Xiaomi Redmi Note 6 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 04 Feb 2020 12:43:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये घडली हि दुर्घटना https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-blast-in-gujarat-india-battery-fire-smoke/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-blast-in-gujarat-india-battery-fire-smoke/#respond Tue, 04 Feb 2020 12:43:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6499 Xiaomi Redmi Note 6 Pro मध्ये ब्लास्ट झाला आणि हि संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली.

The post Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये घडली हि दुर्घटना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जेव्हा स्मार्टफोन मध्ये आग लागण्याची एखादी घटना घडते तेव्हा आपण सावध होतो. कारण फोन आपल्या सर्वात जवळ असतो आणि यात सर्वात जास्त शारीरिक नुकसान होण्याची भीती असते. आज पुन्हा एकदा मोबाईल फोन ब्लास्टची घटना समोर आली आहे. हि बातमी गुजरात मधील जामनगर मधून आली आहे जिथे मोबाईल रिपेरिंग शॉप वर एक फोन अचानक ब्लास्ट झाला. फोन Xiaomi चा होता आणि मॉडेल होता Redmi Note 6 Pro. शाओमी फोन ब्लास्ट होण्याची घटना याआधी पण भारतात अनेकदा झाली आहे. आम्हाला जी बातमी मिळाली त्या नुसार ग्राहकाच्या फोन मध्ये काही तरी बिघाड होता आणि तो रिपेयर केला जात होता. जेव्हा फोनचा बॅक पॅनल उघडण्यात आला, तेव्हा अचानक Xiaomi Redmi Note 6 Pro मध्ये ब्लास्ट झाला आणि हि संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली.

हि बातमी सर्वात आधी खबरगुजरात ने प्रकाशित केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया वर या सीसीटीवी मध्ये कैद झालेला वीडियो टाकला आहे. त्याचबरोबर ज्या मोबाईल रिपेरिंग शॉप वर हि घटना घडली तिथल्या एका फेसबुक यूजर कुनाल सोनी याने पण आपल्या फेसबुक अकाउंट वर वीडियो अपडेट केला आहे. त्यांनी वीडियो मध्ये अशी माहिती दिली आहे कि मोबाईल टेक्निशियन किशनने जेव्हा फोन चेक करण्यासाठी तो उघडला तेव्हा बॅक पॅनल उघडल्याने फोन मध्ये धूर येऊ लागला आणि फोन ब्लास्ट झाला. फोन रिपेयरिंगचे काम ध्रुती मोबाईल द्वारे केले जात होते आणि तिथेच हि घटना घडली. फोन मध्ये आग लागताच धूर येऊ लागला आणि गोंधळ उडाला. हा फोन कोणत्या यूजरचा होता आणि यासाठी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे कि नाही याची माहिती अजूनतरी समोर आली नाही. परंतु फोन ब्लास्टच्या बातमीने लोकांना नक्कीच घाबरवले आहे.

Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग, Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये झाली दुर्घटना#RedmiNote6Pro #PhoneBlast

91mobiles मराठी यांनी वर पोस्ट केले मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

Redmi Note 6 Pro मध्ये आग लागल्याचे वीडियो मध्ये स्पष्ट दिसत आहे. बॅक पॅनल उघडताना फोन मधून धूर येऊ लागला. तेव्हा फोन टेक्निशियनच्या हातात होता. घाबरून टेक्निशियनने फोन लगेच काउंटर वर ठेवला आणि धूर वेगाने वाढू लागला. यावेळी मोबाईलचा मालक पण तिथे उभा होता. जेव्हा धूर अचानक वाढला तेव्हा टेक्निशियनने फोन खाली जमिनीवर फेकून दिला.

