Xiaomi Mi A2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी मी ए2 ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी आणि रेडमी नोट 6 प्रो पण झाला स्वस्त https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-permanent-price-cut-on-redmi-note-6-pro-and-xiaomi-mi-a2-smartphone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-permanent-price-cut-on-redmi-note-6-pro-and-xiaomi-mi-a2-smartphone-in-marathi/#respond Mon, 11 Mar 2019 09:31:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3813 हि कपात कायमची करण्यात आली आहे.

The post शाओमी मी ए2 ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी आणि रेडमी नोट 6 प्रो पण झाला स्वस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने यावर्षीच्या सुरवातीला आपल्या अनेक स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या होत्या, ज्यात गेल्यावर्षी लॉन्च झालेले स्मार्टफोन्स होते. यावेळी कंपनीने पुन्हा आपल्या दोन नवीन स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. जर तुम्ही पण शाओमी फॅन असाल आणि नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शाओमी मी ए2 आणि रेडमी नोट 6 प्रो विकत घेऊ शकता. या दोन्ही फोन्सच्या किंमतीत क्रमश: 2,000 व 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

मी ए2 च्या किंमतीच्या कपातीबद्दल शाओमी इंडियाचे एमडी आणि ग्लोबल वीपी मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटर हँडल वर एक ट्विट केले आहे. तर91मोबाईल्सला रेडमी नोट 6 प्रो च्या कमी झालेल्या किंमतीची माहिती रिटेल सोर्स कडून मिळाली आहे. कपातीनंतर दोन्ही डिवाइसचे 4जीबी रॅम 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. हि कपात कायमची करण्यात आली आहे.

शाओमी मी ए2
शानदार प्रोसेसर सह कंपनी ने हा एंडरॉयड वन इंटीग्रेशन सह सादर केला आहे जो दोन वर्षांपर्यंत ओएस अपडेट देतो. अन्य स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेली 5.99-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन आहे जी गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टड आहे. क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आधारित या डिवाइस मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मी ए2 मध्ये 20-मेगा​पिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे पण वाचा: वीवोने आणला वाटर ड्रॉप नॉच असलेला स्वस्त फोन, सॅमसंग गॅलेक्सी एम10 ला मिळेल चांगलीच टक्कर

शाओमी रेडमी नोट 6 प्रो
हा 19:9 आस्पेक्ट ​रेशियो वाल्या 6.26-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट आधारित या फोन मध्ये 6जीबी आणि 4जीबी रॅम देण्यात आला आहे. सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोटोग्राफी साठी एफ/1.9 अपर्चर असलेला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. तसेच सेल्फी साठी 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा ​डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी आहे.

The post शाओमी मी ए2 ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी आणि रेडमी नोट 6 प्रो पण झाला स्वस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-permanent-price-cut-on-redmi-note-6-pro-and-xiaomi-mi-a2-smartphone-in-marathi/feed/ 0
शाओमी ने 3,000 रुपयांनी कमी केली मी ए2 ची किंमत, हि आहे नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-price-cut-new-price-starts-13999-rs-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-price-cut-new-price-starts-13999-rs-in-marathi/#respond Mon, 07 Jan 2019 11:38:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3311 मी डॉट कॉम वर आता स्मार्टफोनचे दोन्ही वेरिएंट जुन्या किंमतीती विकले जात आहेत.

The post शाओमी ने 3,000 रुपयांनी कमी केली मी ए2 ची किंमत, हि आहे नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने गेल्या वर्षी भारतात आली मी ए स्मार्टफोन सीरीज वाढवत मी ए2 स्मार्टफोन लॉन्च केला होता. नवीन वर्षात आता कंपनी ने मी ए2 ची किंमत कमी केली आहे, ज्यावरून असे वाटते कि कंपनी 15—20 हजार रुपयांच्या रेंज मध्ये नवीन फोन लॉन्च करू शकते. पण याबद्दल लीक व माहिती अजून आली नाही. जर शाओमी मी ए2 बद्दल बोलायचे तर कंपनीच्या या एंडरॉयड वन स्मार्टफोनच्या दोन वेरिएंट मध्ये 3,000 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

91मोबाईल्सला मिळालेल्या माहितीनुसार मी ए2 चा 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट आता 13,999 रुपयांमध्ये सेल केला जाईल. या वेरिएंटची आधी किंमत 15,999 रुपये होती. तसेच 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंटची नवीन किंमत कपातीनंतर 15,999 रुपये झाली आहे. याआधी हा डिवाइस 18,999 रुपयांमध्ये विकला जात होता. स्मार्टफोन कमी किंमतीत ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर विकत घेता येईल. मी डॉट कॉम वर आता स्मार्टफोनचे दोन्ही वेरिएंट जुन्या किंमतीती विकले जात आहेत.

