लाँचच्या आधी Vivo T3x 5G चे फुल स्पेसिफिकेशन आले समोर, जाणून घ्या माहिती

विवोने काही दिवसांपासून आपल्या Vivo T3x 5G स्मार्टफोनचे भारतीय लाँच कंफर्म केले आहे. फ्लिपकार्ट टिझरमध्ये फोनबाबत प्रमुख माहिती पण पाहायला मिळाली आहे. परंतु अजून सादर होण्याची तारिख माहित नाही, याआधी ही डिव्हाईसचे प्रमोशनल मॅटेरियलचा लीक समोर आला आहे. ज्यात मोबाईलचे फुल स्पेसिफिकेशन आणि कलर ऑप्शनची माहिती पाहायला मिळाली आहे. चला, पुढे तुम्हाला विवो टी 3 एक्स 5 जी बाबत सर्व माहितीची अपडेट देत आहोत.

Vivo T3x 5G कलर ऑप्शन आणि स्टोरेज (लीक)

  • विवोच्या नवीन मोबाईल Vivo T3x 5G बद्दल हे लीक ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर समोर आले आहेत.
  • पोस्टमध्ये टिपस्टरने डिव्हाईसच्या प्रमोशनल मॅटेरियलला शेअर केले आहे. ज्यात डिव्हाईस क्रिम्सन ब्लिस आणि सेलीस्टियल ग्रीन सारखे दोन कलर ऑप्शनमध्ये येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • फोनची डिझाईन पाहता डिव्हाईसमध्ये बॅक पॅनलवर एक मोठा सर्कुलर कॅमेरा माड्यूल आहे ज्यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश पाहायला मिळते.
  • हे पण सांगण्यात आले आहे की डिव्हाईस तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात येईल. ज्यात 4GB रॅम +128 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम +128 जीबी स्टोरेज आणि 8GB रॅम + 128 जीबी स्टोरेज सामिल असणार आहेत.

Vivo T3x 5G स्पेसिफिकेशन (संपूर्ण माहिती लीक)

  • डिस्प्ले: लीकनुसार Vivo T3x 5G मध्ये 6.72-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि सेल्फी काढण्यासाठी पंच-होल कटआऊट मिळण्याची शक्यता आहे.
  • प्रोसेसर: मोबाईलमध्ये परफॉरमेंससाठी ब्रँड क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट दिली जाऊ शकते. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी एड्रेनो जीपीयू लावला जाऊ शकतो.
  • स्टोरेज: हा फोन तीन मेमरी व्हेरिएंटमध्ये येण्याची चर्चा आहे. ज्यात 4GB रॅम + 128GB स्टोरेज, 6GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेजचा समावेश आहे. स्टोरेज वाढविण्यासाठी यात मायक्रोएसडी कार्ड पण दिले जाऊ शकते. हेच नाही तर 8 जीबी एक्सटेंटेड रॅमला सपोर्ट पण मिळू शकतो.
  • कॅमेरा: Vivo T3x 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप LED फ्लॅशसह दिसून येत आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर असण्याची शक्यता आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP ची लेन्स दिली जाऊ शकते.
  • बॅटरी: Vivo T3x 5G फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 6,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • वजन आणि डायमेंशन: Vivo T3x 5G 7.99 मिमी पातळ आणि वजन 199 ग्रॅम सांगण्यात आले आहे.
  • इतर: सुरक्षेसाठी Vivo T3x 5G मध्ये साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरियो स्पिकर, पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी IP64 रेटिंग दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here