8,699 रुपयांमध्ये रियलमीला टक्कर देण्यासाठी आला 6000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल कॅमेरा असलेला हा स्वस्त फोन

TECNO ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन Tecno Spark 6 Air लॉन्च केला होता. हा फोन 6,000एमएएच च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करतो जो दोन वेरिएंट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. तसेच आज हा फोन अजून ताकदवान करत टेक्नोने स्पार्क 6 एयर चा अजून एक नवीन वेरिएंट मार्केट मध्ये आणला आहे. टेक्नोचा हा फोन 3 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जो फक्त 8,699 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

विशेष म्हणजे टेक्नो स्पार्क 6 एयर आधीच भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनचा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम मेमरी सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो ज्याची किंमत 7,999 रुपये आहे. तसेच फोनचा दुसरा वेरिएंट 3 जीबी रॅम मेमरी सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि हा 8,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा फोन Comet black, Ocean blue आणि Cloud white कलर मध्ये विकत घेता येईल.

Tecno Spark 6 Air

टेक्नो स्पार्क 6 एयर बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.6 टक्के आहे. कंपनीने हा फोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 7 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सह येतो. तसेच स्क्रीनच्या वरच्या बाजूला छोटीशी ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे.

Tecno Spark 6 Air कंपनीने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो हाईओएस वर चालतो. फोन मध्ये Mediatek Helio A22 चिपसेट Quad Core-2GHz CPU देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेगमेंट पाहता टेक्नो स्पार्क 6 एयर मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा एआई प्राइमरी सेंसर अपर्चर F1.8 सह आहे. तसेच फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि बोके मोड आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर अपर्चर (f/2.0) सह 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Tecno Spark 6 Air एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here