फक्त 8,499 रुपयांमध्ये दमदार फीचर्स असलेला Smart TV; 23 सप्टेंबरपासून होणार विक्री

Westinghouse Launches 32 Inch Pi Series Smart TV In Just 8499 Rupees Know Details

Westinghouse Launches 32-inch Pi Series Smart TV: अमेरिकन कंपनीनं Westinghouse नं भारतीय युजर्सना खुश करण्यासाठी नवीन 32 इंच (WH32SP17) Pi series Smart TV सादर केला आहे. कंपनीनं आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोमधील या नव्या Smart TV ची किंमत फक्त 8,499 रुपये ठेवली आहे. या Westinghouse TV मध्ये एचडी रेडी क्वॉलिटी, हाय एन्ड साउंड टेक्नॉलॉजी आणि बेजल-लेस डिजाइनसह पिक्चर क्वॉलिटीमध्ये सर्वात मोठं इनोवेशन करण्यात आलं आहे. भारतात टीव्ही सर्वात मोठ्या टीव्ही निर्मात्यांपैकी एक SPPL द्वारे बनवण्यात आला आहे. हा नवीन मॉडेल 23 सप्टेंबरपासून The Great India Festival Sale दरम्यान Amazon वर विकला जाईल.

Westinghouse 32-inch Pi Series स्मार्ट टीव्ही फीचर्स

Westinghouse चा 32 इंचाचा नवीन smart Android TV एक एचडी रेडी टीव्ही आहे. या टीव्हीमध्ये 4 जीबी स्टोरेज आणि 512MB रॅम देण्यात आली आहे. टीव्हीमध्ये कंपनीनं डिजिटल नॉइज फिल्टर दिला आहे. यात क्वॉड कोर ए35 प्रोसेसर मिळतो. टीव्हीमध्ये कंपनीनं दिलेला A+ पॅनल शार्प डिटेल आणि व्हायब्रन्ट कलरसह वाइड-अँगलवर शानदार व्हिज्युअल क्वॉलिटी मिळेल. प्रत्येक व्यूइंग अँगलवरून ब्राइटनेस आणि कंट्रांस्ट क्वॉलिटी शानदार मिळेल, असा दावा कंपनीनं केला आहे. हे देखील वाचा: अगदी नव्या सारखे होतील रियलमीचे फोन; पाहा Android 13 Update मिळणाऱ्या स्मार्टफोनची संपूर्ण यादी

Westinghouse Launches 32 Inch Pi Series Smart TV In Just 8499 Rupees Know Details

वेस्टिंगहाउसच्या या स्वस्त स्मार्ट टीव्हीमध्ये 3 HDMI पोर्ट आणि यूएसबी पोर्ट मिळतो. यातील 30W चे दोन स्पिकर शानदार ऑडिओ क्वॉलिटी देतात. टीव्हीमध्ये डिजिटल ऑडियो ऑटपुट आणि सराउंड साउंडसह दमदार साउंड आउटपुट मिळतो. यात Google Play Store अ‍ॅक्सेस असल्यामुळे मल्टीपल अ‍ॅप्स आणि गेम देखील इन्स्टॉल करता येतील. युजर्स त्यांच्या आवडीनुसार अ‍ॅप्स टीव्हीमध्ये डाउनलोड करू शकतील. टीव्हीमध्ये आधीपासूनच युट्युब, प्राइम व्हिडीओ, Sony Liv, Zee5 आणि ErosNow सब्सक्रिप्शन मिळतं.

अन्य Westinghouse स्मार्ट टीव्हीवर देखील मिळेल डिस्काउंट

Westinghouse टीव्हीचा 24 इंच (WH24PL01) मॉडेल फक्त 5,499 रुपये किंमतीत विकत घेता येईल. जो HD रेडी 1366 x 768 पिक्सेल रिजॉल्यूशन डिस्प्ले, 20W स्पिकर आउटपुट, 2 स्पिकर, ऑडियो इक्वलाइजर सारख्या फीचर्ससह येतो. हे देखील वाचा: BGMI Lite Release Date: साइज कमी परंतु मजा तीच! Battlegrounds Mobile India Lite लाँचचा खुलासा

Westinghouse Launches 32 Inch Pi Series Smart TV In Just 8499 Rupees Know Details

विशेष म्हणजे Westinghouse च्या अन्य टीव्ही मॉडेल देखील मोठा डिस्काउंट दिला जाईल. अ‍ॅमेझॉनवर होणाऱ्या सेल दरम्यान कंपनीचा 32 इंच असलेला WH32PL09 सेलमध्ये 6,999 रुपयांमध्ये मिळेल. तसेच 40 इंच (WH40SP50) FHD smart Android TV 13,999 रुपयांमध्ये मिळेल. 43 इंचाच्या FHD TV (WH43SP99) साठी 15,999 रुपये मोजावे लागतील. तर सर्वात मोठा UHD 55 इंचाचा टीव्ही फक्त 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here