12+20एमपी रियर, 20एमपी सेल्फी, 6जीबी रॅम आणि लेटेस्टे एंडरॉयड सह लॉन्च झाला शाओमी मी ए2

शाओमी ने आज कंपनी चा एंडरॉयड वन स्मार्टफोन मी ए2 ग्लोबल मंचावरून सादर केला आहे. शाओमी ने स्पेन मध्ये आयोजित एक ईवेंट मधून हा फोन अंर्तराष्ट्रीय बाजारात आणला आहे. ग्लोबल लॉन्च मुळे या फोन च्या इंडिया लॉन्च चा मार्ग मोकळा झाला आहे.

शाओमी मी ए2 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.99-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. एकीकडे शाओमी चे सर्व फोन फोन मीयूआई वर चालतात पण मी ए2 कंपनी द्वारा एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर करण्यात आला आहे. म्हणजे यात तुम्हाला प्योर एंडरॉयड मिळेल. हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि पुढील दोन वर्षे फोन ला लेटेस्ट एंडरॉयड चा अपडेट मिळेल.

शाओमी ने मी ए2 ला दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केल आहे. यात 6जीबी रॅम आणि 4जीबी रॅम आॅप्शन आहेत. तसेच प्रोसेसिंग साठी मी ए2 मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट देण्यात आला आहे. ग्लोबल मार्केट मध्ये हा फोन 4जीबी रॅम सोबत 32जीबी आणि 64जीबी मेमरी मध्ये उपलब्ध होईल तर 6जीबी रॅम वेरिएंट सोबत 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.

शाओमी मी ए2 च्या कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 20-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन चा रियर कॅमेरा एआई पोर्टरेट मोड ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी मी ए2 मध्ये 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नोलॉजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी या सोबत फ्लॅश लाईट सपोर्ट देण्यात आला आहे.

मी ए2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलजीला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता 4जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 249 यूरो, 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 279 यूरो तर 6जीबी रॅम/128 मेमरी वेरिएंट 349 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतीय करंसी नुसार या किंमती क्रमश: 20,000 रुपये, 22,500 रुपये आणि 28,100 रुपयांच्या आसपास आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here