहता यात ट्राअँगल शेपमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅशसह ऑप्टिकल लेंस आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि ऑन-ऑफ बटन आहे. फोनचा रियर आणि फ्रंट दोन्ही बाजूला गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन मिळते.

कॅमेऱ्यात आहे दम

वीवो एक्स60 सीरीजसाठी वीवो इंडियाने zeiss सह भागेदारी केली आहे. दोन्ही फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा f/1.79 लेंससह 48 मेगापिक्सलचा आहे, तसेच चार axis ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन (OIS) देण्यात आले आहे. कॅमेरा सेटअपमध्ये f/2.2 अल्ट्रा-वाइड लेंससह 13 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलची पोट्रेट लेंस पण आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी दोन्ही फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा f/2.45 लेंससह देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅम, 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेर्‍यासह लॉन्च झाला वीवोचा स्वस्त 5G फोन Vivo Y72

5G ची ताकद असलेला प्रोसेसर

दोन्ही फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 870 प्रोसेसरच्या पावरसह येतात. या प्रोसेसरची खास बाब अशी आहे कि यात 5th generation AI Engine सोबतच Hexagon Tensor Accelerator आहे. तसेच, प्रोसेसरमध्ये हेवी गेम खेळता येतील आणि हाइपर रियलिस्टिक ग्राफिक्सची मजा घेत युजर रियल टाइम परफॉर्मन्स ऑप्टिमाइज करता येईल. या प्रोसेसरमध्ये Adreno 650 जीपीयू पण आहे.

डिस्प्ले आहे सुंदर

Vivo X60 आणि X60 Pro मध्ये 6.56 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2376 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात आस्पेक्ट रेशियो 19.8:9, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि पी3 कलर गामुट सपोर्ट पण आहे. त्याचबरोबर फोनचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येतो.

पावरफुल बॅटरी आणि रॅम/स्टोरेज

वीवो एक्स 60 प्रो मध्ये तुम्हाला 4,200 एमएएचची बॅटरी मिळेल, जी 33 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह येते. तर, एक्स 60 मध्ये 4,300 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जिच्यासोबत तुम्हाला 33 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी पण मिळेल. दोन्ही फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम व 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.

ऑपरेटिंग सिस्टम आणि कनेक्टिवीट फीचर्स

दोन्ही फोन डुअल-सिम (नॅनो) वीवो एक्स60 अँड्रॉइड 11 वर आधारित OriginOS 1.0 वर चालतात. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून हँडसेटमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. यात एक्सीलरोमीटर, एम्बिएंट लाइट सेंसर, जायरोस्कोप, मैग्नेटोमीटर आणि प्रोक्सिमिटी सेंसर देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : Black Shark 4, Black Shark 4 Pro गेमिंग फोन झाला लॉन्च, यामध्ये आहे 12GB रॅम आणि 144Hz डिस्प्लेसह अनेक वैशिष्ट्ये

किंमत

किंमत पाहता कंपनीने वीवो एक्स60 दोन रॅम व दोन स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला आहे. दुसरीकडे वीवो एक्स60 प्रो सिंगल रॅम व स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. Vivo X60 च्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 37,990 रुपये व 12GB रॅम व 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 41,990 रुपये आहे. Vivo X60 Pro च्या किंमतीबद्दल बोलायचे तर याचा 12GB रॅम व 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,990 रुपये आहे.

The post दमदार कॅमेरा असलेले पावरफुल फोन Vivo X60 आणि Vivo X60 Pro भारतात झाले लॉन्च, OnePlus 9 ला मिळणार निश्चित आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-and-vivo-x60-pro-launch-12gb-ram-4300mah-battery-india-price-sale-specification/feed/ 0
भारतात येत आहे पावरफुल फीचर्स आणि सर्वात ताकदवान स्मार्टफोन Vivo X60 5G सीरीज, कंपनीने केला शिक्कामोर्तब https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-vivo-x60-pro-india-launch-confirm-with-48mp-camera-snapdragon-888/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-vivo-x60-pro-india-launch-confirm-with-48mp-camera-snapdragon-888/#respond Wed, 10 Mar 2021 10:18:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10312 Vivo X60 Pro (V2046) अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट जसे की Indonesia Telecom, EEC आणि BIS वर दिसला आहे.

The post भारतात येत आहे पावरफुल फीचर्स आणि सर्वात ताकदवान स्मार्टफोन Vivo X60 5G सीरीज, कंपनीने केला शिक्कामोर्तब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo X60 आणि Vivo X60 Pro स्मार्टफोन कंपनीने फ्लॅगशिप फोन म्हणुन चीन मध्ये लॉन्च केले होते जे 22 मार्चला ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केले जातील. Vivo X50 सीरीजचे अपग्रेडेड वर्जन म्हणुन येणारी ही सीरीजच्या इंडिया लॉन्चबद्दल आता कंपनीने सांगितले आहे. वीवो इंडियाने ट्विटरवर घोषणा केली आहे कि लवकरच भारतात Vivo X60 लॉन्च केली जाईल. पण लॉन्च डेटबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पण बोलले जात आहे की. 22 मार्चला भारतात हा सादर केला जाईल. या दोन्ही फोन्स मध्ये अनेक खास खास फीचर्स आहेत, जसे की वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो दोन्ही फोन Samsung च्या Exynos 1080 प्रोसेसर आणि E3 AMOLED डिस्प्ले सह येतात.