शाओमी ने आपला हा स्मार्टफोन मेटल यूनिबॉडी डिजाईन वर सादर केला आहे. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वर 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची आईपीएस फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. जी गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. शाओमीचे सर्व फोन मीयूआई वर चालतात पण मी ए2 कंपनी ने एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर केला आहे. म्हणजे यात तुम्हाला प्योर एंडरॉयड मिळेल. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो.

शाओमी मी ए2 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स486 प्राइमरी सेंसर आणि 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/1.75 अपर्चर वाले आहेत तसेच एआई पोर्टरेट मोडला सपोर्ट करतात. त्याचप्रमाणे सेल्फी साठी मी ए2 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नॉलजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी यासोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

मी ए2 स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. डुअल सिम, 4जी वोएलटीई, वाईफाई व ब्लूटूथ 5.0 हे या फोन मध्ये कनेक्टिविटी आॅप्शन्स म्हणून उपलब्ध आहेत. शाओमी मी ए2 मध्ये पावर बॅकअप साठी 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी क्विक चार्ज 4.0 सपोर्ट सह सादर करण्यात आली आहे.

The post शाओमी ने 3,000 रुपयांनी कमी केली मी ए2 ची किंमत, हि आहे नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-price-cut-new-price-starts-13999-rs-in-marathi/feed/ 0
शाओमीचा न्यू ईयर धमाका, एक साथ 10 स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती केल्या 2,000 रुपयांपर्यंत कमी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-year-offer-discount-redmi-mi-phone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-year-offer-discount-redmi-mi-phone-in-marathi/#respond Mon, 24 Dec 2018 11:42:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3205 शाओमीची हि खास ऑफर क्रिसमसच्या दिवशी म्हणजे उद्या 25 डिसेंबरपासून सुरु केली जाईल जी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी पर्यंत चालेल.

The post शाओमीचा न्यू ईयर धमाका, एक साथ 10 स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती केल्या 2,000 रुपयांपर्यंत कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी फॅन्ससाठी साल 2018 खूप खास गेले आहे. यावर्षी शाओमीने फक्त हिट स्मार्टफोन इंडियन टेक मार्केट मध्ये आणले नाहीत तर सोबतच स्मार्टटीव व अन्य प्रोडक्ट्स सह गॅजेट बाजरावर पण कब्जा केला आहे. साल 2018 संपण्यासाठी थोडेच दिवस बाकी आहेत आणि शाओमी नवीन वर्षाचे हे दिवस आपल्या फॅन्ससाठी खास बनवू इच्छित आहे. आपल्या यूजर्सना ‘न्यू ईयर’ ची भेट देत शाओमीने एक साथ आपल्या 10 स्मार्टफोन वेरिएंटच्या किंमतींवर थेट 2,000 रुपयांची सूट जाहीर केली आहे.

शाओमीच्या हिट स्मार्टफोन्स मधील एक मी ए2 थेट 2,000 रुपयांच्या डिस्काउंट वर विकत घेता येईल. शाओमी मी ए2 च्या 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वाल्या वेरिएंटच्या किंमतीवर 2,000 रुपयांची सूट देत आहे, ज्यांनंतर हा वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 14,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला मी ए2 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

तसेच शाओमी रेडमी वाय2 तसेच रेडमी नोट 5 प्रो च्या सर्व वेरिएंट्स वर 1,000 रुपयांचीसूट देत आहे. यात 12,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च झालेला रेडमी वाय2 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये तसेच 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला रेडमी वाय2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

तर रेडमी नोट 5 प्रो चा 16,999 रुपयांचा 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट तसेच 14,999 रुपयांचा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट पण 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह विकत घेता येईल.शाओमी 7,999 रुपयांच्या रेडमी 6 स्मार्टफोन वर 500 रुपयांची सूट देत आहे. या डिस्काउंट नंतर 3जीबी रॅम व 64जीबी मेमरी असलेला हा फोन 7,499 रुपयांमध्ये मिळेल. तसेच शाओमीच्या सब ब्रँड पोकोचा पहिलाच फोन पोको एफ1 आपण या न्यू ईयर ऑफर मध्ये आहे.

