Xioami - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi Note 10 सीरीज मार्च मध्ये होईल भारतात लाॅन्च, 10 तारखेला होऊ शकते एंट्री https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-series-might-launch-in-india-on-10-march/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-series-might-launch-in-india-on-10-march/#respond Wed, 10 Feb 2021 12:36:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9979 Redmi Note 10 मध्ये 120 हर्ट्ज असलेला एलसीडी डिस्प्ले असू शकतो. तसेच या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच, फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेऱ्यासह क्वाड कॅमेरा सेटअप असू शकतो.

The post Redmi Note 10 सीरीज मार्च मध्ये होईल भारतात लाॅन्च, 10 तारखेला होऊ शकते एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने नवीन वर्षाच्या सुरवातीला आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये सांगितले होते कि टेक कंपनी Xiaomi भारतात आपल्या ‘नोट’ डिवायसेजच्या विस्ताराची योजना बनवत आहे आणि याअंतर्गत रेडमी नोट 10 सीरीज लाॅन्च केली जाईल. आज या बातमीवर शिक्कामोर्तब करत कंपनीने स्वतः Redmi Note 10 सीरीजच्या भारतीय लाॅन्चची घोषणा केली आहे. पुढल्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये रेडमी नोट 10 सीरीज भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Xiaomi इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी भारतात रेडमी नोट 10 सीरीज लाॅन्च करणार आहे. हि घोषणा आज म्हणजे 10 फेब्रुवारीला करण्यात आली आहे. कंपनीने आतापर्यंत सीरीजच्या लाॅन्चची तारीख सांगितली नाही पण आशा आहे कि रेडमी नोट 10 सीरीज 10 मार्चला भारतात लाॅन्च होऊ शकते तसेच या सिरीज मध्ये Redmi Note 10 आणि Redmi Note 10 Pro स्मार्टफोन येऊ शकतात.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या लीकनुसार Redmi Note 10 मध्ये 120 हर्ट्ज असलेला एलसीडी डिस्प्ले असू शकतो. तसेच या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच, फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेऱ्यासह क्वाड कॅमेरा सेटअप असू शकतो. तसेच, पावर बॅकअपसाठी 5050mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

हे देखील वाचा : Samsung चा मास्टरस्ट्रोक, लाॅन्च केला कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन Samsung Galaxy A32, प्रत्येक आहे स्पेसिफिकेशन दमदार

अलीकडे एक रिपोर्ट समोर आला होता कि रेडमी नोट 10 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. तर रेडमी नोट 10 प्रो मध्ये 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.

कलर ऑप्शन पाहता Note 10 Pro Bronze, Blue आणि Gray कलर मध्ये लॉन्च केला जाईल. आतापर्यंत फोनच्या किंमतीबद्दल कोणतीही लीक माहिती आली नाही. पण, सांगण्यात आले होते कि Redmi Note 10 आणि Note 10 Pro ची किंमत भारतात खूप आक्रमक असू शकते.

The post Redmi Note 10 सीरीज मार्च मध्ये होईल भारतात लाॅन्च, 10 तारखेला होऊ शकते एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-series-might-launch-in-india-on-10-march/feed/ 0
Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान https://www.91mobiles.com/marathi/exclusive-xiaomi-redmi-note-10-pro-launch-in-india-february-mi-11-lite-specs-price-ram-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-xiaomi-redmi-note-10-pro-launch-in-india-february-mi-11-lite-specs-price-ram-leaked/#respond Wed, 20 Jan 2021 11:50:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9710 91मोबाईल्सला सूत्रांकडून या दोन्ही स्मार्टफोन सीरीजच्या भारतातील लाॅन्चची माहिती मिळाली आहे. रेडमी नोट 10 सीरीज आणि मी 11 सीरीजच्या इंडिया लाॅन्च प्लान बद्दल त्यांच्या वेरिएंट्स आणि प्राइस सेग्मेंटची बातमी पण समोर आली आहे.

