एकाच चार्जरनं चार्ज होणार मोबाइल फोन, टॅबलेट आणि लॅपटॉपही! भारतात नवा नियम लागू होणार:रिपोर्ट

USB Type-C भारतात universal charging port बनू शकतो. भारत सरकार (Indian government) यूएसबी टाइप-सीचा ‘one nation, one charger’ म्हणून स्वीकार करू शकते. म्हणजे प्रत्येक मोबाइल फोन, स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट व अन्य डिवाइसेजमध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्टच दिला जाईल. या सर्व गॅजेट्सचे चार्जर एक सारखे असतील आणि एकाच चार्जरनं इतर डिवाइस देखील चार्ज करता येतील. सेंटर इंटर मिनिस्ट्रियल टास्क फोर्स (Central Inter-Ministerial Task Force) च्या नेतृत्वाखाली लवकरच हा नवीन नियम संपूर्ण देशात लागू होऊ शकतो.

USB Type-C port येत्या काही दिवसांत भारतात यूनिवर्सल चार्जिंग पोर्ट बनू शकतो आणि लवकरच सर्व स्मार्टफोन, टॅबलेट्स, लॅपटॉप इत्यादींमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट दिला जाऊ शकतो. कंज्यूमर अफेयर्स सेक्रेटरी रोहित कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्टफोन कंपन्या आणि इंडस्ट्री बॉडीसह मंत्रालयाची बैठक यशस्वीरीत्या पार पडली आहे तसेच कंज्यूमर अफेयर्स मिनिस्ट्रीनुसार स्मार्टफोन कंपन्या आणि इंडस्ट्री ऑर्गेनाइजेशन्सनी यूनिफॉर्म चार्जिंग पोर्ट (USB Type C) टप्प्यांमध्ये रोल आउट करण्यावर सहमती दर्शवली आहे. हे देखील वाचा: Govinda Naam Mera: कसलेल्या मराठी कलाकारांसह येतोय भन्नाट कॉमेडी चित्रपट; थेट OTT वर होणार रिलीज

USB Type-C नं चार्ज होतील सर्व डिवाइस

‘वन नेशन, वन चार्जर’ पॉलिसी अंतर्गत भारत सरकार संपूर्ण देशात टाइप-सी चार्जिंग पोर्टला प्रमुख चार्जिंग यूनिट बनवू इच्छित आहे. सध्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाइल फोन्समध्ये वेगवेगळे चार्जर असतात. तसेच स्मार्टफोन्स, टॅबलेट आणि लॅपटॉप सोबतच स्मार्टवॉच, फिटनेस बँड तसेच अन्य वियरेबलचे चार्जर देखील वेगळे असतात. परंतु नव्या नियमांतर्गत या सर्व डिवाइसेजमध्ये एक सामान चार्जिंग पोर्ट देण्यात येईल आणि सर्व ब्रँड्सचे प्रोडक्ट USB Type-C नं चार्ज करता येतील.

संघटनांना मिळाली मंजूरी

मीडिया रिपोर्टनुसार कंज्यूमर्स अफेयर्स मिनिस्ट्री सोबत झालेल्या मीटिंगमध्ये MAIT, FICCI, CII, सोबतच IIT कानपुर आणि IIT BHU सारख्या एज्युकेशनल इंस्टीट्यूशन्स तसेच Ministry of Environment Forest and Climate Change सारख्या केंद्र सरकारच्या विभागांनी देखील सहभाग घेतला होता. मीटिंगनंतर प्रकाशित करण्यात आलेल्या विधानात भागधारकांनी सहमती दर्शवली आहे की प्रत्येक डिवाइसमध्ये USB Type-C port चा वापर केला गेला पाहिजे. असं केल्यास ग्राहकांना एकापेक्षा जास्त चार्जर सोबत बाळगण्याची गरज नाही तसेच E-Waste (ई-वेस्ट) कमी होऊन पर्यावरणाचा फायदा होईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here