स्पेशल ऑफर अंतर्गत पोको एफ1 चा 6जीबी रॅम/128जीबी मेमरी व्हेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह विकत घेता येईल. तर पोको एफ1 के 8जीबी रॅम/256जीबी मेमरी सोबतच 8जीबी रॅम व 256जीबी मेमरी असलेला आरर्मड एडिशन पण 2,000 रुपयांच्या डिस्काउंट वर विकत घेता येईल.

शाओमीची हि खास ऑफर क्रिसमसच्या दिवशी म्हणजे उद्या 25 डिसेंबरपासून सुरु केली जाईल जी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी पर्यंत चालेल. शाओमीची हि ऑफर ऑनलाइन रिटेल स्टोर्स वर पण उपलब्ध असेल.

The post शाओमीचा न्यू ईयर धमाका, एक साथ 10 स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती केल्या 2,000 रुपयांपर्यंत कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-year-offer-discount-redmi-mi-phone-in-marathi/feed/ 0
शाओमी फॅन्स लक्ष द्या : उद्या पासून सुरु होत आहे ‘आई लव मी’ सेल, या शाओमी फोन वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट, 3,500 रुपयांची सूट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-i-love-mi-sale-offer-redmi-6s-redmi-y2-mi-a2-price-cut-discount-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-i-love-mi-sale-offer-redmi-6s-redmi-y2-mi-a2-price-cut-discount-in-marathi/#respond Wed, 05 Dec 2018 14:03:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3064 आपल्या फॅन्सना न्यू ईयरची भेट देत शाओमी ने ‘आई लव मी’ सेल चे आयोजन केले आहे ज्यात शाओमी स्मार्टफोन्स वर 3,500 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे.

The post शाओमी फॅन्स लक्ष द्या : उद्या पासून सुरु होत आहे ‘आई लव मी’ सेल, या शाओमी फोन वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट, 3,500 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय बाजारात साल 2018 च्या सर्वात हिट स्मार्टफोन ब्रांड्सची जेव्हा लिस्ट बनेल तेव्हा त्यात शाओमीचे नाव सर्वात वर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेगवेगळ्या बजेट मध्ये आपले स्मार्टफोन सादर करणाऱ्या शाओमी ने यावर्षी पण इंडियन बाजारात आपली घोडदौड चालू ठेवेल. शाओमीची फॅन फॉलोइंग पण भारतात खूप जास्त आहे आणि सतत वाढत आहे. आपल्या फॅन्सना न्यू ईयरची भेट देत शाओमी ने ‘आई लव मी’ सेल चे आयोजन केले आहे ज्यात शाओमी स्मार्टफोन्स वर 3,500 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे.

शाओमी ने ‘आई लव मी’ सेलची सुरवात उद्या म्हणजे 6 डिसेंबर पासून होईल. हा सेल तीन दिवसांचा असेल जो 8 डिसेंबर पर्यंत चालेल. या सेल अंतर्गत शाओमीच्या वेगवेगळे स्मार्टफोन प्राइस कट तसेच भरभक्कम डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध होतील. शाओमी ने या सेल साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया सोबत हात मिळवणी केली आहे. आई लव मी सेल अंतर्गत शाओमीच्या आॅफिशियल वेबसाइट सोबत अमेझॉन इंडिया वर पण शाओमी स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंट सह विकत घेता येतील.

शाओमी आई लव मी सेल अंतर्गत कंपनीच्या हिट स्मार्टफोन मी ए2 वर 3,500 रुपयांची सूट दिली जात आहे. शाओमी मी ए2 देशात दोन वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. फोनच्या 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. पण आई लव मी सेल अंतर्गत शाओमी आपल्या या स्मार्टफोन वर 3,500 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. म्हणजे मी ए2 चा मोठा वेरिएंट या सेल मध्ये 15,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

रेडमी वाय2 स्मार्टफोन वर शाओमी 2,000 रुपयांची सूट देत आहे. आई लव मी सेल अंतर्गत 11,999 रुपयांचा रेडमी वाय2 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपये तसेच 9,999 रुपयांचा रेडमी वाय2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट फक्त 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 2जीबी रॅम असलेला रेडमी 6ए स्मार्टफोन वर शाओमी थेट 1,000 रुपयांची सूट देत आहे.