The post Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi चे काही नवीन स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतीय सर्टिफिकेशन साइट्स वर दिसले होते. यात Redmi Note 10 Pro आणि Mi 11 Lite चा समावेश आहे, ज्यांच्याबाबत चर्चा आहे कि शाओमी लवकरच हे फोन्स भारतीय बाजारात लाॅन्च करेल. आता 91मोबाईल्सला सूत्रांकडून या दोन्ही स्मार्टफोन सीरीजच्या भारतातील लाॅन्चची माहिती मिळाली आहे. रेडमी नोट 10 सीरीज आणि मी 11 सीरीजच्या इंडिया लाॅन्च प्लान बद्दल त्यांच्या वेरिएंट्स आणि प्राइस सेग्मेंटची बातमी पण समोर आली आहे.

91मोबाईल्सला टिप्स्टर इशान अग्रवालच्या हवल्यातून माहिती मिळाली आहे कि शाओमीची रेडमी नोट10 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये भारतात लाॅन्च केली जाईल. या सीरीज मध्ये Redmi Note 10 आणि Redmi Note 10 Pro स्मार्टफोन लाॅन्च होतील जे कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये घेऊन येईल. सूत्रांच्या मते रेडमी नोट 9 सीरीज जास्त यशस्वी न झाल्यामुळे शाओमी इंडिया रेडमी नोट 10 सीरीजची किंमत खूप कमी ठेवणार आहे. सीरीजचे दोन्ही स्मार्टफोन Gray, White आणि Green कलर मध्ये बाजारात येतील.

Photo courtesy: firstpost.com

मी 11 सीरीज पाहता मिळालेल्या माहितीनुसार सीरीज अंतगर्त Mi 11 आणि Mi 11 Lite स्मार्टफोन लाॅन्च केले जातील. यातील मी 11 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये येईल, ज्यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजचा समावेश असेल. मी 11 लाइट स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लाॅन्च होईल. Mi 11 मध्ये Gray आणि Blue कलर तसेच Mi 11 Lite मध्ये Pink, Black आणि Blue hue कलर उपलब्ध होतील.

हे देखील वाचा : Xiaomi Redmi Note 10 Pro इंडियन वेबसाइट वर लिस्ट, लाॅन्च आला जवळ

Redmi Note 10 सीरीज

रेडमी नोट 10 प्रो बद्दल आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला जाईल ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वाॅलकाॅमचा 750जी चिपसेट मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि रेडमी नोट 10 प्रो कंपनी 5G आणि 4G दोन्ही मॉडेल्स मध्ये लाॅन्च करेल आणि भारतात फोनचा 4जी मॉडेलच लाॅन्च केला जाईल. दुसरीकडे रेडमी नोट 10 मध्ये मीडियाटेकचा चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे.

Redmi Note 10 Pro

फोटोग्राफीसाठी या सीरीज क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप असेल. रेडमी नोट 10 प्रो स्मार्टफोन मध्ये 108 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहे तर रेडमी नोट 10 स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेंसर सह लाॅन्च केला जाऊ शकतो. हे दोन्ही फोन पावरफुल सेल्फी कॅमेऱ्याला पण सपोर्ट करतील जो पंच- होल डिजाईन मध्ये दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Xiaomi चा स्वस्त 5G फोन Redmi Note 9T, 4जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह झाला लाॅन्च

Mi 11 सीरीज

लीकनुसार Xiaomi Mi 11 Lite फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करेल. फिंगरप्रिंट सेंसर साईड पॅनल वर पावर बटन मध्ये दिला जाऊ शकतो. लीकनुसार फोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला जाईल सोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट मिळू शकतो. सध्या मार्केट मधील POCO X3 एकमेव असा स्मार्टफोन आहे जो या चिपसेट सह येतो.

