स्वस्त स्मार्टफोन Tecno Spark 20C येत आहे भारतात, कंपनीने कंफर्म केले लाँच

Tecno Spark 20 ला भारतात लाँच केल्यानंतर आता कंपनी याला पण स्वस्त मॉडेल Tecno Spark 20C भारतीय बाजारात घेऊन येणार आहे. ब्रँडकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली की टेक्नो स्पार्क 20 सी लवकरच भारतात लाँच केला जाईल. सध्या फोनच्या लाँचची तारीख समोर आली नाही परतु याची अंदाजे किंमत तसेच ग्लोबल स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता.

Tecno Spark 20C किंमत आणि भारतातील (लीक)

टेक्नो स्पार्क 20सी लो बजेट स्मार्टफोन असेल जो कमी किंमतीमध्ये भारतात लाँच केला जाईल. आमचा असा अंदाज आहे की या मोबाइलची किंमत जवळपास 8 हजार रुपयांच्या आसपास ठेवली जाऊ शकते. Tecno Spark 20C 7,499 रुपये किंवा 7,999 रुपयांमध्ये भारतात सेलसाठी उपलब्ध केला जाऊ शकतो. अपेक्षा आहे की मार्चच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हा मोबाइल देशात सेलसाठी उपलब्ध होईल.

Tecno Spark 20C स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल)

  • 6.6” 90Hz Display
  • Mediatek Helio G36
  • 8GB Extended RAM
  • 50MP Rear Camera
  • 18W 5,000mAh Battery
  • स्क्रीन: ग्लोबल मार्केटमध्ये टेक्नो स्पार्क 20सी स्मार्टफोन 720 x 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर सादर झाला होता. हा स्क्रीन पंच-होल स्टाइल वाला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.
  • प्रोसेसिंग : Tecno Spark 20C अँड्रॉइड 13 वर ग्लोबली सादर करण्यात आला आहे जो 2.2गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेल्या कोर्टेक्स-ए53 ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो जी36 प्रोसेसरवर चालतो. अपेक्षा आहे की भारतात पण हा प्रोसेसर आणला जाईल.
  • मेमरी: कंपनीकडून या टेक्नो फोनला 4जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमवर सादर करण्यात आले आहे. यातील एकाला 4 जीबी एक्सटेंडेड रॅम मिळते तसेच दुसरा 8 जीबी एक्सटेंडेड रॅमला सपोर्ट करतो. म्हणजे गरज पडल्यावर हा फोन 16जीबी रॅमवर परफॉर्म करतो.
  • कॅमेरा: टेक्नो स्पार्क 20 सी मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह सेकंडरी एआय लेन्स मिळते. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर ड्युअल फ्लॅशसह 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी Tecno Spark 20C स्मार्टफोन 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
  • आणखी फिचर्स : तसेच हा फोन 100% रिसायकल बॅक कव्हरवर बनविला आहे. ग्लोबल मॉडेलमध्ये सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो तसेच हा फोन Dual Speakers, FM आणि OTG सारख्या फिचर्सला पण सपोर्ट करतो.
  • LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here