Kunal Soni यांनी वर पोस्ट केले सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

सुदैवाने Xiaomi Redmi Note 6 Pro टेक्निशियनच्या हातात ब्लास्ट झाला नाही आणि या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. हे प्रकरण समोर आल्यामुळे सर्विस सेंटर वरील लोक Xiaomi ब्रँड आणि त्याच्या प्रोडक्ट वर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. आतापर्यंत याबाबत कंपनीचे कोणतेही विधान आले नाही. एक मोठी दुर्घटना टळली पण आता हे बघावे लागेल कि Xiaomi या घटनेसाठी कोणाला जबाबदार ठरवते सर्विस सेंटर कि एखादी व्यक्ती कि आपल्या प्रोडक्ट्स वर सेफ्टी साठी काही खास काम करेल.

The post Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये घडली हि दुर्घटना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-blast-in-gujarat-india-battery-fire-smoke/feed/ 0
शाओमी मी ए2 ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी आणि रेडमी नोट 6 प्रो पण झाला स्वस्त https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-permanent-price-cut-on-redmi-note-6-pro-and-xiaomi-mi-a2-smartphone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-permanent-price-cut-on-redmi-note-6-pro-and-xiaomi-mi-a2-smartphone-in-marathi/#respond Mon, 11 Mar 2019 09:31:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3813 हि कपात कायमची करण्यात आली आहे.

The post शाओमी मी ए2 ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी आणि रेडमी नोट 6 प्रो पण झाला स्वस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने यावर्षीच्या सुरवातीला आपल्या अनेक स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या होत्या, ज्यात गेल्यावर्षी लॉन्च झालेले स्मार्टफोन्स होते. यावेळी कंपनीने पुन्हा आपल्या दोन नवीन स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. जर तुम्ही पण शाओमी फॅन असाल आणि नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शाओमी मी ए2 आणि रेडमी नोट 6 प्रो विकत घेऊ शकता. या दोन्ही फोन्सच्या किंमतीत क्रमश: 2,000 व 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

मी ए2 च्या किंमतीच्या कपातीबद्दल शाओमी इंडियाचे एमडी आणि ग्लोबल वीपी मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटर हँडल वर एक ट्विट केले आहे. तर91मोबाईल्सला रेडमी नोट 6 प्रो च्या कमी झालेल्या किंमतीची माहिती रिटेल सोर्स कडून मिळाली आहे. कपातीनंतर दोन्ही डिवाइसचे 4जीबी रॅम 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. हि कपात कायमची करण्यात आली आहे.

शाओमी मी ए2
शानदार प्रोसेसर सह कंपनी ने हा एंडरॉयड वन इंटीग्रेशन सह सादर केला आहे जो दोन वर्षांपर्यंत ओएस अपडेट देतो. अन्य स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेली 5.99-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन आहे जी गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टड आहे. क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आधारित या डिवाइस मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मी ए2 मध्ये 20-मेगा​पिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे पण वाचा: वीवोने आणला वाटर ड्रॉप नॉच असलेला स्वस्त फोन, सॅमसंग गॅलेक्सी एम10 ला मिळेल चांगलीच टक्कर

शाओमी रेडमी नोट 6 प्रो
हा 19:9 आस्पेक्ट ​रेशियो वाल्या 6.26-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट आधारित या फोन मध्ये 6जीबी आणि 4जीबी रॅम देण्यात आला आहे. सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोटोग्राफी साठी एफ/1.9 अपर्चर असलेला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. तसेच सेल्फी साठी 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा ​डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी आहे.

The post शाओमी मी ए2 ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी आणि रेडमी नोट 6 प्रो पण झाला स्वस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-permanent-price-cut-on-redmi-note-6-pro-and-xiaomi-mi-a2-smartphone-in-marathi/feed/ 0
2,000 रुपयांनी स्वस्त झाला शाओमी रेडमी नोट 6 प्रो, बघा कुठून आणि कसा विकत घ्यावा हा फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-rs-2000-discount-now-available-for-rs-11999-on-flipkart-month-end-mobiles-fest-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-rs-2000-discount-now-available-for-rs-11999-on-flipkart-month-end-mobiles-fest-in-marathi/#respond Wed, 27 Feb 2019 08:56:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3731 ग्राहकांनी एक्सिस बँकेच्या बज क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास त्यांना 5 टक्क्यांचा डिस्काउंट पण मिळेल.