Xioami Mi 11 Lite

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लीकनुसार Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फोन मध्ये 8 मेगापिक्सलची सेकेंडरी लेंस आणि 5 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर मिळू शकतो. लीकनुसार वियतनाम मध्ये या फोनची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असेल.

The post Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-xiaomi-redmi-note-10-pro-launch-in-india-february-mi-11-lite-specs-price-ram-leaked/feed/ 0
108एमपी कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह भारतात लॉन्च झाला Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10i 5G https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-5g-launched-in-india-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-5g-launched-in-india-price-specs-sale-offer/#respond Tue, 05 Jan 2021 12:41:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9541 Xiaomi Mi 10i 5G मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट देण्यात आला आहे जो 5जी कनेक्टिविटी सह येतो. Xiaomi Mi 10i 5G क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो, स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपयांपासून सुरु होत आहे

The post 108एमपी कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह भारतात लॉन्च झाला Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10i 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आज भारतात आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत ‘मी सीरीज’ चा विस्तार केला आहे. कंपनीने लेटेस्ट स्मार्टफोन Xiaomi Mi 10i 5G भारतात लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 20,999 रुपयांपासून सुरु होत आहे. शाओमी मी 10आय फक्त दिसायला आर्कषक आहे नाही तर या फोन मध्ये स्पेसिफिकेशन्स पण शानदार देण्यात आले आहेत आणि हा 5जी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. Mi 10i 5G येत्या 7 जानेवारी पासून अमेझॉन इंडिया वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Xiaomi Mi 10i 5G कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला आहे. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या तीन कडा साईड बेजल्सशी जोडल्या गेल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यावर सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर मध्यभागी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्तुळाकार आहे. या सेटअपच्या बाहेर डावीकडे फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वरून फिंगरप्रिंट सेंसर गायब आहे तसेच खालच्या बाजूला Mi लोगो आणि 5G लिहिण्यात आले आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi 10i 5G कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च केला आहे जो 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करते जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन सह येते. मी 10आय 5जी कंपनीने अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला आहे जो मीयुआय 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये र्कोटेक्स ए-77 सीपीयू वर काम करणारा क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट देण्यात आला आहे जो 5जी कनेक्टिविटी सह येतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Mi 10i 5G क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 108 मेगापिक्सलचा HM2 sensor देण्यात आला आहे. तसेच हा शाओमी फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,820एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट्स व किंमत

Xiaomi Mi 10i 5G भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 20,999 रुपये आहे. तसेच फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे आणि या वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. शाओमी मी 10आय 5जी चा सर्वात मोठा वेरिएंट 12 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 23,999 रुपये आहे. हा फोन Midnight Black, Atlantic blue आणि Pacific Sunrise कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 108एमपी कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह भारतात लॉन्च झाला Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10i 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-5g-launched-in-india-price-specs-sale-offer/feed/ 0
4,700mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर सह आला Redmi K30 Pro 5G, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-launched-in-china-with-zoom-edition-64mp-quad-camera-4700mah-battery-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-launched-in-china-with-zoom-edition-64mp-quad-camera-4700mah-battery-price-specification/#respond Tue, 24 Mar 2020 13:05:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6876 Redmi K30 Pro आणि Redmi K30 Pro Zoom Edition चे स्पेसिफिकेशन्स जवळपास एकसारखे आहेत.

The post 4,700mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर सह आला Redmi K30 Pro 5G, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीचा सबब्रँड म्हणून सुरु झालेल्या रेडमीने गेल्यावर्षी इंडिपेंडेंट कंपनी म्हणून सुरवात केली होती. याच सबब्रँड अंतर्गत आज कंपनीने चीन मध्ये आयोजित केलेल्या ऑनलाइन इवेंट मध्ये Redmi K30 Pro आपल्या घरच्या मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. रेडमी के30 प्रो कंपनीने हाई-एंड स्पेसिफिकेशन्स सह सादर केला आहे. या डिवाइस सोबत कंपनीने Redmi K30 Pro Zoom Edition पण सादर केला आहे. दोन्ही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स आणि लुक एकसारखा आहे. पण फोन्सच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्स मध्ये थोडा फरक आहे.