आई लव मी सेल मध्ये 7,499 रुपयांचा रेडमी 6ए चा 32जीबी स्टोरेज वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 16जीबी मेमरी वेरिएंट पण कंपनी स्वस्तात विकत आहे. शाओमी ने आपल्या एका ट्वीट मध्ये रेडमी 6ए ची आॅफर प्राइज 5,999 सांगितली आहे. या ट्वीट वरून समजते की कंपनी रेडमी 6ए च्या 16जीबी स्टोरेज वेरीएंट वर 500 रुपयांचा डिस्काउंट देईल.

The post शाओमी फॅन्स लक्ष द्या : उद्या पासून सुरु होत आहे ‘आई लव मी’ सेल, या शाओमी फोन वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट, 3,500 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-i-love-mi-sale-offer-redmi-6s-redmi-y2-mi-a2-price-cut-discount-in-marathi/feed/ 0
शाओमीची मोठी खेळी, 6जीबी रॅम सह लॉन्च केला मी ए2 https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-launched-with-6gb-ram-128gb-storage-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-launched-with-6gb-ram-128gb-storage-feature-specifications-price-in-marathi/#respond Fri, 26 Oct 2018 13:47:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2657 कंपनी मर्यादित कालावधीसाठी हा वेरिएंट 2,000 रुपयांनी कमी म्हणजे 17,999 रुपयांमध्ये विकत आहे.

The post शाओमीची मोठी खेळी, 6जीबी रॅम सह लॉन्च केला मी ए2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय स्मार्टफोन मार्केट मधील नंबर वन कंपनी शाओमीने नुकताच आपल्या वेबसाइट वर कंपनीचा हिट स्मार्टफोन मी ए2 6जीबी रॅम सह लिस्ट केला होता. तर आज कंपनीने हा शानदार फोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे शाओमी मी ए2 चा 4जीबी रॅम वेरिएंटच आतापर्यंत देशात सेल साठी उपलब्ध होता पण आता हा स्मार्टफोन अजून दमदार करत शाओमीने मी ए2 ला 6जीबी रॅम ने अपग्रेड केले आहे.

शाओमी मी ए2 चा नवीन वेरिएंट 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. शाओमी ने मी ए2 चा नवीन वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो शाओमी आॅफिशियल वेबसाइट सोबतच अमेझॉन इंंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. कंपनी मर्यादित कालावधीसाठी हा वेरिएंट 2,000 रुपयांनी कमी म्हणजे 17,999 रुपयांमध्ये विकत आहे. तर मी ए2 चा 4जीबी रॅम वेरिएंट 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच हा वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

शाओमी ने आपला हा स्मार्टफोन मेटल यूनिबॉडी डिजाईन वर सादर केला आहे. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वर 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची आईपीएस फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. जी गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. शाओमीचे सर्व फोन मीयूआई वर चालतात पण मी ए2 कंपनी ने एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर केला आहे. म्हणजे यात तुम्हाला प्योर एंडरॉयड मिळेल. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो.

शाओमी मी ए2 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स486 प्राइमरी सेंसर आणि 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/1.75 अपर्चर वाले आहेत तसेच एआई पोर्टरेट मोडला सपोर्ट करतात. त्याचप्रमाणे सेल्फी साठी मी ए2 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नॉलजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी यासोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

मी ए2 स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. डुअल सिम, 4जी वोएलटीई, वाईफाई व ब्लूटूथ 5.0 हे या फोन मध्ये कनेक्टिविटी आॅप्शन्स म्हणून उपलब्ध आहेत. शाओमी मी ए2 मध्ये पावर बॅकअप साठी 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी क्विक चार्ज 4.0 सपोर्ट सह सादर करण्यात आली आहे.

