मे ची सुरुवात होईल मोबाईल सोबत, स्वस्त आणि महाग प्रत्येक किंमतीत मिळतील फोन

एप्रिल 2024 मध्ये अनेक स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत आणि आता पुढचा महिना म्हणजे ​मे ची सुरुवात पण अप्रतिम होणार आहे. लो बजेट स्वस्त स्मार्टफोन ते महाग मोबाईल या महिन्यामध्ये भारतात लाँच होतील. पुढच्या आठवड्या (29 एप्रिलपासून 6 मे च्या मध्ये ) अनेक Vivo फोन मार्केटमध्ये एंट्री घेईल, ज्यासोबत Infinix पण आपला मोबाईल सादर करू शकतो. ज्या स्मार्टफोची लाँचची घोषणा झाली आहे तसेच ज्या फोनची घोषणा होणार आहे, त्या सर्वांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo V30e

लाँच तारीख – 2 मे

विवो वी 30 ई 2 मे ला भारतात लाँच होईल. कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की यात अल्ट्रा स्लीम 3 डी कर्व्ड डिस्प्ले दिला जाईल. Vivo V30e 5G फोन 50MP Selfie Camera सह लाँच होईल तसेच याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स 882 पोर्टरेट सेन्सर दिली जाईल. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,500 एमएएचची बॅटरी दिली जाईल. तसेच लीकनुसार हा मोबाईल Qualcomm Snapdragon 6 Gen 1 ऑक्टाकोर वर लाँच केला जाऊ शकतो. पुढील महिन्यात विवो वी 30 ई 5 जी ला Velvet Red आणि Silk Blue कलरमध्ये विकत घेता येईल.

Infinix GT 20 Pro 5G

लाँच तारीख – निश्चित नाही

मे महिन्यामध्ये इनफिनिक्स जीटी 20 प्रो 5जी फोन पण भारतात लाँच होऊ शकतो ज्यात Dimensity 8200 Ultimate प्रोसेसर दिला जाईल. या मोबाईलला 12GB RAM सह आणले जाऊ शकते. तसेच इतर स्पेसिफिकेशन पाहता लीकनुसार हा इनफिनिक्स स्मार्टफोन 108MP OIS Camera तसेच 32MP फ्रंट कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. तसेच मोबाईलमध्ये 144Hz रिफ्रेश रेट असणारा 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि 5000 एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

Vivo Y18

लाँच तारीख – 1 मे (अंदाजे)

पुढच्या आठवड्यात विवो वाय 18 पण भारतीय बाजारात एंट्री घेऊ शकतो, ज्याची प्रारंभिक किंमत 8,999 रुपये असू शकते. या फोनमध्ये 4 जीबी रॅमसह मीडियाटेक हीलियो जी 85 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच मिळालेल्या माहितीनुसार Vivo Y18 840 निट्स ब्राईटनेस असणाऱ्या 6.56 इंचाच्या 90 हर्ट्झ एचडी डिस्प्लेला सपोर्ट करेल. फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा तसेच 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी मोबाईलमध्ये 5,000 एमएएच बॅटरी मिळू शकते. या विवो फोनमध्ये IP54 रेटिंग पण दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

Vivo Y18e

लाँच तारीख – 1 मे (अंदाजे)

विवो वाय 18 सोबतच कंपनी एक आणि लो बजेट स्मार्टफोन वाय 18 ई पण भारतीय बाजारात आणणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या फोनची किंमत फक्त 7,999 रुपये असेल. या फोनमध्ये 528 निट्स ब्राईटनेस असणारी 6.56 इंचाची 90 हर्ट्झ एचडी स्क्रीन दिली जाऊ शकते. तसेच फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा तसेच 5 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर पाहायाला मिळू शकते. सांगण्यात आले आहे की हा मोबाईल पण मीडियाटेक हीलियो जी85 प्रोसेसरवर काम करेल तसेच 4 जीबी रॅमला सपोर्ट करेल. विवो वाय 18 ई ला IP54 रेटिंगसह सादर केले जाऊ शकते ज्याची जाडी 8.39mm तसेच वजन 185g असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here