रेडमीने गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये Redmi K30 4G आणि 5G वेरिएंट मध्ये सादर केला होता. आज याच डिवाइसचा अपग्रेडेड वेरिएंट म्हणून Redmi K30 Pro सादर केला गेला आहे. चला पुढे या फोन संबंधित सर्व माहिती पाहू.

Redmi K30 Pro आणि Redmi K30 Pro Zoom Edition चे स्पेसिफिकेशन्स

Redmi K30 Pro आणि Redmi K30 Pro Zoom Edition चे स्पेसिफिकेशन्स जवळपास एकसारखे आहेत. दोन्ही फोन्सच्या कॅमेरा आणि रॅम व स्टोरेज मध्ये थोडा फरक आहे. दोन्ही फोन्स मध्ये HDR10+ सुपर ऐमोलेड पॅनल देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस 1200nits आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. फोन्स मध्ये 6.67-इंच AMOLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिवाइस मध्ये कंपनीने लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट दिला आहे. वेगवान फाइल ट्रांसफरसाठी यात UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. Redmi K30 Pro मध्ये 6GB रॅम व 128GB स्टोरेज, 8GB रॅम व 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम व 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच Redmi K30 Pro च्या झूम एडिशन मध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम व 256GB स्टोरेज देण्यात आली आहे.

दोन्ही फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि मागे गोल क्वॉड कॅमेरा मॉड्यूल आहे. Redmi K30 Pro च्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 64MP Sony IMX686 सेंसर देण्यात आला आहे. कॅमेरा मध्ये 3x ऑप्टिकल झूम आणि ड्यूल ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन आहे. तसेच फोन 13-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस 123-डिग्री फिल्ड ऑफ व्यू, 8MP टेलीफोटो 30एक्स झूम सपोर्ट आणि ओआईएस आणि 2MP सेंसर आहे. फोनच्या कॅमेऱ्यात EIS आणि 8K वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट आहे. त्याचप्रमाणे रेडमी के30 प्रो झूम एडिशन मध्ये 64MP (IMX686) + 13MP वाइड + 5MP + 2MP (मॅक्रो) लेंस आहे. दोन्ही फोन्स मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 20-मेगापिकसलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi K30 Pro Zoom Edition आणि Redmi K30 Pro मध्ये सुपर ब्लूटूथ आणि लिक्विड कूलिंग फीचर देण्यात आला आहे. कंपनीने फोन मूनलाइट वाइट, स्काई ब्लू, पर्पल आणि स्पेस ग्रे कलर ऑप्शंस मध्ये सादर केला आहे. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4700एमएएच ची बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

किंमत

Redmi K30 Pro च्या 6GB रॅम व 128GB स्टोरेजची किंमत 2999 Yuan (जवळपास 32,000 रुपये), 8GB रॅम व 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 3399 Yuan (जवळपास 36,000 रुपये) आणि 8GB रॅम व 256GB वेरिएंटची किंमत 3699 Yuan (जवळपास 39,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर Redmi K30 Pro झूम एडिशनच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 3799 Yuan (जवळपास 40,000 रुपये) आणि 8GB रॅम व 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 3999 Yuan (जवळपास 43,000 रुपये) आहे.

The post 4,700mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर सह आला Redmi K30 Pro 5G, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-launched-in-china-with-zoom-edition-64mp-quad-camera-4700mah-battery-price-specification/feed/ 0
Redmi 9 आणि Xiaomi Mi 10 सीरीज पुढल्या महिन्यात होतील भारतात लॉन्च, महत्वाच्या माहितीचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-redmi-9-launching-in-india-mid-march-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-redmi-9-launching-in-india-mid-march-specs-price-sale/#respond Fri, 28 Feb 2020 15:39:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6711 Mi 10 आणि Mi 10 Pro फ्लॅगशिप फोन असतील तर Redmi 9 लो बजेट मध्ये लॉन्च केला जाईल.

