अद्भुत : आला हाताला बांधता येणारा स्मार्टफोन, फोल्डेबल फोनला पण मागे टाकेल या कंपनीने

मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 च्या आधी सॅमसंग ने जगासमोर आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन सादर केला होता. सॅमसंग नंतर एमडब्ल्यूसीच्या मंचावरून हुआवई ने पण जगासमोर आपला फोल्डेबल फोन ठेवला आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सची डिजाईन आणि इनकी अनोखी टेक्नॉलॉजी बघून फक्त स्मार्टफोन फॅन आणि टेक लवर हैराण नसून इतर टेक कंपन्या पण फोल्डेबल फोनच्या डिजाईन मध्ये रस घेत आहेत. जर सॅमसंग आणि हुआवईचे हे फोल्डेबल फोन बघून तुम्हाला वाटत असेल कि मोबाईल फोन्स बदलणार आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो कि या दोन्ही कंपन्यांच्या चार पाऊले पुढे जात नुबिया ने असा स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो मनगटावर घड्यळाप्रमाणे बांधता येईल.

चीनी कंपनी नुबिया ने एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावर आपली हि अनोखी टेक्नॉलॉजी सादर केली आहे. कंपनीने सादर केलेला डिवाईस स्मार्टफोन नव्हे तर स्मार्टवॉचच्या कॅटेगरी मध्ये येतो. पण या स्मार्टवॉचचा डिस्प्ले पूर्णपणे स्मार्टफोन प्रमाणे बनवण्यात आला आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या घड्याळात फोटो घेण्यासाठी कॅमेरा पण देण्यात आला आहे. यात सर्व फंक्शन, यूजर इंटरफेस आणि कॉलिंग सारख्या सुविधासह रॅम आणि इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे. या घड्याळात कोणतीही डायल नाही, पण वॉचच्या बॅंडच्या भागावर डिस्प्ले बनवण्यात आला आहे. आणि हाच मोठा डिस्प्ले याला स्मार्टफोन बनवतो. नुबिया ने आपल्या या डिवाईसला अल्फा स्मार्टवॉचचे नाव दिले आहे.

जबरदस्त ​फीचर्स
नुबिया अल्फा फ्लेक्सीबल ओएलईडी डिस्प्ले वर बनवण्यात आला आहे. हा अनोखा डिवाईस उघडून फोनप्रमाणे वापरला जाऊ शकतो तसेच हा बेंड करून एकाद्या घड्याळाप्रमाणे मनगटावर बांधता येतो. नुबिया अल्फा मध्ये 45:9 अल्ट्रा वाइट आस्पेक्ट रेशियो असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिवाईस 960 x 192 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 4-इंचाच्या स्क्रीनला सपोर्ट करतो. या डिवाईसची स्क्रीन पॉलीमाइडने प्रोटेक्ट करण्यात आली आहे. या मटेरियल मुळे डिस्प्ले गरम होत नाही.

या स्मार्टवॉच मध्ये वॉयस कमांड द्वारे मेन्यू ऑपरेट केला जाऊ शकतो. स्मार्टवॉच मध्ये बॅक मेन्यू वर जाण्यासाठी तसेच वॉयस कमांड एक्टिवेट करण्यासाठी दोन फिजिकल बटण देण्यात आले आहेत. या बटणाव्यतिरिक्त एयर जेस्चर द्वारे पण स्मार्टवॉचचा मेन्यू वापरला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला हवेत हातवारे करावे लागतील आणि मेन्यू मागे किंवा पूढे जाईल. सोबतच नुबिया अल्फा फिटनेस ट्रॅकरचे पण काम करतो आणि यातून स्लीम, एक्सरसाईज तसेच हार्टरेट इत्यादि ट्रॅक केली जाऊ शकते.

लॉन्च झाला 6.9-इंच डिस्प्ले आणि 5,810एमएएच बॅटरी असलेला लेनोवो वी7, स्मार्टफोन आणि टॅबलेट दोन्हींचे करेल काम

नुबिया अल्फा चे स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता नुबिया अल्फा मध्ये 1जीबी रॅम देण्यात आला आहे. हा डिवाईस 8जीबी इंटरनल मेमोरीला सपोर्ट करतो ज्यात फोटोज, वीडियो व गाणी सेव करता येतील. हा स्मार्टवॉच एडरॉयड आपरेटिंग सिस्टम वर बनलेला आहे तसेच प्रोसेसिंग साठी कंपनी ने नुबिया अल्फा मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन वियर 2100 चिपसेट दिला आहे. तसेच फोटो घेण्यासाठी हा स्मार्ट डिवाईस 5-मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. पावर साठी यात 500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीनुसार एकदा चार्ज केल्यावर 2 दिवस चालते.

किंमत
नुबिया अल्फा ब्लूटूथ आणि सेल्युलर दोन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. स्मार्टवॉचचा ब्लूटूथ वेरिएंट 449 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसी नुसार 36,300 रुपयांच्या आसपास आहे. तसेच सेल्युलर वेरिएंट 549 यूरो म्हणजे जवळपास 44,400 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच कंपनी ने या स्मार्टवॉचचा एक गोल्ड वेरिएंट पण सादर केला आहे ​ज्याची किंमत 649 यूरो म्हणजे अंदाजे 52,500 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here