The post 2,000 रुपयांनी स्वस्त झाला शाओमी रेडमी नोट 6 प्रो, बघा कुठून आणि कसा विकत घ्यावा हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी लवकरच भारतात रेडमी नोट7/ रेडमी नोट 7 प्रो लॉन्च करण्यासाठी तयार आहे. तसेच शाओमी ने गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये लॉन्च केलेल्या रेडमी नोट 6 प्रो वर डिस्काउंट द्यायला सुरवात केली आहे. हॅन्डसेट फ्लिपकार्ट आणि मी.कॉम वर एका स्पेशल ऑफर अंतर्गत विकला जात आहे.

या किंमतीती मिळेल
शाओमी रेडमी नोट 6 प्रो 4जीबी+64जीबी मॉडेल 12,999 रुपयांचा आहे. तर 6जीबी + 64जीबी वेरियंट 15,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण तीन दिवस डिवाइस फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या साइट वर क्रमश: 11,999 रुपये व 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

6जीबी रॅम आणि 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल 48एमपी कॅमेरा असलेला ओपो एफ11 प्रो

शाओमी ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून याची माहिती दिली आहे. ट्विट नुसार स्मार्टफोन 26 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत ‘मंथ एंड मोबाईल फेस्ट’ अंतर्गत फक्त 11,999 रुपयांमध्ये विकला जाईल. ट्वीट मधील फोटो मध्ये 4जीबी रॅम वेरिएंट दाखवण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनचा 6जीबी रॅम वेरिएंट पण या सेल मध्ये 13,999 रुपयांमध्ये मिळत आहे.

इतकेच नव्हे तर या ऑफर व्यतिरिक्त स्मार्टफोन वर 2,000 रुपयांच्या सुरवातीच्या किंमतीत नो-कॉस्ट ईएमआई चा ऑप्शन पण मिळत आहे. तसेच जुना मोबाईल एक्सचेंज केल्यास 11,950 रुपयांचा एक्सचेंज बोनस पण दिला जात आहे. इतकेच नव्हे तर ग्राहकांनी एक्सिस बँकेच्या बज क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास त्यांना 5 टक्क्यांचा डिस्काउंट पण मिळेल.

अद्भुत : आला हाताला बांधता येणारा स्मार्टफोन, फोल्डेबल फोनला पण मागे टाकेल या कंपनीने

रेडमी नोट 6 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीयूआई 9.6 आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 14एनएम कोरयो 260 सीपीयू सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

कंपनी रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह सादर केला आहे सोबत ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 509 जीपीयू आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. रेडमी नोट 6 प्रो मध्ये एआई टेक्नॉलॉजी आहे. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

The post 2,000 रुपयांनी स्वस्त झाला शाओमी रेडमी नोट 6 प्रो, बघा कुठून आणि कसा विकत घ्यावा हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-rs-2000-discount-now-available-for-rs-11999-on-flipkart-month-end-mobiles-fest-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : आता होणार नाही शाओमी रेडमी नोट 5 ची विक्री, कंपनी ने बंद केला हा हिट फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-discontinued-for-sale-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-discontinued-for-sale-in-india-in-marathi/#respond Thu, 06 Dec 2018 12:09:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3074 काही दिवसांपूर्वी शाओमी इंडिया ने रेडमी नोट 5 प्रो चा अपडेटेड वर्जन रेडमी नोट 6 प्रो भारतीय बाजारात आणला आहे तसेच रेडमी नोट 5 च्या इतर कोणत्याही मॉडेल किंवा नवीन वर्जनची माहिती अजूनतरी आली नाही.