The post शाओमीची मोठी खेळी, 6जीबी रॅम सह लॉन्च केला मी ए2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-launched-with-6gb-ram-128gb-storage-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम असलेला शाओमी मी ए2 इंडियन साइट वर झाला लिस्ट, किंमत 19,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-6hgb-mpdel-listed-on-mi-india-store-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-6hgb-mpdel-listed-on-mi-india-store-in-marathi/#respond Thu, 25 Oct 2018 11:49:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2641 6जीबी वॉल मॉडेल फक्त 4 रंगात उपलब्द आहे. यात रोज गोल्डचा आॅप्शन नाही.

The post 6जीबी रॅम असलेला शाओमी मी ए2 इंडियन साइट वर झाला लिस्ट, किंमत 19,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी ऑगस्ट मध्ये शाओमी ने मी ए2 मॉडेल भारतात सादर केला होता हा कंपनीचा दुसरा फोन आहे जो गूगलच्या एंडरॉयड वन इंटीग्रेशन सह सादर करण्यात आला आहे. लॉन्चच्या वेळी कंपनीने सांगितले होते कि हा फोन 4जीबी आणि 6जीबी रॅम वेरियंट मध्ये येईल. लॉन्चच्या वेळी फक्त 4जीबी वाला मॉडेलच सेल साठी उपलब्ध होता पण आता याचा 6जीबी रॅम वेरियंट पण शाओमी इंडिया स्टोर वर लिस्ट करण्यात आला आहे तिथे या फोनची किंमत 19,999 रुपये आहे. अजूनतरी हा फोन स्टॉक मध्ये नाही फक्त नोटिफाई मी चा ऑप्शन देण्यात आला आहे.

शाओमी मी ए2 चा 4जीबी वेरियंट ब्लॅक, ब्लू, गोल्ड, रेड आणि रोज गोल्ड सहित 5 रंगांत उपलब्ध आहे .तर 6जीबी वॉल मॉडेल फक्त 4 रंगात उपलब्द आहे. यात रोज गोल्डचा आॅप्शन नाही. रंगाव्यतिरिक्त मेमरी मध्ये पण फरक असेल. शाओमी मी ए2 च्या 6जीबी वाल्या मॉडेल मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे तर 4जीबी वाल्या मध्ये फक्त 64जीबी स्टोरेज आहे.

शाओमी मी ए2 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.99-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि पुढील दोन वर्षे फोन ला लेटेस्ट एंडरॉयड चा अपडेट मिळेल. तसेच प्रोसेसिंग साठी मी ए2 मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट देण्यात आला आहे.

शाओमी मी ए2 च्या कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 20-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन चा रियर कॅमेरा एआई पोर्टरेट मोड ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी मी ए2 मध्ये 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नोलॉजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी या सोबत फ्लॅश लाईट सपोर्ट देण्यात आला आहे.मी ए2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलजीला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 6जीबी रॅम असलेला शाओमी मी ए2 इंडियन साइट वर झाला लिस्ट, किंमत 19,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-6hgb-mpdel-listed-on-mi-india-store-in-marathi/feed/ 0
शाओमी ची भेट : आॅफलाईन स्टोर्स वर पण मिळेल मी ए2, आता फ्लॅश सेलची वाट बघावी लागणार नाही https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-available-for-sale-offline-retail-stores-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-available-for-sale-offline-retail-stores-price-features-specifications-in-marathi/#respond Wed, 29 Aug 2018 12:40:18 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1861 रिटेल स्टोर्स वर हा स्मार्टफोन 17,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

The post शाओमी ची भेट : आॅफलाईन स्टोर्स वर पण मिळेल मी ए2, आता फ्लॅश सेलची वाट बघावी लागणार नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने या महिन्याच्या सुरुवातीला भारतात आपली मी ए स्मार्टफोन सीरीज वाढवत मी ए2 स्मार्टफोन लॉन्च केला होता. शाओमी मी ए2 कंपनीचा एंडरॉयड वन स्मार्टफोन आहे जो लेटेस्ट एंडरॉयड अपडेट्स साठी नेहमीच तयार असेल. शाओमी ने मी ए2 अमेजॉन एक्सक्लूसिव म्हणून आणला होता, म्हणजे या फोनचा सेल मी डॉट कॉम व्यतिरिक्त फक्त अमेजॉन इंडिया वर होत होता. पण आता आपल्या फॅन्सना भेट देत शाओमी ने मी ए2 स्मार्टफोन आॅफलाईन बाजारात सादर केला होता. म्हणजे शाओमी मी ए2 आता आपल्या जवळच्या रिटेल स्टोर वरून विकत घेता येईल.