The post Redmi 9 आणि Xiaomi Mi 10 सीरीज पुढल्या महिन्यात होतील भारतात लॉन्च, महत्वाच्या माहितीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने अलीकडेच आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये दोन पावरफुल स्मार्टफोन Mi 10 आणि Mi 10 Pro लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन हाईएंड स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहेत ज्यांनी फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये पदार्पण केले होते. काही दिवसांपूर्वी हे दोन्ही स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट बीआईएस वर लिस्ट झाले होते, ज्यामुळे आशा वाढली होती कि मी 10 आणि मी 10 प्रो लवकरच इंंडियन मार्केट मध्ये पण येतील. आता 91मोबाईल्सला Xiaomi Mi 10 व Mi 10 Pro च्या लॉन्चची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. इतकेच नव्हे तर आम्हाला समजले आहे कि मी सीरीजच्या व्यतिरिक्त कंपनी रेडमी सीरीज मध्ये पण नवीन स्मार्टफोन Redmi 9 पण आणणार आहे.

91मोबाईल्सला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे कि शाओमी Mi 10 व Mi 10 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही स्मार्टफोन मार्च महिन्याच्या मध्यंतरी म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात भारतीय बाजारात लॉन्च केले जातील. शाओमी या हाईएंड स्मार्टफोन्सचा लॉन्च ईवेंट आयोजित करून मार्केट मध्ये आणेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दिवशी ईवेंट मध्ये मी 10 व मी 10 प्रो सोबत Xiaomi रेडमी सीरीज मध्ये पण नवीन फोन आणेल जो Redmi 9 नावाने लॉन्च केला जाईल. Mi 10 आणि Mi 10 Pro फ्लॅगशिप फोन असतील तर Redmi 9 लो बजेट मध्ये लॉन्च केला जाईल.

Xiaomi Mi 10

शाओमी मी 10 बद्दल आधी बोलूया, हा स्मार्टफोन 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल कर्व्ड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते तसेच शाओमीने फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Xiaomi Mi 10 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Mi 10 च्या बॅक पॅनल वर चार रियर कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत ज्यात 108 मेगापिक्सलचा प्राइमरी ISOCELL Bright HMX सेंसरचा समावेश आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस आणि दोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर्सला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमी मी10 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 4,780एमएएच च्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे.

Xiaomi Mi 10 Pro

शाओमी मी10 प्रो सीरीजचा मोठा मॉडेल आहे. या फोन मध्ये पण 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.67 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मी 10 प्रो पण कंपनीने कर्व्ड डिजाईन वर बनवला आहे आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज करून बाजारात आणला आहे. Xiaomi Mi 10 Pro पण एक 5G फोन आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर चालतो. कंपनीने हा डिवाईस एंडरॉयड 10 आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला आहे.

Xiaomi Mi 10 Pro च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 108 मेगापिक्सलचा ISOCELL Bright HMX सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलची शार्ट टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलची मोठी टेलीफोटो लेंस आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा डिवाईस पावर बॅकअपसाठी 50वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Redmi 9

हा स्मार्टफोन लो बजेट डिवाईस असेल आणि रेडमी 9 बद्दल चर्चा आहे कि शाओमी हा मीडियाटेक जी70 चिपसेट वर लॉन्च करेल. हा चिपसेट आपण Realme C3 मध्ये बघितला होता. स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये तुम्हाला 6.6 इंचाची एचडी+ पिक्सल रेजल्यूशन असलेली स्क्रीन मिळेल. Redmi 9 वॉटर ड्रॉप नॉच सह लॉन्च केला जाईल. राहिला प्रश्न मेमरीचा तर आता पर्यंत आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार Redmi 9 च्या एका वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम मेमरी दिली जाईल आणि हा फोन 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. आशा आहे कि हा फोन Xiaomi मोठ्या बॅटरी सह बाजारात सादर करेल.