The post एक्सक्लूसिव : आता होणार नाही शाओमी रेडमी नोट 5 ची विक्री, कंपनी ने बंद केला हा हिट फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने यावर्षी भारतात अपनी नोट सीरीज वाढवत रेडमी नोट 5 स्मार्टफोन लॉन्च​ केला होता. देशातील शाओमी चे हिट स्मार्टफोन्स पाहता रेडमी नोट 5 चे नाव या लिस्ट मध्ये सर्वात वर येते. शाओमी ने इंडिया मध्ये रेडमी नोट 5 मुळे सेलचे अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. रेडमी नोट 5 सोबतच कंपनी ने रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन पण लॉन्च केला होता. या दोन्ही स्मार्टफोन्स ने शाओमीच्या यूजर्सची सख्यां वाढवण्यात मदत केली आहे. वआता अशी बातमी येत आहे की शाओमीचा हाच हिट स्मार्टफोन रेडमी नोट 5 कंपनीने बंद केला आहे. शाओमी ने भारतात रेडमी नोट 5 च्या प्रोडक्शन सोबतच याची विक्री बंद केली आहे.

91मोबाईल्सला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे की शाओमी इंडिया ने रेडमी नोट 5 भारतात बंद केला आहे. कंपनी ने हा फोन शाओमीच्या आॅफिशियल वेबसाइट वरूनच काढून टाकला आहे त्याचबरोबर देशातील आॅफलाईन बाजारात रिटेल स्टोर्स वर पण रेडमी नोट 5 चा सेल बंद करण्यात आला आहे. ज्या रिटेल स्टोर्स वर रेडमी नोट 5 चा स्टॉक उरला होता तो संपवला जात आहे आणि शाओमी कडून रेडमी नोट 5 चा नवीन स्टॉक येत नाही आहे.

शाओमी ने रेडमी नोट 5 सोबत रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन पण लॉन्च केला होता. काही दिवसांपूर्वी शाओमी इंडिया ने रेडमी नोट 5 प्रो चा अपडेटेड वर्जन रेडमी नोट 6 प्रो भारतीय बाजारात आणला आहे तसेच रेडमी नोट 5 च्या इतर कोणत्याही मॉडेल किंवा नवीन वर्जनची माहिती अजूनतरी आली नाही. शाओमी ने रेडमी नोट 5 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता. एक वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली होती.

रेडमी नोट 5 चा 3जीबी रॅम वेरिएंट भारतात 9,999 रुपयांमध्ये विकला जात होता तर 4जीबी रॅम वेरिएंटची किंमत 11,999 रुपये होती. शाओमीच्या रेडमी नोट 5 प्रो व रेडमी नोट 6 प्रो ची किंमत पाहतात…

शाओमी रेडमी नोट 5 प्रो 4जीबी रॅम/ 64जीबी मेमरी वेरिएंट 14,999 रुपये
शाओमी रेडमी नोट 5 प्रो 6जीबी रॅम/ 64जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपये

शाओमी रेडमी नोट 6 प्रो 4जीबी रॅम/ 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये
शाओमी रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम/ 64जीबी मेमरी वेरिएंट 15,999 रुपये

The post एक्सक्लूसिव : आता होणार नाही शाओमी रेडमी नोट 5 ची विक्री, कंपनी ने बंद केला हा हिट फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-discontinued-for-sale-in-india-in-marathi/feed/ 0
शाओमीचा धमाका : रेडमी नोट 6 प्रो भारतात लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 4,000एमएएच बॅटरी आणि 4 कॅमेरा सेंसर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-india-launch-feature-specifications-price-sale-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-india-launch-feature-specifications-price-sale-in-marathi/#respond Thu, 22 Nov 2018 12:22:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2945 रेडमी नोट 6 प्रो फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव फोन आहे जो उद्यापासून या शॉ​पिंग साइट वर आपल्या पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध होईल.

The post शाओमीचा धमाका : रेडमी नोट 6 प्रो भारतात लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 4,000एमएएच बॅटरी आणि 4 कॅमेरा सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी इंडिया ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपली रेडमी 6 सीरीज वाढवत एक साथ तीन नवीन फोन रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो लॉन्च केले होते. हे तिन्ही फोन थोड्याच काळात शाओमीच्या हिट स्मार्टफोन्सच्या श्रेणीत सामील झाले आहेत तसेच शानदार स्पेसिफिकेशन्स व कमी किंमतीती मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. हे यश एक पाऊल अजून पुढे नेत शाओमी ने आज दीर्घ प्रतिक्षेनंतर आपल्या फॅन्सना भेट देत भारतात अजून एक नवीन डिवाईस रेडमी नोट 6 प्रो लॉन्च केला आहे.