मिळाले अनेक सर्टिफिकेशन
या सीरीजमधील Vivo X60 Pro (V2046) अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट जसे की Indonesia Telecom, EEC आणि BIS वर दिसला आहे. तसेच आम्ही या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की वीवो एक्स 60 सीरीज मार्चच्या शेवटी भारतात लॉन्च होईल. या लाइनअप मध्ये विवो X60, X60 Pro आणि संभवतः X60 Pro + चा पण समावेश होण्याची शक्यता आहे, तसेच आम्हाला माहिती मिळाली होती की कंपनी Vivo X60 Pro + त्याच्या आसपास घेऊन येऊ शकते. त्यामुळे हा X60 + ची जागा घेऊ शकतो.

Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता, यात 6.56-इंचाचा ऐमोलेड डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले 19.8:9 आस्पेक्ट रेश्यो, HDR10+ आणि P3 कलर गेमूट आहे. फोन मध्ये 5nm Exynos 1080 SoC सह 12GB LPPRD4x रॅम + 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोन OriginOS सह अँड्रॉइड 11 वर चालतो. फोनमध्ये पवार बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगसह येते.

फोटोग्राफीसाठी Vivo X60 प्रो मध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप, ज्यात 48MP (f / 1.48) Sony IMX598 प्राइमरी सेंसर, 5x ऑप्टिकल झूमसह 8MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 60x डिजिटल झूम, 13GB 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस, आणि 50mm फोकल लेन्थसह अजून एक 13MP पोर्ट्रेट लेंस देण्यात आली आहे. हँडसेट दुसऱ्या जेनरेशनच्या माइक्रो-गिंबल ओआईएस टेक्नॉलॉजी सह येतो, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP स्नॅपर आहे.

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. फक्त वीवो एक्स60 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी आहे. याव्यतिरिक्त वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो मध्ये कोणताही फरक नाही.

The post भारतात येत आहे पावरफुल फीचर्स आणि सर्वात ताकदवान स्मार्टफोन Vivo X60 5G सीरीज, कंपनीने केला शिक्कामोर्तब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-vivo-x60-pro-india-launch-confirm-with-48mp-camera-snapdragon-888/feed/ 0
पावरफुल Vivo X60 Pro Plus वेबसाइट वर लिस्ट, येईल दमदार स्पेसिफिकेशन्स सह https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-3c-listing-launch-soon-with-12gb-ram-snapdragon-888/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-3c-listing-launch-soon-with-12gb-ram-snapdragon-888/#respond Tue, 05 Jan 2021 13:20:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9550 Vivo X60 आणि Vivo X60 Pro स्मार्टफोन सोबतच वीवोने ईशारा केला होता कि आगामी काही दिवसांत या सीरीज मध्ये अजून एक मोबाईल फोन Vivo X60 Pro Plus नावाने जोडला जाईल.

The post पावरफुल Vivo X60 Pro Plus वेबसाइट वर लिस्ट, येईल दमदार स्पेसिफिकेशन्स सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo कंपनीने गेल्या वर्षीच्या शेवटी टेक मंचावर आपली ‘एक्स60 सीरीज’ सादर केली होती. या सीरीज अंतगर्त Vivo X60 आणि Vivo X60 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले होते. हे दोन्ही स्मार्टफोन्स बाजारात आणण्यासोबतच वीवोने ईशारा केला होता कि आगामी काही दिवसांत या सीरीज मध्ये अजून एक मोबाईल फोन Vivo X60 Pro Plus नावाने जोडला जाईल. कंपनीने या फोनच्या लॉन्च डेट आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण आता हा फोन वेबसाइट वर लिस्ट झाला आहे.

Vivo X60 Pro Plus 3सी सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोनचा मॉडेल नंबर Vivo V2056A सांगण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनचे बरेचशे स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण समजले आहे कि हा डिवायस 55वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह बाजारात येईल. चर्चा अशी आहे कि वीवो एक्स60 प्रो प्लस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट सह लॉन्च होईल आणि फोन मध्ये 12 जीबी रॅम मिळेल. लवकरच फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पण समोर येतील.

Vivo X60 Pro

Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.56-इंचाचा ऐमोलेड डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले 19.8:9 आस्पेक्ट रेश्यो, HDR10+ आणि P3 कलर गेमूट आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 5nm Exynos 1080 SoC सह 12GB LPPRD4x रॅम + 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोन OriginOS सह अँड्रॉइड 11 वर चालतो. फोन मध्ये पवार बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सह येते.

फोटोग्राफीसाठी Vivo X60 प्रो मध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप, ज्यात 48MP (f / 1.48) Sony IMX598 प्राइमरी सेंसर, 5x ऑप्टिकल झूम सह 8MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 60x डिजिटल झूम, 13GB 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस, आणि 50mm फोकल लेन्थ सह अजून एक 13MP पोर्ट्रेट लेंस देण्यात आली आहे. हँडसेट दुसऱ्या जेनरेशनच्या माइक्रो-गिंबल ओआईएस टेक्नॉलॉजी सह येतो, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP स्नॅपर आहे.

हे देखील वाचा : OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन 18 जानेवारीला होईल भारतात लॉन्च, बदलून जाईल व्हिडीओग्राफीचा अंदाज

Vivo X60

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. फक्त वीवो एक्स60 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी आहे. याव्यतिरिक्त वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो मध्ये कोणताही फरक नाही. Vivo X60 चीन मध्ये तीन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. हँडसेटच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,498 (जवळपास 39,300 रुपये), 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,798 (जवळपास 42,700 रुपये) आणि 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,998 (जवळपास 45,000 रुपये) आहे. दुसरीकडे वीवो X60 प्रो फक्त एकाच वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. तसेच 12GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 4,498 (जवळपास 50,600 रुपये) आहे.

The post पावरफुल Vivo X60 Pro Plus वेबसाइट वर लिस्ट, येईल दमदार स्पेसिफिकेशन्स सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-3c-listing-launch-soon-with-12gb-ram-snapdragon-888/feed/ 0