एक्सक्लूसिव : आता होणार नाही शाओमी रेडमी नोट 5 ची विक्री, कंपनी ने बंद केला हा हिट फोन

शाओमी ने यावर्षी भारतात अपनी नोट सीरीज वाढवत रेडमी नोट 5 स्मार्टफोन लॉन्च​ केला होता. देशातील शाओमी चे हिट स्मार्टफोन्स पाहता रेडमी नोट 5 चे नाव या लिस्ट मध्ये सर्वात वर येते. शाओमी ने इंडिया मध्ये रेडमी नोट 5 मुळे सेलचे अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. रेडमी नोट 5 सोबतच कंपनी ने रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन पण लॉन्च केला होता. या दोन्ही स्मार्टफोन्स ने शाओमीच्या यूजर्सची सख्यां वाढवण्यात मदत केली आहे. वआता अशी बातमी येत आहे की शाओमीचा हाच हिट स्मार्टफोन रेडमी नोट 5 कंपनीने बंद केला आहे. शाओमी ने भारतात रेडमी नोट 5 च्या प्रोडक्शन सोबतच याची विक्री बंद केली आहे.

91मोबाईल्सला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे की शाओमी इंडिया ने रेडमी नोट 5 भारतात बंद केला आहे. कंपनी ने हा फोन शाओमीच्या आॅफिशियल वेबसाइट वरूनच काढून टाकला आहे त्याचबरोबर देशातील आॅफलाईन बाजारात रिटेल स्टोर्स वर पण रेडमी नोट 5 चा सेल बंद करण्यात आला आहे. ज्या रिटेल स्टोर्स वर रेडमी नोट 5 चा स्टॉक उरला होता तो संपवला जात आहे आणि शाओमी कडून रेडमी नोट 5 चा नवीन स्टॉक येत नाही आहे.

शाओमी ने रेडमी नोट 5 सोबत रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन पण लॉन्च केला होता. काही दिवसांपूर्वी शाओमी इंडिया ने रेडमी नोट 5 प्रो चा अपडेटेड वर्जन रेडमी नोट 6 प्रो भारतीय बाजारात आणला आहे तसेच रेडमी नोट 5 च्या इतर कोणत्याही मॉडेल किंवा नवीन वर्जनची माहिती अजूनतरी आली नाही. शाओमी ने रेडमी नोट 5 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता. एक वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली होती.

रेडमी नोट 5 चा 3जीबी रॅम वेरिएंट भारतात 9,999 रुपयांमध्ये विकला जात होता तर 4जीबी रॅम वेरिएंटची किंमत 11,999 रुपये होती. शाओमीच्या रेडमी नोट 5 प्रो व रेडमी नोट 6 प्रो ची किंमत पाहतात…

शाओमी रेडमी नोट 5 प्रो 4जीबी रॅम/ 64जीबी मेमरी वेरिएंट 14,999 रुपये
शाओमी रेडमी नोट 5 प्रो 6जीबी रॅम/ 64जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपये

शाओमी रेडमी नोट 6 प्रो 4जीबी रॅम/ 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये
शाओमी रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम/ 64जीबी मेमरी वेरिएंट 15,999 रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here