एक्सक्लूसीव: लवकरच भारतात पण लॉन्च होईल वीवो अॅपेक्स, कंपनी ने सांगितला प्लान

या वर्षी फेब्रुवारी मध्ये झालेल्या मोबाइल वर्ल्ड कॉन्ग्रेस 2018 मध्ये वीवो ने आपल्या एका नवीन कॉन्सेप्ट फोन चे प्रदर्शन केले होते. कंपनी ने अॅपेक्स दाखवला होता ज्यात अ​दृश्य फ्रंट कॅमेरा देण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी कंपनी ने घोषणा केली आहे की 12 जूनला हा फोन लॉन्च केला जाईल. पण तेव्हा हा फोन फक्त चीन मध्ये लॉन्च होईल. परंतु 91मोबाइल्स ला या फोन बद्दल एक खास माहिती मिळाली आहे.

29 मे ला भारतात वीवो एक्स21 चा लॉन्च होता जो जगातील पहिला फोन आहे ज्यात स्क्रीन खाली फिंगर​प्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. या फोन च्या लॉन्च बद्दल कंपनी च्या एका अधिकाऱ्याने आम्हाला माहिती दिली आहे की कंपनी याच्या भारतातील लॉन्च बद्दल योजना बनवत आहे आणि लवकरच हा फोन इंडिया मध्ये पण उपलब्ध होईल. पण त्यांनी लॉन्च डेट बद्दल माहिती दिली नाही. एवढे मात्र निश्चित की कंपनी अॅपेक्स भारतात लवकरच लॉन्च करेल.

त्याचबरोबर वीवो अॅपेक्स बद्दल आम्हाला दुसरीकडून पण एक रोचक माहिती मिळाली आहे. त्यांचे म्हणणे होते की वीवो एक्स21 टेस्ट साठी भारतात लॉन्च करण्यात आला आहे. इथे या डिवाइस साठी लोकांची मागणी आल्यास कंपनी अॅपेक्स पण लवकरच लॉन्च करेल. नाही तर यात थोडा वेळ लागु शकतो.

काही दिवसांपूर्वी अॅपेक्स बद्दल काही खास माहिती आली आहे. बातमीनुसार हा फोन रेक्स नावाने लॉन्च केला जाऊ शकतो आणि हा दोन मॉडेल मध्ये सादर केला जाऊ शकतो. एक मॉडेल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह उपलब्ध होऊ शकतो तर दुसरा मॉडेल क्चालकॉम स्नपड्रगन 710 चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो.

डिजाइन च्या बाबतीत हा फोन पूर्णपणे नवीन आहे. वीवो अॅपेक्स मध्ये बेजल फ्री डिजाइन आहे आणि याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 98 टक्के आहे. फोनच्या तिन्ही किनार्‍यांवर बेजल नाही आहे. वरच्या बाजूला बेजल नाहीच आहे. दोन्ही बाजूला फक्त है 1.8एमएम चे बारीक बेजल आहेत. फक्त खालच्या बाजूला 4.3एमएम चा जाड बेजल देण्यात आला आहे. तसेच वीवो एक्स21 प्रमाणे या फोन मध्ये पण अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. वीवो एक्स21 मध्ये स्क्रीन वर एक खास जागेवर टच केल्यावर फोन अनलॉक होतो. तर यात स्क्रीन च्या खालच्या भागात तुम्ही कुठेही टच करून फोन अनलॉक करू शकता. आता पर्यंत अशी टेकनोलॉजी अॅप्पल आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांकडे पण नाही.

वीवो एक्स21 सेल्फी कॅमेरा लपलेला आहे आणि कॅमेरा अॅक्टिव होताच बाहेर येतो, याचा वेग चांगला आहे. रियर पॅनल मध्ये 12-एमपी+12-एमपी चा डुअल रियर कॅमेरा आणि 8-एमपी चा फ्रंट कॅमेरा मिळेल. पण सध्यातरी भारतात या फोन च्या लॉन्च बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. या फोन मध्ये 5.99 इंचाची स्क्रीन मिळेल. कंपनी यात फुल एचडी+ ओएलईडी डिसप्ले देऊ शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here