रेडमी नोट 6 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीयूआई 9.6 आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 14एनएम कोरयो 260 सीपीयू सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

रेडमी नोट 6 प्रो शाओमी ने भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. एक वेरिएंट 6जीबी रॅमला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. तसेच ग्राफिक्स साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये एड्रेनो 509 जीपीयू देण्यात आला आहे.

शाओमी च्या या नवीन नोट डिवाईस मध्ये 4 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. म्हणजे या फोनच्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनेल्स वर डुअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा ​डुअल पिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रेडमी नोट 6 प्रो मध्ये एआई टेक्नॉलिजी आहे. हा फोन बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत डुअल सिम आणि 4जी वोएलटीईला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. अशाप्रकारे पावर बॅकअप साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये शाओमी ने फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी दिली आहे.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो चा 4जीबी रॅम वेरिएंट कंपनी ने 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तर फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रेडमी नोट 6 प्रो फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव फोन आहे जो उद्यापासून या शॉ​पिंग साइट वर आपल्या पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध होईल.

The post शाओमीचा धमाका : रेडमी नोट 6 प्रो भारतात लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 4,000एमएएच बॅटरी आणि 4 कॅमेरा सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-india-launch-feature-specifications-price-sale-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह 22 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-to-launch-in-india-on-22-november-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-to-launch-in-india-on-22-november-in-marathi/#respond Thu, 15 Nov 2018 13:18:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2872 हा 22 नोव्हेंबरला लॉन्च होणार फोन गेल्या महिन्यात थाईलँड मध्ये लॉन्च झालेला रेडमी 6 प्रो असू शकतो.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह 22 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी इंडिया ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपली रेडमी 6 सीरीज वाढवत एक साथ तीन नवीन फोन रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो लॉन्च केले होते. हे तिन्ही फोन थोड्याच काळात शाओमीच्या हिट स्मार्टफोन्सच्या श्रेणीत सामील झाले आहेत तसेच शानदार स्पेसिफिकेशन्स व कमी किंमतीती मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. हे यश एक पाऊल अजून पुढे नेण्याची तयारी शाओमी करत आहे. शाओमी ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 22 नोव्हेंबरला भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. शाओमीचा हा नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 6 प्रो असेल.

शाओमी इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवत सांगतिले आहे कि कंपनी 22 नोव्हेंबरला राजधानी दिल्लीत एका ईवेंटचे आयोजन करणार आहे. कंपनी ने यादिवशी कोणता फोन लॉन्च होईल हे सांगितले नाही पण हा 22 नोव्हेंबरला लॉन्च होणार फोन गेल्या महिन्यात थाईलँड मध्ये लॉन्च झालेला रेडमी 6 प्रो असू शकतो. शाओमी ने मीडिया इन्वाईट मध्ये ‘द न्यू नोट राईज‘ टॅगलाईन वापरली आहे ज्यावरून स्पष्ट होते कि कंपनीचा आगामी फोन नोट सीरीज मध्येच येईल.

शाओमी ने रेडमी नोट 6 प्रो थाईलँड मध्ये लॉन्च केला आहे तिथे फोनची किंमत 6,990 थाई भाट म्हणजे भा​रतीय करंसी नुसार जवळपास 15,599 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता रेडमी नोट 6 प्रो च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनेल्स वर डुअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा ​डुअल पिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रेडमी नोट 6 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीयूआई 9.6 आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 14एनएम कोरयो 260 सीपीयू सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