91मोबाईल्सला रिटेल मधील सूत्रांकडून समजले आहे की शाओमी मी ए2 स्मार्टफोन आता कपंनी कडून रिटेल स्टोर्स वर पण लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन विकत घेण्यासाठी आॅनलाईन सेल ची गरज नाही हा कोणत्याही रिटेल शॉप मधून विकत घेता येईल. शाओमी ने आपल्या आधीच्या स्मार्टफोन्स प्रमाणे मी ए2 ची किंमत पण आॅफलाईन बाजारत वेगळी ठेवली आहे. रिटेल स्टोर्स वर हा स्मार्टफोन 17,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

शाओमी ने मी ए2 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता जो 16 ऑगस्ट पासून आॅनलाईन शॉपिंग साइट वर सेल साठी लिस्ट झाला होता. आॅनलाईन बाजारा पेक्षा आॅफलाईन स्टोर्स वरून हा फोन विकत घेण्यासाठी यूजर्सना 500 रुपये जास्त द्यावे लागतील. हा फोन 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मी ए2 गोल्ड, रोज गोल्ड, लेक ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

शाओमी ने आपला हा स्मार्टफोन मेटल यूनिबॉडी डिजाईन वर सादर केला आहे. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वर 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची आईपीएस फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. जी गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. शाओमीचे सर्व फोन मीयूआई वर चालतात पण मी ए2 कंपनी ने एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर केला आहे. म्हणजे यात तुम्हाला प्योर एंडरॉयड मिळेल. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो.

शाओमी मी ए2 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स486 प्राइमरी सेंसर आणि 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/1.75 अपर्चर वाले आहेत तसेच एआई पोर्टरेट मोडला सपोर्ट करतात. त्याचप्रमाणे सेल्फी साठी मी ए2 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नॉलजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी यासोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

मी ए2 स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. डुअल सिम, 4जी वोएलटीई, वाईफाई व ब्लूटूथ 5.0 हे या फोन मध्ये कनेक्टिविटी आॅप्शन्स म्हणून उपलब्ध आहेत. शाओमी मी ए2 मध्ये पावर बॅकअप साठी 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी क्विक चार्ज 4.0 सपोर्ट सह सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाओमी लवकरच बाजारात मी ए2 चा 6जीबी रॅम वेरिएंट पण घेऊन येणार आहे.

The post शाओमी ची भेट : आॅफलाईन स्टोर्स वर पण मिळेल मी ए2, आता फ्लॅश सेलची वाट बघावी लागणार नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-available-for-sale-offline-retail-stores-price-features-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी मी ए2 झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि फुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-india-launch-design-feature-specification-price-first-impression-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-india-launch-design-feature-specification-price-first-impression-in-marathi/#respond Wed, 08 Aug 2018 13:13:57 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1634 फोनचा 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंट च्या किंमतीसाठी वाट बघावी लागेल.

The post शाओमी मी ए2 झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इतक्या दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शाओमी फॅन्स साठी कंपनी ने आज भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन मी ए2 लॉन्च केला आहे. मी ए2 लॉन्च सोबत शाओमी इंडिया ने भारतीय बाजारात आपल्या स्मार्टफोनच्या संख्येत वाढ केली आहे. शाओमी ने मी ए2 चे दोन रॅम वेरिंएट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. शाओमी मी ए2 येत्या 16 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होईल. हा फोन मी डॉट कॉम सोबतच शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वरून एक्सक्लूसिव विकत घेता येईल.

शाओमी मी ए2

डिजाईन
शाओमी ने आपला हा स्मार्टफोन मेटल यूनिबॉडी डिजाईन वर सादर केला आहे. फोन चा बॅक पॅनल थोडा कर्व्ड आहे. बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच कॅमेरा सेटअप जवळच फिंगरप्रिंट सेंसर आहे. पावर बटन आणि वाल्यूम रॉकर उजव्या पॅनल वर आहेत तसेच यूएसबी टाईप-सी पोर्ट आणि स्पीकर फोन च्या खालच्या पॅनल वर देण्यात आले आहेत.

