Samsung Galaxy A24 लाँचसाठी सज्ज; स्पेसिफिकेशन लीक

Highlights

  • Samsung Galaxy A24 एक स्वस्त 4जी फोन असेल.
  • हा मोबाइल सर्टिफिकेशन साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
  • फोनमध्ये 4GB RAM सह MediaTek Helio G99 प्रोसेसर मिळू शकतो.

सॅमसंग कंपनीनं अलीकडेच भारतीय बाजारात आपले दोन 5जी मोबाइल फोन लाँच केले आहेत जे Galaxy A14 5G आणि Galaxy A23 5G नावानं मार्केटमध्ये आले आहे. आता बातमी आली आहे की कंपनी या सीरीजच्या अजून एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Samsung Galaxy A24 नावानं लाँच होऊ शकतो. हा एक स्वस्त 4जी फोन असेल. कंपनीच्या घोषणेपूर्वी गॅलेक्सी ए24 चे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.

Samsung Galaxy A24 4G फोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर स्पॉट करण्यात आला आहे. हा फोन SM-A245F मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला आहे. हे गीकबेंच लिस्टिंग 18 जानेवारीचं आहे. बेंचमार्किंग स्कोर पाहता गॅलेक्सी ए24 4जी फोनला सिंगल-कोर मध्ये 561 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 1943 स्कोर मिळाला आहे. गीकबेंचवरून फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा: 7GB RAM च्या पावरसह आला लो बजेट स्मार्टफोन Tecno Spark Go 2023; रेडमी-रियलमीचं टेंशन वाढलं

Samsung Galaxy A24 चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.24″ FHD+ 90Hz AMOLED डिस्प्ले
  • MediaTek Helio G99 प्रोसेसर
  • 50MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 25W 5,000mAh बॅटरी

सर्टिफिकेशन साइट गीकबेंचसह अन्य लीक्समध्ये समोर आलेले डिटेल्स पाहता गॅलेक्सी ए24 4जी फोन 2.30गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच होऊ शकतो. चर्चा आहे की काही मार्केट्समध्ये हा फोन मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटसह लाँच होऊ शकतो. काही देशांमध्ये हा फोन सॅमसंग एक्सनॉस 7904 प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो.

Samsung Galaxy A24 चा 4जीबी रॅम व्हेरिएंट गीकबेंचवर समोर आला आहे. परंतु हा फोन एकापेक्षा अधिक मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी या सॅमसंग फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. या सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग स्मार्टफोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह मार्केटमध्ये येऊ शकतो. हे देखील वाचा: आणखी एक स्वस्त रेडमी फोन येणार बाजारात; 5,999 रुपयांच्या Redmi A1 च्या आणखी एका व्हर्जनची बातमी आली

Samsung Galaxy A24 4G मध्ये 6.24 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले असल्याचं समोर आलं आहे. सांगण्यात आलं आहे की ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनू शकते असेल तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. परंतु ही नॉच स्क्रीन असेल की पंच-होल, याची माहिती अद्याप समोर आली नाही. तसेच या फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व लाँच संबंधित माहितीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट पाहावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here