कंपनी नवे रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह सादर केला आहे सोबत ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 509 जीपीयू आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. रेडमी नोट 6 प्रो मध्ये एआई टेक्नॉलॉजी आहे. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.भारतात फोनची किंमत काय असेल तसेच हा कधी सेल साठी उपलब्ध होईल या माहितीसाठी 22 नोव्हेंबरची वाट बघावी लागेल.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह 22 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-to-launch-in-india-on-22-november-in-marathi/feed/ 0
झाला खुलासा दिवाळीच्या आधी भारतात लॉन्च होईल रेडमी नोट 6 प्रो, रेडमी नोट 5 प्रो पेक्षा पण जास्त ताकदवान https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-to-launch-in-india-before-diwali-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-to-launch-in-india-before-diwali-in-marathi/#respond Mon, 15 Oct 2018 06:46:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2490 सध्या फोनच्या किंमतीची माहिती मिळाली नाही पण आशा आहे की कंपनी हा रेडमी नोट 5 प्रो च्या प्राइस सेग्मेंट मध्येच ठेवेल.

The post झाला खुलासा दिवाळीच्या आधी भारतात लॉन्च होईल रेडमी नोट 6 प्रो, रेडमी नोट 5 प्रो पेक्षा पण जास्त ताकदवान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही आठवड्यांपूर्वी शाओमी ने रेडमी नोट 5 प्रो चा अपग्रेड वर्जन रेडमी नोट 6 प्रो अचानकपणे थाइलंड मध्ये लॉन्च केला होता. लॉन्च करणे ही काही मोठी गोष्ट नव्हती पण इतक्या प्रसिद्ध फोन गुपचुप लॉन्च केल्यामुळे चर्चा सुरू झाली. त्याचबरोबर अंदाज लावला जात आहे की लवकरच कपंनी हा भारता सहित दुसर्‍या बाजारात पण लॉन्च करणार आहे आणि आज भारतात रेडमी नोट 6 प्रो च्या लॉन्च बद्दल मोठी बातमी आली आहे.

माई स्मार्ट प्राइस ने माहिती दिली आहे की पुढील काही आठवड्यांत हा फोन लॉन्च केला जाऊ शकतो. आशा आहे की हा फोन दिवाळीच्या आधी भारतात लॉन्च होईल. त्याचबरोबर वेबसाइट ने कलर आणि मेमरी वेरियंटचा पण खुलासा केला आहे. दिलेल्या माहितीनुसार शाओमी रेडमी नोट 6 प्रो भारतात 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम + 64जीबी मेमरी सह उपलब्ध होईल. रेडमी नोट 6 प्रो मध्ये 256जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट आहे. भारतीय वर्जन मध्ये पण असेच असेल. तसेच हा फोन रोज गोल्ड, ब्लॅक आणि ब्लू व रेड या तीन रंगांत उपलब्ध होईल.

पण सध्या फोनच्या किंमतीची माहिती मिळाली नाही पण आशा आहे की कंपनी हा रेडमी नोट 5 प्रो च्या प्राइस सेग्मेंट मध्येच ठेवेल.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो चे स्पेसिफिकेशन पाहता बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल्स वर डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी 20-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल सेटअप आहे.

शाओमी रेडमी 6 प्रो मध्ये 19:9 आस्पेक्ट ​रेशियो असलेला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट आधारित या फोन मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

The post झाला खुलासा दिवाळीच्या आधी भारतात लॉन्च होईल रेडमी नोट 6 प्रो, रेडमी नोट 5 प्रो पेक्षा पण जास्त ताकदवान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-to-launch-in-india-before-diwali-in-marathi/feed/ 0
4 कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी सह शाओमी रेडमी नोट 6 प्रो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-launched-4-camera-sensor-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-launched-4-camera-sensor-feature-specifications-price-in-marathi/#respond Thu, 27 Sep 2018 14:17:15 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2293 शाओमी रेडमी नोट 6 प्रो थायलंड मध्ये ब्लॅक, ब्लू आणि रोज गोल्ड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. शाओमी ने अजूनतरी फोनच्या ग्लोबल लॉन्च ची घोषणा केलेली नाही.

