वोडाफोन आयडियानं आणला 549 रुपयांचा प्लॅन; वैधता मिळेल भरपूर

Highlights

  • Vi Plan मध्ये 180 दिवसांची वैधता मिळत आहे.
  • या प्लॅनमध्ये एसएमएसचा फायदा मिळत नाही.
  • कंपनीनं रिचार्ज वेबसाइटवर लिस्ट केला आहे.

Vodafone-Idea ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. कंपनीनं आपला एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा रिचार्ज कॉम्बो/वैधता कॅटेगरीमध्ये आणण्यात आला आहे. हा त्या ग्राहकांसाठी बेस्ट आहे ज्यांना वैधतेसह डेटाची आवश्यकता आहे. प्लॅनमध्ये फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ मिळत नाही. चला जाणून घेऊया या या प्लॅनमध्ये तुम्हाला नेमका कोणता फायदा मिळणार आहे.

वोडाफोन आयडिया 549 रुपयांचा प्लॅन

  • 180 Days Validity
  • 1GB Data

वोडाफोन आयडियाच्या 549 रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना 180 दिवसांची वैधता मिळते. यात एकूण 1जीबी डेटा मिळतो. परंतु, यात कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ देण्यात आला नाही. तसेच ओटीटी, हेलोट्यून, डेटा रोलओव्हर, ऑल नाइट बिंज असे फायदे देखील मिळत नाहीत. रिचार्जमध्ये कॉलिंगसाठी 2.5 प्रति सेकंद इतके शुल्क आकारले जाते. त्यामुळे हा प्लॅन उन ग्राहकांसाठी चांगला आहे ज्यांना फक्त वैधतेसह थोडा डेटा हवा आहे. हे देखील वाचा: लाँचपूर्वीच गुगल प्ले कंसोलवर OnePlus Nord N30 5G झाला लिस्ट, महत्वाच्या माहितीचा खुलासा

कंपनीनं अलीकडेच 368 रुपये आणि 369 रुपयांचे दोन रिचार्ज सादर केले होते. या दोन्ही प्लॅनसह 30 दिवसांच्या वैधतेव्यतिरिक्त फ्री कॉलिंग, 2जीबी डेली डेटा, एसएमएस सह ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन देखील ऑफर केलं जात आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक करून दोन्ही प्लॅनची फुल डिटेल वाचू शकता.

वोडाफोन आयडिया आहे अडचणीत

वोडाफोन-आयडिया 5जी सेवा लाइव्ह न केल्यामुळे आपले ग्राहक गमावू शकते. कारण अन्य दूरसंचार कंपन्यांनी खूप आधीपासून अनेक राज्यांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली आहे. वोडाफोन आयडियानं 31 डिसेंबर, 2022 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत 7,990 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे. हे देखील वाचा: Vivo Y78+ 5G फोन 50MP कॅमेऱ्यासह लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

कंपनीनं सप्टेंबरच्या तिमाहीत 7,595.5 कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे. तसेच डिसेंबर तिमाहीत एकूण महसूल 10,620.6 कोटी रुपये होता, जो सप्टेंबरच्या तिमाहीत 10,614.6 कोटी रुपयांच्या तुलनेत 0.1 टक्के जास्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here