Vivo V27 Pro च्या संभाव्य किंमतीचा खुलासा; लवकरच येऊ शकतो भारतात

Highlights

  • Vivo V27, V27 Pro आणि V27e भारतात लाँच होऊ शकतात.
  • Vivo V27 Pro ची प्राइस लीकच्या माध्यमातून समोर आली आहे.
  • या फोनची किंमत 40 हजारांच्या आसपास असू शकते.

Vivo V27 Series लवकरच भारतात लाँच होणार आहे. कंपनीनं फोन्सची नावे देखील गुलदस्त्यात ठेवली आहेत. परंतु अशी चर्चा आहे की या सीरिजमध्ये Vivo V27, Vivo V27 Pro आणि Vivo V27e स्मार्टफोन लाँच होऊ शकतात. विविध लीक्समधून या मोबाइल्सच्या अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. तसेच आज सीरीजच्या सर्वात मोठ्या मॉडेल विवो वी27 प्रोच्या भारतातील किंमतीचा खुलासा देखील झाला आहे.

Vivo V27 Pro ची किंमत फोन लाँचच्या आधीच समोर आली आहे. टेक वेबसाइट प्राइसबाबानं आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की हा मोबाइल 8 जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो, ज्यात 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेज दिली जाईल. इंडस्ट्री सोर्सचा हवाला देत रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की विवो वी27 प्रो इंडिया 40 हजार रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ही फोनची प्रारंभिक किंमत असू शकते. हे देखील वाचा: अ‍ॅमेझॉनवरून विकला जाईल शाओमीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली फोन; तारीख ठरली

Vivo V27 Series Specifications

समोर आलेल्या माहितीनुसार, विवो वी27 स्मार्टफोन भारतात लाँच होणार असलेला पहिला असा स्मार्टफोन असेल जो मीडियाटेक डिमेनसिटी 7200 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. हा फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतो. बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा विवो फोन black रंगा सोबतच color changing blue व्हेरिएंटमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: आयफोनच्या तोडीची OPPO Reno 10 सीरिज येणार बाजारात; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक

विवो वी27 प्रो मॉडेल पाहता हा देखील मीडियाटेेक चिपसेटसह बाजारात येऊ शकतो. या फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले दिली जाईल तसेच यात Sony IMX कॅमेरा सेन्सर मिळू शकतात. हा स्मार्टफोन मॉडेल मीडियाटेक डामेंसिटी 8200 चिपसेटसह भारतीय बाजारात एंट्री करू शकतो. Vivo V27 ची प्राइस 35,000 रुपयांच्या आसपास तर Vivo V27 Pro स्मार्टफोनची किंमत 40,000 रुपयांची रेंजमध्ये ठेवली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here