The post 4 कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी सह शाओमी रेडमी नोट 6 प्रो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने नुकतीच इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आपला धाक कायम ठेवत रेडमी 6 सीरीज सादर केली आहे. कंपनी ने एक साथ तीन स्मार्टफोन लॉन्च केले होते, ज्यात रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो यांचा समावेश होता. आज शाओमी ने अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला नवीन डिवाईस रेडमी नोट 6 प्रो पण लॉन्च केला आहे. रेडमी नोट 6 प्रो कंपनी ने 4 कॅमेरा सेंसर सह बाजारात आणला आहे. शाओमी ने रेडमी नोट 6 प्रो सध्या थायलंड मध्ये लॉन्च केला आहे तिथे या फोनची किंमत 6,990 थाई भाट म्हणजे भा​रतीय करंसी नुसार जवळपास 15,599 रुपये ठेवण्यात आली आहे.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो ची सर्वात मोठी खासियत फोनचा कॅमेरा सेग्मेंट आहे. रेडमी नोट 6 प्रो च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनेल्स वर डुअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कामेरर देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा ​डुअल पिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रेडमी नोट 6 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीयूआई 9.6 आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 14एनएम कोरयो 260 सीपीयू सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

कंपनी नवे रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह सादर केला आहे सोबत ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 509 जीपीयू आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. रेडमी नोट 6 प्रो मध्ये एआई टेक्नॉलॉजी आहे. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात अली आहे.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो थायलंड मध्ये ब्लॅक, ब्लू आणि रोज गोल्ड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. शाओमी ने अजूनतरी फोनच्या ग्लोबल लॉन्च ची घोषणा केलेली नाही. त्यामुळे शाओमी आपला हा फोन भारतात कधी घेऊन येईल हॆ सांगता येत नाही.

The post 4 कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी सह शाओमी रेडमी नोट 6 प्रो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-launched-4-camera-sensor-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी नोट 6 प्रो बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट, जल्द होने वाला है लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-listed-on-geekbench-with-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-listed-on-geekbench-with-specifications-in-marathi/#respond Tue, 25 Sep 2018 13:15:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2258 आता शाओमीचा हा आगामी स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग नंतर पुन्हा एकदा फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आल आहेत आणि त्यामुळे रेडमी नोट 6 प्रो लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वाढली आहे.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट, जल्द होने वाला है लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी बद्दल नुकताच एक मोठा लीक समोर आला होता ज्यात रेडमी नोट 6 प्रो चा फोटो इंटरनेट वर वायरल झाला आहे. या लीक मधून फक्त फोनच्या डिजाईन आणि लुकची माहिती मिळाली नव्हती तर सोबतच फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समजले होते. आता शाओमीचा हा आगामी स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग नंतर पुन्हा एकदा फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आल आहेत आणि त्यामुळे रेडमी नोट 6 प्रो लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वाढली आहे.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो गीकबेंच वर याच नावाने लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंच स्कोर पाहता बेंचमार्किंग साइट ने ​रेडमी नोट 6 प्रो ला सिंगल-कोर मध्ये 1332 स्कोर दिला आहे तर हा फोनला मल्टी-कोर मध्ये 4675 स्कोर मिळाला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग 24 सप्टेंबरच्या दुपरिचिया आहे. या लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि ​रेडमी नोट 6 प्रो एंडरॉयड 8.1.0 ओरियो सह सादर केला जाईल.

गीकबेंच नुसार रेडमी नोट 6 प्रो 1.61गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टाकोर प्रोसेसर सह सादर केला जाईल ज्या सोबत हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालेले. बेंच​मार्किंग साइट ​रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4जीबी रॅम सांगण्यात आला आहे. तसेच आधी आलेल्या लीक नुसार हा फोन 6जीबी रॅम आणि 3जीबी/32जीबी च्या वरिएंट मध्ये पण सादर केला जाईल.

