Vivo X100 सीरिजमधील चिपसेटची माहिती लीक; लवकरच येऊ शकते बाजारात

Highlights

 • Vivo X100 आणि Vivo X100 Pro मध्ये Dimensity 9300 चिपसेट दिला जाईल.

 • Vivo X100 Pro+ मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen3 चिपसेट मिळेल.
 • दोन्ही चिपसेट काही महिन्यांनी लाँच केले जातील.

Vivo X80 आणि Vivo X90 सीरिज चीन आणि भारतात सादर केल्यानंतर कंपनी आता पुढील सीरिज काम करत आहे, जी Vivo X100 नावानं येईल. ही नवीन सीरिज यावर्षीच्या अखेरीस लाँच केली जाऊ शकते, ज्यात Vivo X100, Vivo X100 Pro आणि Vivo X100 Pro+ असे तीन मॉडेल असू शकतात. परंतु कंपनीच्या अधिकृत घोषणेपुर्वीच ह्या तिन्ही मॉडेलची माहिती टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं दिली आहे.

Vivo X100 सीरिज चिपसेट

 • डिजिटल चॅट स्टेशननुसार, Vivo X100 आणि Vivo X100 Pro मध्ये डायमेन्सिटी 9300 चिपसेट दिला जाईल.
 • हे विवो फोन जगातील पहिले स्मार्टफोन्स असतील ज्यात हा डायमेन्सिटी चिपसेट वापरला जाईल.
 • तुम्हाला तर माहित असेल की Vivo X90 आणि X90 Pro मध्ये डायमेन्सिटी 9200 चिपसेट देण्यात आला होता.
 • तर Vivo X100 Pro+ स्मार्टफोनला क्वॉलकॉमच्या Snapdragon 8 Gen3 चिपसेटची पावर दिली जाईल.
 • क्वॉलकॉमनं सांगितलं आहे की 2023 चा टेक समिट 24 ते 26 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केलं जाईल, ज्यातून हा चिपसेट सादर केला जाऊ शकतो.

Vivo X100 सिरीजचे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

 • ह्याआधी आलेल्या लिक्सनुसार Vivo 100 Pro+ मध्ये पूर्वीप्रमाणे 1-इंचाचा सोनी आयएमएक्स989 मुख्य सेन्सर म्हणून दिला जाईल. जो Vivo X90 Pro+ मध्ये देखील दिसला होता.
 • Vivo X100 Pro+ मध्ये व्हेरिएबल अपर्चर दिला जाईल. त्यामुळे युजर्सना मुख्य कॅमेऱ्याचा अपर्चर स्वतःहून बदलता येईल आणि ते सेन्सरमध्ये येणारा प्रकाश नियंत्रित करू शकतील.
 • मुख्य कॅमेरा सेन्सरच्या जोडीला एक पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा ऑप्टिकल झूमसाठी दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये Vivo V3 चिप दिली जाऊ शकते.
 • त्याचबरोबर डिजिटल चॅट स्टेशननं सांगितलं आहे की डिवाइसमध्ये ग्लास बॅकसह 100 वॉट फास्ट चार्जिंग मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here