150km रेंज सह आली स्टायलिश Hop Oxo electric bike; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Highlights

  • या इलेक्ट्रिक बाइकची किंमत 1.60 लाख रुपयांपासून सुरु होते.
  • बाइक 4 तासांमध्ये 0 ते 80% चार्ज करता येईल.
  • HOP OXO मध्ये 3.75 Kwh ची लिथियम बॅटरी आहे.

Hop Electric नं अखेरीस मार्केटमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक सादर केली आहे. कंपनीनं सादर केलेल्या electric bike चं नाव Hop Oxo आहे जी सिंगल चार्जमध्ये 150km ची रेंज देते. Jaipur-based electric vehicle Hop Oxo दोन व्हेरिएंट– Oxo आणि Oxo X मध्ये लाँच करण्यात आली आहे. किंमत आणि रेंज पाहता या इलेक्ट्रिक बाइकला भारतातील Revolt RV400 आणि Tork Kratos शी स्पर्धा करावी लागेल. या New Electric Bike ची किंमत, फीचर्स आणि टॉप स्पीडची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Hop Oxo electric bike price आणि Sale

हॉप ऑक्सो इलेक्ट्रिक बाइक ऑक्सो आणि ऑक्सो एक्स अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल आणि यांची किंमत अनुक्रमे 1.25 लाख रुपये आणि 1.40 लाख रुपये आहे. ही ई-बाइक हॉपच्या देशातील 100 एक्सपीरियंस सेंटरसह ऑनलाइन देखील उपलब्ध होईल. ऑक्सो आणि ऑक्सो एक्स तीन कलर ऑप्शन- रेड, ग्रीन आणि ब्लू मध्ये खरेदी करता येईल. हे देखील वाचा: फक्त स्कूटर नव्हे आता Ola ची Electric Bike देखील येणार; लाँच पूर्वीच जाणून घ्या किंमत, रेंज आणि फीचर्स

तसेच ऑक्सो एक्स व्हेरिएंटमध्ये कनेक्टिव्हिटी फीचर्ससह बॅटरीवर 4 वर्ष/अनलिमिटेड-किलोमीटरची वॉरंटी मिळते. तर स्वस्त ऑक्सोच्या बॅटरीवर 4 वर्ष/50,000 किमीची वॉरंटी उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरिएंटमध्ये मोटर, चार्जर आणि कंट्रोलरवर 3 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.

Hop Oxo specifications

ऑक्सोमध्ये 3kW / 5.2kW (पीक) मोटार मिळते, तर ऑक्सो X मध्ये देण्यात आलेली मोटार 6.3kW पेक्षा थोडी जास्त पीक पावर देते. मोटर 3.75 kWh बॅटरी पॅकशी जोडण्यात आली आहे जी 5 तासांत (0-100 टक्के) फुल चार्ज होऊ शकते. ऑक्सोमध्ये इको, पावर आणि स्पोर्ट असे तीन रायडींग मोड मिळतात, तर ऑक्सो एक्स मध्ये अतिरिक्त टर्बो मोड मिळतो. ऑक्सो आणि ऑक्सो एक्स अनुक्रमे ताशी 90 किमी आणि ताशी 95 किमीचा टॉप स्पीड देतात. हे देखील वाचा: 75KM रेंज सह लाँच झाली Odysse Trot इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत आहे परवडणारी

ऑक्सो आणि ऑक्सो एक्स एकदा चार्ज केल्यावर 150 किमीची रेंज मिळते. तसेच ऑक्सो ट्विन्स मध्ये 18 इंचाचे फ्रंट आणि 17 इंचाचे रियर अलॉय व्हील आणि ट्विन डिस्क ब्रेक, एलईडी लाइटिंग, 5 इंच एलसीडी इंस्ट्रूमेंटेशन, 180 मिमी ग्राउंड क्लीयरेंस आणि इलेक्ट्रिकल्ससाठी आयपी रेटिंग मिळते तसेच ऑक्सो एक्स मध्ये 4G आणि GPS क्षमता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here