लीक वरून समजले आहे कि रेडमी नोट 6 प्रो 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह नॉच डिस्प्ले सह सादर केला जाईल. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा डुअल ​रियर कॅमेरा सेटअप असेल तसेच लीक नुसार फोनच्या फ्रंट पॅनल वर 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन सेल्फी कॅमेरा देण्यात येतील.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. जरी शाओमी ने अजून रेडमी नोट 6 प्रो बद्दल कोणतीही आॅफिशियल घोषणा केली नसली तरी गीकबेंच च्या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे कि शाओमी आपला हा फोन लवकरच अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च करेल.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट, जल्द होने वाला है लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-listed-on-geekbench-with-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी नोट 6 प्रो च्या किंमतीचा झाला खुलासा, दोन वेरिएंट आले समोर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-price-and-ram-storage-leak-with-colour-variant-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-price-and-ram-storage-leak-with-colour-variant-in-marathi/#respond Wed, 29 Aug 2018 13:21:01 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1865 शाओमी रेडमी नोट 6 प्रो बद्दल विख्यात टिप्सटर रोनाल्ड क्वॉड्ट ने ट्वीट केले आहे ज्यात फोनची किंमत आणि याचे कलर वेरिएंट याचा खुलासा करण्यात आला आहे.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो च्या किंमतीचा झाला खुलासा, दोन वेरिएंट आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने गेल्या आठवड्यात बातमी देऊन सांगितले होते की शाओमी कंपनी आपली नोट सीरीज वाढवण्याची योजना करत आहे आणि रेडमी नोट 6 वर काम पण सुरु झाले आहे. बातमी अशी होती की शाओमी रेडमी नोट 6 आणि रेडमी नोट 6 प्रो येत्या काही आठवड्यात टेक जगासमोर सादर केले जातील. त्यानुसार आज एका लीक मधून रेडमी 6 प्रो चे स्पेसिफिकेशन्स आणि याची किंमत शेयर करण्यात आली आहे.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो बद्दल विख्यात टिप्सटर रोनाल्ड क्वॉड्ट ने ट्वीट केले आहे ज्यात फोनची किंमत आणि याचे कलर वेरिएंट याचा खुलासा करण्यात आला आहे. या ट्वीट नुसार रेडमी नोट 6 प्रो शाओमी 2 रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाईल. एक वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज असेल तर दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम सोबत 64जीबी च्या मेमरीला सपोर्ट करेल.

रेडमी नोट 6 प्रो बद्दल सांगण्यात आले आहे की हा फोन गोल्ड, ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट्स मध्ये येईल. रोनाल्ड यांच्या माहिती नुसार रेडमी नोट 6 प्रो चा 3जीबी रॅम वेरिएंट 200 यूरो तर 4जीबी रॅम वेरिएंट 250 यूरो मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. भारतीय करंसी नुसार ही किंमत क्रमश: 16,500 रुपये aani 20,000 रुपयांच्या आसपास असेल.

शाओमी रेडमी नोट 6 काही दिवसांपूर्वी यूएस च्या सर्टिफिकेशन साइट फेडरल कम्यूनिकेशन कमिशन (एफसीसी) वर दिसला होता. या वेबसाइट वर फोन एफ1806ई7टीजी मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. सर्टिफिकेशन साइट वर फोन मधील डुअल बँड वाई-फाई, एलटीई, डब्लूसीडीएमए, सीडीएमए आणि जीएसएम सह इतर सपोर्ट बद्दल माहिती मिळाली होती.

रेडमी नोट 6 किंवा रेडमी नोट 6 प्रो बद्दल अजूनतरी शाओमी ने कोणतीही आॅफिशियल माहिती दिली नाही. त्यामुळे कंपनी द्वारा आॅफिशियल घोषणा होईस्तोवर फोनच्या किंमत व रॅम-स्टोरेज च्या माहिती वर विश्वास ठेवता येणार नाही.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो च्या किंमतीचा झाला खुलासा, दोन वेरिएंट आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-price-and-ram-storage-leak-with-colour-variant-in-marathi/feed/ 0