डिस्प्ले
शाओमी ने मी ए2 स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाची आईपीएस फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. डिस्प्ले प्रोटेक्शन साठी हा गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे.

ओएस आणि प्रोसेसर
एकीकडे शाओमी चे सर्व फोन मीयूआई वर चालतात तर मी ए2 कंपनी द्वारा एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर करण्यात आला आहे. म्हणजेच यात तुम्हाला प्योर एंडरॉयड मिळेल. हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि पुढील दोन वर्ष फोन ला लेटेस्ट एंडरॉयड चा अपडेट मिळेल. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी
शाओमी मी ए2 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स486 प्राइमरी सेंसर आणि 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/1.75 अपर्चर वाले आहेत तसेच एआई पोर्टरेट मोडला सपोर्ट करतात. त्याचप्रमाणे सेल्फी साठी मी ए2 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नॉलजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी यासोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

रॅम आणि स्टोरेज
शाओमी ने भारतीय बाजारात मी ए2 दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला आहे. यात 6जीबी रॅम आणि 4जीबी रॅम आॅप्शन आहेत. 4जीबी रॅम सोबत 64जीबी मेमरी आहे तर 6जीबी रॅम वेरिएंट सोबत 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

सिक्योरिटी व कनेक्टिविटी
मी ए2 स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. डुअल सिम, 4जी वोएलटीई, वाईफाई व ब्लूटूथ 5.0 हे या फोन मध्ये कनेक्टिविटी आॅप्शन्स म्हणून उपलब्ध आहेत.

बॅटरी
शाओमी मी ए2 मध्ये पावर बॅकअप साठी 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी क्विक चार्ज 4.0 सपोर्ट सह सादर करण्यात आली आहे.

किंमत
शाओमी मी ए2 गोल्ड, रोज गोल्ड, लेक ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिंट मध्ये विकत घेता येईल. फोनचा 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंट च्या किंमतीसाठी वाट बघावी लागेल.

The post शाओमी मी ए2 झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-india-launch-design-feature-specification-price-first-impression-in-marathi/feed/ 0
8 ऑगस्टला भारतात येत आहे शाओमी मी ए2, एवढी असू शकते इंडियन प्राइस https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-india-launch-on-8th-august-feature-specifications-price-availability-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-india-launch-on-8th-august-feature-specifications-price-availability-in-marathi/#respond Wed, 25 Jul 2018 09:21:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1406 मी ए2 च्या बेसिक वेरिएंट ची किंमत भारतीय बाजारत 18,000 रुपये असू शकते.

The post 8 ऑगस्टला भारतात येत आहे शाओमी मी ए2, एवढी असू शकते इंडियन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने काल ग्लोबल मंचावरून आपले दोन नवीन स्मार्टफोन मी ए2 आणि मी ए2 लाइट अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर केले आहेत. शाओमी ने स्पेन मध्ये आयोजित एका ईवेंट च्या माध्यमातून हे फोंस अंर्तराष्ट्रीय बाजारात आणले आहेत. ग्लोबल लॉन्च होताच भारतातील शाओमी यूजर्स एकच प्रश्न विचारात आहेत की हा फोन भारतात कधी येईल. यूजर्स ची ही उत्सुकता पाहून शाओमी इंडिया हेड मनु कुमार जैन ने ग्लोबल लॉन्च नंतर काही तासांनी मी ए2 च्या इंडिया लॉन्च च्या तारखेची घोषणा केली आहे.

शाओमी इंडिया हेड मनु जैन ने आपल्या ट्वीटर हँडल वरून ट्वीट करून आॅफिशियल केले आहे की मी ए2 स्मार्टफोन येत्या 8 ऑगस्ट ला भारतात लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे शाओमी ने काल ग्लोबल मंचावर मी ए2 स्मार्टफोन दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला आहे. यात 6जीबी रॅम आणि 4जीबी रॅम आॅप्शन आहे. हा फोन 4जीबी रॅम सह 32जीबी आणि 64जीबी मेमरी सह सादर झाले आहे तर 6जीबी रॅम वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेज सोबत लॉन्च करण्यात आला आहे. भारतात कोणते वेरिएंट लॉन्च होतील हे जाणून घेण्यासाठी वाट बघावी लागेल.

