Vivo V29 ला मिळालं आणखी एक सर्टिफिकेशन; लवकरच होऊ शकते बाजारात एंट्री

Highlights

  • विवो वी29 सीरीजमध्ये तीन फोन होऊ शकतात लाँच.
  • जुलैमध्ये हा फोन बाजारात येऊ शकतो.
  • 8जीबी रॅम सपोर्ट दिला जाऊ शकतो.

विवो वी29 सीरीज लाँचसाठी तयार होत आहे ज्यात Vivo V29 वॅनिला मॉडेल सोबतच Vivo V29 Pro आणि Vivo V29 Lite सारखे फोन देखील एंट्री करू शकतात. गेल्या काही दिवसांत ही सीरीज अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसली आहे आता नवीन अपडेटमध्ये विवो वी29 ग्लोबल सर्टिफिकेशन फोरम (जीसीएफ) वर दिसला आहे. सर्टिफिकेशन्स संबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo V29 जीसीएफ लिस्टिंग

  • Vivo चा नवीन डिवाइस मॉडेल नंबर V2250 आणि मार्केटिंग नेम V29 सह दिसला आहे. GCF सर्टिफिकेशन वरून असं देखील समजलं आहे की Vivo V29 अनेक 5G बँड्सना सपोर्ट करेल. ज्यात n1, n2, n3, n5, n8, n20, n28 (200Hz / 300Hz बँडविड्थ), n38, n40 , एन41, एन66, एन77 आणि एन78 चा समावेश केला जाऊ शकतो. एक महत्वाची बाब म्हणजे GCF आणि अन्य लिस्टिंगमध्ये फोनसह 5G जोडण्यात आलं नाही.

    Vivo V29 5G गीकबेंच लिस्टिंग

    • गीकबेंचवर हा फोन V2250 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
    • ह्यात 8जीबी रॅम सपोर्ट मिळेल असं सांगण्यात आलं होतं.
    • डिवाइसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस चिपसेट असल्याचं उल्लेख देखील होता.
    • तसेच डिवाइस अँड्रॉइड 13 ओएसवर चालेल.

    Vivo V29 5G चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

    • डिस्प्ले: लीकनुसार विवो वी29 5जी फोनमध्ये 6.5 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. ज्यात 1080 x 2408 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जाईल.
    • प्रोसेसर: डिवाइसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस ऑक्टा कोर प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो.
    • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत डिवाइस 4,500 एमएएच बॅटरीसह येईल. ह्यात फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील असेल. परंतु फास्ट चार्जिंगची माहिती लीक झाली नाही.
    • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित असेल.
    • कॅमेरा: Vivo V29 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2 मेगापिक्सल डेप्थ आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळू शकते. तर सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here