अ‍ॅमोलेड डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह Vivo V29 Lite लाँच, जाणून घ्या किंमत

Highlights

  • फोन चेक रिपब्लिकमध्ये सादर झाला आहेत.
  • ह्यात 8GB RAM सपोर्ट मिळतो.
  • स्नॅपड्रॅगन 695 ची प्रोसेसिंग पावर आहे.

अनेक रिपोर्ट्समधून सांगण्यात आले होते की विवो आपल्या Vivo V29 सीरिजचे स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करेल. त्यानुसार V29 सीरिजचा पहिला फोन Vivo V29 Lite 5G आता अधिकृतपणे चेक रिपब्लिकमध्ये सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ह्या नव्या विवो स्मार्टफोनची किंमत फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo V29 Lite ची किंमत

Vivo V29 Lite 5G स्मार्टफोन सध्या प्री सेलसाठी उपलब्ध आहे आणि 15 जूनपासून ह्याची विक्री सुरु होईल. हा डिवाइस 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह आला आहे, ज्याची किंमत CZK 8,499 ठेण्यात आली आहे, ही किंमत 31,808 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन डार्क ब्लॅक आणि समर गोल्ड कलरमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं ह्या सोबत दोन वर्षांची वॉरंटी देत आहे.

Vivo V29 Lite चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Vivo V29 Lite फोनमध्ये 6.78 इंचाचा एफएचडी + अ‍ॅमोलेड पॅनल देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 आस्पेक्ट रेशियो, 300Hz टच सॅम्पलिंग रेट, 2160Hz PWM आय प्रोटेक्शन, 1,300 निट्झ पर्यंत ब्राईटनेस आणि DCI-P3 कलर गामुट.
  • प्रोसेसर : Vivo V29 Lite मध्ये कंपनीनं स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटची ताकद दिली आहे.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते.
  • बॅटरी : डिवाइस 5000mAh बॅटरीसह आला आहे ज्यात 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • कॅमेरा : फोनमध्ये OIS सपोर्ट असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, जोडीला 2-मेगापिक्सलची बोकेह लेन्स आणि 2-मेगापिक्सलची मायक्रो लेन्स आहे. तसेच, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर आधारित फनटच ओएस 13 देण्यात आला आहे. ह्या फोनला दोन मोठे अँड्रॉइड अपडेट आणि 3 वर्ष सिक्योरिटी अपडेट मिळतील.
  • कनेक्टिव्हिटी : फोनमध्ये ड्युअल-सिम 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत.
  • अन्य फीचर्स : Vivo V29 Lite ला IP54 रेटिंग मिळाली आहे. ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून हा सुरक्षित राहतो. तर सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here