The post Redmi 9 आणि Xiaomi Mi 10 सीरीज पुढल्या महिन्यात होतील भारतात लॉन्च, महत्वाच्या माहितीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-redmi-9-launching-in-india-mid-march-specs-price-sale/feed/ 0
शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या स्मार्टफोन वर मिळत आहे किती सूट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-y2-poco-f1-offer-discount-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-y2-poco-f1-offer-discount-price/#respond Thu, 11 Apr 2019 13:59:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4073 Mi Super Sale मध्ये रेडमी नोट 5 प्रो चे हे दोन्ही वेरिएंट क्रमश: 10,999 रुपये तसेच 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

The post शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या स्मार्टफोन वर मिळत आहे किती सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने याच महिन्यात आपल्या ‘मी फेस्टिवल’ चे आयोजन केले होते. हा फेस्टिवल 4 एप्रिल पासून सुरु होऊन 6 एप्रिल पर्यंत चालला होता ज्यात फक्त शाओमी स्मार्टफोन डिस्काउंट वर विकले गेले नव्हते तर अनेक ऑफर्स अंतर्गत मी फॅन्स गिफ्ट व फ्री प्रोडक्ट पण मिळाले. एका महिन्यात आपल्या इंडियन फॅन्सना अजून एक भेट देत शाओमी ने आज पासून ‘मी सुपर सेल’ चे आयोजन केले आहे. जर तुम्ही पण एखादा शाओमी फोन घेऊ इच्छित असाल तर हीच योग्य वेळ आहे तो फोन कमी किंमतीत घेण्याची.

शाओमी मी सुपर सेल
Xiaomi ने आज ‘मी सुपर सेल’ ची सुरवात केली आहे. हा खास सेल 3 दिवस आयोजित करण्यात आला आहे जो आज 11 एप्रिल पासून सुरु होऊन 13 एप्रिल पर्यंत चालेल. Xiaomi Mi Super Sale मध्ये शाओमी प्रोडक्ट खूप कमी किंमतीत आणि भारी डिस्काउंट वर मिळत आहेत. या सेल मध्ये कंपनीने शाओमीच्या रेडमी सीरीजच्या नवीन व अन्य स्मार्टफोन्स सह पोको ब्रँड फोनचा पण समावेश केला आहे. या सेल मध्ये शाओमी स्मार्टफोन थेट 2,000 पर्यंतची सूट मिळत आहे.

इतका मिळेल डिस्काउंट
सर्वात आधी पोकोफोन बद्दल बोलायचे तर शाओमी ‘मी सुपर सेल’ मध्ये Poco F1 च्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंट वर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. डिस्काउंट नंतर पोको एफ1 चा हा वेरिएंट 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Redmi Note 5 Pro चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट आणि 6जीबी रॅम व 64जीबी वेरिएंट पण 2,000 रुपये स्वस्तात विकत घेता येईल. ​सूटीनंतर Mi Super Sale मध्ये रेडमी नोट 5 प्रो चे हे दोन्ही वेरिएंट क्रमश: 10,999 रुपये तसेच 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

हे देखील वाचा: Realme 3 Pro च्या लॉन्च डेटचा खुलासा, 22 एप्रिलला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन

Mi Super Sale मध्ये शाओमी Redmi Note 6 Pro च्या 6जीबी रॅम व 64जीबी वेरिएंट वर 2,000 रुपयांची सूट देत आहे ज्यामुळे हा वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. तसेच Redmi 6 Pro वर कंपनी कडून 1,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या सूटीनंतर रेडमी 6 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी वेरिएंट 9,999 रुपये तर 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Mi Super Sale मध्ये 7,999 रुपयांचा Redmi 6 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 6,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. तसेच कंपनी Redmi Y2 स्मार्टफोन वर पण 1,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या सेल मध्ये रेडमी वाई2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 7,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: 4,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंग Galaxy A70

विशेष म्हणजे Xiaomi ने फक्त एका महिन्यात देशात रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो चे 10,00,000 यूनिट विकले आहेत. इंडियन मार्केट मध्ये रेडमी नोट 7 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच रेडमी नोट 7 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपये तथा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. हे दोन्ही फोन मी डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट वर फ्लॅश मध्ये मिळतात.