शाओमी मी ए2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.99-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. एकीकडे शाओमी चे सर्व फोन फोन मीयूआई वर चालतात पण मी ए2 कंपनी द्वारा एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर करण्यात आला आहे. म्हणजे यात तुम्हाला प्योर एंडरॉयड मिळेल. हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि पुढील दोन वर्षे फोन ला लेटेस्ट एंडरॉयड चा अपडेट मिळेल. तसेच प्रोसेसिंग साठी मी ए2 मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट देण्यात आला आहे.

शाओमी मी ए2 च्या कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 20-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन चा रियर कॅमेरा एआई पोर्टरेट मोड ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी मी ए2 मध्ये 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नोलॉजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी या सोबत फ्लॅश लाईट सपोर्ट देण्यात आला आहे.

मी ए2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलजीला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता 4जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 249 यूरो, 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 279 यूरो तर 6जीबी रॅम/128 मेमरी वेरिएंट 349 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतीय करंसी नुसार या किंमती क्रमश: 20,000 रुपये, 22,500 रुपये आणि 28,100 रुपयांच्या आसपास आहेत.

भारतात शाओमी मी ए2 ला कंपनी याच किंमतीच्या आसपास लॉन्च करू शकते. मी ए2 च्या बेसिक वेरिएंट ची किंमत भारतीय बाजारत 18,000 रुपये असू शकते. पण भारतात लॉन्च होणार्‍या मी ए2 च्या वेरिएंट आणि किंमतीच्या ठोस माहितीसाठी सध्यातरी 8 ऑगस्ट ची वाट बघावी लागेल.

The post 8 ऑगस्टला भारतात येत आहे शाओमी मी ए2, एवढी असू शकते इंडियन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-india-launch-on-8th-august-feature-specifications-price-availability-in-marathi/feed/ 0
नॉच डिसप्ले, 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला शाओमी मी ए2 लाइट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-lite-launched-feature-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-lite-launched-feature-price-specifications-in-marathi/#respond Tue, 24 Jul 2018 12:20:18 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1394 स्पेन मध्ये आयोजित एक ईवेंट मधून कंपनी ने मी ए2 स्मार्टफोन सादर केला आहे त्याचबरोबर कंपनी ने अजून एक अन्य वेरिएंट मी ए2 लाइट पण ग्लोबल मंचावरून सादर केला आहे.

The post नॉच डिसप्ले, 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला शाओमी मी ए2 लाइट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने ग्लोबल मंचावरून आपले दोन शानदार डिवाईस सादर केले आहेत. स्पेन मध्ये आयोजित एक ईवेंट मधून कंपनी ने मी ए2 स्मार्टफोन सादर केला आहे त्याचबरोबर कंपनी ने अजून एक अन्य वेरिएंट मी ए2 लाइट पण ग्लोबल मंचावरून सादर केला आहे. मी ए2 लाइट शाओमी चा नॉच डिसप्ले वाला डिवाईस आहे. शाओमी मी ए2 बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. तर शाओमी मी ए2 लाइट ची संपूर्ण माहिती खाली दिली आहे :

शाओमी मी ए2 लाइट 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन मध्ये 5.84-इंचाचा फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. मी ए2 लाइट पण एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम ओरियो वर चालतो. त्याचबरोबर प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट देण्यात आला आहे.

शाओमी ने मी ए2 लाइट दोन वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. ग्लोबल मार्केट मध्ये हा फोन 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी ए2 लाइट पण डुअल रियर कॅमेरा ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी मी ए2 लाइट चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 179 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 14,400 रुपये होतात. तसेच फोन चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 229 यूरो मध्ये लॉन्च झाला आहे. ही किंमत इंडियन करंसी मध्ये 18,500 रुपयांच्या आसपास असेल. विशेष म्हणजे शाओमी ने ग्लोबल लॉन्च सोबत मी ए2 च्या इंडिया लॉन्च ची पण घोषणा केली आहे. परंतु कंपनी ने हे स्पष्ट केले आहे की मी ए2 लाइट सध्या इंडियन बाजारात येणार नाही.

The post नॉच डिसप्ले, 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला शाओमी मी ए2 लाइट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-lite-launched-feature-price-specifications-in-marathi/feed/ 0