Vivo ने आज टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजी आणि इनोवेशनचे शानदार उदाहरण सादर केले आहे. कंपनीने नवीन कॉन्सेप्ट फोन Vivo Apex 2020 ग्लोबल लॉन्च केला आहे. वीवो अपेक्स 2020 फक्त आर्कषक डिजाईन वर बनला नाही तर सोबतच या फोन मध्ये आधुनिक फीचर्स आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. Vivo Apex 2020 2330 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.45 इंचाच्या वॉटरफॉल डिस्प्ले वर सादर केला गेला आहे जो 120डिग्री फुलव्यू ऐजलेस एक्सपीरियंस देतो. फोनची स्क्रीन दोन्ही बाजुंनी बॅक पॅनलकडे वळली आहे.
शानदार डिस्प्ले
Vivo Apex 2020 चा डिस्प्ले स्टाईलिश आहेच तसेच हा ऍडव्हान्स फीचर्स आणि टेक्नॉलॉजीने पण सुसज्ज आहे. वीवोने या कॉन्सेप्ट फोनच्या डिस्प्लेचा अर्धा भाग फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज केला आहे. म्हणजे डिस्प्लेच्या खालच्या भागावर कुठेही बोट ठेवल्यास फोन अनलॉक केला जाऊ शकतो. तसेच Vivo Apex 2020 अंडर स्क्रीन सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा सेल्फी कॅमेरा फोन डिस्प्लेच्या खाली आहे जो बाहेरून दिसत नाही.
वीवो अपेक्स 2020 चा हा अंडर स्क्रीन फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे जो सेल्फीची कमांड दिल्यावर दिसतो तसेच फोटो कॅप्चर केल्यावर पुन्हा डिस्प्ले खाली गायब होतो. त्याचप्रमाणे Vivo Apex 2020 कंपनीने डुअल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे. फोनचा प्राइमरी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे तर दुसरा कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे.
दमदार कॅमेरा
प्राइमरी रियर कॅमेऱ्याबाबत बोलायचे तर हा 16 मेगापिक्सल सह 5एक्स ते 7.5एक्स Continuous Optical Zoom देऊ शकतो. तसेच वीवोने अपेक्स 2020 कॉन्सेप्ट फोनचा सेकेंडरी रियर कॅमेरा सेंसर ऍडव्हान्स स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजी वर बनवला आहे जो फोटो व वीडियो रेकॉर्ड करताना एखाद्या गिंबल प्रमाणे स्थिरता देतो. या वैशिष्ट्यामुळे वीवोने Vivo Apex 2020 च्या रियर कॅमेऱ्याला ‘गिंबल कॅमेरा’ असे नाव दिले आहे.
पावरफुल प्रोसेसिंग
एंडरॉयड 10 आधारित Vivo Apex 2020 आकर्षक तर आहेत सोबतच प्रोसेसिंगच्या बाबतीत पण पावरफुल आहे. कंपनीने हा फोन क्वॉलकॉमच्या पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 सह सादर केला आहे जो 7 नॅनोमीटर टेक्नोलॉजी वर बनला आहे. विशेष म्हणजे क्वॉलकॉमच्या या चिपसेट मध्ये 5जी मोडेम इंटिग्रेटेड आहे जो Vivo Apex 2020 ला पण 5G कनेक्टिविटी देतो. तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 60वॉट वायरलेस चार्जिंगल सपोर्ट करतो.
Vivo Apex 2020 कंपनीने 12 जीबी रॅम वर सादर केला आहे तसेच फोन मध्ये 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. लक्षात असू दे कि वीवो अपेक्स फोन पूर्णपणे बटण व पोर्ट लेस असतात. म्हणजे Apex 2020 मध्ये पण तुम्हाला कोणतेही बटण किंवा पोर्ट मिळणार नाहीत. या कॉन्सेप्ट फोनचे साईज डायमेंशन 157.25×66.2×8.8एमएम असे आहेत तर फोनचे वजन एकूण 169 ग्राम आहे. वीवो अपेक्स 2020 ब्लॅक आणि व्हाईट दोन कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

