The post शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या स्मार्टफोन वर मिळत आहे किती सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-y2-poco-f1-offer-discount-price/feed/ 0
रेडमी नोट 6 प्रो नोव्हेंबर मध्ये होईल भारतात लॉन्च, डुअल सेल्फी कॅमेरा असेल यात https://www.91mobiles.com/marathi/xioami-redmi-note-6-pro-india-launch-date-dual-selfie-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xioami-redmi-note-6-pro-india-launch-date-dual-selfie-camera-in-marathi/#respond Mon, 22 Oct 2018 09:17:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2575 शाओमी ने रेडमी नोट 6 प्रो थाईलँड मध्ये लॉन्च केला आहे तिथे फोनची किंमत 6,990 थाई भाट म्हणजे भा​रतीय करंसी नुसार जवळपास 15,599 रुपये ठेवण्यात आली आहे.

The post रेडमी नोट 6 प्रो नोव्हेंबर मध्ये होईल भारतात लॉन्च, डुअल सेल्फी कॅमेरा असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी इंडिया ने नुकतेच भारतात आपली रेडमी 6 सीरीज वाढवत एक साथ तीन नवीन फोन रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो लॉन्च केले होते. हे तिन्ही फोन मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध झाले आहेत तसेच शाओमीच्या हिट स्मार्टफोन्सच्या श्रेणी मध्ये पण सामील झाले आहेत. पण आता शाओमी फॅन्स साठी आश्चर्यकारक अशी बातमी समोर आली आहे कि शाओमी लवकरच भारतात आपला अजून एक नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 6 प्रो लॉन्च करणार आहे.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो बद्दल माहिती मिळाली आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर मध्येच रेडमी नोट 6 प्रो भारतात लॉन्च करेल. रेडमी नोट 6 प्रो संबंधित एक ईमेज मीडिया रिपोर्ट मध्ये शेयर करण्यात आली आहे ज्यात फोनच्या लॉन्च डेट चा उल्लेख करण्यात आला आहे. या ईमेज मध्ये रेडमी नोट 6 प्रो के लॉन्च डेटच्या समोर ‘1.. नोव्हेंबर’ लिहिण्यात आले आहे. म्हणजे शाओमीचा हा शानदार स्मार्टफोन 11 नोव्हेंबर पासून 19 नोव्हेंबरच्या दरम्यान भारतात लॉन्च करण्यात येईल.

शाओमी ने रेडमी नोट 6 प्रो थाईलँड मध्ये लॉन्च केला आहे तिथे फोनची किंमत 6,990 थाई भाट म्हणजे भा​रतीय करंसी नुसार जवळपास 15,599 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता रेडमी नोट 6 प्रो च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनेल्स वर डुअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कामेरर देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा ​डुअल पिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रेडमी नोट 6 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीयूआई 9.6 आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 14एनएम कोरयो 260 सीपीयू सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

कंपनी नवे रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह सादर केला आहे सोबत ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 509 जीपीयू आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. रेडमी नोट 6 प्रो मध्ये एआई टेक्नॉलॉजी आहे. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात अली आहे.

The post रेडमी नोट 6 प्रो नोव्हेंबर मध्ये होईल भारतात लॉन्च, डुअल सेल्फी कॅमेरा असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xioami-redmi-note-6-pro-india-launch-date-dual-selfie-camera-in-marathi/feed/ 0