लाँचपूर्वीच गुगल प्ले कंसोलवर OnePlus Nord N30 5G झाला लिस्ट, महत्वाच्या माहितीचा खुलासा

Highlights

  • Google Play Console लिस्टिंगवर दिसला OnePlus Nord N30 5G.
  • OnePlus Nord N30 5G यूएसमध्ये लवकरच लाँच होऊ शकतो.
  • Nord N30 5G इंडिया भारतात आलेल्या Nord CE 3 Lite चा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो.

भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वी OnePlus Nord CE 3 Lite 5G लाँच करण्यात आला होता. आता बातमी आली आहे की हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये लवकरच येऊ शकतो. परंतु हा फोन OnePlus Nord N30 5G नावाने रिब्रँडेड करून लाँच केला जाईल, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. तसेच आता हा हँडसेट गुगल प्ले कंसोल आणि सपोर्ट डिवाइस लिस्टिंगमध्ये दिसला आहे. ही लिस्टिंग टेक साइट MySmartPrice नं स्पॉट केली आहे. लिस्टिंगमधून फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स आणि मॉडेल नंबरचा खुलासा झाला आहे.

वनप्लस नॉर्ड एन30 5जी ची गुगल प्ले कंसोल लिस्टिंग

  • FHD+ Display
  • 6GB RAM, Android 13
  • Qualcomm Snapdragon 695

लिस्टिंगमध्ये फोन CPH2513/CPH2515 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. तसेच खुलासा झाला आहे की फोनमध्ये FHD+ डिस्प्ले आणि 8GB रॅम असेल. Nord N30 5G मध्ये अँड्रॉइड 13 ओएस आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC असेल. फोनमध्ये शानदार ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU दिला जाईल. हँडसेट गुगल प्ले-सपोर्टेड डिवाइसच्या लिस्टमध्ये OnePlus Nord N30 5G नावानं रजिस्टर करण्यात आला आहे.

थोडं या सर्टिफिकेशन विषयी जाणून घेऊया की Google जगभरातील निर्मात्यांना Android डिवाइसवर Google चे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल करण्याचा ऑप्शन देतो. Google ची Android टीम हे डिवाइस Google आणि PlayStore वापरण्यासाठी सुरक्षित आहेत की नाही हे ठरवण्यासाठी सर्टिफाइड करते.

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइटचे स्पेसिफिकेशन्स

फोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह येतो. प्रोसेसिंगसाठी हा मोबाइल 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्लॉकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 8जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह इंटरनल 8जीबी रॅम आणि 256जीबी पर्यंतची स्टोरेज आहे. यात 108 मेगापिक्सलचा सॅमसंग एचएम6 सेन्सर, 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे जो सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी वापरता येईल. पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचच्या बॅटरीसह 67वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आणि अँड्रॉइड 13 ओएस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here